मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
भाद्रपद अमावास्या

द्वितीय परिच्छेद - भाद्रपद अमावास्या

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


भाद्रामावास्यायांकुशग्रहणमुक्तं हेमाद्रौहारीतेन मासेनभस्यमावास्यातस्यांदर्भोच्चयोमतः अयातयामास्तेदर्भाविनियोज्याः पुनः पुनः नभाः श्रावणः तेनदर्शांतमासेजन्माष्टम्यनंतरंदर्शोलभ्यते मदनरत्नेतु मासेनभस्येमावास्यातस्यांदर्भोच्चयोमत इतिमरीचिवाक्यमुक्तं नभस्योभाद्रपदः तेनमहालयांतर्गतदर्शोलभ्यते अत्रगौणमुख्यचांद्राभ्यामेकएवदर्श इत्यन्ये ।

भाद्रपद अमावास्येस नवीन दर्भ काढण्यास सांगतो हेमाद्रींत - हारीत - “ श्रावणमासीं अमावास्येस नवीन दर्भसंचय करावा, ते दर्भ पर्युषित ( वासे ) होत नाहींत म्हणून त्यांचा आप आपल्या कर्माविषयीं वारंवार उपयोग करावा. ” येथें ‘ नभस्‍ ’ या पदानें श्रावणमास समजावा, तेणेंकरुन दर्शांत मास धरला असतां जन्माष्टमीनंतरचा दर्श येतो. मदनरत्नांत तर - “ भाद्रपदांतील जी अमावास्या तिचे ठायीं दर्भग्रहण करावें ” असें मरीचिवचन सांगितलें आहे. तेणेंकरुन महालयांतील दर्श येतो. येथें गौण चांद्र ( पूर्णिमांत ) म्हटला म्हणजे भाद्रपद आणि मुख्य चांद्र ( अमावास्यांत ) म्हटला म्हणजे श्रावण असा समजून दोन्ही वचनांनीं एकच ( जन्माष्टमी नंतरचाच ) दर्श येतो, असें अन्य विद्वान्‍ सांगातात. 

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP