मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
वैशाखमास

द्वितीय परिच्छेद - वैशाखमास

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


मेषसंक्रमेप्रागपरादशदशघटिकाः पुण्यकालः रात्रौप्रागुक्तं अत्रधर्मघटादिदानमुक्तंपृथ्वीचंद्रोदयेपाद्मे तीर्थेचानुदिनंस्नानंतिलैश्चपितृतर्पणं दानंधर्मघटादीनांमधुसूदनपूजनं माधवेमासिकुर्वीतमधुसूदनतुष्टिदम् ।

वैशाखमास - मेषसंक्रांतीचेठायीं पूर्वीच्या १० व पुढें १० घटिका पुण्यकाळ होय. रात्रीं संक्रांत होईल तर पूर्वी प्रथमपरिच्छेदांत पर्वकाळ सांगितला आहे. या मासांत धर्मघटादिदान सांगतो - पृथ्वीचंद्रोदयांत - पद्मपुराणांत - “ प्रतिदिवशीं तीर्थांत स्नान, तिलांनीं पितृतर्पण, धर्मघटादिकांचें दान व मधुसूदनपूजन हीं वैशाखमासीं मधुसूदनप्रीत्यर्थं करावीं. ”

अथवैशाखस्नानं तत्रपृथ्वीचंद्रोदयेविष्णुस्मृतिपाद्मयोः तुलामकरमेषेषुप्रातः स्नानंविधीयते हविष्यंब्रह्मचर्यंचमहापातकनाशनमितिसौरमास उक्तः अन्यत्पक्षद्वयमुक्तंतत्रैवपाद्मे मधुमासस्यशुक्लायामेकादश्यामुपोषितः पंचदश्यांचभोवीरमेषसंक्रमणेतुवा वैशाखस्नाननियमंब्राह्मणानामनुज्ञया मधुसूदनमभ्यर्च्यकुर्यात्संकल्पपूर्वकं तत्रमंत्रः वैशाखंसकलंमासंमेषसंक्रमणेरवेः प्रातः सनियमः स्नास्येप्रीयतांमधुसूदनः मधुहंतुः प्रसादेनब्राह्मणानामनुग्रहात्‍ निर्विघ्नमस्तुमेपुण्यंवैशाखस्नानमन्वहं माधवेमेषगेभानौमुरारेमधुसूदन प्रातः स्नानेनमेनाथफलदोभवपापहन्निति तीर्थविशेषोपितत्रैवोक्तः मेषसंक्रमणेभानोर्माधवेमासियत्नतः महानद्यांनदीतीर्थेनदेसरसिनिर्झरे देवखातेथवास्नायाद्यथाप्राप्तेजलाशये दीर्घिकाकूपवापीषुनियतात्माहरिंस्मरन्निति संकल्पेचतत्तत्तीर्थनामग्राह्यं अज्ञानेतुविष्णुतीर्थमितिवदेत्‍ यदानज्ञायतेनामतस्यतीर्थस्यभोद्विजाः तत्रेत्युच्चारणंकार्यंविष्णुतीर्थमिदंत्विति तीर्थस्यदेवताविष्णुः सर्वत्रापिनसंशय इतितत्रैवोक्तेः ।

आतां वैशाखस्नान सांगतो - पृथ्वीचंद्रोदयांत विष्णुस्मृतींत व पद्मपुराणांत - “ तुला, मकर, मेष या संक्रांतीचे ठायीं प्रातःस्नान, हविष्यान्न, ब्रह्मचर्य हीं केलीं असतां महापातकाचा नाश होतो ” याप्रमाणें सौरमास ( संक्रांतिमास ) सांगितला आहे. दुसरे दोन पक्ष एकादश्यादि व पौर्णिमादि तेथेंच पद्मपुराणांत सांगतो - “ चैत्रमासाच्या शुक्लपक्षीं एकादशीस किंवा पौर्णिमेस किंवा मेषसंक्रांतीस उपोषण करुन ब्राह्मणांच्या आज्ञेनें मधुसूदनाची पूजा करुन संकल्पपूर्वक वैशाखस्नानाचा नियम धारण करावा. ” त्याचा मंत्र - “ वैशाखं सकलं मासं मेषसंमक्रणे रवेः ॥ प्रातः सनियमः स्नास्ये प्रीयतां मधुसूदनः ॥ मधुहंतुः प्रसादेन ब्राह्मणानामनुग्रहात्‍ ॥ निर्विघ्नमस्तु मे पुण्यं वैशाख स्नानमन्वहं ॥ माधवे मेषगे भानौ मुरारे मधुसूदन ॥ प्रातःस्नानेन मे नाथ फलदो भव पापहन्‍ ॥ ” विशेष तीर्थैही तेथेंच सांगतो - “ सूर्याच्या मेषसंक्रांतींत वैशाखमासीं प्रयत्नानें महानदी, नदी, तीर्थ, नद, तळें, निर्झर, देवखात, अथवा कोणताही जलाशय, दीर्घिका, कूप, वापी इत्यादि तीर्थीं नियम धरुन विष्णुस्मरण करुन प्रातःस्नान करावें ” संकल्पांत त्या त्या तीर्थाचें नाम ग्रहण करावें. तीर्थाचें नांव अज्ञात असेल तर विष्णुतीर्थ असें म्हणावें; कारण, “ जेव्हां
तीर्थाचें नांव अज्ञात असेल तेव्हां तेथें हें विष्णुतीर्थ असा उच्चार करावा. कार्ण, सर्वत्र तीर्थांची देवता विष्णु होय, यांत संशय नाहीं ” असें तेथेंच सांगितलें आहे.

तथान्योपिविशेषस्तत्रैवपाद्मे तुलसीकृष्णगौराख्यातयाभ्यर्च्यमधुद्विषं विशेषेणतुवैशाखेनरोनारायणोभवेत् माधवंसकलंमासंतुलस्यायोर्चयेन्नरः त्रिसंध्यंमधुहंतारंनास्तितस्यपुनर्भवः तथा प्रातः स्नात्वाविधानेनमाधवेमाधवप्रियं योश्वत्थमूलमासिंचेत्तोयेनबहुनासदा कुर्यात्प्रदक्षिणंतंतुसर्वदेवमयंततः पितृदेवमनुष्यांश्च तर्पयेत्सचराचरं योश्वत्थमर्चयेदेवमुदकेनसमंततः कुलानामयुतंतेनतारितंस्यान्नसंशयः कंडूयपृष्ठतोगांतुस्नात्वापिप्पलतर्पणं कृत्वागोविंदमभ्यर्च्यनदुर्गतिमवाप्नुयात्‍ तथा एकभक्तमथोनक्तमयाचितमतंद्रितः माधवेमासियः कुर्याल्लभतेसर्वमीप्सितं वैशाखेविधिनास्नानंदेवनद्यादिकेबहिः हविष्यंब्रह्मचर्यंचभूशय्यानियमस्थितिः व्रतंदानंदमोदेविमधुसूदनपूजनं अपिजन्मसहस्त्रोत्थंपापंदहतिदारुणं मदनरत्नेस्कांदे प्रपाकार्याचवैशाखेदेवेदेयागलंतिका उपानव्द्यजनच्छत्रसूक्ष्मवासांसिचंदनं जलपात्राणिदेयानितथापुष्पगृहाणिच पानकानिचचित्राणिद्राक्षारंभाफलान्यपि तिथितत्त्वे ददातियोहिमेषादौसक्तूनंबुघटान्वितान् पितृनुद्दिश्यविप्रेभ्यः सर्वपापैः प्रमुच्यत इति तथा वैशाखेयोघटंपूर्णंसभोज्यंवैद्विजन्मने ददातिसुरराजेंद्रसयातिपरमांगतिं एवंसंपूर्णस्नानाशक्तौत्र्यहंवास्नायात्‍ तदुक्तंतत्रैवपाद्मे त्रयोदश्यांचतुर्दश्यांवैशाख्यांवादिनत्रयं अपिसम्यग्विधानेननारीवापुरुषोपिवा प्रातः स्नातः सनियमः सर्वपापैः प्रमुच्यते यदातुवैशाखोमलमासोभवतितदाकाम्यानांतत्रसमाप्तिनिषेधात् मासद्वयंस्नानंतन्नियमाश्चकर्तव्याः मासोपवासचांद्रायणादितुमलमासएवसमापयेत् तदुक्तंदीपिकायां नियतत्रिंशद्दिनत्वाच्छुभेमास्यारभ्यसमापयेतमलिनेमासोपवासव्रतमिति ।

तसाच दुसराही विशेष तेथेंच पद्मपुराणांत सांगतो “ कृष्ण व श्वेत तुळशींनीं भगवंताचें पूजन करावें, वैशाखमासीं तर विशेषेंकरुन करावें, तेणेंकरुन पूजनकर्ता नारायणस्वरुप होतो. सर्ववैशाखपर्यंत तुलसींनीं जो नारायणाचें त्रिकाल पूजन करील त्यास पुनर्जंन्म होत नाहीं. ” तसेंच “ जो मनुष्य वैशाखमासीं प्रातःकाळीं विधिपूर्वक स्नान करुन माधवप्रिय अश्वत्थाच्या मूलाचें बहुत उदकानें प्रत्यहीं सिंचन करुन नंतर सर्व देवमय अशा अश्वत्थास प्रदक्षिणा करील त्यानें पितर देव, मनुष्य यांचें व चराचरजगाचें तर्पण केलें, असें होतें. जो अश्वत्थाचे आसमंतात्‍ भागीं उदकानें पूजन ( सिंचन ) करील त्यानें दहा हजार कुळें तारिलीं यांत संशय नाहीं. गाईच्या पाठीवर खाजवून स्नान करुन पिंपळाचें तर्पण करुन गोविंदाचे पूजन केलें तर दुर्गति प्राप्त होणार नाहीं. ” तसेच “ वैशाखमासीं आलस्यरहित होऊन एकभुक्त, नक्त, अयाचित यांतून कोणतें एक जो करील तो सर्व मनोरथ पावेल. वैशाखमासीं भागीरथी इत्यादि तीर्थी यथाविधि बाहेर स्नान करुन हविष्यान्न, ब्रह्मचर्य, भूशय्या, नियमानें राहणें, व्रत, दान, इंद्रियनिग्रह, विष्णुपूजन हीं केलीं असतां हजारों जन्मांत केलेलें मोठें पापही दग्ध होतें. ” मदनरत्नांत - स्कंदपुराणांत “ वैशाखमासीं प्रपा ( पाणपोई ) करावी, देवावर गळती ( पाण्याची धार ) धरावी, उपानत्‍ ( वाहणा, जोडा ), विंझणा, छत्र, बारीक वस्त्रें, चंदन, उदकपात्रें, तशींच पुष्पयुक्त गृहें, नाना प्रकारचीं सुवासिक पानकें ( पन्हीं ), द्राक्षें, केळीं इत्यादिक द्यावीं. ” तिथितत्त्वांत “ जो मनुष्य मेषसंक्रांतीच्या आरंभीं उदकयुक्त घटानें सहित सक्तु ( सातूचें पीठ ) पितरांच्या उद्देशानें ब्राह्मणांकारणें देतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. ” तसेंच “ जो मनुष्य वैशाखमासीं भोजनासहित पूर्णघट ब्राह्मणास देतो तो उत्तम गति पावतो. ” अथवा महिनापर्यंत स्नान करण्यास शक्ति नसेल तर तीन दिवस तरी स्नान करावें. तें सांगतो तेथेंच पाद्मांत - “ वैशाखांत त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा या तीन दिवशीं तरी यथाविधि स्त्री किंवा पुरुष नियमानें प्रातःकाळीं स्नान करील तर तो सर्वं पापांपासून मुक्त होईल. ’’ ज्या वर्षीं वैशाख मलमास होतो त्या वर्षीं, मलमासांत काम्यकर्मांच्या समाप्तीचा निषेध सांगितल्यामुळें दोन महिने स्नान व स्नानाचे नियम करावे. मासोपवास व चांद्रायणादिक व्रतें तर मलमासींच समाप्त करावी. तें सांगतो दीपिकेंत - “ तीस दिवस नियमानें करावयाचें असें मासोपवासव्रत शुद्ध मासांत आरंभून मलमासांत समाप्त करावें. ”

अत्रदानविशेष उक्तोऽपरार्केवामनपुराणे गंधाश्चमाल्यानितथावैशाखेसुरभीणिच देयानिद्विजमुख्येभ्योमधुसूदनतुष्टये एवंस्नानेकृतेतस्योद्यापनंकार्यं तदुक्तंतत्रैव मासमेवंबहिः स्नात्वानद्यादौविमलेजले एकादश्यांचद्वादश्यांपौर्णमास्यामथापिवा उपोष्यनियतोभूत्वाकुर्यादुद्यापनंबुधः मंडलंकारयेदादौकलशंतत्र विन्यसेत् निष्केणवातदर्धेनतदर्धार्धेनवापुनः शक्त्यावाकारयेद्देवंसौवर्णंलक्षणान्वितं लक्ष्मीयुक्तंजगन्नाथंपूजयेदासनेबुधः भूषणैश्चंदनैः पुष्पैर्दीपैर्नैवेद्यसंचयैः एवंसंपूज्यविधिवद्रात्रौजागरणंचरेत् श्वोभूतेकृतमैत्रोथग्रहवेद्यांग्रहान्यजेत्‍ होमंकुर्यात्प्रयत्नेनपायसेनविचक्षणः तिलाज्येनयवैर्वापिसर्वैर्वापिस्वशक्तितः अष्टोत्तरसहस्त्रंवाशतमष्टोत्तरंतुवा प्रतद्विष्णुरनेनैव इदंविष्णुरनेनवा व्रतसंपूर्तिसिद्ध्यर्थंधेनुमेकांपयस्विनीं पादुकोपानहौछत्रंगुरवेव्यजनंतथा शय्यांसोपस्करांदद्याद्दीपिकांदर्पणंतथा ब्राह्मणान्भोजयेत्रिंशत्तेभ्योदद्याच्चदक्षिणां कलशाञ्लसंपूर्णांस्तेभ्योदद्याद्यवांस्तथा एवंकृतेमाधवस्यचोद्यापनविधौशुभे फलमाप्नोतिसकलंविष्णुसायुज्यमाप्नुयात् एतावत्यशक्तौतत्रैवोक्तं वैशाख्यांविधिनास्नात्वाभोजयेद्ब्राह्मणान्दश कृसरंसर्वपापेभ्योमुच्यतेनात्रसंशयइति ।

ह्या वैशाखस्नानांत विशेष दानें सांगतो - अपरार्कांत वामनपुराणांत - “ वैशाखमासीं सुगंध व सुरभि पुष्पें मधुसूदनाच्या संतोषार्थ ब्राह्मणांस द्यावीं ” याप्रमाणें स्नान केलें असतां त्याचें उद्यापन करावें. तें सांगतो तेथेंच - “ याप्रकारें महिनापर्यंत बाहेर नद्यादिस्वच्छजलांत स्नान करुन एकादशीस किंवा द्वादशीस अथवा पौर्णिमेस उपोषण करुन नियम धारण करुन उद्यापन करावें. तें असें - प्रथम सर्वतोभद्र मंडल करुन त्याजवर कलश स्थापून त्यावर निष्क ( चारतोळे ) अथवा त्याचे निम्मे किंवा त्याचे अर्ध अथवा अर्थ तोळा अथवा शक्त्यानुसार सुवर्णाची लक्षणयुक्त लक्ष्मीसहित विष्णूची प्रतिमा करुन आसनावर ठेवून भूषणें, चंदन, पुष्पें, दीप, अनेकप्रकारचे नैवेद्य यांहीं यथाविधि पूजन करुन रात्रीस जागरण करावें. दुसरे दिवशीं स्नानसंध्यादि करुन ग्रहवेदीवर ग्रहांचें पूजन करुन पायस ( क्षीर ), तिल, घृत, यव यांतून एका द्रव्यानें अथवा सर्व द्रव्यांनीं आपल्या शक्तीप्रमाणें अष्टोत्तरसहस्त्र किंवा अष्टोत्तरशत संख्याक “ प्रतद्विष्णु० ” किंवा “ इदंविष्णु० ” या मंत्रानें होम करावा. व्रत संपूर्ण होण्याकरितां एक पयस्विनी धेनु, पादुका, उपानह, छत्र, व्यजन, उपसाहित्यसहित शय्या, दीप, आरसा हीं गुरुस ( उपाध्यायास ) द्यावीं व तीस ब्राह्मणांस भोजन देऊन दक्षिणा द्यावी. तसेंच जलपूर्ण कलश व यव ब्राह्मणांस द्यावे. असा वैशाखमासाचा शुभ उद्यापनविधि केला असतां सर्व फल प्राप्त होऊन विष्णुसायुज्य प्राप्त होतें. ” इतकें करण्यास शक्ति नसेल तर तेथेंच सांगतो - “ वैशाखी पौर्णिमेस यथाविधि स्नान करुन दहा ब्राह्मणांस कृसरान्नाचें ( खिचडीचें ) भोजन द्यावें, म्हणजे सर्व पापांपासून मुक्त होतो यांत संशय नाहीं. ”

वैशाखशुक्लतृतीयाअक्षय्यतृतीयोच्यते सापूर्वाह्णव्यापिनीग्राह्या दिनद्वयेपितव्द्याप्तौपरैव तदुक्तंनिर्णयामृतेनारदीये वैशाखेशुक्लपक्षेतुतृतीयारोहिणीयुता दुर्लभाबुधवारेणसोमेनापियुतातथा रोहिणीबुधयुक्तापिपूर्वविद्धाविवर्जिता भक्त्याकृतापिमांधातः पुण्यंहंतिपुराकृतं गौरीविनायकोपेतारोहिणीबुधसंयुताविनापिरोहिणीयोगात्पुण्यकोटिप्रदासदेति इयंयुगादिरपि साचोक्तारत्नमालायां माघेपंचदशीकृष्णानभस्येचत्रयोदशी तृतीयामाधवेशुक्लानवम्यूर्जेयुगादय इति यत्तुगौडाः माघस्यपौर्णमास्यांतुघोरंकलियुगंस्मृतमितिब्राह्मोक्तेः वैशाखमासस्यचयातृतीयानवम्यसौकार्तिकशुक्लपक्षे नभस्यमासस्यतमिस्त्रपक्षेत्रयोदशीपंचदशीचमाघे इतिविष्णुपुराणे चकारेणतमिस्त्रपक्षानुषंगेपिपूर्वानुरोधात्पौर्णमास्येवज्ञेया द्वेशुक्ल इत्यादिकंतुनिर्मूलमित्याहुः तन्न दर्शेतुमाघमासस्यप्रवृत्तंद्वापरंयुगमितिभविष्यविरोधात् एतेनब्राह्मानुसारात्पूर्णिमायामेवयुगादिश्राद्धंवदन् शूलपाणिः परास्तः तेनकल्पभेदाद्युगभेदाद्वाव्यवस्थेतितत्त्वं एतेनकार्तिकेनवमीशुक्लामाघमासेचपूर्णिमेतिबृहन्नारदीयंव्याख्यातं निर्मूलत्वोक्तिर्नारदीयाज्ञानकृता ।

वैशाखशुद्ध तृतीया ही अक्षय्यतृतीया. ती पूर्वाह्णव्यापिनी घ्यावी. दोनही दिवशीं पूर्वाह्णव्यापिनी असतां पराच घ्यावी. तें सांगतो - निर्णयामृतांत नारदीयांत “ वैशाखशुक्ल तृतीया ही रोहिणी व बुधवार किंवा सोमवारयुक्त असेल तर ती दुर्लभ होय. रोहिणी व बुधवार यांहीं युक्त असली तरी ती पूर्वविद्धा निषिद्ध आहे. ती भक्तीनें केली तरी पूर्वी केलेल्या पुण्याचा नाश करिते. तृतीया चतुर्थीनें युक्त व रोहिणी, बुधवार यांहीं युक्त अथवा रोहिणीयोगावांचूनही केली असतां कोटिपुण्य देणारी होय. ” ही तृतीया युगादिही आहे. ती सांगतो रत्नमालेंत - “ माघमासाची अमावास्या, भाद्रपदकृष्ण त्रयोदशी, वैशाखशुक्ल तृतीया व कार्तिकशुक्ल नवमी ह्या चार तिथि युगादि होत. ” आतां जें गौड - “ माघमासीं पौर्णिमेस घोर कलियुत प्रवृत्त झालें ” ह्या ब्राह्मवचनावरुन “ वैशाखमासाची शुक्ल तृतीया, कार्तिकशुक्ल नवमी, भाद्रपदकृष्ण त्रयोदशी व माघमासांत पंचदशी ह्या युगादि ” या विष्णुपुराणवचनांत पंचदशीस चकारानें कृष्णपक्षाचा अनुषंग ( संबंध ) केला तरी पूर्वब्राह्मवचनानुरोधानें पौर्णमासीच युगादि जाणावी. ‘ शुक्लपक्षीं दोन युगादि ’ हें वचन तर निर्मूल होय असें म्हणतात. तें बरोबर नाहीं. कारण, “ माघमासीं अमावास्येस द्वापरयुग प्रवृत्त झालें. ” या भविष्यवचनाशीं विरोध येतो. यावरुन ब्राह्मवचनानुरोधानें पौर्णिमेसच युगादिश्राद्ध करावें असें सांगणारा जो शूलपाणि तो खंडित झाला. तेणेंकरुन कल्पभेदानें किंवा युगभेदानें व्यवस्था करावी हें तत्त्व होय. यावरुन ( कल्पभेदानें व्यवस्था सांगितल्यावरुन ) “ कार्तिकशुक्ल नवमी, माघी पौर्णिमा ह्या युगादि ” असें बृहन्नारदीयवचन व्याख्यात झालें. निर्मूलोक्ति तर नारदीयवचनाच्या अज्ञानामुळें समजावी.

अत्रश्राद्धमुक्तंमात्स्ये कृतंश्राद्धंविधानेनमन्वादिषुयुगादिषु हायनानिद्विसाहस्रंपितृणांतृप्तिदंभवेदिति भारतेपि यामन्वाद्यायुगाद्याश्चतिथयस्तासुमानवः स्नात्वाहुत्वाचदत्वाचजप्त्वानंतफलंलभेदिति श्राद्धेपिपूर्वाह्णव्यापिनीग्राह्या पूर्वाह्णेतुसदाकार्याः शुक्लामनुयुगादयः दैवेकर्मणिपित्र्येचकृष्णेचैवापराह्णिकाइति पाद्मोक्तेः द्वेशुक्लेद्वेतथाकृष्णेयुगादीकवयोविदुः शुक्लेपौर्वाह्णिकेग्राह्येकृष्णेचैवापराह्णिके इतिहेमाद्रौनारदीयवचनाच्च दीपिकापि अथोमन्वादियुगादिकर्मतिथयः पूर्वाह्णिकाः स्युः सितेविज्ञेयाअपराह्णिकाश्चबहुलेइति स्मृत्यर्थसारेपि युगादिमन्वादिश्राद्धेषुशुक्लपक्षेउदयव्यापिनीतिथिर्ग्राह्या कृष्णपक्षेऽपराह्णव्यापिनीति दिवोदासीयेगोभिलः वैशाखस्यतृतीयांयः पूर्वविद्धांकरोतिवै हव्यंदेवानगृह्णंतिकव्यंचपितरस्तथेति गोविंदार्णवेप्येवं तेनेयंपूर्वाह्णव्यापिनी दिनद्वयेतत्त्वेपरैवेतिधर्मतत्त्वविदोहेमाद्यादयः अनंतभट्टस्तु सवैधृतिर्व्यतीपातोयुगमन्वादयस्तथा सन्मुखाउपवासेस्युर्दानादावंतिमाः स्मृताइत्याह दानादावितिश्राद्धसंग्रहः उपवासस्त्वग्रेवक्ष्यते हेमाद्रावप्येवं माधवस्तुव्यतीपातः श्राद्धेपराह्णव्यापीग्राह्यइत्याह स्मृत्यर्थसारेतुकुतुपकालयोगीत्युक्तं यत्तुमार्कंडेयः शुक्लपक्षस्यपूर्वाह्णेश्राद्धंकुर्याद्विचक्षणः कृष्णपक्षापराह्णेहिरौहिणंतुनलंघयेत्‍ रौहिणोनवमोमुहूर्तः अत्रशुक्लपक्षयुगादिश्राद्धंपूर्वाह्णेकार्यमितिशूलपाणिः निर्णयामृतादयस्तुकालादर्शेऽमाश्राद्धमापराह्णिकमुक्त्वाएषमन्वंतरादीनांयुगादीनांविनिर्णय इत्युक्तत्वाद्देशुक्लइत्यादिवचनंविष्णुपूजनविषयं श्राद्धेत्वापराह्णिक्येवेतिव्यवस्थांजगदुः सेयंपूर्वोक्तानेकवचोविरोधात्पूर्वाह्णेदैविकंकुर्यादित्यादिवचनादेवसिद्धेवचनवैयर्थ्याच्चस्वाच्छंद्यविलसितमात्रमित्युपेक्षणीया किंच
कालादर्शोक्तिर्न्यायमूला वचोमूलावा नाद्यः युगादिश्राद्धस्यामाश्राद्धविकृतित्वेनन्यायतो पराह्णव्याप्तावपिवचनेचतस्यबाधात्‍ नांत्यः अतिदेशादेवापराह्णप्राप्तेर्वचनवैयर्थ्यात्‍ अप्राप्तेशास्त्रमर्थवदितिन्यायात्‍ तेनयदिकालादर्शोक्तेः कथंचिच्छ्रद्धाजाड्येनसमाधित्सा तर्हिन्यायप्राप्तकृष्णपक्षयुगादिविषयत्वेनसाव्यवस्थापनीयेतिदिक्‍ पूर्वाह्णस्तत्रद्वेधाभक्तदिनपूर्वार्धः द्वेधाभक्तदिनांशकोत्रगदितः प्राह्णापराह्णावितिदीपिकोक्तेः माधवादयोप्येवम् ।


या तृतीयेस श्राद्ध सांगतो. मत्स्यपुराणांत - “ मन्वादि व युगादि तिथींस यथाविधि श्राद्ध केलें असतां दोन हजार वर्षै पितरांची तृप्ति होते. ” भारतांतही - “ ज्या मन्वादि व युगादि तिथि त्यांचे ठायीं मनुष्यानें स्नान, हवन, दान, जप, हीं केलीं असतां त्यांचें अनंतफल प्राप्त होतें. ” ही तिथी श्राद्धाविषयींही पूर्वाह्णव्यापिनी घ्यावी. कारण, “ शुक्लपक्षींच्या मन्वादि व युगादि तिथि दैवपित्र्यकर्मांविषयीं पूर्वाह्णव्यापिनी व कृष्णपक्षींच्या अपराह्णव्यापिनी घ्याव्या ” असें पद्मपुराणवचन आहे. “ युगादि तिथि दोन शुक्लपक्षांत व दोन कृष्णपक्षांत आहेत असें विद्वान्‍ म्हणतात, त्या शुक्लपक्षांतील पूर्वाह्णव्यापिनी घ्याव्या, व कृष्णपक्षांतील अपराह्णव्यापिनी घ्याव्या ” असें हेमाद्रींत नारदीयवचन ही आहे. दीपिकाही “ मन्वादि व युगादि कर्मतिथि, शुक्लपक्षांतील पूर्वाह्णव्यापिनी व कृष्णपक्षांतील अपराह्णव्यापिनी घ्याव्या. ” स्मृत्यर्थसारांतही - युगादि मन्वादि श्राद्धांविषयीं शुक्लपक्षांतील उदयव्यापिनी तिथि घ्यावी. व कृष्णपक्षांतील अपराह्णव्यापिनी घ्यावी. दिवोदासीयांत गोभिल - “ जो मनुष्य वैशाखशुद्धतृतीया पूर्वविद्धा करील त्याचें हव्य ( देवांना दिलेलें ) देव ग्रहण करीत नाहींत, व काव्य ( पितरांस दिलेलें ) पितरही ग्रहण करीत नाहींत. ” गोविंदार्णवांतही असेंच आहे. तेणेंकरुन
ही तिथि पूर्वाह्णव्यापिनी घ्यावी; - दोन दिवशीं पूर्वाह्णव्यापिनी असतां पराच घ्यावी असें धर्मतत्त्ववेत्ते हेमाद्यादिक म्हणतात. अनंतभट्ट तर - “ वैधृति, व्यतीपात, हे योग; व युगादि, मन्वादि, ह्या तिथि; उपवासाविषयीं संमुख घ्याव्या. व दान ( श्राद्ध ) इत्यादिकांविषयीं परविद्धा घ्याव्या ” असें सांगतो. येथें उपवास पुढें सांगूं. हेमाद्रींतही असेंच सांगितलें आहे. माधव तर - श्राद्धाविषयीं व्यतीपात अपराह्णव्यापी घ्यावा असें सांगतो. स्मृत्यर्थसारांत तर कुतुपकालव्यापि घ्यावा असें सांगितलें आहे. आतां जें मार्कंडेय - “ शुक्लपक्षांत पूर्वाह्णीं श्राद्ध करावें, व कृष्णपक्षांत अपराह्णीं करावें. रौहिण ( नवम मुहूर्त ) तर उल्लंघन करुं नये ” असें सांगतो त्याचा अर्थ - शुक्लपक्ष युगादिश्राद्ध पूर्वाह्णीं करावें, असें शूलपाणि सांगतो. निर्णयामृतादिक ग्रंथकार तर, कालादर्शांत अमावास्याश्राद्ध अपराह्णीं करावें, असें सांगून “ हाच निर्णय मन्वंतरादींचा व युगादींचा आहे ” असें सांगितल्यामुळें “ शुक्लपक्षी दोन युगादि ” इत्यादि पूर्वोक्त नारदीयवचन विष्णुपूजनविषयक होय. श्राद्धाविषयीं तर अपराह्णव्यापिनीच घ्यावी, अशी व्यवस्था सांगते झाले. ती ही व्यवस्था पूर्वोक्त पाद्मादि अनेक वचनांशीं विरुद्ध असल्यामुळें आणि “ पूर्वाह्णीं देवकार्य करावें व अपराह्णीं पित्र्य करावें ” इत्यादि वचनानेंच सिद्ध असतां वचन व्यर्थ होत असल्यामुळें ही स्वच्छंदविलसित ( बडबड ) मात्र म्हणून उपेक्षणीय ( अग्राह्य ) होय. आणखी असें कीं, कालादर्शाचें सांगणें न्यायमूलक आहे किंवा वचनमूलक आहे ? पहिला पक्ष न्यायमूलक तो नाहीं. कारण, युगादि श्राद्ध हें अमावास्याश्राद्धाची विकृति असल्यामुळें प्रकृतीप्रमाणें विकृति करावी, या न्यायानें अपराह्णकालाची प्राप्ति युगादिश्राद्धाविषयीं प्राप्त झाली तरी पूर्वोक्तवचनांनीं त्याचा ( अपराह्णकालाचा ) बाध होतो. दुसरा पक्ष वचनमूलक तोही नाहीं. कारण, अतिदेशानें ( प्रकृतीप्रमाणें विकृति करावी अशा सांगण्यानेंच ) अपराह्णकालाची प्राप्ति असल्यामुळें नवीन वचनें व्यर्थ होतात. कारण, पूर्वी अप्राप्तविषयाविषयीं जें शास्त्र ( वचन ) तें सार्थक होतें, असा न्याय आहे. यावरुन जर कालादर्शाच्या सांगण्याविषयीं श्राद्ध असल्यामुळें कसें तरी तें त्याचें सांगणें लावून घ्यावयाचें असेल तर न्यायानें प्राप्त असलेल्या कृष्णपक्षयुगादि श्राद्धांविषयीं तें सांगणें व्यवस्थित करावें, ही दिशा समजावी. दिनमानाचे दोन भाग करुन जो पूर्वभाग तो पूर्वाह्ण येथें समजावा. कारण, “ दिनमानाचे दोन भाग केले असतां पूर्वभाग पूर्वाह्ण व दुसरा भाग अपराह्ण ” असें दीपिकेंत सांगितलें आहे. माधवादिकही असेंच सांगतात.

अत्रविशेषोहेमाद्रौभविष्ये वैशाखेशुक्लपक्षेतुतृतीयायांतथैवच गंगातोयेनरः स्नात्वामुच्यतेसर्वकिल्बिषैः तस्यांकार्योयवैर्होमोयवैर्विष्णुंसमर्चयेत् यवान्दद्याद्दिजातिभ्यः प्रयतः प्राशयेद्यवानिति अत्रदानविशेषस्तत्रैव भविष्ये इमांप्रक्रम्य उदकुंभान्सकनकान्सान्नान्सर्वरसैः सह यवगोधूमचणकान्सक्तुदध्योदनंतथा ग्रैष्मिकंसर्वमेवात्रसस्यंदानेप्रशस्यत इति देवीपुराणेपि तृतीयायांतुवैशाखेरोहिण्यृक्षेप्रपूज्यतु उदकुंभप्रदानेन शिवलोकेमहीयते मंत्रस्तु एषधर्मघटोदत्तोब्रह्मविष्णुशिवात्मकः अस्यप्रदानात्तृप्यंतुपितरोपिपितामहाः गंधोदकतिलैर्मिश्रंसान्नंकुंभंफलान्वितं पितृभ्यः संप्रदास्यामिअक्षय्यमुपतिष्ठत्विति ।

ह्या तृतीयेविषयीं विशेष विधि सांगतो - हेमाद्रींत भविष्यपुराणांत - “ वैशाखशुक्लपक्षीं तृतीयेस गंगोदकामध्यें जो नर स्नान करितो तो सर्व पातकांपासून मुक्त होतो. त्या तिथीस यवांनीं होम करावा व यवांनीं विष्णुपूजन करावें, आणि यव ब्राह्मणांस द्यावे व यव ( सातु ) प्राशन करावे. ” या तिथींस विशेष दान सांगतो. तेथेंच भविष्यांत - या तृतीयेचा उपक्रम करुन “ सुवर्ण व अन्न यांनीं युक्त सर्व रसांसहित उदककुंभ, यव, गोधूम, चणक, सक्तु, दध्योदन व ग्रीष्मऋतूं तील सर्व धान्यें हीं दानाविषयीं प्रशस्त होत. ” देवीपुराणांतही - “ वैशाखमासीं रोहिणीयुक्त तृतीयेस शिवाचें पूजन करुन उदकुंभदान करावें, तेणेंकरुन शिवलोकीं पूज्य होतो. ” उदकुंभदानाचा मंत्र - “ एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः । अस्य प्रदानात्तृप्यंतु पितरोपि पितामहाः ॥ गंधोदकतिलैर्मिश्रं सान्नं कुंभं फलान्वितम्‍ । पितृभ्यः संप्रदास्यामि अक्षय्यमुपतिष्ठतु ॥ ”

अत्रचपिंडरहितंश्राद्धंकुर्यात् अयनद्वितयेश्राद्धंविषुवद्वितयेतथा युगादिषुचसर्वासुपिंडनिर्वपणादृतेइति हेमाद्रौपुलस्त्यवचनात् अत्ररात्रिभोजनेप्रायश्चित्तमृग्विधाने रात्रौभुक्तेवत्सरेतुमन्वादिषुयुगादिषु अभिस्ववृष्टिंमंत्रंचजपेदशनपातकमिति अपरार्केयमः कृतोपवासाः सलिलंयेयुगादिदिनेषुच दास्यंत्यन्नादि सहितंतेषांलोकामहोदयाइति वैशाखेमलमासेसतितत्रैवयुगादिः कार्या तथाचहेमाद्रौऋष्यश्रृंगः दशहरासुनोत्कर्षश्चतुर्ष्वपियुगादिषु उपाकर्मणिचोत्सर्गेह्येतदिष्टंवृषादित इति एतद्दशहरादिकंवृषादिसंक्रमेइष्टं कन्याचंद्रेवृषेरवावित्यादिनासौरमासोक्तेरित्यर्थः कालादर्शेपि अब्दोदकुंभमन्वादिमहालययुगादिष्वितिमलमासकर्तव्येषुपरिगणनाच्च महालयशब्देनमघात्रयोदश्युच्यत इतिमाधवः स्मृतिचंद्रिकायांतुमासद्वयेकर्तव्यमित्युक्तं यौगादिकंमासिकंचश्राद्धंचापरपक्षिकं मन्वादिकंतैर्थिकंचकुर्यान्मासद्वयेपिचेति अपरपक्षः कृष्णपक्षः नतुमहालयः तस्यतत्रनिषेधात् मदनरत्नेपिमरीचिः प्रतिमासंमृताहेचश्राद्धंयत्प्रतिवत्सरं मन्वादौचयुगादौचतन्मासोरुभयोरपीति प्रतिवत्सरंक्रियमाणंकल्पादिश्राद्धमितिसएवव्याचख्यौ अत्रश्राद्धाकरणेप्रायश्चित्तमुक्तमृग्विधाने नयस्यद्यावामंत्रंचशतवारंतदाजपेत्‍ युगादयोयदान्यूनाः कुरुतेनैवचापिय इति अत्रसमुद्रस्नानंप्रशस्तं तदुक्तंपृथ्वीचंद्रोदयेसौरपुराणे युगादौतुनरः स्नात्वाविधिवल्लवणोदधौ गोसहस्त्रप्रदानस्यकुरुक्षेत्रेफलंहियत् तत्फलंलभतेमर्त्योभूमिदानस्यचध्रुवमिति अयंनिर्णयः सर्वयुगादिषुबोद्धव्यः इतियुगादिनिर्णयः ।

या तिथीस पिंडरहित श्राद्ध करावें; कारण, “ दोन अयनसंक्रांति, दोन विषुवसंक्रांति व सर्व युगादि तिथि यांचे ठायीं पिंडदानावांचून श्राद्ध करावें ” असें हेमाद्रींत पुलस्त्यवचन आहे. या तिथीस रात्रिभोजन केलें तर प्रायश्चित्त सांगतो ऋग्विधानांत - “ मन्वादि व युगादि ह्या तिथींस रात्रिभोजन केलें तर तद्दोषनिवृत्त्यर्थ “ अभिस्ववृष्टिं० ” हा मंत्र दहावेळ जपावा. ” अपरार्कांत यम - “ जे मनुष्य युगादि तिथींचे ठायीं उपवास करुन अन्नादिसहित जलदान करितात त्यांस उत्तम लोक प्राप्त होतात. ” वैशाख मलमास असतां त्यांतच युगादि तिथि कराव्या. तेंच हेमाद्रींत ऋष्यश्रृंग सांगतो - “ दशहरा, चार युगादि, उपाकर्म व उत्सर्जन यांचे ठायीं उत्कर्ष ( अधिकांतील कृत्य शुद्धांत नेणें हें ) नाहीं. कारण, हें वृषभादिसंक्रांतींत इष्ट होय. ” कारण, ‘ कन्येस चंद्र व वृषभास रवि असतां दंशहरा होते ’ इत्यादि वचनेंकरुन सौरमास सांगितला आहे, असा भाव. आणि कालादर्शांतही - वर्षपर्यंत उदकुंभश्राद्ध, मन्वादिश्राद्ध, महालय व युगादिश्राद्ध, यांची मलमासांत कर्तव्यामध्यें गणना केलेलीही आहे. महालयशब्दानें मघात्रयोदशी घ्यावी असें माधव सांगतो. स्मृतिचंद्रिकेंत तर - दोनही महिन्यांत युगादि व मन्वादि करावें असें सांगितलें आहे - तें असें - “ युगादि श्राद्ध, मासिक, आपरपक्षिक श्राद्ध, मन्वादिश्राद्ध, तीर्थश्राद्ध, हीं दोनही महिन्यांत ( मलमासांत व शुद्धमासांत ) करावीं. ” आपरपक्षिक म्हणजे कृष्णपक्षांतील श्राद्ध. महालय नव्हे. कारण, महालयाचा मलमासांत निषेध आहे. मदनरत्नांतही मरीचि - “ दरएक महिन्यांत मृतदिवशीं करावयाचें श्राद्ध ( मासिक ), प्रतिवार्षिक श्राद्ध, मन्वादि व युगादि श्राद्ध हीं दोनही मासांत करावीं. ” प्रतिवत्सरं म्हणजे ‘ प्रतिवर्षी करावयाचें कल्पादिश्राद्ध ’ अशी तोच ( मदनरत्नच ) व्याख्या करिता झाला. या तृतीयेस श्राद्ध न केलें तर ऋग्विधानांत प्रायश्चित्त सांगितलें आहे तें असें - “ ज्या वेळीं युगादिश्राद्ध यथायोग्य होणार नाहीं किंवा जो मनुष्य करीत नाहीं त्यानें ‘ नयस्यद्यावा० ’ या मंत्राचा शंभरवेळां जप करावा. ” या तिथीस समुद्रस्नान प्रशस्त. तें पृथ्वीचंद्रोदयांत सौरपुराणांत सांगतो - “ जो मनुष्य युगादि तिथीस क्षारसमुद्रामध्यें स्नान करितो तो हजार गाई कुरुक्षेत्रामध्यें दिल्याचें जें फल तें फल पावतो व भूमिदानाचें फल पावतो ” हा निर्णय सर्व युगादि तिथींचे ठायीं जाणावा. इति युगादिनिर्णयः ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP