TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
भोग दे जिविच्या गुणग्राही...

लावणी ५६ वी - भोग दे जिविच्या गुणग्राही...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


लावणी ५६ वी
भोग दे जिविच्या गुणग्राही ! ।
ठेविला प्राण तुझे पाईं ॥धृ०॥
केली सेवा आजवर म्या हो । आतां जें मागेन तें द्या हो
फावल्या वेळे समयीं या हो । भेट मज गरिबाची घ्या हो
माझें भाषण तरि ऐका हो । जशि मैना करिते टाहो
नाहीं मागत विशेष कांहीं ॥१॥
येथें कां मन तुमचें जातें ? । कोणीकडे न्याल तेथें येतें ।
चित्त पहिलें प्रशस्त होतें । आतां पातळ दिसतें नातें ।
नग्न मी ह्र्दयावर घेतें । उरासि धरुनी मुके देतें
तुम्हिच शिरिमंत, मी अन्याई ॥२॥
हेत मजवर तुमचा कैसा । जसा जळीं बक धरितो मासा
प्रीतिची असले तर पोसा । उपद्रव लागेल तो सोसा
रोज भोगा घटका तासा । कसोटीं देह माझा घासा
लागली प्रीतिची मिठाई ॥३॥
सख्या तूंअ मम जिविच्या जिवना । तुझी कांता राजिवनयना
करि चटपट जिव हा राहावेना । निथळतें जळ माझ्या नयना
होनाजी बाळा म्हणे, मना आलीस पुरती
अमच्या ध्यानीं रहात जा सुखी बारमाही ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:23.1100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दाम करी काम, बिबी करी सलास

  • सर्व गोष्टी पैशानें साध्य होतात, किंबहुना कोणी स्त्रीसुद्धां पैशानें वश करतां येतें. moneya makes the mare go. 
RANDOM WORD

Did you know?

गोकुळ अष्टमी उपास आज करायचा? की उद्या करायचा?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site