मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
वसंतोत्सव

द्वितीय परिच्छेद - वसंतोत्सव

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


चैत्रकृष्णप्रतिपदिवसंतोत्सवः साचौदयिकीग्राह्या प्रवृत्तेमधुमासेतुप्रतिपद्युदितेरवावितिभविष्योक्तेः दिनद्वयेतथात्वेपूर्वा वत्सरादौवसंतादौबलिराज्येतथैवच पूर्वविद्धैवकर्तव्याप्रतिपत्सर्वदाबुधैरितिवृद्धवसिष्ठवचनात् ‍ अत्रविशेषोहेमाद्रौभविष्ये चैत्रेमासिमहाबाहोपुण्येतुप्रतिपद्दिने यस्तत्रश्वपचंस्पृष्ट्वास्नानंकुर्यान्नरोत्तमः नतस्यदुरितंकिंचिन्नाधयोव्याधयोनृपेति तथा प्रवृत्तेमधुमासेतुप्रतिपद्युदितेरवौ कृत्वाचावश्यकार्याणिसंतर्ष्यपितृदेवताः वंदयेद्धोलिकाभूमिंसर्वदुः खोपशांतये मंत्रश्च वंदितासिसुरेंद्रेणब्रह्मणाशंकरेणच अतस्त्वंपाहिनोदेविभूतेभूतिप्रदाभवेति अत्रचूतकुसुमप्राशनमुक्तंतत्रैवपुराणसमुच्चये वृत्तेतुषारसमयेसितपंचदश्यांप्रातर्वसंतसमयेसमुपस्थितेच संप्राश्यचूतकुसुमंसहचंदनेनसत्यंहिपार्थपुरुषोऽथसमाः सुखीस्यात् ‍ मंत्रस्तु चूतमग्र्यंवसंतस्यमाकंदकुसुमंतव सचंदनंपिबाम्यद्यसर्वकामार्थसिद्धय इति चैत्रामावास्यामन्वादिः साचापराह्णव्यापिनीग्राह्या कृष्णपक्षस्थत्वात् ‍ इतिफाल्गुनमासः समाप्तः ॥

चैत्रकृष्णप्रतिपदेस वसंतोत्सव करावा . ती प्रतिपदा सूर्योदयव्यापिनी घ्यावी . कारण , " प्रतिपदेंत सूर्योदयकालीं मधुमास ( चैत्रमास ) प्रवृत्त झाला असतां " असें भविष्यपुराणवचन आहे . दोन दिवस सूर्योदयकालीं प्रतिपदा असतां पहिली घ्यावी . कारण , " संवत्सरारंभाची प्रतिपदा , वसंतारंभाची प्रतिपदा आणि बलिप्रतिपदा ह्या सर्वदा विद्वानांनीं पूर्वविद्धाच कराव्या . " असें वृद्धवसिष्ठाचें वचन आहे . ह्या प्रतिपदेस विशेष सांगतो हेमाद्रींत भविष्यांत - " चैत्रमासांत पुण्य कारक प्रतिपदेच्या दिवशीं जो मनुष्य अंत्यजांस ( चांडालादिकांस ) स्पर्श करुन स्नान करील त्याला कोणतेंही पातक असणार नाहीं , आणि मनोव्यथा व शारीरव्याधि होत नाहींत . " तसेंच - " प्रतिपदेंत सूर्योदयकालीं मधुमास प्रवृत्त झाला असतां स्नानसंध्यादि आवश्यक कृत्यें करुन पितर व देवता यांचें तर्पण करुन सर्व दुःखांच्या शांतीसाठीं होळीच्या भूमीला नमस्कार करावा . " नमस्काराचा मंत्र - " वंदितासि सुरेंद्रेण ब्रह्मणा शंकरेण च ॥ अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव . " या प्रतिपदेस आम्रकुसुमप्राशन सांगतो तेथेंच पुराणसमुच्चयांत - " फाल्गुनशुक्लपौर्णिमेस शिशिर ऋतु संपल्यावर प्रातःकालीं वसंत ऋतु प्राप्त झाला असतां आंब्याचा मोहर चंदनासह वाटून प्राशन केल्यानें तो पुरुष वर्षपर्यंत सुखी होईल . " आम्रकुसुमप्राशनाचा मंत्र - ‘ चूतमग्र्यं वसंतस्य माकंद कुसुमं तव ॥ सचंदनं पिबाम्यद्य सर्वकामार्थसिद्धये ॥ ’ चैत्री अमावास्या ही मन्वादि आहे . ती कृष्णपक्षांतील मन्वादि असल्यामुळें अपराह्णव्यापिनी घ्यावी . याप्रमाणें फाल्गुनमासाचा निर्णय समाप्त झाला .

एवंनिरुपितमिदंगहनंतुकालतत्त्वंविचार्यवचनैश्चनयैश्चसम्यक् ‍ तद्दोषदृष्टिमपहायविवेचनीयंविद्वद्भिरित्य विरतंप्रणतोस्मितेषु १

मयासद्वाऽसद्वायदिहगदितंमंदमतिनाकिमेतच्छक्यंवाध्यवसितुमपिस्वल्पमतिना तदेवंयत्किंचिद्गदितमिहविख्यातमहिमाप्रतापोऽयंसर्वोविकसतितुपित्रोश्चरणयोः २

योभाट्टतंत्रगहनार्णवकर्णधारः शास्त्रांतरेषुनिखिलेष्वपिमर्मभेत्ता योऽत्रश्रमः किलकृतः कमलाकरेणप्रीतोऽमुनाऽस्तुसुकृतीबुधरामकृष्णः ३

इतिश्रीमन्नारायणभट्टसूरिसूनुरामकृष्णभट्टसुतदिनकरभट्टानुजकमलाकरभट्टकृते निर्णयसिंधौसंवत्सरकृत्यनिरुपणंनामद्वितीयपरिच्छेदः समाप्तः ।

या प्रकारानें हें गहन ( समजण्यास कठीण ) असें कालाचें तत्त्व ऋषिवचनांनीं व न्यायांनीं चांगला विचार करुन निरुपण केलें आहे . विद्वानांनीं दोषदृष्टि दूर करुन त्याचें विवेचन करावें . म्हणून विद्वानांचे ठिकाणीं सतत मी नम्र झालों आहें . ॥१॥

मी मंदमति कमलाकरानें येथें चांगलें किंवा वाईट जें सांगितलें आहे तें स्वल्पमति अशा मला मनांत आणण्याविषयीं तरी शक्य आहे काय ? तस्मात् ‍ या ग्रंथांत जें कांहीं मीं निरुपण केलें हा सारा मातापितरांच्या चरणांचा विख्यातमहिमा प्रताप प्रफुल्लित झालेला आहे , असें समजावें . ॥२॥

या ग्रंथांत जो मी कमलाकारानें श्रम केला आहे त्या श्रमानें , जो मीमांसारुप गहन ( खोल ) समुद्राचा नावाडी व इतर सर्वशास्त्रांचेंही मर्म जाणणारा असा धन्य पंडित रामकृष्ण ( माझा पिता ) संतुष्ट असो ॥३॥

इति द्वितीय परिच्छेदाची महाराष्ट्र टीका समाप्त झाली .

इति द्वितीयपरिच्छेदः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 21, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP