मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
नवरात्रांत वेदपारायण

द्वितीय परिच्छेद - नवरात्रांत वेदपारायण

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अत्रवेदपारायणमप्युक्तंरुद्रयामले एवंचतुर्वेदविदोविप्रान्सर्वान्प्रसादयेत् ‍ तेषांचवरणंकार्यंवेदपारायणायवैइति तथा एकोत्तराभिवृद्ध्यातुनवमीयावदेवहि चंडीपाठंजपेच्चैवजापयेद्वाविधानतः तिथितत्त्वेवाराहीतंत्रे प्रणवंचादितोजप्त्वास्तोत्रंवासंहितांपठेत् ‍ अंतेचप्रणवंदद्यादित्युवाचादिपुरुषः आधारेस्थापयित्वातुपुस्तकंप्रजपेत्सुधीः हस्तसंस्थापनादेवयस्माद्वैविफलंभवेत् ‍ स्वयंचलिखितंयच्चशूद्रेणलिखितंभवेत् ‍ अब्राह्मणेनलिखितंतच्चापिविफलंभवेत् ‍ ऋषिच्छंदादिकंन्यस्यपठेत्स्तोत्रंविचक्षणः स्तोत्रेनदृश्यतेयत्रप्रणवंतत्रविन्यसेत् ‍ सर्वत्रपाठ्येविज्ञेयस्त्वन्यथाविफलंभवेत् ‍ एवंनवमीपर्यंतंप्रत्यहंकुर्यात् ‍ अत्रविशेषोहेमाद्रौदेवीपुराणे यदाद्येदिवसेकुर्याच्चंडिकापूजनादिकं द्विगुणंतद्दितीयेह्नित्रिगुणंतत्परेहनि नवमीतिथिपर्यंतंवृद्ध्यापूजाजपादिकमिति एतेननवरात्रेपूजैवप्रधानंउपवासादित्वंगमितिगम्यते तिथिह्नासेतुतिथिद्वयनिमित्तंपूजादिमहालयश्राद्धवदेकदिनेआवृत्त्याकार्यम् ‍ वृद्धौतद्वदेवावृत्तिः ततोनवरात्रोपवासादिसंकल्पंकुर्यात् ‍ स्वस्याशक्तावन्येनवापूजादिकारयेत् ‍ स्वयंवाप्यन्यतोवापिपूजयेत्पूजयीतवेतितरंगिण्यांदेवीपुराणात् ‍ इदंचदेवीपूजनंशुक्रास्तादावपिकार्यम् ‍ तदुक्तंधर्मप्रदीपे नष्टेशुक्रेतथाजीवेसिंहस्थेचबृहस्पतौ कार्याचैवस्वदेव्यर्चाप्रत्यब्दंकुलधर्मतइति मलमासेतुवचनाभावान्नभवति ।

या नवरात्रांत वेदपारायणही सांगतो - रुद्रयामलांत - " असेंच चतुर्वेदवेत्त्या सर्व ब्राह्मणांस प्रसन्न करावें , आणि त्यांना वेदपारायणाकरितां वरावें . " तसाच " एकोत्तरवृद्धीनें नवमीपर्यंत चंडीपाठाचा जप यथाविधि स्वतः करावा . अथवा दुसर्‍याकडून करवावा . " तिथितत्त्वांत वाराहीतंत्रांत - " प्रथम प्रणवाचा जप करुन स्तोत्र किंवा संहिता पठन करावी , नंतर अंतींही प्रणवाचा जप करावा , असें आदिपुरुष सांगता झाला , आधारावर पुस्तक ठेवून वाचन करावें . कारण , हस्तांत पुस्तक घेतल्यानें पाठ विफल होतो . स्वतां लिहिलेलें किंवा शूद्रानें लिहिलेलें व अब्राह्मणानें लिहिलेलें पुस्तक असेल तर तेंही वाचन विफल होतें . ऋषि , छंद , देवता यांचा न्यास करुन स्तोत्रपाठ करावा . स्तोत्रांत जेथें प्रणव नसेल तेथें प्रणव योजावा . हा क्रम सर्व पाठांत जाणावा . प्रणवावांचून पाठ विफल होतो . " असें नवमीपर्यंत प्रतिदिवशीं करावें . याविषयीं विशेष सांगतो - हेमाद्रींत - देवीपुराणांत - " जें प्रथमदिवशीं चंडिकेचें पूजनादिक करावें तें दुसरे दिवशीं द्विगुणित व तिसरे दिवशीं त्रिगुणित असें नवमीतिथिपर्यंत पूजा , जप इत्यादिक वृद्धीनें करावें . " या वचनावरुन नवरात्रांत पूजाच प्रधान आहे , उपवासादिक तर अंग होय , असें समजतें . तिथिक्षय असेल तर दोन तिथिनिमित्तानें करावयाच्या दोन पूजा वगैरे , महालयश्राद्धासारख्या एक दिवशींच आवृत्तीनें कराव्या . तिथीची वृद्धि असतां महालयासारखीच द्विरावृत्ती करावी . नंतर नवरात्रांत कर्तव्य जें उपवासादिक त्याचा संकल्प करावा . आपणांस सामर्थ्य नसेल तर दुसर्‍याकडून पूजादिक करवावें . कारण , " स्वतां पूजन करावें किंवा दुसर्‍याकडून करवावें . " असें दुर्गाभक्तितरंगिणींत - देवीपुराणवचन आहे . हें देवीपूजन शुक्रास्तादिकांतही करावें . तें सांगतो धर्मप्रदीपांत - " शुक्र व गुरु यांचें अस्त किंवा बृहस्पति सिंहस्थ असतांही प्रतिवर्षीं कुलधर्मास्तव आपल्या देवीचें पूजन करावें . " मलमासांत करण्याविषयीं वचन नसल्यामुळें होत नाहीं .

अत्रसाश्वस्याश्वपूजनमुक्तम् ‍ मदनरत्नेदेवीपुराणे आश्वयुक् ‍ शुक्लप्रतिपत्स्वातीयोगेशुभेदिने पूर्वमुच्चैः श्रवानामप्रथमंश्रियमावहत् ‍ तस्मात्साश्वैर्नरैस्तत्रपूज्योसौश्रद्ध्यासह पूजनीयाश्चतुरगानवमीयावदेवहिः शांतिः स्वस्त्ययनंकार्यंतदातेषांदिनेदिने धान्यंभल्लातकंकुष्ठंवचासिद्धार्थकास्तथा पंचवर्णेनसूत्रेणग्रंथिंतेषांतुबंधयेत् ‍ वायव्यैर्वारुणैः सौरैः शाक्तैर्मंत्रैः सवैष्णवैः वैश्वदेवैस्तथाग्नेयैर्होमः कार्योदिनेदिने कल्पतरौत्वेतदग्रेन्यदपि ज्येष्ठायोगेपुरातत्रगजाश्चाष्टौमहाबलाः पृथिवीमावहन्पूर्वंसशैलवनकाननाम् ‍ कुमुदैरावणौपद्मः पुष्पदंतोथवामनः सुप्रतीकोंजनोनीलस्तस्मात्तांस्तत्रपूजयेत् ‍ शाक्रादृक्षात्समारभ्यनवम्यंतंचपूर्ववत् ‍ अश्ववद्धोमादीत्यर्थः ।

ह्या प्रतिपदेचे ठायीं ज्याचे अश्व असतील त्यास अश्वपूजन सांगितलें आहे - मदनरत्नांत - देवीपुराणांत - " आश्विनशुक्ल प्रतिपदेस स्वातीनक्षत्राचा योग असतां शुभ दिवशीं पूर्वीं उच्चैः श्रवानामक अश्वाला प्रथम शोभा प्राप्त झाली , या कारणास्तव अश्वयुक्त मनुष्यांनीं त्या तिथीस उच्चैः श्रव्याची पूजा करावी व अश्वांचीही पूजा नवमीपर्यंत करावी . प्रतिदिवशीं त्यांची शांति व स्वस्त्ययन ( मंगल ) करावें . धणे , भल्लातक ( बिबवे ), कोष्ठकोलिंजन , वेखंड , राई ह्यांचा पंचवर्ण सूत्रानें ग्रंथि बांधून त्यांचे कंठांत बांधावीं . वायु , वरुण , सूर्य , शक्ति , विष्णु , विश्वेदेव , अग्नि यांच्या मंत्रांनीं प्रतिदिवशीं होम करावा . " कल्पतरुंत तर याच्या पुढें दुसराही प्रकार सांगतो - पूर्वी नवरात्रांतील ज्येष्ठानक्षत्रावर महाबलिष्ठ असे आठ हत्ती पर्वत , अरण्य यांसहवर्तमान पृथ्वीला वाहते झाले , म्हणून पृथ्वी वाहणार्‍या कुमुद , ऐरावण , पद्म , पुष्पदंत , वामन , सुप्रतीक , अंजन , नील , ह्या आठ हत्तींची पूजा करावी . ती पूजा ज्येष्ठानक्षत्रावर आरंभ करुन नवमीपर्यंत अश्वपूजेप्रमाणें होमादि करुन करावी . "

अथप्रतिपदादिषुविशेषोदुर्गाभक्तितरंगिण्यांभविष्ये केशसंस्कारद्रव्याणिप्रदद्यात्प्रतिपद्दिने पक्कतैलंद्वितीयायांकेशसंयमहेतवे पट्टदोरमितिगौडपाठः दर्पणंचतृतीयायांसिंदूरालक्तकंतथा मधुपर्कंचतुर्थ्यांतुतिलकंनेत्रमंडनं पंचम्यामंगरागंचशक्त्यालंकरणानिच षष्ठ्यांबिल्वतरौबोधंसायंसंध्यासुकारयेत् ‍ सप्तम्यांप्रातरानीयगृहमध्येप्रपूजयेत् ‍ उपोषणमथाष्टम्यामात्मशक्त्याचपूजनम् ‍ नवम्यामुग्रचंडायाः पूजांकुर्याद्वलिंतथा संपूज्यप्रेषणंकुर्याद्दशम्यांसारवोत्सवैः अनेनविधिनायस्तुदेवींप्रीणयतेनरः स्कंदवत्पालयेद्देवीतंपुत्रधनकीर्तिभिः कृत्यतत्त्वार्णवेलैंगे कन्यायांकृष्णपक्षेतुपूजयित्वार्द्रभेपिवा नवम्यांबोधयेद्देवींमहाविभवविस्तरैः शुक्लपक्षेचतुर्थ्यांतुदेवीकेशविमोक्षणम् ‍ प्रातरेवतुपंचम्यांस्नापयेत्सुशुभैर्जलैः षष्ठ्यांसायंप्रकुर्वीतबिल्ववृक्षेधिवासनम् ‍ सप्तम्यांपत्रिकापूजाअष्टम्यांचाप्युपोषणम् ‍ पूजाचजागरश्चैवनवम्यांविधिवद्वलिः विसर्जनंदशम्यांतुक्रीडाकौतुकमंगलैः अत्रनवम्यांबोधनासामर्थ्येषष्ठ्यांबोधनमितिस्मार्ताः फलभूमार्थिनः समुच्चय इत्यन्ये नवम्यांमंत्रः कालिकापुराणे इषेमास्यसितेपक्षेनवम्यामार्द्रभेदिवा श्रीवृक्षेबोधयामित्वांयावत्पूजांकरोम्यहम् ‍ अत्रस्त्रीव्रतेविशेषः परिभाषायांज्ञेयः ।

आतां प्रतिपदादि तिथींचे ठायीं विशेष सांगतो . दुर्गाभक्तितरंगिणींत - भविष्यांत - " केशसंस्कारद्रव्यें प्रतिपदेस द्यावीं . द्वितीयेस केशसंयमना ( बंधना ) करितां पक्क तैल द्यावें . ‘ पक्कतैल ’ या स्थानीं ‘ पट्टदोर ’ असा गौडपाठ आहे . तृतीयेस दर्पण , सिंदूर व अळता . चतुर्थीस नेत्रभूषण , तिलक व मधुपर्क . पंचमीस यथाशक्ति अलंकार व अंगराग द्यावे . षष्ठीस सायंसंध्यासमयीं बिल्ववृक्षाचे ठायीं बोध ( पुढें सांगावयाचा तो ) करावा . सप्तमीस प्रातःकालीं गृहामध्यें आणून पूजन करावें . अष्टमीस उपोषण व आपल्या शक्तीनें पूजन करावें . नवमीस चंडिकेची पूजा व बलिदान करावें . दशमीस सारवोत्सवांनीं पूजन करुन देवी पोंचवावी . या विधीनें जो मनुष्य देवीतें संतुष्ट करतो त्याला देवी पुत्र , धन , कीर्ति हीं देऊन स्कंदासारखें त्याचें पालन करिते . " कृत्यतत्त्वार्णवांत - लिंगपुराणांत - कन्यासंक्रांतींत आश्विन कृष्णपक्षांत ( दर्शांतमासानें भाद्रपदकृष्णपक्षांत ) आर्द्रानक्षत्रावर किंवा नवमीस मोठ्या ऐश्वर्यविस्तारांनीं देवीचा प्रबोधोत्सव करावा . आश्विन शुक्लपक्षांत चतुर्थीस देवीचें केशविमोक्षण करावें . पंचमीस प्रातःकालींच स्वच्छ जलानें स्नान घालावें . षष्ठीस सायंकालीं बिल्ववृक्षीं अधिवासन करावें . सप्तमीस पत्रिकापूजा . अष्टमीस उपोषण . नवमीस पूजा , जागरण व यथाशास्त्र बलिदान करावें . दशमीस क्रीडा - कौतुक - मंगलांनीं विसर्जन करावें . " या ठिकाणीं आश्विनकृष्ण नवमीस प्रबोधोत्सवाचें सामर्थ्य नसेल तर आश्विनशुक्लषष्ठीस प्रबोध करावा , असें स्मार्त सांगतात . मोठ्या फलाची इच्छा असेल त्यानें नवमीस व षष्ठीसही प्रबोधोत्सव करावा , असें अन्य सांगतात . आश्विन कृष्ण नवमीस प्रबोधनाचा मंत्र - कालिकापुराणांत - ‘ इषेमास्यसिते पक्षे नवम्यामार्द्रभे दिवा । श्रीवृक्षे बोधयामि त्वां यावत्पूजां करोम्यहम् ‍ । ’ येथें स्त्रीव्रताविषयीं विशेष आहे तो परिभाषेंत ( प्रथमपरिच्छेदांत ) पाहावा .

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP