मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
कार्तिकमासकृत्यें

द्वितीय परिच्छेद - कार्तिकमासकृत्यें


निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां कार्तिकमासकृत्यें सांगतो .
अथकार्तिकमासः तुलासंक्रमेप्रागपरादशघटिकाः पुण्याः रात्रौतुप्रागुक्तम् ‍ अथकार्तिकस्नानम् ‍ तत्र पृथ्वीचंद्रोदयेविष्णुस्मृतिपाद्मयोः तुलामकरमेषेषुप्रातः स्नानंविधीयते हविष्यंब्रह्मचर्यंचमहापातकनाशनमितिसौरमासउक्तः प्राच्याश्चेतदेवाद्रियंते दाक्षिणात्यास्तु आश्विनस्यतुमासस्ययाशुक्लैकादशीभवेत् ‍ कार्तिकस्यव्रतानीहतस्यांवैप्रारभेत्सुधीरितिपाद्मोक्तेः भार्गवार्चनेच प्रारभ्यैकादशींशुक्लामाश्विनस्यतुमानवः प्रातः स्नानंप्रकुर्वीतयावत्कार्तिकभास्करइतिविष्णुरहस्योक्तेः हेमाद्रावादित्यपुराणे पूर्णआश्वयुजेमासिपौर्णमास्यांसमाहितइत्युक्त्वा मासंसमग्रंपरयाचभक्त्यासमाप्यतेकार्तिकपौर्णमास्यामित्यंतेभिधानाच्चाश्विनशुक्लैकादश्यांपौर्णमास्यांवारभ्यकार्तिकशुक्लद्वादश्यांपौर्णमास्यांवासमापयेदित्याहुः मदनपारिजातेविष्णुः कार्तिकंसकलंमासंनित्यस्नायीजितेंद्रियः जपन् ‍ हविष्यभुक् ‍ शांतः सर्वपापैः प्रमुच्यते अत्रदेशविशेषः पाद्मे कार्तिकंप्रक्रम्य कुरुक्षेत्रेकोटिगुणोगंगायामपितत्समः ततोधिकः पुष्करेस्याद्दूरवत्यांचभार्गव पुण्याः पुर्यश्चसप्तैवमुनयोमथुराधिका दुर्लभः कार्तिकोविप्रामथुरायांनृणामिह यत्रार्चितः स्वकंरुपंभक्तेभ्यः संप्रयच्छतीति इदंचस्नानंकाशीस्थपंचनदेप्यतिप्रशस्तम् ‍ शतंसमास्तपस्तप्त्वाकृतेयत्प्राप्यतेफलम् ‍ तत्कार्तिकेपंचनदेसकृत्स्नानेनलभ्यते कार्तिकेबिंदुतीर्थेयोब्रह्मचर्यपरायणः स्नास्यत्यनुदितेभानौभानुजात्तस्यभीः कुत इत्यादिकाशीखंडोक्तेः भानुजोयमः ॥

तुलासंक्रांतीच्या पूर्वीच्या दहा व पुढच्या दहा घटिका पुण्यकाल . रात्रीं संक्रांत असतां पुण्यकाल पूर्वीं ( प्रथम परिच्छेदांत ) सांगितला आहे . आतां कार्तिकस्नान सांगतो - पृथ्वीचंद्रोदयांत विष्णुस्मृतींत व पद्मपुराणांत - " तुला , मकर , मेष या संक्रांतींत प्रातःस्नान , हविष्यभक्षण व ब्रह्मचर्यव्रत हीं करावीं म्हणजे महापातकाचा नाश होतो . " याप्रमाणें हा सौरमास ( संक्रांतिमास ) सांगितला आहे . प्राग्देशीय लोक हा सौरमासच घेतात . दाक्षिणात्य तर , " आश्विनमासाचे शुक्लपक्षांतील एकादशीस कार्तिकाचे व्रतांचा आरंभ करावा " ह्या पाद्मवचनावरुन व भार्गवार्चनांतही " आश्विनशुक्ल एकादशीस प्रारंभ करुन कार्तिकशुक्ल द्वादशीपर्यंत मनुष्यानें प्रातःस्नान करावें " ह्या विष्णुरहस्यवचनावरुन आणि हेमाद्रींत आदित्यपुराणांत - " आश्विनमास पूर्ण झाला असतां पौर्णिमेचे ठायीं समाहितपणानें " असें सांगून " सर्व महिनाभर परमभक्तानें स्नान करुन कार्तिकपौर्णिमेचे ठायीं समाप्त करावें " असें अंतीं सांगितल्यावरुनही आश्विनशुक्ल एकादशीस किंवा पौर्णिमेस प्रारंभ करुन कार्तिकशुक्ल द्वादशीस किंवा पौर्णिमेस समाप्त करावें , असें सांगतात . मदनपारिजातांत विष्णु - " सर्व कार्तिकमासामध्यें जितेंद्रिय व शांत होऊन नित्यस्नान , जप व हविष्यान्नभोजन करणारा सर्व पापांपासून मुक्त होतो . " ह्या कार्तिकस्नानाविषयीं विशेष देश पद्मपुराणांत कार्तिकमासाचा उपक्रम करुन सांगतो - " कुरुक्षेत्रांत कार्तिकमास कोटिगुणित फल देणारा आहे . गंगेमध्येंही त्याच्या समान आहे . पुष्करतीर्थाचे ठायीं व द्वारकेंत त्याच्याहून अधिक फल देणारा आहे . सात पुरी ( अयोध्या , मथुरा , माया , काशी , कांची , अवंतिका , आणि द्वारावती ह्या ) पुण्यकारक आहेत ; पण त्या सातांमध्यें मथुरापुरी अधिक पुण्यकारक आहे . मनुष्यांना मथुरेमध्यें कार्तिकमास प्राप्त होणें दुर्लभ आहे . इहलोकीं ज्या मथुरेंत पूजिलेला भगवान् ‍ भक्तांला आत्मस्वरुप देतो . " हें कार्तिकस्नान काशींतील पंचनद तीर्थांतही अति प्रशस्त आहे . कारण , " कृतयुगामध्यें शंभर वर्षैं तप करुन जें फल प्राप्त होतें तें फल कार्तिकमासांत पंचनदतीर्थांत एकवेळ स्नान केल्यानें प्राप्त होतें . कार्तिकमासांत जो मनुष्य ब्रह्मचर्यव्रत धारण करुन सूर्योदयापूर्वीं बिंदुमाधवतीर्थामध्यें स्नान करील त्याला यमाचें भय कोठून होणार ? " इत्यादिक काशीखंडवचनें आहेत .
इदंचप्रातः स्नानंसंध्यांचकृत्वाकार्यम् ‍ तेनविनेतरकर्मानधिकारादितिवर्धमानः यद्यपिप्रातः संध्यायाः सूर्योदयेसमाप्तिस्तथापिवचनबलादनुदितहोमवद्भविष्यति स्नानमंत्रश्चतत्रैव कार्तिकेऽहंकरिष्यामिप्रातः स्नानंजनार्दन प्रीत्यर्थंतवदेवेशदामोदरमयासह इमंमंत्रंसमुच्चार्यमौनीस्नायाद्व्रतीनर इति अर्घ्यमंत्रोपितत्रैव व्रतिनः कार्तिकेमासिस्नातस्यविधिवन्मम गृहाणार्घ्यंमयादत्तंदनुजेंद्रनिषूदन नित्यनैमित्तिकेकृष्णकर्तिकेपापनाशने गृहाणार्घ्यंमयादत्तंराधयासहितोहरे इमौमंत्रौसमुच्चार्ययोऽर्घ्यंमह्यंप्रयच्छति सुवर्णरत्नपुष्पांबुपूर्णशंखेनपुण्यवान् ‍ सुवर्णपूर्णापृथिवीतेनदत्तानसंशय इति एवंसंपूर्णस्नानाशक्तौत्र्यहंस्नायात् ‍ वाराणस्यांपंचनदेत्र्यहंस्नातास्तुकार्तिके अमीतेपुण्यवपुषः पुण्यभाजोऽतिनिर्मलाइतिकाशीखंडोक्तेः ॥

हें कार्तिकस्नान प्रातःस्नान व संध्या हीं करुन करावें . कारण , प्रातःस्नान व संध्या हीं केल्यावांचून इतर कर्मांस अधिकार नाहीं , असें वर्धमान सांगतो . जरी प्रातः संध्येची समाप्ति सूर्योदयकालीं होते असें आहे , तथापि वचनबलानें जसा सूर्योदयाच्या पूर्वीं अग्निहोत्रहोम होतो तसें सूर्योदयाच्या पूर्वीं प्रातः संध्या समाप्त करुन हें कार्तिकस्नान होतें . स्नानाचा मंत्र तेथेंच सांगतो - " कार्तिकेऽहं करिष्यामिउ प्रातःस्नानं जनार्दन ॥ प्रीत्यर्थं तव देवेश दामोदर मया सह ॥ हा मंत्र म्हणून व्रती मनुष्यानें मौन धारण करुन स्नान करावें . " अर्घ्याचा मंत्रही तेथेंच सांगतो - " व्रतिनः कार्तिके मासि स्नातस्य विधिवन्मम ॥ गृहाणार्घ्यं मया दत्तं दनुजेंद्रनिषूदन ॥ नित्यनैमित्तिके कृष्ण कार्तिके पापनाशने ॥ गृहाणार्घ्यं मया दत्तं राधया सहितो हरे ॥ हे दोन मंत्र म्हणून सुवर्ण , रत्न , पुष्प , उदक हीं शंखांत घालून शंखानें जो पुण्यवान् ‍ भगवंताला अर्घ्य देतो त्यानें सुवर्णपूर्ण पृथिवी दिली यांत संशय नाहीं . " याप्रकारें सर्व महिना स्नान करण्याला शक्ति नसेल तर तीन दिवस करावें . कारण , " वाराणसीमध्यें पंचनदतीर्थांत कार्तिकमासीं तीन दिवस ज्यांनीं स्नान केलें ते हे पुण्यात्मे , पुण्य भोगणारे अतिनिर्मल होतात " असें काशीखंडवचन आहे .

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP