मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
माघमासांतील कृत्यें

द्वितीय परिच्छेद - माघमासांतील कृत्यें

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अथमाघस्नानम् ‍ तत्रविष्णूः तुलामकरमेषेषुप्रातः स्नायीसदाभवेत् ‍ हविष्यंब्रह्मचर्यंचमाघस्नानेमहाफलमिति सौरमास उक्तः ब्राह्मेतुसावन उक्तः एकादश्यांशुक्लपक्षेपौषमासेसमारभेत् ‍ द्वादश्यांपौर्णमास्यांवाशुक्लपक्षेसमापनमिति पाद्मेपि पौषस्यैकादशींशुक्लामारभ्यस्थंडिलेशयः मासमात्रंनिराहारस्त्रिकालंस्नानमाचरेत् ‍ त्रिकालमर्चयेद्विष्णुंत्यक्तभोगोजितेंद्रियः माघस्यैकादशींशुक्लांयावद्विद्याधरोत्तमेति त्रिकालस्नानंमासोपवासविषयम् ‍ निराहार इत्युक्तेः पृथ्वीचंद्रोदयेत्वन्यथोक्तम् ‍ विष्णुः दर्शंवापौर्णमासींवाप्रारभ्यस्नानमाचरेत् ‍ पुण्यान्यहानित्रिंशत्तुमकरस्थेदिवाकर इति अत्रदर्शमितिशुक्लादिमुख्यचांद्राभिप्रायेण अयंतुपक्षोनेदानींप्रचरति ।

माघस्नान - त्याविषयीं विष्णु - " तूळ , मकर आणि मेष या संक्रांतींत दररोज प्रातःस्नान करावें . मकरसंक्रांतिरुप माघांत स्नान करणाराला हविष्यभक्षण व ब्रह्मचर्यव्रतधारण हीं मोठें फल देणारीं आहेत . " ह्या वचनानें स्नानाविषयीं मकरसंक्रांतिरुप सौर माघमास सांगितला आहे . ब्रह्मपुराणांत तर स्नानाविषयीं सावन ( तीस दिवसांचा ) माघमास सांगितला आहे , तो असा - ‘ पौषमासाचे शुक्ल एकादशीस माघस्नानाचा आरंभ करावा . आणि माघ शुक्लपक्षाचे द्वादशीस किंवा पौर्णिमेस माघस्नानाची समाप्ति करावी . " पद्मपुराणांतही - " पौष शुक्ल एकादशीपासून माघ शुक्ल एकादशीपर्यंत एक महिनाभर दररोज भूमीवर शयन व निराहार करुन त्रिकाल स्नान करावें . आणि सारे उपभोग टाकून जितेंद्रिय होऊन त्रिकाल विष्णूचें पूजन करावें . " या वचनांत त्रिकाल स्नान सांगितलें तें जो मासपर्यंत उपवास करणारा असेल त्याला समजावें . कारण , तेथेंच ‘ निराहार करुन ’ असें सांगितलें आहे . पृथ्वीचंद्रोदयांत तर वेगळ्यांच प्रकारानें सांगितलें आहे , तें असें - विष्णु - " पौषी अमावास्येस किंवा पौर्णिमेस प्रारंभ करुन तीस दिवस स्नान करावें . सूर्य मकरास ज्या मासांत असतो त्या मासाचे तीस दिवस पुण्यकारक आहेत . " या वचनांत अमावास्येस आरंभ करुन असें जें सांगितलें तें शुक्ल प्रतिपदेपासून मुख्य चांद्रमास धरुन सांगितलें आहे . स्नानाविषयीं मुख्य चांद्रमास धरणें हा पक्ष सांप्रत प्रचारांत नाहीं .

अत्राधिकारिणोभविष्ये ब्रह्मचारीगृहस्थोवावानप्रस्थोथभिक्षुकः बालवृद्धयुवानश्चनरनारीनपुंसकाः स्नात्वामाघेशुभेतीर्थेप्राप्नुवंतीप्सितंफलम् ‍ पाद्मे सर्वेऽधिकारिणोह्यत्रविष्णुभक्तौयथानृप ब्राह्मे उष्णोदकेनवास्नानमशक्येसतिकुर्वते दृढेषुसर्वगात्रेषुउष्णोदंनविशिष्यते वैष्णवामृतेगौडनिबंधेचस्कांदे पौष्यांतुसमतीतायांयावद्भवतिपूर्णिमा माघमासस्यतावद्धिपूजाविष्णोर्विधीयते पितृणांदेवतानांचमूलकंनैवदापयेत् ‍ ब्राह्मणोमूलकंभुक्त्वाचरेच्चाद्रायणंव्रतम् ‍ अन्यथायातिनरकंक्षत्रविट्शूद्रएवच वर्जनीयंप्रयत्नेनमूलकंमदिरोपमम् ‍ यदातुमाघोमलमासोभवतितदाकाम्यानांतत्रसमाप्तिनिषेधान्मासद्वयेस्नानंतन्नियमाश्चकार्याः मासोपवासचांद्रायणादितुमलमासएवसमापयेत् ‍ तदुक्तंदीपिकायाम् ‍ नियतत्रिंशद्दिनत्वाच्छुभेमास्यारभ्यसमापयेतमलिनेमासोपवासव्रतमिति मासोपवासपदंचांद्रायणादेरुपलक्षणम् ‍ ।

या माघस्नानाविषयीं अधिकारी सांगतो भविष्यांत - " ब्रह्मचारी , गृहस्थाश्रमी , वानप्रस्थ , संन्याशी , बालक , वृद्ध , तरुण , पुरुष , स्त्रिया , नपुंसक हे सारे माघमासांत शुभ तीर्थाचे ठायीं स्नान करुन अभीष्ट फल पावतात . " पाद्मांत - " जसे विष्णूची भक्ती करण्याविषयीं सारे अधिकारी आहेत तसे माघस्नानाविषयीं सारे अधिकारी आहेत . " ब्राह्मांत - " शीतोदकानें स्नानाविषयीं शक्ति नसतां उष्णोदकानें स्नान करितात . सारे शरीरावयव दृढ असतां उष्णोदक विशेष फलदायक होत नाहीं . " वैष्णवामृतांत गौडनिबंधांत स्कांदांत - " पौषी पौर्णिमेपासून माघी पौर्णिमा येई तोंपर्यंत दररोज विष्णूची पूजा करावी . ह्या माघमासांत पितरांला व देवांला मुळा अर्पण करुं नये . ब्राह्मणानें मुळा भक्षण केला असतां चांद्रायण व्रत करावें . चांद्रायण केलें नाहीं तर नरकास जाईल . क्षत्रिय , वैश्य , शूद्र यांनीं देखील मद्यासारखा मुळा असल्यामुळें तो प्रयत्नानें वर्ज्य करावा . " ज्यावेळीं माघ मलमास येईल त्यावेळीं , मलमासांत काम्य व्रतांचे समाप्तीचा निषेध असल्यामुळें दोन मासांत स्नान व स्नानाचे नियम करावे . मासपर्यंत उपवासव्रत आणि चांद्रायणव्रत इत्यादिकांची समाप्ति तर मलमासांतच करावी . तें सांगतो दीपिकेंत - " मासोपवासव्रताचे दिवस नियमित ( ठरलेले ) तीस असल्यामुळें शुद्धमासांत तें आरंभून मलमासांत समाप्त करावें " ह्या दीपिकेच्या वचनांतील ‘ मासोपवास ’ या पदानें उपलक्षणेंकरुन चांद्रायणादिक घ्यावें .

स्नानारंभेचमंत्रोविष्णुनोक्तः तत्रचोत्थायनियमंगृहीयाद्विधिंपूर्वकम् ‍ माघमासमिमंपूर्णस्नास्येऽइंदेवमाधव तीर्थस्यास्यजलेनित्यमितिसंकल्प्यचेतसीति प्रत्यहंमंत्रश्चपाद्मे दुःखदारिद्यनाशायश्रीविष्णोस्तोषणायच प्रातः स्नानंकरोम्यद्यमाघेपापविनाशनम् ‍ मकरस्थेरवौमाघेगोविंदाच्युतमाधव स्नानेनानेनमेदेवयथोक्तफलदोभवः इमंमंत्रंसमुच्चार्यस्नायान्मौनसमन्वित इति प्रत्यहंसूर्यार्घ्यम् ‍ मंत्रस्तुपृथ्वीचंद्रोदयेपाद्मे सवित्रेप्रसवित्रेचपरंधामजलेमम त्वत्तेजसापरिभ्रष्टंपापंयातुसहस्रधेति ।

स्नानारंभाविषयीं मंत्र सांगतो विष्णु - " ज्या दिवशीं स्नानाचा आरंभ करावयाचा त्या दिवशीं पहांटेस उठून स्नानाचा नियम धरावा , तो असा - ‘ माघमासमिमं पूर्णं स्नास्येहं देव माधव ॥ तीर्थम्यास्य जले नित्यमिति संकल्प्य चेतसि . " प्रतिदिवशीं स्नानाचा मंत्र सांगतो पद्मपुराणांत - " दुःखदारिद्यनाशाय श्रीविष्णोस्तोषणाय च ॥ प्रातः स्नानं करोम्यद्य माघे पापविनाशनम् ‍ ॥ मकरस्थे रवौ माघे गोविंदाच्युत माधव ॥ स्नानेनानेन मे देव यथोक्तफलदो भव ॥ ’ ह्या मंत्राचा उच्चार करुन मौन धारण करुन स्नान करावें . " स्नान केल्यावर प्रतिदिवशीं सूर्याला अर्घ्य द्यावें . अर्घ्याचा मंत्र पृथ्वीचंद्रोदयांत पाद्मांत - ‘ सवित्रे प्रसवित्रे च परं धाम जले मम ॥ त्वत्तेजसा परिभ्रष्टं पापं यातु सहस्रधा ’

स्नानकालश्चसूर्योदयः त्रिस्थलीसेतौ मकरस्थेरवौयोहिनस्नात्यभ्युदितेरवाविति माघमासेरटंत्यापः किंचिदभ्युदितेरवावितिचपाद्मवचनात् ‍ संप्राप्तेमाघमासेतुतपस्विजनवल्लभे क्रोशंतिसर्ववारीणिसमुद्गच्छतिभास्करे पुनीमः सर्वपापानित्रिविधानिनसंशय इतिनारदीयोक्तेः योमाघमास्युषसिसूर्यकराभितप्तेस्नानंसमाचरतिचारुनदीप्रवाहे उद्धृत्यसप्तपुरुषान् ‍ पितृमातृवंश्यान् ‍ स्वर्गंप्रयात्यमरदेहधरोनरोऽसौ इतिभविष्योत्तरवचनाच्च ब्राह्मेत्वरुणोदय उक्तः अरुणोदयेतुसंप्राप्तेस्नानकालेविचक्षणः माधवांघ्रियुगंध्यायन् ‍ यः स्नातिसुरपूजित इति तथा अरुणोदयमारभ्यप्रातः कालावधिंप्रभो माघस्नानवतांपुण्यंक्रमात्तत्रावधारणा उत्तमंतुसनक्षत्रंमध्यमंलुप्ततारकम् ‍ सवितर्युदितेभूपततोहीनंप्रकीर्तितमिति तेनात्रशक्त्यपेक्षयाव्यवस्था इदंचस्नानंप्रयागेऽतिप्रशस्तम् ‍ काश्याः शतगुणंप्रोक्तंगंगायामुनसंगमे सहस्रगुणितासापिभवेत्पश्चिमवाहिनी पश्चिमाभिमुखीगंगाकालिंद्यासहसंगता हंतिकल्पकृतंपापंसामाघेनृपदुर्लभेत्यादिपाद्मादिवचोभ्यः विस्तरस्तुमत्पितामहकृतप्रयागसेतौज्ञेयः ब्राह्मे यत्रकुत्रापियोमाघेप्रयागस्मरणान्वितः करोतिमज्जनंतीर्थेसलभेद्गांगमज्जनम् ‍ तथासमुद्रेप्यतिप्रशस्तम् ‍ तदुक्तंपृथ्वीचंद्रोदयेप्रभासखंडे माघेमासिचयः स्नायान्नैरंतर्येणभावतः पौंडरीकफलंतस्यदिवसेदिवसेभवेत् ‍ माघस्नानंकाम्यमेवेतिभट्टाः विष्ण्वादिवाक्येसदावश्यशब्दान्नित्यत्वावगतेर्नित्यकाम्यमितितुयुक्तम् ‍ ।

स्नानाचा काल म्हटला म्हणजे सूर्योदय होय . कारण , त्रिस्थलीसेतूंत - " मकरास सूर्य असतां जो मनुष्य सूर्योदयकालीं स्नान करीत नाहीं त्यास पाप लागतें . " व " माघमासांत किंचित् ‍ सूर्योदय झाला असतां उदकें शब्द करितात . कीं , ब्रह्महत्या करणारा किंवा सुरापान करणारा अशा कोणा कोणा महापाप्यास पवित्र करुं ? " असेंही पाद्मवचन आहे . आणि " तपस्वी लोकांस प्रिय असा माघमास प्राप्त असतां सूर्य उदय पावतेवेळीं सारीं उदकें ओरडतात कीं , आम्हीं त्रिविध ( कायिक , वाचिक , मानसिक ) अशा सार्‍या पापांस पवित्र करितों , यांत संशय नाहीं " असें नारदीय वचन आहे . आणि " जो मनुष्य माघ मासांत प्रातःकालीं सूर्यकिरण पडलेल्या अशा सुंदर नदीप्रवाहांत स्नान करितो तो मनुष्य पित्याच्या व मातेच्या वंशांतील सात पुरुषांच्या उद्धार करुन देवशरीर प्राप्त होऊन स्वर्गास जातो . " असें भविष्योत्तर वचनही आहे . ब्रह्मपुराणांत तर स्नानाचा काल अरुणोदय सांगितला आहे . तो असा - " स्नानाचा काल अरुणोदय प्राप्त झाला असतां जो मनुष्य भगवंताच्या चरणकमलद्वंद्वाचें ध्यान करुन स्नान करितो त्याची देव पूजा करितात . " तसेंच - " अरुणोदयाला आरंभ करुन प्रातः कालपर्यंत माघस्नान करणार्‍यांला पुण्य प्राप्त होतें ; त्या पुण्याचा उत्तम मध्यम कनिष्ठ भाव अनुक्रमानें सांगतो - नक्षत्रें दिसत आहेत त्या वेळीं स्नान उत्तम पुण्यकारक . नक्षत्रें दिसेनाशीं झाल्यावर जें स्नान तें मध्यम पुण्यकारक . आणि सूर्याचा उदय झाल्यावर जें स्नान तें कनिष्ठ पुण्यकारक सांगितलें आहे . " या स्नानाचा वर सांगितलेल्या पाद्म - नारदीय - भविष्योत्तर वचनांत सूर्योदय काल सांगितला . आणि ब्राह्मांत अरुणोदय काल सांगितला . यावरुन या दोन कालांची शक्तीप्रमाणें व्यवस्था जाणावी . म्हणजे सशक्तांस अरुणोदय काल व अशक्तांस सूर्योदय काल समजावा . हें माघस्नान प्रयागाचेठायीं अति प्रशस्त आहे . कारण , " गंगायमुनेच्या संगमाचे ठायीं काशीपेक्षां शंभरपटीनें अधिक आहे . ती गंगा जेथें पश्चिमवाहिनी आहे येथें सहस्रपट पुण्य देणारी आहे . यमुनेस मिळून पश्चिमाभिमुखी झालेली गंगा कल्पपर्यंत केलेल्या पापाचा नाश करिते . ती पश्चिमाभिमुखी गंगा माघमासांत मिळणें दुर्लभ आहे " इत्यादिक पद्मपुराणादि वचनें आहेत . याचा विस्तार आमच्या पितामहांनीं ( नारायणभट्टांनीं ) केलेल्या प्रयागसेतूत पाहावा . ब्राह्मांत - " जो मनुष्य माघमासांत कोणत्याही तीर्थांत प्रयागाचें स्मरण करुन स्नान करितो , त्याला गंगास्नानाचें फल प्राप्त होतें . " तसेंच हें माघस्नान समुद्रांतही अति प्रशस्त आहे . तें सांगतो - पृथ्वीचंद्रोदयांत प्रभासखंडांत - " जो मनुष्य माघमासांत शुद्ध भावानें निरंतर स्नान करितो त्यास प्रतिदिवशीं कमलार्पणाचें फल प्राप्त होतें . " हें माघस्नान काम्यच आहे , असें नारायणभट्ट सांगतात . विष्णु इत्यादिकांच्या वचनांत ‘ सदा ’ ‘ अवश्य ’ असे शब्द असल्यावरुन नित्यत्वाचें बोधन असल्यामुळें आणि इतर बहुत वचनांत फल सांगितल्यामुळें नित्य व काम्य , असें म्हणणें युक्त आहे .

मासपर्यंतंस्नानासंभवेतुत्र्यहमेकाहंवास्नायात् ‍ महामाघींपुरस्कृत्यसस्नौतत्रदिनत्रयमितिलिंगात् ‍ अस्मिन् ‍ योगेत्वशक्तोपिस्नायादपिदिनत्रयम् ‍ प्रयागेमाघमासेतुत्र्यहंस्नातस्ययत्फलम् ‍ नाश्वमेधसहस्त्रेणतत्फलंलभते भुवीतिपाद्मादिवचनात् ‍ अत्रमकरसंक्रमोरथसप्तमीमाघीतित्र्यहमित्येके माघशुक्लदशम्यादीत्यन्ये मकराद्यत्र्यह इत्यपरे माघमासाद्यत्र्य्ह इतिकेचित् ‍ त्रयोदश्यादीतिबहवः महामाघींपुरस्कृत्यसस्नौतत्रदिनत्रयमितिपाद्मोक्तेः एतस्यार्थवादत्वाद्यत्किंचिद्दिनत्रयमितिभट्टाः तत्त्वंतुसंदिग्धेषुवाक्यशेषादितिन्यायात्र्त्रयोदश्याद्येवेति प्रयागंविनापिपाद्मे अस्मिन्योगेत्वशक्तोपिस्नायादपिदिनत्रयमिति ।

एक मासपर्यंत स्नानाचा असंभव असेल तर तीन दिवस किंवा एक दिवस स्नान करावें . कारण , " महामाघी पौर्णिमा पुढें करुन तीन दिवस स्नान करिता झाला " असें पाद्मांत तीन दिवस स्नान केलेल्याचें बोधक वचन आहे . " महामाघी व प्रयाग या योगाचे ठायीं स्नानाविषयीं अशक्त असेल त्यानेंही माघमासांत तीन दिवस स्नान करावें . माघमासांत प्रयागाचे ठायीं तीन दिवस स्नान केल्यानें जें फल प्राप्त होतें तें फल सहस्र अश्वमेघ केल्यानें भूमीवर प्राप्त होत नाहीं . " असें पद्म पुराणादि वचन आहे . या माघस्नानाविषयीं तीन दिवस घ्यावयाचे ते मकरसंक्रांति , रथसप्तमी , माघी पौर्णिमा हे होय , असें कितीएक सांगतात . माघ शुक्लदशमी , एकादशी , द्वादशी , असें अन्य सांगतात . मकराचे पहिले तीन दिवस , असें इतर म्हणतात . माघ मासाचे पहिले तीन दिवस , असें केचित् ‍ म्हणतात . त्रयोदशी , चतुर्दशी , पौर्णिमा , असें बहुत विद्वान् ‍ सांगतात . कारण , ‘ महामाघी पुढें करुन तीन दिवस स्नान करिता झाला ’ हें वर सांगितलेलें पाद्म वचन आहे . हें वचन अर्थवाद ( झालेल्या अर्थाचें प्रतिपादक ) असल्यामुळें कोणते तरी तीन दिवस स्नान करावें , असें भट्ट सांगतात . खरा प्रकार म्हटला तर - ‘ संदिग्धस्थलीं वाक्यशेषानें निर्णय समजावा ’ ह्या न्यायानें ‘ महामाघीं पुरस्कृत्य० ’ ह्या वर सांगितलेल्या पाद्म लिंगावरुन त्रयोदश्यादि पौर्णिमेपर्यंतच तीन दिवस समजावे . प्रयागावांचूनही सांगतो पाद्मांत - ह्या योगावर ( प्रयागाचे ठायीं ) स्नानाविषयीं अशक्त असेल त्यानेंही तीन दिवस स्नान करावें .

माघस्नानेनियमास्तुनारदीये नवह्निंसेवयेत् ‍ स्नातोह्यस्नातोपिवरानने होमार्थंसेवयेद्वह्निंशीतार्थंनकदाचन अहन्यहनिदातव्यास्तिलाः शर्करयान्विताः त्रिभागस्तुतिलानांहिचतुर्थः शर्करान्वितः अनभ्यंगीवरारोहेसर्वमासंनयेद्व्रती तथा अप्रावृतशरीरस्तुयः कष्टंस्नानमाचरेत् ‍ पदेपदेश्वमेधस्यफलंप्राप्नोतिमानवः तथा शंखचक्रधरं देवंमाधवंनामपूजयेत् ‍ वह्निंहुत्वाविधानेनततस्त्वेकाशनोभवेत् ‍ भूशय्याब्रह्मचर्येणशक्तः स्नानंसमाचरेत् ‍ अशक्तोब्रह्मचर्यादौस्वेच्छासर्वत्रकथ्यते तथा तिलस्नायीतिलोद्वर्तीतिलहोमीतिलोदकी तिलभुक् ‍ तिलदाताचषट् ‍ तिलाः पापनाशनाइति प्रयागासंभवेकाश्यांदशाश्वमेधोत्तरस्थप्रयागतीर्थेस्नानमुक्तंकाशीखंडे काश्युद्भवेप्रयागेयेतपसिस्नांतिमानवाः दशाश्वमेधजनितंफलंतेषांभवेद्ध्रुवमिति ।

माघस्नानाविषयीं नियम सांगतो , नारदीयांत - " स्नान केल्यावर किंवा स्नान करण्याचे पूर्वीं देखील अग्नीचें सेवन ( अग्नीचा सेक ) करुं नये . होमाकरितां अग्निसेवन करावें . शीत जाण्याकरितां कधींही अग्नि सेवन करुं नये . दररोज शर्करायुक्त तीळ द्यावे . त्यांत तीन भाग तीळ आणि एक भाग साखर असावी . व्रतस्थानें अभ्यंग केल्यावांचून सारा महिना घालवावा . " तसेंच - " जो मनुष्य शरीरावर प्रावरण न घेतां कष्टानें जाऊन स्नान करील त्याला पदापदाचे ठायीं अश्वमेघाचें फल प्राप्त होईल . " तसेंच - " शंख , चक्र धारण करणार्‍या देव माधवाचें पूजन करावें . यथाविधि अग्नींत होम करुन नंतर एकभुक्त करावें . सशक्त असेल त्यानें भूमीवर शयन व ब्रह्मचर्य धारण करुन स्नान करीत असावें . ब्रह्मचर्य , भूशयन इत्यादिकांविषयीं अशक्त असेल त्यानें यथेच्छ वर्तन करावें . " तसेंच - " तिलयुक्त उदकानें स्नान , तीळ वाटून अंगास लावणें , तिळांचा होम , तिलोदकतर्पण , तिल भक्षण , आणि तिळांचें दान याप्रमाणें सहा प्रकारचा तिळांचा उपयोग पापनाश करणारा आहे . " माघ मासांत प्रयागास जाणें न घडेल तर काशींत दशाश्वमेध तीर्थाचे उत्तरेस असणार्‍या प्रयागतीर्थांत स्नान सांगतो काशीखंडांत - " काशींतील प्रयागतीर्थांत माघमासामध्यें जे स्नान करितात त्यांस निश्चयानें दशाश्वमेधाचें फल प्राप्त होतें . "

स्नानोत्तरंमदनपारिजातेविष्णुः काष्ठमौनान्नमस्कृत्यपूजयेत्पुरुषोत्तमम् ‍ अवश्यमेवकर्तव्यंमाघस्नानमितिश्रुतिः भविष्ये तैलमामलकाश्चैवतीर्थेदेयास्तुनित्यशः ततः प्रज्वालयेद्वह्निंसेवनार्थंद्विजन्मनाम् ‍ एवंस्नानावसानेतुभोज्यंदेयमवारितम् ‍ भोजयेद्दिजदांपत्यंभूषयेद्वस्त्रभूषणैः कंबलाजिनरत्नानिवासांसिविविधानिच चोलकानिचदेयानिप्रच्छादनपटास्तथा उपानहौतथागुप्तमोचकौपापमोचकौ अनेनविधिनादद्यान्माधवः प्रीयतामितिपाद्मे भूमौशयीतहोतव्यमाज्यंतिलसमन्वितम् ‍ तथा अन्नंचैवयथाशक्त्यादेयंमाघेनराधिप सुवर्णरक्तिकामात्रंदद्याद्वेदविदेतथा माघांतेतुविशेषोनारदीये माघावसानेसुभगेषड्रसंभोजनंस्मृतम् ‍ सूर्योमेप्रीयतांदेवोविष्णुमूर्तिर्निरंजनः दंपत्योर्वाससीसूक्ष्मेसप्तधान्यसमन्विते त्रिंशत्तुमोदकादेयाः शर्करातिलसंयुताइति अत्रैकादशीविधानेनव्रतस्योद्यापनंतथेति पाद्मवचनात् ‍ पूर्वेऽह्निउपवासपूजनादिकृत्वापरेऽह्नितिलचर्वाज्यैरष्टोत्तरशतंहोमंकृत्वासवित्रेप्रसवित्रेचेतिपूर्वोक्तंमंत्रमुक्त्वा दिवाकरजगन्नाथप्रभाकरनमोस्तुते परिपूर्णंकुरुष्वेहमाघस्नानमुषः पतेइति समापयेदितिसंक्षेपः ।

स्नान केल्यानंतर कर्तव्य सांगतो - मदनपारिजातांत विष्णु - " काष्ठमौनांला नमस्कार करुन पुरुषोत्तमाची पूजा करावी . हें माघस्नान अवश्य करावें , असें वेदांत सांगितलें आहे . " भविष्यपुराणांत - " स्नानानंतर तीर्थाचे ठायीं तेल व आंवळे हे दररोज द्यावे . नंतर ब्राह्मणांला शेकण्याकरितां अग्नि पेटवावा . याप्रमाणें एकमास स्नान समाप्त झाल्यानंतर मुक्तद्वार भोजन घालावें . ब्राह्मणाचे दांपत्यास भोजन घालावें , आणि वस्त्रें व भूषणें यांनीं भूषित करावें . धाबळी , कृष्णाजिन , रत्नें , नाना प्रकारचीं वस्त्रें , चोळणे , प्रावरणवस्त्रें , पायांतील जोडा , पलंगपोस हे सर्व , देव माधवाच्या प्रीत्यर्थ ब्राह्मणास द्यावे . " पाद्मांत - " भूमीवर शयन करावें . तिलसहित घृताचा होम करावा . " तसेंच - " माघमासांत आपल्या शक्तीप्रमाणें अन्न समर्पण करावें . वेदवेत्त्या ब्राह्मणास एक गुंज सुवर्ण द्यावें . " माघमासाचे अंतीं विशेष सांगतो नारदीयांत - " माघमासाचे शेवटीं ‘ सूर्यो मे प्रीयतां देवो विष्णुमूर्तिर्निरंजनः ’ असें म्हणून षड् ‍ रसांचें भोजन द्यावें . आणि दंपत्याला सप्त धान्यांसहित दोन सूक्ष्म वस्त्रें द्यावीं . शर्करा व तीळ यांचे तीस लाडू करुन ते द्यावे . " " एकादशी व्रताच्या विधीनें माघस्नानरुप व्रताचें उद्यापन करावें . " ह्या पद्मपुराण वचनावरुन माघस्नानसमाप्तीच्या पूर्वदिवशीं उपवास , पूजा इत्यादि करुन दुसर्‍या दिवशीं तिल , चरु , आज्य ह्या तीन द्रव्यांनीं अष्टोत्तरशत होम करुन ‘ सवित्रे प्रसवित्रे च परं धाम जले मम ॥ त्वत्तेजसा परिभ्रष्टं पापं यातु सहस्रधा ॥ ’ ह्या पूर्वोक्त मंत्राचा उच्चार करुन ‘ दिवाकर जगन्नाथ प्रभाकर नमोस्तुते ॥ परिपूर्ण कुरुष्वेदं माघस्नानमुषःपते ’ ह्या मंत्रानें समाप्त करावें . असा हा माघस्नानविधि संक्षेपानें सांगितला आहे .

N/A

References : N/A
Last Updated : June 21, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP