TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
कां हो घ्या ना विडी ? अशी...

लावणी ७१ वी - कां हो घ्या ना विडी ? अशी...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


लावणी ७१ वी
कां हो घ्या ना विडी ? अशी कोण नार फाकडी ? ।
रोज मजविशी घातली अढी अढी ॥धृ०॥
पहिले दिस तूं कां रे विसरला ? ।
ममता लावुन कां दुर झाला ? ।
चित्तापासुन सांगा मजला । समजाविते तुज घडोघडी ॥१॥
असें मजला जरि ठाउक असतें ।
पहिलेच मी तुजलागी कसते ।
आढी धरून तुजवर कां रुसते ? । प्रचीत आली रोकडी ॥२॥
कोण सवत पाहेली मजवरते ? ।
मोहिले तुजला अजवरते ।
इष्क लागला तुमचा तिजवरते । उमज आतां तातडी ॥३॥
असें उत्तर ऐकून सख्यानें ।
ह्रदयीं धरिली सखी हर्षानें ।
होनाजी बाळा चीं प्रिय कवनें । जाती अमृतघडी ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:23.9830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सवत

  • स्त्री. १ सपत्नी ; एकाच नवर्‍याची दुसरी बायको . २ ( ल . ) प्रतिस्पर्धी . वेदातें म्हणे मज हे । सवती जाली । - ज्ञा १६ . २३५ . [ सं . सपत्नी ; प्रा . सवत्ती ; हिं . सौती ] 
  • ०मत्सर सवतीमत्सर - पु . १ एकाच नवर्‍याच्या दोन बायका असतां त्यांस परस्परांबद्दल वाटणारा हेवा ; द्वेष . म्हणे रावणपत्न्यांनीं मारली । सवती मत्सर करोनियां । २ ( सामान्यतः ) स्पर्धा ; हेवा ; मत्सर ( दोन अनुयायी , सेवक , भृत्य वगैरे मधील ). सवतवळा - पु . सवतीसवती ; एका नवर्‍याच्या अनेक बायका समुच्चयानें . सवतळा सवताळा - पु . १ एकाच स्त्रीशीं लग्न करूं इच्छिणारे दोन अथवा अधिक गृहस्थ परस्पर . २ जार ; यार ; प्रियकर . ( गो . ) सवतो . सवतीचें भांडण - न . एक मुलींचा खेळ . - मखेपु २९२ . 
  • f  A rival wife, 
  • सवती सवती Rival wives. 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.