TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
श्रवणद्वादशी

द्वितीय परिच्छेद - श्रवणद्वादशी

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


श्रवणद्वादशी

श्रवणद्वादशी .

इयमेवश्रवणद्वादशी तत्रैकादश्यांद्वादशीश्रवणयोगेसैवोपोष्या एकादशीद्वादशीचवैष्णव्यमपितत्रचेत् तद्विष्णुशृंखलंनामविष्णुसायुज्यकृद्भवेदिति विष्णुधर्मोक्तेः नारदीयेपि संस्पृश्यैकादशींराजन् ‍ द्वादशींयदिसंस्पृशेत् ‍ श्रवणंज्योतिषांश्रेष्ठंब्रह्महत्यांव्यपोहति द्वादशीश्रवणस्पृष्टास्पृशेदेकादशींयदि सएववैष्णवोयोगोविष्णुशृंखलसंज्ञित इतिहेमाद्रौमात्स्योक्तेश्च दिनद्वयेद्वादशीश्रवणयोगेपिपूर्वा निर्णयामृतेत्वस्यपूर्वार्धमन्यथापठितं द्वादशीश्रवणर्क्षंचस्पृशेदेकादशींयदीति तेनहेमाद्रिमते एकादश्याः श्रवणयोगाभावेपितद्युक्त द्वादशीयोगमात्रेणविष्णुशृंखलंभवति निर्णयामृतमतेतु श्रवणस्यैकादशीद्वादशीभ्यांयोगएवविष्णुश्रृंखलंनान्यथेति यदानिशीथानंतरंसूर्योदयावधिद्विकलामात्रमपिश्रवणर्क्षंभवतितदापिपूर्वैव तदुक्तंतत्रैवनारदीये इमांप्रकृत्य तिथिनक्षत्रयोर्योगोयोगश्चैवनराधिप द्विकलोयदिलभ्येतसज्ञेयोह्यष्टयामिक इति द्वादशीश्रवणस्पृष्टाकृत्स्नापुण्यतमातिथिः नतुसातेनसंयुक्तातावत्येवप्रशस्यत इतिमदनरत्नेमात्स्याच्च दिवोदासीयेतु रात्रेः प्रथमपादेचेच्छ्रवणंहरिवासरे तदापूर्वामुपवसेत्प्रातर्भांतेचपारणमित्युक्तं इदंतुनिर्मूलत्वात्पूर्वविरोधाच्चोपेक्ष्यं इयंबुधवारेतिप्रशस्ता बुधश्रवणसंयुक्तासैवचेद्दूदशीभवेत् ‍ अत्यंतमहतीसास्याद्दत्तंभवतिचाक्षयमिति हेमाद्रौस्कांदात् ‍ ।

हीच श्रवणद्वादशी होय . त्या श्रवणद्वादशीचा निर्णय असा - एकादशीस श्रवणाचा आणि द्वादशीचा योग असतां त्या दिवशींच उपोषण करावें . कारण , " जर एक दिवशीं एकादशी , द्वादशी आणि श्रवणनक्षत्र हीं तीनही असतील , तर त्या योगाला विष्णुशृंखल म्हटलें आहे , तो योग विष्णूचें सायुज्य देणारा होतो , असें विष्णुधर्मांत वचन आहे . नारदीयांतही - " सर्वांमध्यें श्रेष्ठ असें श्रवणनक्षत्र जर एकादशीस स्पर्श करुन द्वादशीस स्पर्श करील तर तें - उपोषणाच्या योगानें - ब्रह्महत्या दूर करितें . " " श्रवणानें स्पर्श केलेली द्वादशी जर एकादशीस स्पर्श करील तर तोच विष्णुशृंखल नांवाचा वैष्णवयोग आहे " असें हेमाद्रींत मात्स्यवचनही आहे . दोन दिवस द्वादशी व श्रवण यांचा योग असतांही पूर्वा करावी . निर्णयामृतांत तर ‘ द्वादशी श्रवणस्पृष्टा स्पृशेदेकादशीं यदि ’ या स्थानीं ‘ द्वादशी श्रवणर्क्षं च स्पृशेदेकादशीं यदि ’ असा पाठ केलेला आहे . म्हणजे द्वादशी आणि श्रवणनक्षत्र हीं दोन जर एकादशीस स्पर्श करतील तर तो विष्णुशृंखलयोग होतो . यावरुन हेमाद्रीच्या मतीं एकादशीस श्रवणयोग नसला तरी श्रवणयुक्त द्वादशीचा योग एकादशीस असला म्हणजे विष्णुशृंखलयोग होतो . निर्णयामृताच्या मतीं तर श्रवणाला एकादशी व द्वादशी या दोघांचा योग असेल तरच विष्णुशृंखलयोग होतो , अन्यथा होत नाहीं . जेव्हां मध्यरात्रीनंतर सूर्योदयाच्या आंत दोन कलाही श्रवणनक्षत्र असेल तेव्हां देखील पूर्वाच करावी . तें तेथेंच नारदीयांत - ह्या श्रवणद्वादशीचा उपक्रम करुन सांगतो - " तिथि व नक्षत्र यांचा योग हा दोन कला योग जर मिळेल तर तो आठ प्रहर योग जाणावा . " आणि " श्रवणानें स्पर्श केलेली द्वादशी तिथि ती सारी पुण्यकारक आहे . श्रवणानें युक्त जितकी द्वादशी तितकीच पुण्यकारक आहे , असें नाही " असें मदनरत्नांत मात्स्यवचनही आहे . दिवोदासीयांत तर - " जर एकादशीचे दिवशीं रात्रीच्या पहिल्या प्रहरीं श्रवण असेल - अर्थात् ‍ दुसर्‍या दिवशीं द्वादशी व श्रवण असेल - तर पूर्व दिवशीं उपवास करावा , आणि दुसर्‍या दिवशीं प्रातःकाळीं नक्षत्र संपल्यावर पारणा करावी " असें सांगितलें आहे . हें वचन निर्मूल असल्यामुळें व ‘ तिथिनक्षत्रयोर्योगो० ’ इत्यादि पूर्ववचनाचा विरोध येत असल्यामुळें उपेक्षणीय ( अस्वीकार्य ) आहे . ही श्रवणद्वादशी बुधवारीं असेल तर अतिप्रशस्त आहे . कारण , ‘‘ तीच द्वादशी बुधवार व श्रवण यांनीं युक्त असेल तर ती अतिशय मोठी आहे . त्या दिवशीं दान केलेलें अक्षय होतें . " असें हेमाद्रींत स्कांदवचन आहे .

यानितुपठंति उत्तराषाढसंयुक्ताश्रोणामध्याह्नगापिवा आसुरीसैवतारास्याद्धंतिपुण्यंपुराकृतं उदयव्यापिनीग्राह्याश्रोणाद्वादशिकायुता विश्वर्क्षसंयुतासाचनैवोपोष्याशुभेप्सुभिरित्यादीनिविष्णुधर्मस्कांदभविष्यादिवचनानि तानिनिर्मूलानि यदपिस्मृत्यर्थसारेउदयव्यापिनीग्राह्येत्युक्तं यच्चबृहन्नारदीयेउदयव्यापिनीग्राह्याश्रवणद्वादशीव्रत इति तद्यदाशुद्धाधिकाद्वादशीपरदिनंएवोदयेश्रवणयोगः पूर्वेह्निचतद्भिन्नेकालेयोगस्तत्परम् ‍ दिनद्वयेउदययोगेपूर्वैव बहुकर्मकालव्याप्तेरित्युक्तंमदनरत्ने यदात्वेकादश्येवश्रवणयुतानद्वादशीतदापिपूर्वैव यदानप्राप्यतेऋक्षंद्वादश्यांवैष्णवंक्कचित् ‍ एकादशीतदोपोष्यापापघ्नीश्रवणान्वितेतिमदनरत्नेनारदीयोक्तेः यदापरैवर्क्षयुतातदापरा तत्रशक्तेनोपवासद्वयंकार्यं एकादशीमुपोष्यैवद्वादशींसमुपोषयेत् ‍ नचात्रविधिलोपः स्यादुभयोर्दैवतंहरिरिति भविष्योक्तेः यत्तुविष्णुधर्में पारणांतंव्रतंज्ञेयंव्रतांतेविप्रभोजनं असमाप्तेव्रतेपूर्वेनैवकुर्याद्व्रतांतरमिति तदेतद्भिन्नपरं अत्रगौडाः श्रृणुराजन्परंकाम्यंश्रवणद्वादशीव्रतमितिस्थूलशीर्षवचनात्काम्यमेवेदम् ‍ तेनाशक्तस्यनित्यैकादशीव्रतमेवेतिमन्यंते द्वादश्यामुपवासेनशुद्धात्मानृपसर्वशः

आतां जीं कोणी सांगतात कीं , " उत्तराषाढायुक्त श्रवणतारा मध्याह्नव्यापिनी असली तरी ती तारा आसुरी आहे , ती पूर्वी केलेलें पुण्य घालविते . द्वादशीनें युक्त श्रवणतारा ( नक्षत्र ) उदयव्यापिनी घ्यावी . तीच श्रवणतारा उत्तराषाढायुक्त अशी असतां तिचें उपोषण कल्याणेच्छूंनीं करुं नये . " इत्यादिक विष्णुधर्म - स्कंदपुराण - भविष्यपुराणादिकवचनें तीं निर्मूल होत . आतां जें स्मृत्यर्थसारांत उदयव्यापिनी श्रवणद्वादशी घ्यावी असें सांगितलें आहे , आणि जें बृहन्नारदीयांत - " व्रताविषयीं श्रवणद्वादशी उदयव्यापिनी घ्यावी . " तें सांगणें जेव्हां पूर्वदिवशीं द्वादशी संपूर्ण असून दुसर्‍या दिवशींच वाढलेल्या द्वादशीस सूर्योदयकालीं श्रवणयोग असेल व पूर्वदिवशीं उदयभिन्नकालीं श्रवणयोग असेल तद्विषयक आहे . दोन दिवस उदयकालीं श्रवण असतां पूर्वाच करावी . कारण , पूर्वदिवशीं बहुत कर्मकालाला श्रवणद्वादशीची व्याप्ति आहे , असें मदनरत्नांत सांगितलें आहे . जेव्हां तर एकादशीच श्रवणयुक्त आहे , द्वादशी श्रवणयुक्त नाहीं तेव्हां देखील पूर्वाच करावी . कारण , " जेव्हां श्रवणनक्षत्राचा योग द्वादशीस मुळींच नसेल तेव्हां श्रवनयुक्त एकादशीस उपोषण करावें , ती पापनाश करणारी आहे " असें मदनरत्नांत नारदीयवचन आहे . जेव्हां दुसर्‍या दिवशींच श्रवणयुक्त द्वादशी असेल तेव्हां पराच करावी . त्या वेळीं सशक्तानें दोन उपवास करावे . कारण , " एकादशीस उपोषण करुनच द्वादशीचें उपोषण करावें . आतां एकादशीव्रत व द्वादशीव्रत हीं दोन व्रतें भिन्न असल्यामुळें एकाची समाप्ति झाल्यावांचून दुसरें केलें असतां व्रतविधीचा विघात होईल ? असें म्हणूं नये ; कारण , दोन्ही व्रतांची देवता हरि ( विष्णु ) आहे . " असें भविष्यपुराणवचन आहे . आतां जें विष्णुधर्मांत - " पारणा होईपर्यंत व्रत समजावें . व्रत समाप्त झाल्यावर ब्राह्मणभोजन करावें . पहिलें व्रत समाप्त झाल्यावांचून दुसरें व्रत करुं नयेच " असें वचन , तें हें व्रत सोडून इतरव्रतविषयक आहे . या स्थलीं गौड ग्रंथकार - " हे राजा ! दुसरें काम्य असें श्रवणद्वादशीव्रत सांगतो , श्रवण कर . " ह्या स्थूलशीर्षवचनावरुन हें श्रवणद्वादशीव्रत काम्यच आहे . यावरुन अशक्त मनुष्याला एकादशीव्रतच नित्य आहे . आणि द्वादशीव्रत काम्य आहे असें मानितात . आणि " हे राजा ! द्वादशीस उपवास केल्यानें सर्व प्रकारानें आत्मा शुद्ध होऊन अनुपम चक्रवर्तित्व आणि उत्तम संपत्ति यांतें पावतो " ह्या गौडनिबंधांतील मात्स्यवचनावरुनही हें द्वादशीव्रत काम्य असें होत आहे . दक्षिणेकडील विद्वान् ‍ तर - " एकादशीस भोजन करुन द्वादशीस उपवास केल्यानें दोन्ही व्रतांचें सारें पुण्य निःसंशय प्राप्त होतें " ह्या वराह - वामनपुराणवचनावरुन श्रवणद्वादशीव्रतच नित्य आहे , असें सांगतात . आतां ह्या वचनांत " एकादशीस भोजन करुन " असें सांगितलें तें ‘ फलादि आहार करुन ’ असें समजावें . ‘ अन्नभोजन करुन ’ असें समजूं नये . कारण , ‘ अन्नाश्रित पापें आहेत , तीं एकादशीस अन्न खाणारास प्राप्त होतात . ’ या वचनेंकरुन एकादशीस भोजनाचा निषेध आहे . आणि " मनुष्यास दोन उपवास करण्याची शक्ति जर नसेल तर पहिल्या दिवशीं फलाहार करुन दुसर्‍या दिवशीं निराहार कारावा " असें दिवोदासीयांत भविष्यवचनही आहे . दोन उपवासांविषयीं अशक्त असून ज्यानें एकादशीव्रत घेतलें आहे त्याला सांगतो - मात्स्यांत - " शुक्लपक्षांतील द्वादशीस जर श्रवण नक्षत्र असेल तर त्या वेळीं एकादशीचें उपोषण करुन द्वादशीचे दिवशीं हरीची पूजा करावी " अर्थात् ‍ द्वादशीस उपवास करुं नये . एकादशीव्रत ग्रहण केलेलें नसेल तर एकादशीस भोजन करुन द्वादशीचें उपोषण करावें . कारण , " एकादशीस भोजन करुन द्वादशीस उपवास करावा , म्हणजे पूर्व दिवसाचें सारें पुण्य निःसंशय प्राप्त होतें " असें नारदीयवचन आहे .

पारणंतूभयांतेन्यतरांतेवाकुर्यात् ‍ तिथिनक्षत्रनियमेतिथिभांतेचपारणमितिस्कांदात् ‍ तिथिनक्षत्रसंयोगेउपवासोयदाभवेत् ‍ पारणंतुनकर्तव्यंयावन्नैकस्यसंक्षय इतिनारदीयादितिहेमाद्रिः यद्यप्यत्रनक्षत्रमात्रांतेपिपारणंप्रतिभाति तथापितिथिमात्रांतेज्ञेयम् ‍ नत्वृक्षांतेतिथिमध्येपि याः काश्चित्तिथयः प्रोक्ताः पुण्यानक्षत्रयोगतः ऋक्षांतेपारणंकुर्याद्विनाश्रवणरोहिणीमिति विष्णुधर्मे श्रवणांतमात्रेपारणनिषेधात् ‍ रोहिण्यांतु भांतेकुर्यात्तिथेर्वापिइतिवह्निपुराणात् ‍ तदंतेप्यस्तुनत्वत्रैवमस्तीतिनऋक्षांतोनुकल्प इतिमदनरत्ने असंभवेतु तिथ्यंतेतिथिभांतेवापारणंयत्रचोदितम् ‍ यामत्रयोर्ध्वगामिन्यांप्रातरेवहिपारणेतिज्ञेयम् ‍ यत्तुमदनरत्ने द्वादशीवृद्धौश्रवणवृद्धौवाश्रवणांतएवपारणंकुर्यात् ‍ पारणंतिथिवृद्धौतुद्वादश्यामुडुसंक्षयात् ‍ वृद्धौकुर्यात्रयोदश्यांतत्रदोषोनविद्यत इतिवह्निपुराणादित्युक्तम् ‍ तत्प्रकरणादेतस्यामेवश्रवणयुक्तैकादश्यांविहितविजयैकादशीव्रतपरंनतुश्रवणद्वादशीपरमितिमदनरत्ने गौडास्तुश्रवणद्वादशीपरमाहुः ।

ह्या श्रवणद्वादशीव्रताची पारणा तर - श्रवण व द्वादशी दोन्ही संपल्यावर किंवा दोघांपैकीं एक संपल्यावर करावी . कारण , " तिथि व नक्षत्र यांच्या निमित्तानें उपवास असतां तिथि व नक्षत्र संपल्यावर पारणा करावी " असें स्कांदवचन आहे . आणि " जेव्हां तिथि व नक्षत्र यांच्या संयोगाचा उपवास असेल तेव्हां जोंपर्यंत एकाची समाप्ति झाली नाहीं तोंपर्यंत पारणा करुं नये " असें नारदीय वचन आहे , असें हेमाद्रि सांगतो . आतां जरी येथें या वचनावरुन केवळ नक्षत्र संपल्यावरही पारणा करावी असें दिसतें , तरी एक संपल्यावर म्हणजे तिथि संपल्यावर पारणा जाणावी . नक्षत्र संपल्यावर तिथि असेल तर तिथीमध्यें ( द्वादशीमध्यें ) ही पारणा समजूं नये . कारण , " ज्या कोणत्या तिथि नक्षत्रयोगानें पुण्यकारक म्हणून सांगितल्या त्या तिथींची पारणा नक्षत्र संपल्यावर करावी ; पण श्रवण व जन्माष्टमीसंबंधी रोहिणी हीं दोन नक्षत्रें वर्ज्य करुन हा निर्णय समजावा " असा विष्णुधर्मांत केवळ श्रवण संपल्यावर द्वादशी असतां पारणेचा निषेध केला आहे . रोहिणीविषयीं तर " नक्षत्रांतीं पारणा करावी , किंवा जन्माष्टमीच्या अंतीं पारणा करावी " ह्या अग्निपुराणवचनावरुन केवळ नक्षत्रांतीं सुद्धां पारणा असो . तशी या ठिकाणीं ( श्रवणद्वादशीव्रतांत ) केवळ नक्षत्रांतींच पारणा नाहीं ; म्हणून नक्षत्रांतीं पारणा , हा अनुकल्प ( कनिष्ठपक्ष ) असें समजूं नये ; अर्थात् ‍ श्रवणांतींच पारणा हा मुळींच पक्ष नाहीं , असें मदनरत्नांत सांगितलें आहे . आतां जें मदनरत्नांत - द्वादशीची वृद्धि किंवा श्रवणाची वृद्धि असतां श्रवणांतींच पारणा करावी . कारण , " द्वादशीचे दिवशीं तिथीची वृद्धि असतां नक्षत्र संपल्यावर द्वादशींत पारणा करावी . आणि नक्षत्राची ( श्रवणाची ) वृद्धि असेल तर ( द्वादशी संपल्यावर ) त्रयोदशींत पारणा करावी , त्याविषयीं दोष नाहीं " असें वह्निपुराणवचन आहे , असें सांगितलें तें प्रकरणावरुन ह्याच श्रवणयुक्त एकादशीस विहित जें विजयैकादशीव्रत तद्विषयक आहे . श्रवणद्वादशीव्रतविषयक नाहीं , असें मदनरत्नांत सांगितलें आहे . गौड तर - हें वचन श्रवणद्वादशीव्रतविषयक आहे , असें सांगतात .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-05-29T00:44:24.3430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कोणाचा कोण, पितळेचा होन, सांपडला तर शोधतो कोण?

  • (सापडला याऐवजी सांडला शब्‍द असावा.) ज्‍याचा काही अर्थाअर्थी संबंध नाही अशा क्षुल्‍लक मनुष्‍याबद्दल चवकशी कोण करतो? कारण पितळेचा होन सापडला तर त्‍याची किंमत अगदी अल्‍प असल्‍यामुळे तो कोणाचा असेल याबद्दल कोणी चौकशी करीत नाही किंवा सांडला तरी त्‍याबद्दल कोणी फिकीर करीत नाही. 
RANDOM WORD

Did you know?

Wife disgracing, defaming her husband, what is the solution ?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.