मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
पौषमासकृत्यें

द्वितीय परिच्छेद - पौषमासकृत्यें

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां पौषमासकृत्यें सांगतो .

धनुः संक्रमे पराः षोडशघटिकाः पुण्याः अन्यत्प्राग्वत् ‍ अत्रोत्सर्जननिर्णयोवक्तव्योप्युपाकर्मप्रसंगात्प्रागेवोक्तः कल्पतरौभविष्ये पौषेमासियदादेविशुक्लाष्टम्यांबुधोभवेत् ‍ तस्यांस्नानंजपोहोमस्तर्पणंविप्रभोजनम् ‍ मत्प्रीतयेकृतंदेविशतसाहस्रिकंभवेत् ‍ अत्रैवरोहिण्यार्द्रायोगेपुण्यतमत्वंतत्रैवज्ञेयम् ‍ पौषशुक्लैकादशीमन्वादिः साचोक्ताप्राक् ‍ पौषपौर्णिमानंतराः सप्तम्यष्टमीनवम्योष्टकाद्याः प्रागुक्ताः ।

धनुः संक्रांतीच्या पुढच्या सोळा घटिका पुण्यकाळ जाणावा . इतर सर्व निर्णय पूर्वीं ( प्रथमपरिच्छेदांत ) सांगितल्याप्रमाणें समजावा . एथें उत्सर्जनाचा निर्णय सांगावयाचा पण तो उपाकर्माच्या प्रसंगानें पूर्वींच सांगितला आहे . कल्पतरुंत भविष्यपुराणांत - " शंकर म्हणतात - हे देवि ! पौषशुक्ल अष्टमीस जेव्हां बुधवार असेल तेव्हां स्नान , जप , होम , तर्पण , ब्राह्मणभोजन हीं माझ्या प्रीत्यर्य करावीं , तीं लक्षपट होतात . " या अष्टमीसच रोहिणी व आर्द्रा नक्षत्र यांचा योग अतिशय पुण्यकारक होतो . असें तेथेंच सांगितलें आहे . पौषशुक्लएकादशी ही मन्वादि होय . तिचा निर्णय पूर्वीं सांगितला आहे . पौषपौर्णिमेच्या पुढच्या सप्तमी , अष्टमी , नवमी ह्या अष्टकादिक श्राद्धतिथि पूर्वीं ( मार्गशीर्षांत ) सांगितल्या आहेत .

N/A

References : N/A
Last Updated : June 21, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP