मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
देवीपूजा

द्वितीय परिच्छेद - देवीपूजा

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अत्रदेवीपूजैवप्रधानम् ‍ उपवासादित्वंगम् ‍ अष्टम्यांचनवम्यांचजगन्मातरमंबिकाम् ‍ पूजयित्वाश्विनेमासिविशोकोजायतेनरइतिहेमाद्रौभविष्ये तस्याएवफलसंबंधात् ‍ नवमीतिथिपर्यंतंवृद्ध्यापूजाजपादिकमितितत्रैवदेवीपुराणात् ‍ शरत्कालेमहापूजाक्रियतेयाचवार्षिकीतिमार्कंडेयपुराणाच्च पूर्ववचनादष्टमीनवमीपूजैवप्रधानमन्यत्सर्वमंगमितिगौडाः एकाहपक्षोपिकालिकापुराणे यस्त्वेकस्यामथाष्टम्यांनवम्यामथसाधकः पूजयेद्वरदांदेवींमहाविभवविस्तरैरिति तत्त्वंतुराजसूयेन्ययागैः समप्रधानायाः सहितायाअप्यवेष्टेरेतयान्नाद्यकामंयाजयेदित्येकत्वान्मध्येविधानाच्च यथाफलार्थोबहिः प्रयोगस्तथा नवरात्रमध्यस्थायाअष्टम्या नवम्यावाफलार्थः पृथक्प्रयोगः रुपनारायणधृतदेवीपुराणे महानवम्यांपूजेयंसर्वकामप्रदायिका सर्वेषुचैववर्णेषुतवभक्त्याप्रकीर्तिता कृत्वाप्नोतियशोराज्यपुत्रायुर्धनसंपदः साचकाम्यानित्याच एवमन्यैरपितथादेव्याः कार्यंप्रपूजनम् ‍ विभूतिमतुलांलब्धुंचतुर्वर्गप्रदायकमिति योमोहादथवालस्याद्देवींदुर्गांमहोत्सवे नपूजयतिदंभाद्वाद्वेषाद्वाप्यत्रभैरव क्रुद्धाभगवतीतस्यकामानिष्टान्निहंतिवै इतिकालिकापुराणेफलनिंदाश्रुतेः वर्षेवर्षेविधातव्यंस्थापनंचविसर्जनमितितिथितत्त्वेदेवीपुराणाच्च अत्रोपवासादिकमुक्तंहेमाद्रौभविष्ये एवंचविंध्यवासिन्यांनवरात्रोपवासतः एकभक्तेननक्तेनतथैवायाचितेनच पूजनीयाजनैर्देवीस्थानेस्थानेपुरेपुरे गृहेगृहेशक्तिपरैर्ग्रामेग्रामेवनेवने स्नातैः प्रमुदितैर्ह्यष्टैर्ब्राह्मणैः क्षत्रियैर्नृपैः वैश्यैः शूद्रैर्भक्तियुक्तैर्म्लेच्छैरन्यैश्चमानवैरिति यत्तुरुपनारायणीयेभविष्ये एवंनानाम्लेच्छगणैः पूज्यतेसर्वदस्युभिरिति तत्तामसपूजापरम् ‍ विनामंत्रैस्तामसीस्यात्किरातानांतुसंमतेतितत्रैवोक्तेः मदनरत्ने देवीपुराणेपि कन्यासंस्थेरवौशक्रशुक्लामारभ्यनंदिकां अयाचीह्यथवैकाशीनक्ताशीवाथवांब्वदः भूमौशयीतचामंत्र्यकुमारीर्भोजयेन्मुदा वस्त्रालंकारदानैश्चसंतोष्याः प्रतिवासरम् ‍ बलिंचप्रत्यहंदद्यादोदनंमांसमाषवत् ‍ त्रिकालंपूजयेद्देवींजपस्तोत्रपरायणइति नंदिकाप्रतिपत्तिथिरितिमैथिलाः षष्ठीतिगौडाः ।

ह्या नवरात्राचे ठायीं देवीपूजाच प्रधान . उपवास , स्तोत्रपाठ , जप इत्यादिक तर अंग आहे . कारण , " आश्विनमासांत अष्टमी व नवमी या तिथीस जगन्माता अंबिकेचें पूजन केलें असतां मनुष्य शोकरहित होतो - " ह्या हेमाद्रींतील भविष्यवचनांत पूजेलाच फल सांगितलें आहे . व " नवमी तिथीपर्यंत वृद्धीनें ( पहिले दिवशीं एक , दुसर्‍या दिवशीं दोन असें ) पूजा व जप इत्यादि करावें , " असें तेथेंच देवीपुराणवचन आहे ; आणि " शरत्कालीं प्रतिवर्षीं महापूजा करितात " असें मार्केंडेयपुराणवचनही आहे . वरील भविष्यवचनावरुन अष्टमी - नवमीपूजाच प्रधान आहे ; बाकीचें सर्व अंग होय असें गौड सांगतात . एक दिवसाचा पक्षही सांगतो , कालिकापुराणांत - " जो साधक असेल त्यानें एका अष्टमीस अथवा नवमीस वरदादेवीचें मोठ्या ऐश्वर्यविस्तारांनीं पूजन करावें . " याचें तत्त्व म्हटलें तर असें की , राजसूययज्ञांत अवेष्टि नावाचा याग व इतर याग सांगितले आहेत . इतर यागांत जीं प्रधानकर्मैं तींच या अवेष्टियागांत आहेत . असें असून ती अवेष्टि सर्व यागांसह सांगितली असूनही ‘ जो अन्नादिकांची इच्छा करील त्याच्याकडून ही अवेष्टि करवावी ’ या अर्थाच्या वचनांत ‘ एतया ’ असें एकवचन असल्यामुळें ; आणि मध्यें विधान केल्यामुळें ; त्या अन्नादिफलाकरितां राजसूययज्ञाच्या बाहेर जसा प्रयोग होतो , तसा नवरात्रामध्यें असलेल्या अष्टमीचा किंवा नवमीचा फलार्थ पृथक् ‍ प्रयोग होतो . रुपनारायणग्रंथांत - देवीपुराणांत - " महानवमीचे ठायीं ही पूजा सर्व मनोरथ देणारी होय . हे वत्सा ! सर्व वर्णांविषयीं तुझ्या भक्तीस्तव सांगितली आहे , ही केली असतां यश , राज्य , पुत्र , आयुष्य , धन , संपत्ति , हीं प्राप्त होतात . " ही पूजा काम्य व नित्यही आहे . कारण , " असेंच अन्यांनींही बहुत ऐश्वर्यप्राप्तीकरितां धर्म , अर्थ , काम , मोक्ष हे चार वर्ग देणारें देवीचें पूजन करावें . " " जो मनुष्य मोहानें अथवा आलस्यानें अथवा दंभानें किंवा द्वेषानें महोत्सवांत दुर्गादेवीचें पूजन करीत नाहीं त्यावर भगवती क्रुद्ध होऊन इष्ट मनोरथांचा नाश करिते . " असें कालिकापुराणांत फल व निंदाश्रवण आहे . आणि " प्रतिवर्षीं देवीचें स्थापन व विसर्जन करावें . " असें तिथितत्त्वांत देवीपुराणांत वचनही आहे . तेथें उपवासादिक सांगतो - हेमाद्रींत - भविष्यांत - " याप्रमाणें विंध्यवासिनी देवीचेठायीं नवरात्र उपवास , किंवा एक भक्त , किंवा नक्त , अथवा अयाचित करुन जनांनीं प्रत्येक स्थानीं , प्रत्येक नगरीं , प्रत्येक गृहीं , प्रत्येक ग्रामीं , प्रत्येक वनीं नवरात्र करावें . स्नान केलेले अत्यंत आनंदित असे ब्राह्मण , क्षत्रिय , राजे , वैश्य , शूद्र यांनीं व भक्तियुक्त म्लेच्छांनीं व अन्य मनुष्यांनींही देवीचें पूजन करावें . " आतां जें रुपनारायणग्रंथांत भविष्यांत - " असेंच अनेक म्लेच्छ व भिल्ल इत्यादि चोर देवीची पूजा करितात " असें वचन तें तामसपूजापर होय . कारण , " मंत्रावांचून तामसीपूजा भिल्लांस विहित आहे . " असें तेथेंच सांगितलें आहे . मदनरत्नांत देवीपुराणांतही - " कन्याराशीस सूर्य असतां शुक्ल प्रतिपदेस आरंभ करुन अयाचित , अथवा एकभुक्त , किंवा नक्त , अथवा उदकभक्षण करुन भूमीवर निद्रा करुन कुमारींस आमंत्रण करुन त्यांना आनंदानें भोजन घालावें . प्रतिदिवशीं वस्त्र अलंकार कुमारींला देऊन संतुष्ट करावें . प्रतिदिवशीं मांसमाषयुक्त भाताचा बलि द्यावा . जप व स्तोत्रपाठ करुन त्रिकाल देवीचें पूजन करावें . " या वचनांत नंदिका म्हणजे प्रतिपदा तिथि असें मैथिल सांगतात . नंदिका म्हणजे षष्ठी असें गौड म्हणतात .

तच्चपूजनंरात्रौकार्यम् ‍ आश्विनेमासिमेघांतेमहिषासुरमर्दिनीं निशासुपूजयेद्भक्त्यासोपवासादिकः क्रमादिति देवीपुराणात् ‍ संग्रहेपि आश्विनेमासिमेघांतेप्रतिपद्यातिथिर्भवेत् ‍ तस्यांनक्तंप्रकुर्वीतरात्रौदेवींचपूजयेत् ‍ रात्रिरुपायतोदेवीदिवारुपोमहेश्वरः रात्रिव्रतमिदंदेविसर्वपापप्रणाशनम् ‍ सर्वकामप्रदंनृणांसर्वशत्रुनिबर्हणं रात्रिव्रतमिदंतस्यरात्रौकर्तव्यतेष्यते नक्तव्रतमिदंयस्मादन्यथानरकेगतिरित्यादिवचनाच्च रात्रिव्रतत्वमेवाभिप्रेत्यमाधवेनोक्तम् ‍ तस्यनक्तव्रतत्वादिति नतुरात्रिभोजनात् ‍ ननु मासिचाश्वयुजेशुक्लेनवरात्रेविशेषतः संपूज्यनवदुर्गांचनक्तंकुर्यात्समाहितः नवरात्राभिधंकर्मनक्तव्रतमिदंस्मृतं आरंभेनवरात्रस्येत्यादिस्कांदात् ‍ माधवोक्तेश्चनक्तमेवप्रधानमितिचेत् ‍ न नवरात्रोपवासत इत्यादेरनुपपत्तेः तेनपाक्षिकनक्तानुवादोयं नित्यानित्यसंयोगविरोधात् ‍ नह्यग्निहोत्रेदशमपक्षेप्राप्तस्य दध्नाजुहोतीत्यस्येंद्रियकामहोमेनुवादोघटते नित्यवदनुवादायोगादित्युक्तंवार्तिके तथात्रापि तेनात्रतद्वदेवगुणात्फलमितिज्ञेयम् ‍ ननु रात्रेः कर्मकालत्वेतव्द्यापिनीपूर्वैवप्रतिपत्प्राप्नुयात् ‍ मैवम् ‍ न्यायतः प्राप्तावपिपूर्वोक्तवचनैर्बाधात् ‍ यथापूर्वेद्युः कर्मकालव्यापिनीमपित्यक्त्वास्वल्पापिपरैवरामनवमीतिप्रागुक्तम् ‍ यथावा निशीथेसतीमपिपूर्वांजन्माष्टमींत्यक्त्वा रोहिणीयुक्तापरैवेतिमाधवेनोक्तम् ‍ तथात्रापि वस्तुतस्तु रात्रेःकर्मकालत्ववचसांहेमाद्याद्यलिखनात् ‍ समूलत्वंविमृश्यमेव त्रिकालंपूजयेदित्यादिपूर्वविरोधाच्च माधवोक्तिस्तुपाक्षिकनक्तानुवाद इत्युक्तं तस्मात्सर्वपक्षेषुपरैवप्रतिपदितिसिद्धम् ‍ अत्रकेचिन्नवरात्रशब्दोनवाहोरात्रपरः वृद्धौसमाप्तिरष्टम्यांह्नासेमाप्रतिपन्निशि प्रारंभोनवचंड्यास्तुनवरात्रमतोर्थवदितिदेवीपुराणादित्याहुः तन्न अतिह्नासवृद्ध्योर्न्यूनादिकत्वापत्तेः अत्रमूलाभावाच्च तेनतिथिवाच्येवायं तदुक्तं तिथिवृद्धौतिथिह्नासेनवरात्रमपार्थकम् ‍ अष्टरात्रेनदोषोयंनवरात्रतिथिक्षयेइति सचनवरात्रशब्दः क्कचिल्लक्षणयाकर्मवाची यथाप्रारंभोनवरात्रस्येत्यत्रेतिदिक् ‍ ।

तें देवीपूजन रात्रीस करावें . कारण , " आश्विनमासीं मेघांतीं ( शरद्‍ऋतूंत ) उपवासादियुक्त होऊन क्रमानें महिषासुरमर्दिनी देवीचें भक्तीनें रात्रीस पूजन करावें . " असें देवीपुराणवचन आहे . संग्रहांतही - " आश्विनमासीं मेघांतीं जी प्रतिपदा तिथि होते तिचेठायीं नक्त करावें , आणि रात्रीस देवीचें पूजन करावें . कारण , देवी रात्रिरुपा व महेश्वर दिवारुप आहे . यास्तव हे देवि , हें रात्रिव्रत सर्व पापनाश करणारें व मनुष्यांस सर्व मनोरथ देणारें व सर्व शत्रुनाश करणारें असें आहे . हें रात्रिव्रत रात्रीं करावें , हें इष्ट आहे . कारण , हें नक्तव्रत आहे . हें केलें नाहीं तर नरकांत गति होते . " इत्यादि वचनही आहे . हें रात्रिव्रत आहे , अशाच अभिप्रायानें माधव सांगतो कीं , ‘‘ तें नक्तव्रत आहे . " रात्रिभोजनानें हें होत नाहीं . शंका - आश्विनमासांत शुक्लपक्षांत नवरात्रामध्यें विशेषेंकरुन नवदुर्गेची पूजा करुन समाधानपूर्वक नक्त करावें . नवरात्र नांवाचें हें कर्म नक्तव्रत म्हटलें आहे . नवरात्राच्या आरंभीं . " इत्यादि स्कांदवचनावरुन आणि वर माधवानें सांगितल्यावरुन ह्या नवरात्रांत नक्तच प्रधान ( मुख्य ) आहे , असें म्हणूं ? समाधान - नक्तच प्रधान असें म्हणतां येत नाहीं . कारण ‘ नवरात्रोपवासतः " म्हणजे नवरात्र उपवास किंवा एकभक्त अथवा नक्त इत्यादि वर सांगितलेलें ( भविष्यादिवचन ) उपपन्न होणार नाहीं . तेणेंकरुन ( भविष्यादि वचनाच्या अनुपपत्तीवरुन ) असें समजतें कीं , स्कंदवचन , माधव इत्यादिकांनीं सांगितलेलें वैकल्पिक ( विकल्पानें होणार्‍या ) नक्ताचा अनुवाद आहे , म्हणजे भविष्यादिकांनीं सांगितलेलें नक्तव्रत करावें , असें माधव , स्कांद इत्यादिकांनीं सांगितलें आहे . अपूर्व नक्त सांगितलें नाहीं . आतां याच्या उलट म्हणतों - म्हणजे स्कांद - माधव इत्यादिकांनीं सांगितलेल्या नित्य नक्ताचा वर भविष्यादिकांनीं सांगितलेलें अनित्य ( वैकल्पिक ) नक्त हा अनुवाद असें म्हटलें , तर नित्य तेंच अनित्य ( वैकल्पिक ) म्हटलें असतां नित्यत्वाचा विरोध येईल . कारण , नित्यत्व व अनित्यत्व एकत्र असत नाहींत . अग्निहोत्रांत दहाव्या पक्षीं ‘ दध्ना जुहोति ’ म्हणजे अग्निहोत्राचा होम दह्यानें करावा . असें सांगितलें आहे . हा होम नित्य आहे ; आणि ‘ दध्ना इंद्रियकामस्य जुहुयात् ‍ ’ या वाक्यानें इंद्रियें चांगलीं व्हावीं , असें इच्छिणारानें दह्यानें होम करावा , असें सांगितलें आहे . हा होम अनित्य आहे . हा अनित्य होम त्या नित्य होमाचा अनुवाद घडेल काय ? अनुवाद घडत नाहीं . कारण , " नित्याचा अनित्य अनुवाद होत नाहीं . " असें वार्तिकांत सांगितलें आहे . तसेंच येथें समजावें . तेणेंकरुन त्या ठिकाणीं जसें इंद्रियेच्छूला दधिरुप गुणानें फल आहे . तसें येथें नक्तादिव्रत गुणानें फल आहे , असें समजावें . शंका - वरील संग्रहादिवचनावरुन रात्री हा कर्मकाल झाला असतां रात्रिव्यापिनी पूर्वा ( अमवास्यायुक्त ) प्रतिपदा प्राप्त होईल ? समाधान - प्राप्त होत नाहीं . कारण , न्यायानें ‘ कर्मणो यस्य यः कालस्तत्कालव्यापिनी तिथिः ’ या वचनानें पूर्वीची प्राप्त झाली तरी पूर्वीं सांगितलेल्या अमावास्यायुक्तनिषेधक वचनांनीं बाध होतो . जशी रामनवमी पूर्वदिवशीं कर्मकालव्यापिनी असली तरी ती टाकून पराच सांगितलीं आहे . अथवा जशी जन्माष्टमी मध्यरात्रीं असलेली देखील पूर्वीची टाकून रोहिणीयुक्त पराच करावी , असें माधवानें सांगितले आहे , तसें येथेंही समजावें . वास्तविक म्हटलें तर , रात्रीं कर्मकाल आहे , असें बोधन करणारीं वचनें हेमाद्रिप्रभृति निबंधकारांनीं न लिहिल्यामुळें तीं समूल असल्याविषयींचा विचार करावयाचाच आहे . अर्थात् ‍ तीं निर्णयाविषयीं प्रमाण होतील असें म्हणतां येत नाहीं . आणि रात्रीच कर्मकाल म्हटला तर , वर सांगितलेल्या मदनरत्नांत धरलेल्या देवीपुराणांतील ‘ त्रिकालं पूजयेद्देवीं ’ इत्यादि वचनाचा विरोधही येतो . माधवोक्ति तर पाक्षिक नक्ताचा अनुवाद आहे , असें पूर्वीं सांगितलें आहे . तस्मात् ‍ सर्व पक्षांचे ठायीं पराच प्रतिपदा घ्यावी असें सिद्ध झालें . या ठिकाणीं केचित् ‍ ग्रंथकार - ‘ नवरात्र ’ हा शब्द नऊ अहोरात्रांचा बोधक आहे . कारण , " एकाद्या तिथीची वृद्धि असतां नवचंडीची समाप्ति अष्टमीस करावी . क्षय झाला असतां अमवास्यायुक्त प्रतिपदेस रात्रीं प्रारंभ करावा . म्हणून नवरात्र हा शब्द यथार्थ होतो " असें सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , अतिह्नास ( दोन तिथींचा क्षय ) किंवा अतिवृद्धि झाली असतां कमज्यास्ती होईल . आणि ह्या वचनाविषयीं मूलही नाहीं . तेणेंकरुन हा नवरात्रशब्द नऊ तिथींचा बोधक आहे . तें सांगतों - " तिथीची वृद्धि किंवा तिथीचा क्षय असतां नवरात्र निरर्थक होतें . नवरात्रांतील तिथीचा क्षय होऊन आठरात्री झाल्या असतां हा दोष येत नाहीं . कारण , नऊ तिथि आहेत . " नऊ तिथींचा वाचक तो नवरात्र शब्द क्वचित् ‍ ठिकाणीं लक्षणेंकरुन नवरात्रकर्मवाचक होतो . जसें ‘ नवरात्राचा प्रारंभ ’ या ठिकाणीं नवरात्रकर्माचा प्रारंभ , असा अर्थ आहे . ही दिशा समजावी .

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP