मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
ये गोविंदा नंद-नंदा वना ज...

लावणी १९८ वी - ये गोविंदा नंद-नंदा वना ज...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


ये गोविंदा नंद-नंदा वना जाय रे ॥धृo॥
निज गुज बोले माता यश्वदा ।
धेनू सोडी बाळ मुकुंदा ।
उभा कीं ये द्बारीं वडजा पेंदा ।
त्यासी मी सांगुं तरी काय रे ? ॥१॥
ऊठ ऊठ वेगीं, सूर्य उदेला ।
गाई गोधनासी बहु वेळ झाला ।
सिद्ध शिदोरी दहीदुधकाला ।
सवंगडियाचे सजय ( ? ) खाय रे ॥२॥
केशवा माधवा कृष्ण मुरारी ।
मुरली अधरीं धरी हरि पूतनारी ।
कुंभ घेऊनी शिरीं उभ्या व्रजनारी ।
घडि घडि राधा तुज पाहे रे ॥३॥
गोविंदराव म्हणे त्रैलोक्यपाळा ।
वृत्ती गाई अमुच्या प्रीतींनें पाळा ।
सर्वव्यापक तू जग-प्रतिपाळा ।
बाळक राघू गणू गाइ रे ॥४॥
ये-हे !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP