मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
भाद्रपदशुक्ल द्वादशी

द्वितीय परिच्छेद - भाद्रपदशुक्ल द्वादशी

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


भाद्रपदशुक्लद्वादश्यांश्रवणयोगरहितायांपारणंकुर्यात् आभाकासितपक्षेष्वितिदिवोदासोदाह्रतवचनात् उपोष्यैकादशींमोहात्पारणंश्रवणेयदि करोतिहंतितत्पुण्यंद्वादशद्वादशीभवमिति तत्रैवस्कांदाच्च अस्यतत्रैवप्रतिप्रसवः मार्कंडेयः विशेषेणमहीपालश्रवणंवर्धतेयदि तिथिक्षयेनभोक्तव्यंद्वादशीलंघयेन्नहीति केचित्तु यदात्वपरिहार्योयोगस्तदाश्रवणनक्षत्रेत्रेधाविभक्तेमध्यमविंशतिघटिकायोगंत्यक्त्वापारणंकार्यं तदुक्तंविष्णुधर्मे श्रुतेश्चमध्येपरिवर्तमेतिसुप्तिप्रबोधपरिवर्तनमेववर्ज्यमिति केचिच्चतुर्धाविभज्यमध्यपादद्वयंवर्ज्यमाहुः अत्रमूलंचिंत्यम् ।

श्रवणयोगरहित भाद्रपदशुक्ल द्वादशीस एकादशीची पारणा करावी. कारण, “ आ ( आषाढ ), भा ( भाद्रपद ), का ( कार्तिक ) यांच्या शुक्लपक्षाच्या द्वादशीस अनुक्रमानें अनुराधा, श्रवण, रेवती यांचा योग असतां पारणा करुं नये; कारण, पारणा केली तर बारा द्वादशींचें पुण्य जातें. ” असें दिवोदासानें वचन सांगितलें आहे. आणि “ एकादशीचे ठायीं उपोषण करुन अज्ञानानें श्रवणनक्षत्रावर पारणा करील तर बारा द्वादशींपासून उत्पन्न झालेल्या पुण्याचा नाश होतो, ” असें तेथेंच स्कांदवचनही आहे. याचा तेथेंच प्रतिप्रसव ( निषेधाचा अपवाद ) सांगतो मार्कंडेय - “ हे राजा ! विशेषेंकरुन श्रवणनक्षत्र जर वाढेल व तिथीचा क्षय असेल तर श्रवणांत भोजन करुं नये; पण द्वादशीचें उल्लंघन करुं नये. ” केचित् ग्रंथकार तर - जेव्हां श्रवणनक्षत्राचा योग परिहार करण्यास अशक्य असेल तेव्हां श्रवणनक्षत्राचे तीन भाग करुन मधल्या वीस घटिका सोडून पारणा करावी. तें सांगतो - विष्णुधर्मांत “ भगवान्‍ अनुराधेच्या प्रथमपदीं निजतो, रेवतीच्या अंत्यपादीं जागृत होतो, श्रवणाच्या मध्यभागीं परिवर्तन ( कुशीस वळणें ) करतो. यास्तव निद्रा, जागर, परिवर्तन हेच काल सोडावे. ” केचित्‍ ग्रंथकार तर, श्रवणाचे चार भाग करुन मधले दोन पाद सोडावे असें सांगता. या विष्णुधर्मवचनाविषयीं मूळ चिंत्य आहे.

अत्रैवविष्णुपरिवर्तनोत्सवंकुर्यात्‍ संध्यायांविष्णुंसंपूज्यप्रार्थयेत् मंत्रस्तुतिथितत्त्वेउक्तः ॐ वासुदेवजगन्नाथप्राप्तेयंद्वादशीतव पार्श्वेनपरिवर्तस्वसुखंस्वपिहिमाधवेति अत्रैवशक्रध्वजोत्थापनमुक्तमपरार्के गर्गेण द्वादश्यांतुसितेपक्षेमासिप्रौष्ठपदेतथा शक्रमुत्थापयेद्राजाविश्वश्रवणवासवे ।

येथेंच विष्णुपरिवर्तनोत्सव करावा. संध्यासमयीं विष्णुपूजन करुन प्रार्थना करावी. प्रार्थनामंत्र तर - तिथितत्त्वांत सांगतो - वासुदेव जगन्नाथ प्राप्तेयं द्वादशी तव ॥ पार्श्वेन परिवर्तस्व सुखं स्वपिहि माधव. ” ह्या द्वादशीचे दिवशींच इंद्रध्वजाचें उत्थापन सांगतो अपरार्कांत - गर्ग - “ भाद्रपद शुक्लपक्षाच्या द्वादशीस उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा या नक्षत्रांवर राजानें इंद्रध्वजाचें उत्थापन करावें. ”

 

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP