मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
शिवरात्रिनिर्णय

द्वितीय परिच्छेद - शिवरात्रिनिर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


फाल्गुनकृष्णचतुर्दशीशिवरात्रिः साचकेषुचिद्वचनेषुप्रदोषव्यापिनीग्राह्येत्युक्तम् ‍ केषुचिन्निशीथव्यापिनी तत्राद्यामाधवीये त्रयोदश्यस्तगेसूर्येचतसृष्वेवनाडिषु भूतविद्धातुयातत्रशिवरात्रिव्रतंचरेत् ‍ स्मृत्यंतरेपि प्रदोषव्यापिनीग्राह्याशिवरात्रिचतुर्दशी रात्रौजागरणंयस्मात्तस्मात्तांसमुपोषयेत् ‍ अत्रप्रदोषोरात्रिः उत्तरार्धेतस्याहेतुत्वोक्तेः कामिकेपि आदित्यास्तमयेकालेअस्तिचेद्याचतुर्दशी तद्रात्रिः शिवरात्रिः स्यात्साभवेदुत्तमोत्तमेति द्वितीयापितत्रैवनारदसंहितायाम् ‍ अर्धरात्रियुतायत्रमाघकृष्णचतुर्दशी शिवरात्रिव्रतंतत्रसोऽश्वमेधफलंलभेत् ‍ स्मृत्यंतरेपि भवेद्यत्रत्रयोदश्यांभूतव्याप्तामहानिशा शिवरात्रिव्रतंतत्रकुर्याज्जागरणंतथेति ईशानसंहितायाम् ‍ माघकृष्णचतुर्दश्यामादिदेवोमहानिशि शिवलिंगतयोद्भूतः कोटिसूर्यसमप्रभः तत्कालव्यापिनीग्राह्याशिवरात्रिव्रतेतिथिरिति अर्धरात्रादधश्चोर्ध्वंयुक्तायत्रचतुर्दशी तत्तिथावेवकुर्वीतशिवरात्रिव्रतंव्रती नार्धरात्रादधश्चोर्ध्वंयुक्तायत्रचतुर्दशी नैवतत्रव्रतंकुर्यादायुरैश्वर्यहानितः अर्धरात्रश्चद्वितीययामांत्यतृतीययामाद्यघटीद्वयरुप इतिमाधवः वचनंतूक्तंप्राक् ‍ एवंसतिपूर्वेद्युरेवोभयव्याप्तौपूर्वैव त्रयोदशीयदादेविदिनभुक्तिप्रमाणतः जागरेशिवरात्रिः स्यान्निशिपूर्णाचतुर्दशीतिस्कांदोक्तेः दिनभुक्तिरस्तमयः जयंतीशिवरात्रिश्चकार्येभद्राजयान्वितेइतिस्कांदाच्च दिनद्वयेनिशीथव्याप्तौहेमाद्रिमतेपूर्वा अर्धरात्रात्पुरस्ताच्चेज्जयायोगोयदाभवेत् ‍ पूर्वविद्धैवकर्तव्याशिवरात्रिः शिवप्रियैरितिपाद्मवचनात् ‍ मदनरत्नेप्येवम् ‍ गौडाअप्येवमाहुः ।

आतां शिवरात्रिनिर्णय - फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ( तीच अमावास्यांत मास या मानानें माघ कृष्ण चतुर्दशी ही ) शिवरात्रि आहे . ती कितीएक वचनांत प्रदोषव्यापिनी घ्यावी , असें आहे . आणि कितीएक वचनांत निशीथ मध्यरात्र , ( रात्रीचा मध्य मुहूर्त ) व्यापिनी घ्यावी , असें आहे . त्या दोहोंपैकीं पहिली ( प्रदोषव्यापिनी ) सांगतो माधवीयांत - " सूर्यास्तापासून चार घटिकांचे आंतच चतुर्दशीयुक्त जी त्रयोदशी तिचेठायीं शिवरात्रिव्रत करावें . " स्मृत्यंतरांतही - " शिवरात्रि चतुर्दशी प्रदोषव्यापिनी घ्यावी . ज्या कारणास्तव रात्रीं जागरण आहे म्हणून रात्रीं असलेल्या त्या चतुर्दशीस उपोषण करावें . " ह्या वचनांत प्रदोष म्हणजे रात्रि समजावी . कारण , पुढच्या अर्धांत रात्रीं जागरण हा हेतु सांगितला आहे . कामिकांतही - " सूर्याच्या अस्तकालीं जी चतुर्दशी असेल ती रात्र शिवरात्रि होय . ती उत्तमोत्तम आहे . " दुसरी ( निशीथव्यापिनी ) देखील तेथेंच नारदसंहितेंत सांगतो - ‘‘ ज्या दिवशीं माघकृष्णचतुर्दशी अर्धरात्रीं असेल त्या दिवशीं जो शिवरात्रिव्रत करील त्याला अश्वमेधफल प्राप्त होईल . " स्मृत्यंतरांतही - " ज्या दिवशीं त्रयोदशीचे ठायीं चतुर्दशीनें व्याप्त महानिशा ( मध्यरात्र ) होईल त्या दिवशीं शिवरात्रिव्रत व जागरण करावें . " ईशानसंहितेंत - " माघकृष्ण चतुर्दशीचे ठायीं मोठ्या रात्रीं आदिदेव भगवान् ‍ कोटिसूर्याप्रमाणें देदीप्यमान असा शिवलिंगरुपानें उत्पन्न ( प्रगट ) झाला , म्हणून शिवरात्रिव्रताचे ठायीं तत्कालव्यापिनी तिथि घ्यावी . " " ज्या दिवशीं अर्धरात्राच्या पूर्वीं व पुढें चतुर्दशी असेल त्या तिथीचेठायींच शिवरात्रिव्रत व्रती यानें करावें . ज्या दिवशीं अर्धरात्राच्या पूर्वी व पुढें चतुर्दशी नसेल त्या तिथीस शिवरात्रिव्रत , करुं नयेच . कारण , आयुष्य , ऐश्वर्य यांची हानि होते . " अर्धरात्र म्हणजे दुसर्‍या प्रहराची शेवटची एक घटिका आणि तिसर्‍या प्रहराची पहिली एक घटिका मिळून दोन घटिकारुप काल होय , असें माधव सांगतो . त्याविषयीं वचन पूर्वीं जन्माष्टमीप्रकरणीं सांगितलें आहे . असें असतां पूर्वदिवशींच मध्यरात्रव्यापिनी व प्रदोषव्यापिनी चतुर्दशी असेल तर पूर्वाच करावी कारण , " हे देवि , जेव्हां अस्तमयपर्यंत त्रयोदशी असून रात्रीं संपूर्ण चतुर्दशी असेल तेव्हां ती शिवरात्रि जागराविषयीं समजावी " असें स्कांदवचन आहे . आणि " कृष्णजयंती सप्तमीयुक्त करावी , व शिवरात्रि त्रयोदशीयुक्त करावी " असें स्कांदवचनही आहे . दोन दिवस मध्यरात्रव्याप्ति असतां हेमाद्रीच्या मतीं पूर्वा करावी . कारण , " जर अर्धरात्रीच्या पूर्वीं जेव्हां त्रयोदशीचा योग असेल तेव्हां तीच पूर्वविद्ध शिवरात्रि शिवभक्तांनीं करावी " असें पाद्मवचन आहे . मदनरत्नांतही असेंच आहे . गौडही असेंच सांगतात .

निर्णयामृतेतुसर्वापिशिवरात्रिः प्रदोषव्यापिन्येव अर्धरात्रवाक्यानिकैमुतिकन्यायेनप्रदोषस्तावकानीत्युक्तम् ‍ तन्न अर्धरात्रस्यपूर्वंकर्मकालत्वोक्तेः परदिनेप्रदोषनिशीथोभयव्याप्तिसत्त्वात्परैवेतितुमाधवः इदमेवचयुक्तंप्रतीमः परेद्युः प्रागुक्तार्धरात्रस्यैकदेशव्याप्तौपूर्वेद्युः संपूर्णतद्वयाप्तौच सत्यपिपरेद्युः प्रदोषनिशीथोभययोगेपूर्वेद्युः संपूर्णव्याप्तेः पूर्वैव व्याप्यार्धरात्रंयस्यांतुलभ्यतेयाचतुर्दशी तस्यामेवव्रतंकार्यंमत्प्रसादार्थिभिर्नरैः तदूर्ध्वाधोन्विताभूतासाकार्याव्रतिभिः सदेतिमाधवधृतेशानसंहितोक्तेः पूर्वेद्युर्निशीथस्यपरेद्युः प्रदोषस्येत्येकैकव्याप्तौतुपूर्वैव जयायोगस्यप्राशस्त्यात् ‍ तच्चोक्तंनागरखंडे माघफाल्गुनयोर्मध्येअसितायाचतुर्दशी अनंगेनसमायुक्ताकर्तव्यासासदातिथिरिति पाद्मे अर्धरात्रात्पुरस्ताच्चेज्जयायोगोयदाभवेत् ‍ पूर्वविद्धैवकर्तव्याशिवरात्रिः शिवप्रियैरिति स्कांदेपि भवेद्यत्रत्रयोदश्यांभूतव्याप्तामहानिशा शिवरात्रिव्रतंतत्रकुर्याज्जागरणंतथेति महतामपिपापानांदृष्टावैनिष्कृतिः परा नदृष्टाकुर्वतांपुंसांकुहूयुक्तांतिथिंशिवामितिस्कांदेदर्शयोगस्यनिंदितत्वाच्च यदाचतुर्दशीपूर्वेद्युर्निशीथादूर्ध्वंप्रवृत्तापरेद्युश्चनिशीथादर्वागेवसमाप्तातदापरेद्युरेकव्याप्तिसत्त्वात्परैव माघासितेभूतदिनंहिराजन्नुपैतियोगंयदिपंचदश्याः जयाप्रयुक्तांनतुजातुकुर्याच्छिवस्यरात्रिंप्रियकृच्छिवस्येतिवचनात् ‍ एवंदिनद्वयेप्रदोषव्याप्त्यभावेनिशीथव्याप्तिसत्त्वात्पूर्वैव तेनदिनद्वयेनिशीथव्याप्तौप्रदोषव्याप्त्यानिर्णयः दिनद्वयेप्रदोषव्याप्तौनिशीथेननिर्णयः एकैकव्याप्तौतुनिशीथेननिर्णयइति इयंचरविभौमसोमवारेषुशिवयोगेचातिप्रशस्ताहेमाद्रौतीर्थखंडेलैंगें फाल्गुनस्यचतुर्दश्यांकृष्णपक्षेसमाहिताः कृत्तिवासेश्वरंलिगमर्चयंतिशिवंशुभे तेयांतिपरमंस्थानंसदाशिवमनामयम् ‍ ।

निर्णयामृतांत तर - सर्व मासांतील शिवरात्रि प्रदोषव्यापिनीच घ्यावी . अर्धरात्रव्यापिनी घ्यावी अशीं जीं वाक्यें तीं कैमुतिकन्यायानें प्रदोषस्तुतिबोधक आहेत , असें सांगितलें आहे , तें बरोबर नाहीं . कारण , पूर्वीं अर्धरात्र हा कर्मकाल सांगितला आहे . ज्या वेळीं दोन्ही दिवशीं अर्धरात्रव्याप्ति असेल त्या वेळीं पर दिवशीं प्रदोषकालीं व अर्धरात्रीं व्याप्ति असल्यामुळें पराच करावी , असें तर माधव सांगतो . हेंच युक्त आहे , असें आम्हीं समजतों . परदिवशीं पूर्वीं सांगितलेल्या - द्विघटिकात्मक - अर्धरात्राच्या एकदेशीं व्याप्ति असतां आणि पूर्वदिवशीं संपूर्ण अर्धरात्रव्याप्ति असतां परदिवशीं प्रदोष व अर्धरात्र या दोघांचा योग असला तरी पूर्वदिवशीं संपूर्ण अर्धरात्रव्याप्ति असल्यामुळें पूर्वाच करावी . कारण , " ज्या तिथीचे ठायीं चतुर्दशी अर्धरात्रीला व्यापून मिळते त्या तिथीचे ठायींच शिवप्रसादेच्छु मनुष्यांनीं व्रत करावें . अर्धरात्राच्या पूर्वी व पश्चात् ‍ असलेली चतुर्दशी व्रतकरणारांनीं सदा घ्यावी . " असें माधवानें धरलेलें ईशानसंहितावचन आहे . पूर्वदिवशीं निशीथ ( अर्धरात्र ) व्याप्ति आणि परदिवशीं प्रदोषव्याप्ति अशी एक एक काल व्याप्ति असेल तर पूर्वाच करावी . कारण , जया ( त्रयोदशी ) योग प्रशस्त आहे . तें सांगतो नागरखंडांत - " माघ व फाल्गुन यांच्या मध्यें जी कृष्णचतुर्दशी त्रयोदशीनें युक्त असेल ती सदा करावी . " पाद्मांत - " ज्या वेळीं अर्धरात्राच्या पूर्वीं त्रयोदशीचा योग होईल त्या वेळीं शिवभक्तांनीं पूर्वविद्धाच ( त्रयोदशीयुक्ताच ) शिवरात्रि करावी . " स्कांदांतही - " ज्या त्रयोदशीचे ठायीं चतुर्दशीव्याप्त महानिशा ( मध्यरात्र ) होईल त्या तिथीस शिवरात्रिव्रत व तसेंच जागरण करावें . " आणि " महापातकांना देखील उत्कृष्ट निष्कृति ( प्रायश्चित्त ) पाहिली आहे ; पण अमावास्यायुक्त चतुर्दशी करणार्‍या पुरुषांस निष्कृति ( प्रायश्चित्त ) कोठें पाहिली नाहीं . ’ अशी स्कांदांत अमावास्यायोगाची निंदाही केलेली आहे . ज्या वेळीं पूर्वदिवशीं चतुर्दशी मध्यरात्रीच्या पुढें प्रवृत्त झाली व परदिवशीं मध्यरात्रीच्या पूर्वीच समाप्त झाली त्या वेळीं परदिवशीं एकप्रदोषकालीं व्याप्ति असल्यामुळें पराच करावी . कारण , " माघमासाचे कृष्णचतुर्दशीस जर अमावास्येचा योग असेल तर शिवभक्तानें त्रयोदशीयुक्त शिवरात्रि कधींही करुं नये " असें वचन आहे . याप्रमाणें दोन दिवशीं प्रदोषव्याप्ति नसेल तर पूर्वदिवशीं निशीथ ( अर्धरात्र ) व्याप्ति असल्यामुळें पूर्वाच करावी . ह्या सर्व वरील अर्थावरुन असा सारांश झाला कीं , दोन दिवशीं मध्यरात्रव्याप्ति असतां प्रदोष व्याप्तीनें निर्णय म्हणजे ज्या दिवशीं प्रदोषव्याप्ति ती करावी . दोन दिवशीं प्रदोषव्याप्ति असतां मध्यरात्रव्याप्तीनें निर्णय म्हणजे ज्या दिवशीं मध्यरात्रव्याप्ति असेल ती करावी . एक एक व्याप्ति म्हणजे प्रदोषव्याप्ति किंवा मध्यरात्रव्याप्ति असेल तर मध्यरात्रव्याप्ति असेल ती घ्यावी , ह्या चतुर्दशीस रवि , भौम व सोम यांतील वार व शिवयोग असतां ही चतुर्दशी अति प्रशस्त आहे . हेमाद्रींत तीर्थखंडांत लिंगपुराणांत - " फाल्गुनकृष्णचतुर्दशीचेठायीं जे मनुष्य स्वस्थचित्त होऊन कृत्तिवासेश्वर शिवलिंगाची पूजा करितात ते उत्तम व रोगरहित अशा सदाशिवस्थानाप्रत जातात . "

अथ पारणानिर्णयः ॥ शिवरात्रिपारणेतुविरुद्धवाक्यानिदृश्यंते स्कांदे कृष्णाष्टमीस्कंदषष्ठीशिवरात्रिचतुर्दशी एताः पूर्वयुताः कार्यास्तिथ्यंतेपारणंभवेत् ‍ जन्माष्टमीरोहिणीचशिवरात्रिस्तथैवच पूर्वविद्धैवकर्तव्यातिथिभांतेचपारणमिति तिथिमध्येपिपारणंस्कांदेउक्तम् ‍ उपोषणंचतुर्दश्यांचतुर्दश्यांतुपारणम् ‍ कृतैः सुकृतलक्षैश्चलभ्यतेवाथवानवा ब्रह्मांडोदरमध्येतुयानितीर्थानिसंतिवै संस्नातानिभवंतीहभूतायांपारणेकृते तिथीनामेवसर्वासामुपवासव्रतादिषु तिथ्यंतेपारणंकुर्याद्विनाशिवचतुर्दशीमिति अत्रयामत्रयादर्वाक् ‍ चतुर्दशीसमाप्तौ तदंतेतदूर्ध्वगामिन्यांतुप्रातस्तिथिमध्यएवेतिहेमाद्रिमाधवादयोव्यवस्थामाहुः तन्न तिथ्यंतेतिथिभांतेवापारणंयत्रचोदितम् ‍ यामत्रयोर्ध्वगामिन्यांप्रातरेवहिपारणेत्यादि सामान्यवचनैरेवव्यवस्थासिद्धेरुभयविधवाक्यवैयर्थ्यापत्तेः वयंतुतिथ्यंतेपारणंभवेदितिकृष्णाष्टम्यादिविषयमेव नतुशिवरात्रिविषयम् ‍ तदुपादानंतुपूर्वयुतत्वमात्रकथनार्थम् ‍ कथमन्यथास्कांदे एवशून्यह्रदयवाक्यवत्तिथिमध्येपारणविधानंघटते तस्माद्विना शिवचतुर्दशीमितिपर्युदस्तत्वाच्छिवरात्र्याः सर्वप्रकारेषुतिथिमध्यएवपारणेतिब्रूमः शिष्टाचारोप्येवमेव दीपिकायांतुरात्रावपितिथ्यंतएवोक्तम् ‍ व्रततिथेरंतेनिशीथेपिवाऽश्नीयादिति मदनरत्नकालादर्शयोस्तु साह्यस्तमयपर्यंतंव्यापिनीचेत्परेहनि दिवैवपारणंकुर्यात्पारणेनैवदोषभागित्युक्तम् ‍ तन्न तिथिमध्येपारणविधानान्निषेधेफलायोगाच्चतिथ्यंतानपेक्षणाद्दोषाप्रसक्त्याचतुर्थपादासंगतेः तेनेदंशिवरात्रिभिन्नव्रतपरंज्ञेयम् ‍ ।

आतां शिवरात्रीच्या पारणेविषयीं तर विरुद्ध वाक्यें दिसतात . तीं अ़शीं स्कांदांत - " कृष्णजन्माष्टमी , स्कंदषष्ठी , शिवरात्रि चतुर्दशी , ह्या तिथि पूर्वयुक्त कराव्या , आणि तिथीच्या अंतीं पारणा करावी . जन्माष्टमी , रोहिणी ( कृष्णजयंती ), आणि शिवरात्रि , ह्या पूर्वविद्धाच कराव्या . तिथि व नक्षत्र ( रोहिणी ) यांचे अंतीं पारणा करावी . " तिथीमध्येंही पारणा सांगतो स्कांदांत - " चतुर्दशींत उपोषण व चतुर्दशींत पारणा हें लक्षावधि सुकृतें केल्यानें प्राप्त होईल किंवा न होईल असें आहे . चतुर्दशींत पारणा केली असतां ह्या ब्रह्मांडांत जितकीं तीर्थैं आहेत तितक्या तीर्थांचें स्नान केल्यासारखें होतें . सर्व तिथींच्या उपवासव्रतादिकांत तिथींच्या अंतीं पारणा करावी . शिवरात्रिचतुर्दशी वर्ज्य करुन हा निर्णय समजावा . " या पारणेविषयीं दिवसा तीन प्रहरांच्या आंत चतुर्दशी समाप्त असेल तर चतुर्दशीच्या अंतीं पारणा . तीन प्रहरांच्या पुढें चतुर्दशी असेल तर प्रातःकाळीं तिथीमध्येंच पारणा , अशी हेमाद्रि , माधव इत्यादि ग्रंथकार व्यवस्था सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , " तिथीच्या अंतीं किंवा तिथि व नक्षत्र यांच्या अंतीं पारणा जेथें सांगितली आहे , तेथें तीन प्रहरांच्या पुढें तिथि असतां प्रातःकाळींच पारणा करावी . " इत्यादि सामान्य वचनांनींच व्यवस्था सिद्ध असल्यामुळें तिथीच्या अंतीं व तिथीच्या मध्यें अशीं दोन प्रकारची पारणा सांगणारीं वाक्यें व्यर्थ होतील . आम्हीं ( कमलाकरभट्ट ) तर - वर स्कांदवचनांत ‘ तिथ्यंते पारणं भवेत् ‍ ’ म्हणजे तिथीच्या अंतीं पारणा करावी , असें सांगितलें तें कृष्णाष्टमी इत्यादिविषयींच समजावें . शिवरात्रिविषयीं समजूं नये . त्या वचनांत ‘ शिवरात्रि ’ ग्रहण अशा करितां कीं , पूर्वयुक्त करावी , इतकेंच सांगण्याकरितां आहे . असें जर नसेल [ चतुर्दशीविषयीं देखील तिथीच्या अंतीं पारणा इष्ट असेल ] तर स्कांदांतच विचारशून्य ह्रदयाच्या वाक्याप्रमाणें तिथीच्या मध्यें पारणा सांगणें कसें घडतें ? तस्मात् ‍ ‘ तिथ्यंते पारणं कुर्याद्विना शिवचतुर्दशीं ’ या वरील वचनानें चतुर्दशी वगळल्यामुळें यामत्रयोर्ध्वगामिनी व यामत्रयाच्या पूर्वसमाप्ति इत्यादि सर्व प्रकारचेठायीं शिवरात्रिव्रताची तिथिमध्येंच पारणा करावी , असें सांगतों . शिष्टाचारही असाच आहे . दीपिकेंत तर - रात्रीं देखील तिथीच्या अंतींच पारणा सांगितली आहे - " व्रततिथीच्या अंतीं अथवा ती व्रततिथि मध्यरात्रीपर्यंत असेल तर समाप्त झाल्यावर मध्यरात्रीं भोजन करावें . " मदनरत्न व कालादर्श यांत तर " ती चतुर्दशी परदिवशीं अस्तमयपर्यंत असेल तर दिवसासच पारणा करावी . दिवसा पारणा केली असतां दोष लागत नाहीं " असें सांगितलें आहे . तें बरोबर नाहीं . कारण , तिथीच्या मध्यें पारणा सांगितली असल्यामुळें व तिथीच्या मध्यें पारणेच्या निषेधाविषयीं फलही नसल्यामुळें तिथीच्या अंताची ( समाप्तीची ) अपेक्षा नसल्याकारणानें तिथीमध्यें पारणेला दोषाचा प्रसंग नसल्यानें वरील वचनांतील ‘ पारणे नैव दोषभाक् ‍ ’ म्हणजे तिथीमध्यें पारणा केली असतां दोष लागत नाहीं , हा चवथा पाद असंगत होईल . कारण , दोषाची प्रसक्ति नसल्यामुळें , दोष लागत नाहीं हें सांगणें नको आहे . तेणेंकरुन हें वचन शिवरात्रिभिन्नव्रतविषयक समजावें .

इदंचव्रतंसंयोगपृथक्त्वन्यायेननित्यंकाम्यंच तथाचमाधवीयेस्कांदे परात्परतरंनास्तिशिवरात्रिव्रतात्परम् ‍ नपूजयतिभक्त्येशंरुद्रंत्रिभुवनेश्वरम् ‍ जंतुर्जन्मसहस्रेषुभ्रमतेनात्रसंशय इत्यकरणेप्रत्यवायश्रवणात् ‍ वर्षेवर्षेमहादेविनरोनारीपतिव्रता शिवरात्रौमहादेवंनित्यंभक्त्याप्रपूजयेदितिवीप्साश्रुतेः अर्णवोयदिवाशुष्येत् ‍ क्षीयेतहिमवानपि चलंत्येतेकदाचिद्वैनिश्चलंहिशिवव्रतमितिवचनाच्चनित्यता ममभक्तस्तुयोदेविशिवरात्रिमुपोषकः गणत्वमक्षयंदिव्यमक्षयंशिवशासनम् ‍ सर्वान्भुक्त्वामहाभोगांस्ततोमोक्षमवाप्नुयादितिस्कांदात् ‍ द्वादशाब्दिकमेतत्स्याच्चतुर्विंशाब्दिकंतुवेतितत्रैवेशानसंहितावचनात्काम्यता तत्रैव शिवरात्रिव्रतंनामसर्वपापप्रणाशनम् ‍ आचंडालमनुष्याणांभुक्तिमुक्तिप्रदायकं अत्रजागरोपवासपूजाः समुदिताः व्रतं नतुप्रत्येकम् ‍ समुदितानांफलसंबंधात् ‍ यत्तु अथवाशिवरात्रिंचपूजाजागरणैर्नयेत् ‍ तथा अखंडितव्रतोयोहिशिवरात्रिमुपोषयेत् ‍ सर्वान्कामानवाप्नोतिशिवेनसहमोदते कश्चित्पुण्यविशेषेणव्रतहीनोपियः पुमान् ‍ जागरंकुरुतेतत्रसरुद्रसमतांव्रजेदित्यादिस्कांदंतदनुकल्पत्वादशक्तपरम् ‍ ।

हें शिवरात्रिव्रत संयोगपृथक्त्वन्यायानें नित्य व काम्य आहे . कारण , तसेंच माधवीयांत स्कांदांत - " शिवरात्रिव्रताहून दुसरें कांहीं अत्यंत श्रेष्ठ नाहीं . त्या व्रतदिवशीं जो प्राणी भक्तीनें त्रिभुवनेश्वर रुद्रातें पूजीत नाहीं तो या संसारांत हजारों जन्मपर्यंत फिरतो , यांत संशय नाहीं . " न केलें तर असा दोष सांगितल्यावरुन ; पुरुष अथवा स्त्री यांनीं वर्षावर्षाचे ठायीं शिवरात्रीचे दिवशीं महादेवाची भक्तीनें पूजा करावी " या वचनांत ‘ वर्षे वर्षे ’ अशी द्विरुक्ति असल्यावरुन ; आणि " कदाचित् ‍ समुद्र शुष्क होईल व हिमवान् ‍ पर्वतही क्षीण होईल व ते कदाचित् ‍ चलित होतील ; पण शिवव्रत कधींही चलित होणार नाहीं " या वचनावरुनही नित्य आहे . " भगवान् ‍ शिव म्हणतात - हे देवि ! जो माझा भक्त शिवरात्रीचें उपोषण करितो त्याला दिव्य ( उत्कृष्ट ) नाशरहित कोठेंही शिवाज्ञाभग्न न होणारें असें गणत्व ( आधिपत्य ) प्राप्त होऊन सारे मोठे भोग भोगून तो मोक्षास जाईल . " असें स्कांदवचन असल्यावरुन ; आणि " हें शिवरात्रिव्रत द्वादशाब्दिक होतें , अथवा चतुर्विशाब्दिक ( चोवीस वर्षेपर्यंत ) होतें " असें तेथेंच ईशानसंहिता वचनावरुनही काम्यत्व आहे . तेथेंच - " शिवरात्रिव्रत सर्व पाप नाश करणारें व चांडालापर्यंत मनुष्यांना भुक्ति व मुक्ति देणारें होय . " ह्या शिवरात्रिव्रताचे ठायीं जागरण , उपवास , पूजा हीं सर्व मिळून व्रत होतें . जागरण , उपवास , पूजा यांतून एक करणें हें व्रत होत नाहीं . कारण , फलसंबंध सर्वांना मिळून सांगितला आहे . आतां जें - " अथवा शिवरात्रि पूजा व जागरण यांनीं करावी . " तसेंच - " जो अखंडितव्रत होत्साता शिवरात्रीचें उपोषण करितो तो सर्व मनोरथ पावून शिवासहवर्तमान आनंद पावतो . कोणी एकादा पुरुष व्रतहीन असतांही कांहीं पुण्यविशेषानें त्या शिवरात्रीचे ठायीं जागरण करितो तो रुद्रसमान होतो . " इत्यादिक जें स्कंदपुराणांतील वचन तें अनुकल्प ( कनिष्ठ पक्ष ) असल्यामुळें अशक्तविषयक जाणावें .

माघेतरप्रतिमासशिवरात्रिस्तु शिवरात्रिशब्दस्यमाघकृष्णचतुर्दश्यामेवरुढत्वात् ‍ माघमासस्यशेषेयाप्रथमाफाल्गुनस्यच कृष्णाचतुर्दशीसातुशिवरात्रिः प्रकीर्तितेति हेमाद्रौवचनाच्च नायंनिर्णयस्तत्रेति रात्रौयामचतुष्टयेपूजाविधानाद्यस्मिन् ‍ दिनेअधिकारात्रिव्याप्तिः साग्राह्या साम्येतुपूर्वैवेतिहेमाद्रिरुचिवान् ‍ वस्तुतस्तुप्रतिमासकृष्णचतुर्दश्यामपि सर्वकामप्रदंकृष्णचतुर्दश्यांशिवव्रतमित्युपक्रम्यचतुर्दशाब्दंकर्तव्यंशिवरात्रिव्रतंशुभमितिहेमाद्रौकालोत्तरेशिवरात्रिशब्दप्रयोगात् ‍ कौंडपायिनामयानाग्निहोत्रेनैत्यकाग्निहोत्रधर्माइवतद्धर्मप्राप्तिः स्यादेव अतः प्रदोषनिशीथोभयव्याप्त्यैवनिर्णयइतिवयंप्रतीमः ।

माघावांचून इतर प्रतिमासांतील शिवरात्रि तर - ‘ शिवरात्रि ’ हा शब्द माघकृष्णचतुर्दशीचे ठायींच रुढ असल्यामुळें ; आणि " माघमासाच्या शेवटीं आणि फाल्गुनमासाच्या पूर्वी जी कृष्णचतुर्दशी ती शिवरात्रि म्हटली आहे " ह्या हेमाद्रींतील वचनावरुनही हा ( माघकृष्णचतुर्दशीचा ) निर्णय त्या इतर चतुर्दशींविषयीं नाहीं . म्हणून रात्रीं चार प्रहरांचे ठायीं पूजा सांगितल्यावरुन ज्या दिवशीं अधिक रात्रिव्याप्ति असेल ती घ्यावी . दोन्ही दिवशीं रात्रीं समानव्याप्ति असेल तर पूर्वाच घ्यावी , असें हेमाद्रि सांगता झाला . वास्तविक म्हटलें तर - प्रत्येक मासीं कृष्णचतुर्दशीचे ठायीं देखील " कृष्णचतुर्दशीचे ठायीं शिवव्रत सर्व काम देणारें आहे " असा उपक्रम करुन " कल्याणकारक शिवरात्रिव्रत चवदा वर्षै करावें " असा हेमाद्रींत कालोत्तरांत शिवरात्रि या शब्दाचा प्रयोग केलेला असल्यामुळें ; जसें - कौंडपायीशाख्यांच्या अयनाग्निहोत्राचे ठायीं नित्य अग्निहोत्राचे धर्म प्राप्त होतात - तसे शिवरात्रीचे सारे धर्म प्रतिमासशिवरात्रीचे ठायीं प्राप्त होतच आहेत . म्हणून प्रदोष व निशीथ ( अर्धरात्र ) या दोन व्याप्तीनेंच निर्णय करावा . असें आह्मीं ( कमलाकरभट्ट ) समजतों .

N/A

References : N/A
Last Updated : June 21, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP