मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
उपाकर्म ( श्रावणी )

द्वितीय परिच्छेद - उपाकर्म ( श्रावणी )

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


आतां उपाकर्म ( श्रावणी ) सांगतो.

अथोपाकर्म तत्रबह्वृचानांप्रयोगपारिजातेशौनकः अथातः श्रावणेमासेश्रवणर्क्षयुतेदिने श्रावण्यांश्रावणेमासिपंचम्यांहस्तसंयुते दिवसेविदधीतैतदुपाकर्मयथोदितं अध्यायोपाकृतिंकुर्यात्तत्रोपासनवह्निनेति अत्र पौर्णमास्युपसंहारन्यायेनयजुर्बेदिपरेतिहेमाद्रिः अत्रहस्तयुक्तापंचम्युक्ता कारिकापि तन्मासेहस्तयुक्तायांपंचम्यांवातदिष्यते इति केवलपंचम्यांहस्तयुतेन्यस्मिन्‍दिनेइतितुहेमाद्रिः उपासनवह्निनेतितु कर्मद्वयमिदंकेचिल्लौकिकाग्नौप्रकुर्वतेइतिकारिकोक्तलौकिकाग्निनाविकल्पते तत्राप्यध्याप्यैरन्वारब्धइतिसूत्रात्‍सशिष्यत्वे तदधिकारिकस्याचार्याग्नानान्यस्याग्नावन्योजुहुयादितिनिषेधाल्लौकिकएव तदभावेतुस्मार्तइति निगर्वः ।


प्रयोगपारिजातांत शौनक - “ यानंतर श्रावणमासांत श्रवणनक्षत्रयुक्त दिवशीं, श्रावणीपौर्णिमेस, श्रावणमासाच्या पंचमीस, हस्तयुक्त दिवशीं हें उपाकर्म यथोक्त विधीनें करावें. वेदांचें उपाकरण ( स्वीकार ) उपासनाग्नीनें करावें. ” एथें श्रावणीपौर्णमासी सांगितली ती उपसंहारन्यायानें यजुर्वेदिविषयक आहे, असें हेमाद्रि सांगतो. या कर्माविषयीं हस्तयुक्त पंचमी सांगितली आहे. कारिकाही - “ अथवा त्या पूर्वोक्तमासांत हस्तयुक्त पंचमीस तें उपाकर्म इष्ट आहे. ” केवळ पंचमीस व हस्तयुक्त इतर दिवशीं करावें, असें तर हेमाद्रि सांगतो. वरील वचनांत ‘ उपासनवह्निना ’ असें आहे तें तर “ हीं दोन कर्मै ( उपाकर्म व उत्सर्जन ) कितीएक लौकिकाग्नीवर करितात ” ह्या कारिकेंत सांगितलेल्या लौकिकाग्नीशीं विकल्पित ( उपासनाग्नीनें किंवा लौकिकाग्नीनें करावें असें ) होतें. तो विकल्प असतांही “ शिष्यांनीं अन्वारब्ध अशा आचार्यानें करावें ” ह्या सूत्रावरुन शिष्यांसह करावयाचें असतां त्या उपकर्माविषयीं शिष्य अधिकारी असल्यामुळें ‘ दुसर्‍याच्या अग्नीवर अन्यानें होम करुं नये ’ या वचनानें आचार्याच्या अग्नीवर होमाचा निषेध असल्यामुळें लौकाग्नीवरच करावें असें झालें. शिष्यांच्या अभावीं तर स्मार्ताग्नीवर करावें, असें निगर्व सांगतो.

यद्यपिदिपिकायां वेदोपाकृतिरोषधिप्रजननेपक्षेसितेश्रावणेइति शुक्लपक्षोपिसर्वेषांमुख्यकालत्वेनोक्तः वक्ष्यमाणगार्ग्यवचनेनछंदोगान्प्रतिविहितस्यतस्याविरोधिनः सर्वान्प्रतिप्रवृत्तिश्च तथापिश्रावणमाससंबंधस्यसूत्रोक्तत्वात्कृष्णपक्षेपिकार्यमितिवृद्धाः तथाचसूत्रम्‍ अथातोध्यायोपाकरणमोषधीनांप्रादुर्भावेश्रवणेनश्रावणस्यपंचम्यांहस्तेनवा अत्रश्रवणोमुख्योन्येगौणाः तत्प्राथम्यात् तस्याहर्द्वययोगेहेमाद्रौव्यासः धनिष्ठासंयुतंकुर्याच्छ्रावणंकर्मयद्भवेत‍ तत्कर्मसफलंज्ञेयमुपाकरणसंज्ञितं श्रवणेनतुयत्कर्मह्युत्तराषाढसंयुतं संवत्सरकृतोध्यायस्तत्क्षणादेवनश्यतीति गार्ग्योपि उदयव्यापिनित्वेवविष्ण्वर्क्षेघटिकाद्वयं तत्कर्मसफलंज्ञेयंतस्यपुण्यंत्वनंतकं इति पूर्वेद्यरुत्तराषाढायोगेपरेद्युः श्रवणाभावेघटिकाद्वयन्यूनेवापंचम्यादौकार्यं नतुपूर्वविद्धायांसंगवमात्रे अपवादाभावात् किंच परेद्युः संगवास्पर्शेनिषिद्धपूर्वाग्रहणेकिंमानं संगववाक्यंश्रवणवाक्यंचेतिचेत् तर्हिव्रीहिवाक्यादश्वशफवाक्याच्चमाषमिश्राणामप्युपादानंस्यादितिमहत्पांडित्यं निषेधानुप्रवेशान्नैरपेक्ष्यबाधानेतिचेत् इहापितुल्यं एतेनपर्वाप्यौदयिकंव्याख्यातं निषेधानुप्रवेशस्योभयत्रतुल्यवात् ।

आतां जरी दिपिकेंत - “ ओषधी उत्पन्न झाल्या असतां श्रावणशुक्लपक्षांत वेदांचें उपाकरण करावें ” असा शुक्लपक्षही सर्वांस मुख्य काळ सांगितला आहे; आणि पुढें सांगावयाच्या ‘ शुक्लपक्षे तु हस्तेन उपाकर्मापराह्णिकं ’ ह्या गार्ग्यवचनानें छंदोगशाख्यांना शुक्लपक्ष सांगितलेला असून तो अविरुद्ध असल्यामुळें सर्वशाख्यांना प्रवृत्तही होत आहे तरी श्रावणमासाचा संबंध सूत्रानें उक्त असल्यामुळें कृष्णपक्षांतही करावें, असें वृद्ध सांगतात. तेंच सूत्र सांगतो - “ आतां अध्यायांचें ( वेदांचें ) उपाकरण ओषधींचा प्रादुर्भाव असतां श्रावणमासाचे श्रवणनक्षत्रावर, पंचमीस, किंवा हस्तनक्षत्रावर करावें. ” याविषयीं श्रवण मुख्य. इतर काल गौण होत. कारण, तो प्रथम सांगितला आहे. त्या श्रवणाचा दोन दिवस योग असतां सांगतो हेमाद्रींत व्यास - जें उपाकरण कर्म तें श्रवणयुक्त धनिष्ठा नक्षत्रावर करावें म्हणजे सफल होतें. आणि उत्तराषाढायुक्त श्रवणावर जें होतें त्या योगानें एकवर्षपर्यंत केलेलें अध्ययन तत्क्षणींच नष्ट होतें. ” गार्ग्यही - “ उदयव्यापि श्रवणनक्षत्र दोन घटिका असलें तरी त्या दिवशीं केलेलें कर्म सफल होतें व त्याचें पुण्य अनंत आहे. ” पूर्वदिवशीं उत्तराषाढायोग व दुसर्‍या दिवशी श्रवण नाहीं किंवा दोनघटिकांहून न्यून असेल तर त्या वेळीं पंचमी इत्यादि कालीं करावें, पण उत्तराषाढाविद्ध अशा श्रवणावर संगवकालीं ( पांच भाग केलेल्या दिनाच्या दुसर्‍या भागीं ) करुं नये. कारण, उत्तराषाढाविद्ध निषेधाचा अपवाद नाहीं. आणखी असें कीं, दुसर्‍या दिवशीं श्रवणाचा संगवकालास स्पर्श नसतां निषिद्ध अशी पूर्वतिथि घेण्याविषयीं काय प्रमाण आहे ? जर पुढें सांगावयाचें ‘ संगवकालीं करावें ’ हें वाक्य आणि ‘ श्रवणावर करावें ’ हें वाक्यप्रमाण आहे, असें म्हटलें तर ‘ व्रीहिभिर्यजेत ’ ( व्रीहींनीं होम करावा ), ‘ अश्वशफपरिमितैर्यजेत ’ ( घोड्याच्या पायांच्या खुरांत राहतील तितक्यांनीं होम करावा ) ह्या दोन वाक्यांवरुन, व्रीहि अल्प असल्यामुळें त्यांत माष ( उडीद ) मिश्रणानें घोड्याच्या खुर परिमिति करुन घ्यावे, असें होईल, हें मोठें पांडित्य म्हणावयाचें आहे ! आतां असें म्हणतों कीं, ‘ माषांनीं होम करुं नये ’ या निषेधाचा त्यांत प्रवेश असल्यामुळें माष येत नाहींत. असें म्हटलें तर एथेंही उत्तराषाढाविद्धाचा निषेध असल्यामुळें उत्तराषाढायुक्ताचें ग्रहण होत नाहीं हें समान आहे. यावरुन पर्व ( पौर्णिमा ) देखील घ्यावयाचें तें उदयव्यापि घ्यावें, असें बोधित झालें. कारण, पूर्वाचा निषेध दोन्ही ठिकाणीं ( श्रवण व पर्व यांविषयीं ) समान आहे.

श्रवणयुतदिनेसंक्रांत्यादौतु उपाकर्मनकुर्वतिक्रमात्सामर्ग्यजुर्विदः ग्रहसंक्रांतियुक्तेषुहस्तश्रवणपर्वस्वितिहेमाद्रौनिषेधात्पंचम्यादयोग्राह्याः मदनरत्नेपि यदिस्याच्छ्रावणंपर्वग्रहसंक्रांतिदूषितं स्यादुपाकरणंशुक्लपंचम्यांश्रावणस्यतु स्मृतिमहार्णवे संक्रांतिर्ग्रहणंवापियदिपर्वणिजायते तन्मासेहस्तयुक्तायांपंचम्यांवातदिष्यते तत्रापि प्रयोगपारिजाते वृद्धमनुकात्यायनौ अर्धरात्रादधस्ताच्चेत्संक्रांतिर्ग्रहणंतदा उपाकर्मनकुर्वीतपरतश्चेन्नदोषकृदिति मदनरत्नेगार्ग्योपि यद्यर्धरात्रादर्वाक्तुग्रहः संक्रमएवच नोपाकर्मतदाकुर्याच्छ्रावण्यांश्रवणेपिवा एतेनग्रहणसंक्रांतिकालेश्रवणसत्त्वे एवनिषेधोनार्वागितिमूर्खशंकापरास्ता ग्रहविशिष्टानां हस्तश्रवणपर्वणांप्रत्येकंनिषेधेतद्युतोपाकर्मनिषेधेचविशिष्टोद्देशेवाक्यभेदात् पंचम्यांसंक्रांतौनिषेधाभावापत्तेश्च तेनार्धरात्रात्पूर्वंग्रहसंक्रमसत्त्वे एवोपाकर्मनिषेधोनतद्योगे एव यत्तु प्रतिपन्मिश्रितेनैवनोत्तराषाढसंयुते श्रवणेश्रावणंकुर्युर्ग्रहसंक्रांतिवर्जिते इतिप्रतिपन्मिश्रनिषेधकंवचनंतन्निर्मूलम् ।

श्रवणयुक्त दिवशीं संक्रांति वगैरे असेल तर “ ग्रहण किंवा संक्रांतियुक्त अशा हस्त - श्रवण - पर्वावर अनुक्रमानें सामवेदी, ऋग्वेदी, यजुर्वेदी हे उपाकर्म करीत नाहींत ” असा हेमाद्रींत निषेध असल्यामुळें पंचम्यादिक काल घ्यावे. मदनरत्नांतही - “ जर श्रावणीपौर्णिमा ग्रहण किंवा संक्रांति यांनीं दूषित होईल तर श्रावणाच्या शुक्लपंचमीस उपाकरण होईल. ” स्मृतिमहार्णवांत - “ जर पर्वाचे ठायीं संक्रांति किंवा ग्रहण होईल तर त्या मासांत हस्तयुक्त पंचमीस तें उपाकरण इष्ट आहे. ” संक्रांत्यादि असतांही सांगतो - प्रयोगपारिजातांत वृद्धमनु व कात्यायन “ त्या दिवशीं मध्यरात्रीच्या आंत जर संक्रांति किंवा ग्रहण असेल तर उपाकर्म करुं नये. मध्यरात्रीच्या पुढें असेल तर दोष नाहीं. ” मदनरत्नांत गार्ग्यही - “ जर अर्धरात्रीच्या आंत ग्रहण किंवा संक्रांत असेल तर श्रावणपौर्णिमासीस किंवा श्रवणावर उपाकर्म करुं नये. ” यावरुन ग्रहणकालीं व संक्रांतिकालीं श्रवण असेल तरच निषेध आहे. ग्रहण व संक्रांती होण्याच्या आंत श्रवण असतां निषेध नाहीं, अशी मूर्खशंका खंडित झाली. कारण, ग्रहणयुक्त हस्त, श्रवण, पर्व या प्रत्येकाचा निषेध केला असतां व तसल्या नक्षत्रादियुक्त उपाकर्माचा निषेध केला असतां विशिष्टाचा ( ग्रहणविशिष्ट श्रवणादिकांचा ) उद्देश करुन निषेधाचें विधान झाल्यामुळें भिन्न भिन्न वाक्यें होती, हा दोष समजावा. आणि ग्रहण व संक्रांतियुक्त श्रवणाचाच निषेध केला असतां पंचमीस संक्रांत असेल तर निषेध होणार नाहीं. तेणेंकरुन अर्धरात्रीच्या पूर्वी ग्रहण किंवा संक्रांत असेल तरच उपाकर्माचा निषेध आहे. ग्रहणादिकांचा योग श्रवणादिकांस असतांच निषेध नाहीं. आतां जें “ ग्रहणसंक्रांतिरहित श्रवणावर श्रावणी करावी. प्रतिपदायुक्त किंवा उत्तराषाढायुक्त श्रवणावर करुं नये ” असें प्रतिपदायुक्त श्रवणाचें निषेधकवाक्य तें निर्मूल आहे.

अत्रच वेदोपाकरणेप्राप्तेकुलीरेसंस्थितेरवौ उपाकर्मनकर्तव्यंकर्तव्यंसिंहयुक्तके इतिवचनंदेशांतरविषयं नर्मदोत्तरभागेकर्तव्यंसिंहयुक्तके कर्कटेसंस्थितेभानावुपाकुर्यात्तुदक्षिण इतिबृहस्पतिवचनादितिप्रयोगपारिजातेनोक्तं पराशरमाधवीयेप्येवं सामगानांसिंहस्थरवावुक्तेस्तद्विषय इदं पुरोडाशचतुर्धाकरणवदुपसंह्नियते तेषामेवदेशव्यवस्था नतुबह्वृचादिपरं तेषांसूत्रेचांद्रश्रावणोक्तेः सौरेपंचम्ययोगात् इतितुवयंपश्यामः यत्तुकालादर्शे अध्यायानामुपाकर्मश्रावण्यांतैत्तिरीयकाः बह्वृचाः श्रवणेकुर्युः सिंहस्थोर्कोभवेद्यदि सहस्तशुक्लपंचम्यांवातद्ग्रहणसंक्रमे असिंहार्केप्रोष्ठपद्यांश्रवणेनव्यवस्थयेति तन्मूलालेखनाच्चिंत्यम् ।

या ठिकाणीं “ वेदांचें उपाकरण प्राप्त असतां सूर्य कर्काला असेल तर उपाकर्म करुं नये. सिंहराशीस सूर्य असतां करावें. ” असें वचन तें इतर देशविषयक आहे. कारण, “ नर्मदेच्या उत्तरभागीं सिंहराशीस सूर्य असतां उपाकर्म करावें. आणि दक्षिणभागीं कर्कास सूर्य असतां करावें ” असें बृहस्पतिवचन आहे म्हणून प्रयोगपारिजातानें उक्त आहे. पराशरमाधवीयांतही असेंच आहे. सामवेद्यांना सिंहस्थ रवि असतां उपाकर्म सांगितल्यामुळें त्यांविषयींच ह्या वचनानें - जसें ‘ पुरोडाशं चतुर्धा करोति ’ ह्या सामान्य पुरोडाशचतुर्धाकरणवाक्याचा ‘ आग्नेयं चतुर्धा करोति, ( आग्नेयपुरोडाश चतुर्धा करावा ) ह्या वाक्यानें उपसंहार ( एक विषयावर म्हणजे आग्नेयपुरोडाशावर चतुर्धाकरणाचें पर्यवसान ) केला आहे तसा - येथें उपसंहार केला आहे. त्यांना ( सामगांना ) च नर्मदोत्तरीं सिंहास सूर्य असतां इत्यादि पूर्वोक्त देशव्यवस्था समजावी. बह्वृचाद्रिकांविषयीं नाहीं. कारण, यांच्या सूत्रांत चांद्रश्रावणमास सांगितला आहे. सौरमास श्रावण म्हटला तर पंचमी सांपडत नाहीं, असें तर आम्हीं ( कमलाकरभट्ट ) समजतों. आतां जें कालादर्शांत - “ वेदांचें उपाकर्म तैत्तिरीयशाख्यांनीं
सिंहराशीस सूर्य असेल तर श्रावणीपौर्णमासीस करावें. बह्वृचांनीं श्रावणावर करावें. त्या दिवशीं ग्रहण किंवा संक्रांत असेल तर हस्तयुक्त पंचमीस करावें. सिंहराशीस सूर्य गेला नसेल तर प्रौष्ठपदी पौर्णमासीस व श्रवणावर पूर्वोक्त व्यवस्थेनें करावें ” असें वचन आहे त्याचें मूळ ग्रंथकारानें लिहिलें नसल्यामुळें तें चिंत्य ( प्रमाणशून्य ) आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP