मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
महाष्टमी

द्वितीय परिच्छेद - महाष्टमी

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अथमहाष्टमी साचपरयुता शुक्लपक्षेष्टमीचैवशुक्लपक्षेचतुर्दशी पूर्वविद्धानकर्तव्याकर्तव्यापरसंयुतेति ब्रह्मवैवर्तात् ‍ मदनरत्नेस्मृतिसंग्रहे शरन्महाष्टमीपूज्यानवमीसंयुतासदा सप्तमीसंयुतानित्यंशोकसंतापकारिणी जंभेनसप्तमीयुक्तापूजितातुमहाष्टमी इंद्रेणनिहतोजंभस्तस्माद्दानवपुंगवः तस्मात्सर्वप्रयत्नेनसप्तमीमिश्रिताष्टमी वर्जनीयाप्रयत्नेनमनुजैः शुभकांक्षिभिः सप्तमींशल्यसंयुक्तांमोहादज्ञानतोपिवा महाष्टमींप्रकुर्वाणोनरकंप्रतिपद्यते सप्तमीकलयायत्रपरतश्चाष्टमीभवेत् ‍ तेनशल्यमिदंप्रोक्तंपुत्रपौत्रक्षयप्रदम् ‍ तथा पुत्रान्हंतिपशून्हंतिहंतिराष्ट्रंसराजकम् ‍ हंतिजातानजातांश्चसप्तमीसहिताष्टमी तेननात्रत्रिमुहूर्तवेधः तदाघटिकामात्राप्यौदयिकीग्राह्या व्रतोपवासनियमेघटिकैकापियाभवेदितिदेवलोक्तेः गौडाअप्येवमाहुः अतएवोक्तं भोजराजेन नचसप्तमीशल्यसमोपहतेति इयंभौमेतिप्रशस्ता अष्टम्यामुदितेसूर्येदिनांतेनवमीभवेत् ‍ कुजवारोभवेत्तत्रपूजनीयाप्रयत्नतइतिमदनरत्नेवचनात् ‍ सप्तमीशल्यसंविद्धावर्जनीयासदाष्टमी स्तोकापिसामहापुण्यायस्यांसूर्योदयोभवेदितिमदनरत्नेस्मृतिसमुच्चयवचनात् ‍ अष्टमीनवमीयुक्तानवमीचाष्टमीयुतेतिपाद्मवचनाच्च इयमेवमूलयुक्ताचेन्महानवमीसंज्ञा आश्वयुक् ‍ शुक्लपक्षेयाष्टमीमूलेनसंयुता सामहानवमीप्रोक्तात्रैलोक्येपिसुदुर्लभेतिहेमाद्रौस्कांदात् ‍ मूलयुक्तापिसप्तमीयुताचेत्त्याज्यैवेत्युक्तंनिर्णयामृतेदुर्गोत्सवे मूलेनापिहिसंयुक्तासदात्याज्याष्टमीबुधैः लेशमात्रेणसप्तम्याअपिस्याद्यदिदूषितेति महाष्टमीपूर्वेद्युः पूर्वाह्णव्यापित्वेपूर्वान्यथापरैवेतिनिर्णयदीपमतम् ‍ एतच्चतुच्छत्वादुपेक्ष्यम् ‍ रुपनारायणधृतेदेवीपुराणे सप्तमीवेधसंयुक्तायैः कृतातुमहाष्टमी पुत्रदारधनैर्हीनाभ्रमंतीहपिशाचवत् ‍ यत्तु सप्तम्यामुदितेसूर्येपरतोयाष्टमीभवेत् ‍ तत्रदुर्गोत्सवंकुर्यान्नकुर्यादपरेहनीतिविश्वरुपनिबंधवचनंतदाश्विनकृष्णाष्टमीविषयम् ‍ कन्यायांकृष्णपक्षेतुपूजयित्वाष्टमीदिने नवम्यांबोधयेद्देवींगीतवादित्रनिः स्वनैरितिदेवीपुराणेतत्रापिपूजोक्तेरितिहेमाद्रौनिर्णयामृतेचोक्तम् ‍ ।

आतां महाष्टमी सांगतो - ती अष्टमी नवमीयुक्त घ्यावी . कारण , " शुक्लपक्षांतील अष्टमी व चतुर्दशी ह्या तिथि पूर्वविद्धा करुं नयेत , परयुक्ता कराव्या . " असें ब्रह्मवैवर्तवचन आहे . मदनरत्नांत - स्मृतिसंग्रहांत - " शरदृतूंतील महाष्टमी नवमीयुक्त सर्वदा पूज्य होते . सप्तमीयुक्ता अष्टमी शोक व संताप करणारी आहे . जंभासुरानें सप्तमीयुक्त महाष्टमी पूजिली म्हणून तो जंभासुर सर्व दानवांत श्रेष्ठ असतांही इंद्रानें मारला . या कारणास्तव शुभेच्छु मनुष्यानीं सप्तमीयुक्त अष्टमी प्रयत्नानें वर्ज्य करावी . सप्तमीरुपशल्यानें युक्त महाष्टमी अविचारानें अथवा अज्ञानानें जो करितो तो नरकास जातो . तेव्हां सप्तमी एक कला असून पुढें अष्टमी असेल तेव्हां तें शल्य होतें , तें पुत्रपौत्रांचा क्षय करणारें होय . " तसेंच - ‘‘ सप्तमीसहित अष्टमी पुत्रांचा , पशूंचा , राजासहित राष्ट्राचा , आणि झालेले व होणारे यांचा नाश करिते . " यावरुन येथें सामान्य वाक्यावरुन तीन मुहूर्त सप्तमी असेलतरच वेध समजूं नये . जेव्हां पूर्वींची सप्तमीयुक्त असेल तेव्हां घटिकामात्र देखील उदयव्यापिनी असेल ती घ्यावी . कारण , " व्रत , उपवास , नियम , यांविषयीं प्रातःकालीं एक घटिकामात्रही असलेली तिथि घ्यावी " असें देवलवचन आहे . गौडही असेंच सांगतात . म्हणूनच भोजराजानें सांगितलें आहे , कीं " शल्यासारख्या सप्तमीनें उपहत ( दूषित ) अष्टमी करुं नये . " ही भौमवारीं असतां अतिप्रशस्त . कारण , " अष्टमींत सूर्योदय असून सायंकालीं नवमी असेल व त्या दिवशीं भौमवार होईल तर अशा योगावर देवीपूजन प्रयत्नानें करावें . " असें मदनरत्नांत वचन आहे . आणि " सप्तमीशल्यानें विद्ध अष्टमी निरंतर वर्ज्य करावी ; जीचेठायीं सूर्योदय असेल ती अल्पही असली तरी मोठी पुण्यकारक होते . " असें मदनरत्नांत स्मृतिसमुच्चयवचन आहे . व " अष्टमी नवमीयुक्त करावी व नवमी अष्टमीयुक्त करावी . " असें पाद्मवचनही आहे . हीच अष्टमी मूलनक्षत्रयुक्त असेल तर ती महानवमी होते . कारण , " आश्विनशुक्लपक्षांत मूलनक्षत्रानें युक्त जी अष्टमी ती महानवमी म्हटली आहे , ती त्रैलोक्यांतही अति दुर्लभ होय . " असें हेमाद्रींत स्कांदवचन आहे . मूल नक्षत्रानें युक्त असली तरी सप्तमीयुक्त असेल तर ती वर्ज्य करावीच , असें निर्णयामृतांत दुर्गोत्सवांत सांगितलें आहे - " जर सप्तमीच्या लेशानेंही दूषित असलेली अष्टमी मूल नक्षत्रानें युक्त असली तरी ती विद्वानांनीं सर्वदा टाकावी . " महाष्टमी , पूर्व दिवशीं पूर्वाह्णव्यापिनी असतां पूर्वा . पूर्व दिवशीं पूर्वाह्णव्यापिनी नसतां पराच करावी , असें निर्णयदीपाचें मत . हें तुच्छ असल्यामुळें उपेक्षणीय होय . रुपनारायणधृत देवीपुराणांत - " सप्तमीवेधयुक्त महाष्टमी ज्यांनीं केली ते पुत्र , स्त्री , धन यांनीं हीन होऊन पिशाचासारखे इहलोकीं फिरतात . " आतां जें " सप्तमींत सूर्योदय होऊन पुढें जी अष्टमी असते तिचे ठायीं दुर्गोत्सव करावा . दुसर्‍या दिवशीं करुं नये . " असें विश्वरुपनिबंधवचन तें आश्विन कृष्णाष्टमीविषयक होय . कारण , " कन्यासंक्रांतींत कृष्णपक्षीं अष्टमीदिवशीं देवीचें पूजन करुन नवमीस गीत , वाद्य शब्दांनीं देवी जागृत करावी . " अशी देवीपुराणांत आश्विन कृष्णपक्षांतही पूजा सांगितली आहे , असें हेमाद्रींत निर्णयामृतांत सांगितलें आहे .

यानितु भद्रायांभद्रकाल्याश्चमध्येस्यादर्चनक्रिया तस्माद्वैसप्तमीविद्धाकार्यादुर्गाष्टमीबुधैरिति यच्च मोहचूलोत्तरेब्राह्मेच आश्विनस्यसिताष्टम्यामर्धरात्रेतुपार्वती भद्रकालीसमुत्पन्नापूर्वाषाढासमायुतेति तथा तत्राष्टम्यांभद्रकालीदक्षयज्ञविनाशिनी प्रादुर्भूतामहाघोरायोगिनीकोटिभिः सहेति यच्चमदनरत्ने महाष्टम्याश्विनेमासिशुक्लाकल्याणकारिणी सप्तम्यापियुताकार्यामूलेनतुविशेषतइति तानिपरदिने‍ऽष्टम्यभावविषयाणीति मदनरत्नेउक्तं यत्तुतत्रैवपरदिनेष्टमीसत्त्वेपिपूर्वविद्धाविधायकंवचनम् ‍ यदाष्टमींतुसंप्राप्यह्यस्तंयातिदिवाकरः तत्रदुर्गोत्सवंकुर्यान्नकुर्यादपरेहनि दुर्भिक्षंतत्रजानीयान्नवम्यांयत्रपूज्यतइतितत्परदिनेदशम्यांनवम्यभावविषयम् ‍ यदासूर्योदयेनस्यान्नवमीचापरेहनि तदाष्टमींप्रकुर्वीतसप्तम्यासहितांनृपेतितत्रैवस्मृतिसंग्रहोक्तेः उत्तरास्तिथयोयत्रक्षयंयांतिनराधिप पूर्वाष्टमींतदाकुर्यादन्यथात्वशुभंभवेदितिदुर्गोत्सवोक्तेश्चेति मदनरत्ने वस्तुतस्तुइदंवचनद्वयंअष्टमीनवम्योः सूर्योदयद्वयासंबंधपरम् ‍ अतएवनवमीचेतिचकारादष्टमीच तिथयइतिबहुवचनादष्टमीनवमीदशम्युक्ता अन्यथापूर्वोक्तविरोधादितिदिक् ‍ ।

आतां जीं ‘‘ भद्रेवर मध्यें भद्रकालीची पूजा होते , यास्तव सप्तमीविद्ध दुर्गाष्टमी विद्वानांनीं करावी . " आणि जें मोहचूलोत्तरांत व ब्राह्मांत " - आश्विनाच्या शुक्ल अष्टमीस पूर्वाषाढायोग असतां मध्यरात्रीं पार्वती भद्रकाली उत्पन्न झाली . तसेंच त्या अष्टमीस दक्षयज्ञनाशकर्त्री भद्रकाली कोट्यवधि योगिनींसहित महाभयंकर उत्पन्न झाली . " आणि जीं मदनरत्नांत - " आश्विनमासांत शुक्लपक्षीं कल्याण करणारी महाष्टमी सप्तमीनें युक्त ही करावी . विशेषेंकरुन मूल नक्षत्रानें युक्त ती करावी " अशीं वचनें तीं परदिवशीं अष्टमी सर्वथा नसेल तशाविषयीं होत असें मदनरत्नांत सांगितलें आहे . आतां जें तेथेंच पर दिवशीं अष्टमी असतांही पूर्वविद्धा घेण्याविषयीं , वचन " ज्या दिवशीं अष्टमींत सूर्य जाऊन अस्तास जातो , त्या दिवशीं दुर्गोत्सव करावा . पर दिवशीं करुं नये . ज्या देशांत नवमीस दुर्गापूजन केलें असेल त्या देशांत दुर्भिक्ष पडेल असें जाणावें . " असें तें परदिवशीं दशमीचे ठायीं नवमीचा अभाव असेल त्याविषयीं समजावें . कारण , " ज्या वेळीं सूर्योदयीं अष्टमी नाहीं , आणि परदिवशीं नवमी असेल त्या वेळीं सप्तमीसहित अष्टमी करावी . " असें तेथेंच स्मृतिसंग्रहवचन आहे . आणि " ज्या वेळीं पुढच्या तिथि क्षयगामिनी असतील त्या वेळीं पूर्वाष्टमी करावी . परदिवशीं केली असतां अशुभ होईल " असें दुर्गोत्सववचनही आहे , असें मदनरत्नांत आहे . वास्तविक म्हटलें तर ‘ यदा सूर्योदये ’ व ‘ उत्तरास्तिथयो० ’ हीं दोन वचनें अष्टमी व नवमी ह्या दोन तिथींस दोन सूर्योदयांचा संबंध नसेल तद्विषयक आहेत . म्हणजे दोहोंपैकीं एकाचा क्षय असेल त्या वेळीं यांची प्रवृत्ति होते . म्हणूनच ‘ नवमीचापरेहनि ’ येथें ‘ च ’ शब्दानें अष्टमीही येते . म्हणजे - ज्या वेळीं नवमी आणि अष्टमी ह्या दोन तिथि सूर्योदयीं नाहींत , तर दोहोंपैकीं एकाचा क्षय आहे त्या वेळीं पूर्वाष्टमी करावी . असा अर्थ होतो . ‘ उत्तरास्तिथयो० ’ ह्या वचनांत ‘ तिथयः ’ ह्या बहुवचनानें अष्टमी , नवमी , दशमी , ह्या तीनतिथि जेव्हां क्षयगामिनी असतील त्या वेळीं पूर्वाष्टमी करावी , असा अर्थ होतो . असा अर्थ न केला तर पूर्वोक्त ( स्मृतिसमुच्चयदुर्गोत्सव ) वचनाचा विरोध येईल , अशी दिशा समजावी .

यत्तु अहंभद्राचभद्राहंनावयोरंतरंक्कचित् ‍ सर्वसिद्धिंप्रदास्यामिभद्रायामर्चिताह्यहमितिदेवीपुराणे तद्विष्टिकरणमध्येपूजाविधानार्थम् ‍ विष्टिंत्यक्त्वामहाष्टम्यांममपूजांकरोतियः तस्यपूजाफलंनस्यात्तेनाहमवमानितेतितत्रैवोक्तेरितिनिर्णयामृते तथाकालिकापुराणे सप्तम्यांपत्रिकापूजाअष्टम्यांचाप्युपोषणम् ‍ पूजाच जागरश्चैवनवम्यांविधिवद्वलिरिति अष्टम्युपवासश्चपुत्रवतानकार्यः उपवासंमहाष्टम्यांपुत्रवान्नसमाचरेत् ‍ यथातथावापूतात्माव्रतीदेवींप्रपूजयेदितितत्रैवोक्तेः रुपनारायणीयेब्राह्मे अत्यर्थंपूजनीयासातस्मिन्नहनिमानवैः उपोषितैर्वस्त्रधूपमाल्यरत्नानुलेपनैः पशुभिः पानकैर्ह्रद्यैरात्रौजागरणेनच दुर्गागृहेचशस्त्राणि पूजितव्यानिपंडितैः वाद्यभांडानिचिह्नानिकवचान्यायुधानिच ।

आतां जें " देवी म्हणते - मी देवी भद्रा ( कल्याणी ) आहें , आणि भद्रा जी ती मी देवी आहें . भद्रा ( कल्याणी , विष्टि ) व मी ह्या दोघांमध्यें कांहीं अंतर नाहीं , म्हणून कल्याणीवर माझी पूजा केली असतां मी सर्व सिद्धि देतें " हें देवीपुराणांतील वचन विष्टि करणावर पूजा करण्यास सांगण्याकरितां आहे . कारण , " जो मनुष्य महाष्टमीचे ठायीं विष्टीचा त्याग करुन माझी पूजा करितो त्याला पूजेचें फल प्राप्त होत नाहीं . कारण , त्यानें माझा अपमान केला आहे . " असें तेथेंच सांगितलें आहे , असें निर्णयामृतांत आहे . तसेंच कालिकापुराणांत - " सप्तमीचे ठायीं पत्रिकापूजा करावी . अष्टमीचे ठायीं उपोषण , पूजा , जागर हीं करावीं . नवमीचे ठायीं यथाशास्त्र बलिदान करावें . " अष्टमीचे ठायीं उपवास पुत्रवंतानें करुं नये . कारण , " पुत्रवंतानें महाष्टमीस उपवास करुं नये , जसा तसा पवित्र होऊन व्रतस्थ राहून देवीचें पूजन करावें . " असें तेथेंच सांगितलें आहे . रुपनारायणीयांत - ब्राह्मांत - " अष्टमीचे दिवशीं मनुष्यांनीं उपोषण करुन वस्त्र , धूप , माल्य , रत्नें , अनुलेपन , पशूंचें बलिदान , आवडणारीं पानकें ( मद्यें वगैरे ), रात्रौ जागरण इत्यादि उपचारांनीं देवीचें पूजन करावें . दुर्गा देवीच्या गृहांत पंडितांनीं शस्त्रें पुजावीं . व वाजविण्याचीं भांडी , चिन्हें , कवचें , आयुधें हींही पुजावीं . "

अत्रविशेषोहेमाद्रौनिर्णयामृतेभविष्ये आश्वयुक् ‍ शुक्लपक्षस्य अष्टमीमूलसंयुता सामहानवमीनाम त्रैलोक्येपिसुदुर्लभा कन्यागतेसवितरिशुक्लपक्षेष्टमीयुता मूलनक्षत्रसंयुक्तासामहानवमीस्मृता नवम्यांपूजितादेवीददात्यभिमतंफलम् ‍ सापुण्यासापवित्राचसाधन्यासुखदायिनी तस्यांसदापूजनीयाचामुंडामुंडमालिनी सदेत्युक्तेर्नित्यतापि तस्यांयेह्युपयुज्यंतेप्राणिनोमहिषादयः सर्वेतेस्वर्गतियांतिघ्नतांपापंनविद्यते यावन्नचालयेदात्रंपशुस्तावन्नहन्यते नतथाबलिदानेनपुष्पधूपविलेपनैः यथासंतुष्यतेमेषैर्महिषैर्विंध्यवासिनी एवंचविंध्यवासिन्यांनवरात्रोपवासतः एकभुक्तेननक्तेनस्वशक्त्यायाचितेनच पूजनीयाजनैर्देवीस्थानेस्थानेपुरेपुरे गृहेगृहेभक्तिपरैर्ग्रामेग्रामेवनेवने स्नातैः प्रमुदितैर्ह्रष्टैर्ब्राह्मणैः क्षत्रियैर्नृपैः वैश्यैः शूद्रैर्भक्तियुतैर्म्लेच्छैरन्यैश्चमानवैः स्त्रीभिश्चकुरुशार्दूलतद्विधानमिदंश्रृणु जयाभिलाषीनृपतिः प्रतिपत्प्रभृतिक्रमात् ‍ लौहाभिसारिकंकर्मकारयेद्यावदष्टमीति लौहाभिसारिककर्मविधानंतत्रैवोक्तम् ‍ प्रागुदक्प्रवणेदेशेपताकाभिरलंकृतम् ‍ मंडपंकारयेद्दिव्यंनवसप्तकरंपरम् ‍ षोडशहस्तमित्यर्थः आग्नेय्यांकारयेत्कुंडंहस्तमात्रंसुशोभनम् ‍ मेखलात्रयसंयुक्तंयोन्याश्वत्थदलाभया राजचिह्नानिसर्वाणिशस्त्राण्यस्त्राणियानिच आनीयमंडपेतानिसर्वाण्यत्राधिवासयेत् ‍ ततस्तुब्राह्मणः स्नातः शुक्लांबरधरः शुचिः ॐकारपूर्वकैर्मंत्रैस्तल्लिंगैर्जुहुयाद्धृतम् ‍ शस्त्रास्त्रमंत्रैर्होतव्यंपायसंघृतसंयुतम् ‍ हुतशेषंतुरंगाणांराजानमुपहारयेत् ‍ लोहाभिसारिकंकर्मतेनैवऋषिभिः स्मृतम् ‍ धृतपल्ययनानश्वान्गजांश्चसमलंकृतान् ‍ भ्रामयेन्नगरेनित्यंबंदिघोषपुरः सरम् ‍ प्रत्यहंनृपतिः स्नात्वासंपूज्यपितृदेवताः पूजयेद्राजचिह्नानिफलमाल्यविलेपनैः तस्याभिसरणाद्राज्ञोविजयः समुदाह्रतः पूजामंत्रान्प्रवक्ष्यामिपुराणोक्तानहंतव यैः पूजिताः प्रयच्छंतिकीर्तिमायुर्यशोबलम् ‍ ।

येथें विशेष सांगतो - हेमाद्रींत निर्णयामृतांत भविष्यांत - " आश्विन शुक्लपक्षाची जी मूलनक्षत्रयुक्त अष्टमी ती महानवमी होय , ही त्रैलोक्यांत दुर्लभ आहे . सूर्य कन्याराशीस असतां शुक्लपक्षांतील अष्टमी व मूलनक्षत्र यांनीं युक्त जी नवमी ती महानवमी होय . नवमीस देवीचें पूजन केलें असतां ती देवी इच्छितफल देते . ती महानवमी पुण्य , पवित्र व सुख देणारी आहे . तिचे ठायीं मुंडांची माला धारण करणार्‍या चामुंडादेवीचें सदा पूजन करावें . " ह्या वचनांत ‘ सदा ’ असें सांगितल्यावरुन हें देवीपूजन नित्यही आहे , असें होतें . त्या महानवमीचेठायीं ज्या महिषादिक प्राण्यांचा उपयोग केला जातो , ते सारे प्राणी स्वर्गास जातात . व त्यांची हिंसा करणारांना पाप लागत नाहीं . जोंपर्यंत पशु आपलें शरीर चाळवीत नाहीं तोंपर्यंत तो पशु मारुं नये . विंध्यवासिनी देवी जशी मेष व महिष यांनीं संतुष्ट होते तशी बलिदान , पुष्प , धूप , विलेपन , यांनीं संतुष्ट होत नाहीं . याप्रमाणें नवरात्रामध्यें उपवास , एकभुक्त , नक्त , अयाचित यांतून आपल्या शक्तीप्रमाणें कोणतें एक करुन जनांनीं विंध्यवासिनी देवीचें पूजन जागोजागीं , नगरानगरांत , प्रतिगृहीं , प्रतिग्रामीं , प्रतिवनीं भक्तियुक्त होऊन करावें . स्नान करुन आनंदित होऊन हर्षयुक्त अशा ब्राह्मण , क्षत्रिय , राजे , वैश्य , शूद्र , भक्तियुक्त म्लेच्छ , अन्यही मनुष्य व स्त्रिया यांनीं पूजा करावी . हे कुरुश्रेष्ठा ! त्याचें विधान सांगतों , श्रवण कर . जयेच्छूराजानें प्रतिपदेस आरंभ करुन क्रमानें लोहाभिसारिक कर्म अष्टमीपर्यंत करावें . " लोहाभिसारिककर्माचें विधान तेथेंच सांगितलें आहे . तें असें - " प्रागुदक् ‍ प्रवण ( पूर्वेकडे व उत्तरेकडे सखल ) प्रदेशीं पताकांनीं अलंकृत , सुंदर सोळा हात लांब असा उत्कृष्ट मंडप करावा . त्याचे आग्नेयीस एकाहाताचें सुंदर , तीन मेखलांनीं युक्त , अश्वत्थपत्राकार योनीनें युक्त असें कुंड करावें . नंतर जीं राजचिन्हें , शस्त्रें व अस्त्रें असतील तीं सारीं या मंडपांत आणून अधिवासन करावें . नंतर ब्राह्मणानें स्नान करुन पांढरें वस्त्र धारण करुन शुद्ध होऊन त्या देवतेच्या लिंगांनीं युक्त अशा ॐकारपूर्वक मंत्रांनीं आज्यहोम करावा . शस्त्रास्त्रमंत्रांनीं घृतयुक्त पायसाचा होम करावा . हुतशेष असेल तें अश्वांच्या राजास द्यावें . यावरुन हें लोहाभिसारिक कर्म ऋषींनीं सांगितलें आहे . जिन घातलेले अश्व व अलंकृत गज यांना वाद्यघोषासहित नित्य नगरांत फिरवावें .

राजानें प्रतिदिवशीं स्नान करुन पितर , देवता यांचें पूजन करुन फलें , माल्यें , गंध यांहींकरुन राजचिन्हांचें ( छत्रचामरादिकांचें ) पूजन करावें . त्याच्या अभिसरणानें ( गमनानें ) राजाचा विजय सांगितला आहे . आतां त्यांचे पूजेविषयीं पुराणोक्त पूजामंत्र मी तुला सांगतों . ज्या मंत्रांनीं पूजित केलेल्या छत्रादि देवता कीर्ति , आयुष्य , यश , व बल देतात . "

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP