मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
तुलसीकाष्ठमालाधारण

द्वितीय परिच्छेद - तुलसीकाष्ठमालाधारण

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अथमालाधारणम् ‍ तत्रस्कांदेद्वारकामाहात्म्ये निवेद्यकेशवेमालांतुलसीकाष्ठसंभवाम् ‍ वहतेयोनरोभक्त्यातस्यवैनास्तिपातकम् ‍ नजह्यात्तुलसीमालांधात्रीमालांविशेषतः महापातकसंहर्त्रीधर्मकामार्थदायिनीम् ‍ विष्णुधर्मे स्पृशेत्तुयानिलोमानिधात्रीमालाकलौनृणाम् ‍ तावद्वर्षसहस्त्राणिवैकुंठेवसतिर्भवेत् ‍ मालायुग्मंतुयोनित्यंधात्रीतुलसिसंभवम् ‍ वहतेकंठदेशेतुकल्पकोटिर्दिवंवसेत् ‍ तुलसीकाष्ठसंभूतेमालेकृष्णजनप्रिये बिभर्मित्वामहंकंठेकुरुमांकृष्णवल्लभम् ‍ एवंसंप्रार्थ्यविधिवन्मालांकृष्णगलेऽर्पिताम् ‍ धारयेत्कार्तिकेयोवैसगच्छे द्वैष्णवंपदमिति अत्रमूलंचिंत्यम् ‍ ॥

आतां तुलसीकाष्ठमालाधारण . त्याविषयीं स्कंदपुराणांत द्वारकामाहात्म्यांत सांगतो - " तुलसीकाष्ठांची माला भगवंताला निवेदन करुन जो मनुष्य भक्तीनें धारण करितो त्याला पातक खरोखर नाहीं . तुलसीकाष्ठमाला व विशेषेंकरुन धात्री ( आमलकी ) काष्ठमाला टाकूं नये . कारण , ती महापापाचा नाश करणारी व धर्म , काम , अर्थ यांतें देणारी आहे . " विष्णुधर्मांत - " कलियुगामध्यें आमलकीकाष्ठमाला मनुष्याच्या अंगावरील जितक्या रोमांला स्पर्श करील तितकीं सहस्त्र वर्षैं वैकुंठांत वास होईल . धात्री व तुलसी यांच्या दोन माला जो नित्य कंठामध्यें धारण करितो तो कोटिकल्पपर्यंत स्वर्गवास करितो . मालाधारणाचा मंत्र : - तुलसीकाष्ठसंभूते माले कृष्णजनप्रिये ॥ बिभर्मि त्वामहं कंठे कुरु मां कृष्णवल्लभं ॥ अशी प्रार्थना करुन यथाविधि कृष्णाच्या कंठामध्यें अर्पण केलेली अशी माला कार्तिकमासामध्यें जो धारण करील तो विष्णुलोकाप्रत जाईल . " या मालाधारणवचनाविषयीं मूल प्रमाणाचा विचार करावा .

तथाकाशीखंडे कार्तिकेमासिमेयात्रायैः कृताभक्तितत्परैः बिन्दुतीर्थकृतस्नानैस्तेषांमुक्तिर्नदूरतः भार्गवार्चनदीपिकायांनृसिंहपुराणे अगस्तिकुसुमैर्देवंयोऽर्चयेच्चजनार्दनं दर्शनात्तस्यदेवर्षेर्नरकंनाश्नुतेनरः विहायसर्वपुष्पाणिमुनिपुष्पेणकेशवम् ‍ कार्तिकेयोऽर्चयेद्भक्त्यावाजपेयफलंलभेत् ‍ स्कांदेकार्तिकमाहात्म्ये मालतीमालयाविष्णुः केतक्याचैवपूजितः समाः सहस्रंसुप्रीतोभवेत्तेमधुसूदनः पृथ्वीचंद्रोदयेपाद्मे कार्तिकेनार्चितोयैस्तुकमलैः कमलेक्षणः जन्मकोटिषुविप्रेंद्रनतेषांकमलागृहे तथा कार्तिकेकेशवेपूजायेषांनाम्नासुतैः कृता तेनिर्भर्त्स्यरवेः पुत्रंवसंतित्रिदिवेसदा तुलसीदललक्षेणकार्तिकेयोऽर्चयेद्धरिम् ‍ पत्रेपत्रेमुनिश्रेष्ठमौक्तिकंलभतेफलम् ‍ तथास्कांदेकार्तिकमाहात्म्ये धात्रीच्छायेतुयः कुर्यात्पिंडदानंमहामुने मुक्तिंप्रयांतिपितरः प्रसादान्माधवस्यतु धात्रीफलविलिप्तांगोधात्रीफलविभूषितः धात्रीफलकृताहारोनरोनारायणोभवेत् ‍ धात्रीच्छायांसमाश्रित्ययोऽर्चयेच्चक्रधारिणम् ‍ पुष्पेपुष्पेऽश्वमेधस्यफलंप्राप्नोतिमानवः तथास्कांदे कार्तिकेमासिविप्रेंद्रधात्रीवृक्षोपशोभिते वनेदामोदरंविष्णुंचित्रान्नैस्तोषयेद्विभुम् ‍ मूलेनपायसेनाथहोमंकुर्याद्विचक्षणः ब्राह्मणान्भोजयेच्छक्त्यास्वयंभुंजीतबंधुभिरिति ॥

तसेंच काशीखंडांत " कार्तिकमासामध्यें भक्तियुक्त होऊन बिंदुमाधवतीर्थांत स्नाम करुन ज्यांनीं माझी ( भगवंताची ) यात्रा केली त्यांस मुक्ति दूर नाहीं . " भार्गवार्चनदीपिकेंत नृसिंहपुराणांत - " अगस्तिपुष्पांनीं जनार्दन देवाचें जो पूजन करील त्याच्या दर्शनानें मनुष्यास नरक प्राप्त होत नाहीं . कार्तिकमासीं सर्व पुष्पें सोडून अगस्तिपुष्पानें केशवाचें जो भक्तीनें पूजन करील त्यास वाजपेययज्ञाचें फल प्राप्त होईल . " स्कंदपुराणांत - कार्तिकमहात्म्यांत - " मालती , ( जाई , चमेली ) पुष्पांच्या मालेनें व केतकीपुष्पानें पूजिलेला भगवान् ‍ विष्णु हजार वर्षै संतुष्ट होतो . " पृथ्वीचंद्रोदयांत पद्मपुराणांत - " कमलनेत्र भगवान् ‍ कार्तिकेमासामध्यें ज्यांनीं कमलांनीं पूजिला नाहीं त्यांच्या घरीं लक्ष्मी कोटिजन्मपर्यंत राहाणार नाहीं . " तसेंच " कार्तिकमासामध्यें केशवाची पूजा ज्यांच्या नांवानें पुत्रांनीं केली ते यमाची अवज्ञा करुन ( यमलोक सोडून ) निरंतर स्वर्गवास करतात . कार्तिकमासीं लक्ष तुलसीपत्रांनीं जो हरीचें पूजन करील त्याला एक एक पत्राला मौक्तिक दानाचें फल प्राप्त होतें . " तसेंच स्कंदपुराणांत कार्तिकमाहात्म्यांत - " आंवळीच्या छायेमध्यें जो पिंडदान करील त्याचे पितर भगवंताच्या प्रसादानें मुक्तीस जातात . धात्रीफलें वाटून अंगास लावणारा , धात्रीफलांनीं भूषित व धात्रीफलें भक्षण करणारा मनुष्य नारायण होतो . धात्री ( आमलकी ) छायेचा आश्रय करुन जो भगवंताचें पूजन करितो तो मनुष्य पुष्पापुष्पाचे ठायीं अश्वमेधाचें फल पावतो . " तसेंच स्कंदपुराणांत - " कार्तिकमासीं धात्रीवृक्षांनीं सुशोभित वनामध्यें दामोदर नामक विष्णूला नानाप्रकारच्या अन्नांनीं संतुष्ट करुन ( नैवेद्य दाखवून ) मूलमंत्रानें पायसाचा होम करावा , आणि यथाशक्ति ब्राह्मणभोजन करुन आपण बंधूंसह भोजन करावें .

तथा कार्तिकेद्विदलव्रतंप्रागुक्तं कार्तिकेद्विदलंत्यजेदिति पाद्मेपिकार्तिकमाहात्म्ये राजिकामाढकंचैवनैवाद्यात्कार्तिकव्रती द्विदलंतिलतंलैचतथान्यन्मतिदूषितम् ‍ स्कांदेपि कार्तिकेवर्जयेत्तद्वद्दूदलंबहुबीजकम् ‍ माषमुद्गमसूराश्चचणकाश्चकुलित्थकाः निष्पावाराजमाषाश्च आढक्योद्विदलंस्मृतम् ‍ नूतनान्यपिजीर्णानिसर्वाण्येतानिवर्जयेत् ‍ अत्रकेचिदुत्पत्तिसमयेदलद्वयंयस्यभवतितद्भूतपूर्वगत्याद्विदलमित्युच्यत इत्याहुः उदाहरंतिच बीजमेवसमुद्भूतंद्विदलंचांकुरंविना दृश्यतेयत्रसस्येषुद्विदलंतन्निगद्यतइति अन्येतुलक्षणायांमानाभावाद्वचनस्यनिर्मूलत्वाद्दिदलात्मकंयस्यस्वरुपंतदेववर्जयेदित्याहुः तथानारदीये कार्तिकेवर्जयेत्तैलंकार्तिकेवर्जयेन्मधु कार्तिकेवर्जयेत्कांस्यंकार्तिकेशुक्तसंधितम् ‍ कांस्यंतत्पात्रभोजनम् ‍ शुक्तंपर्युषितम् ‍ संधितंलवणशाकः तत्रैव कार्तिकेविष्णुमूर्त्यग्रेदीपदानाद्दिवंव्रजेत् ‍ तथा कार्तिकेतुकृतादीक्षानृणांजन्मविमोचनी तथा कार्तिकेकृच्छ्रसेवीयः प्राजापत्यपरोथवा एकांतरोपवासीवात्रिरात्रोपोषितोपिवा षड्वाद्वादक्षपक्षंवामासंवावरवर्णिनि एकभक्तेननक्तेनतथैवायाचितेनच उपवासेनभैक्षेणव्रजतेपरमंपदम् ‍ अन्येपिनियमाः प्रागुक्ताः ।

तसेंच कार्तिकमासीं द्विदलव्रत , म्हणजे ‘ कार्तिके द्विदलं त्यजेत् ‍ ’ ( कार्तिकांत द्विदल सोडावें ) असें पूर्वीं चातुर्मास्यव्रत प्रकरणीं सांगितलें आहे . पद्मपुराणांतही कार्तिकमाहात्म्यांत - " राजिका ( राई , मोहरी ), तुरी , द्विदल ( दोन डाळिंबीचा पदार्थ ), तिळांचें तेल , आणि बुद्धीला दूषित करणारा दुसरा कोणताही पदार्थ हे कार्तिकव्रत करणारानें भक्षण करुं नयेत . " स्कंदपुराणांतही " कार्तिकमासामध्यें द्विदल व बहुबीज सोडावें . उडीद , मूग , मसुरा , चणे , कुळीथ , पावटे , चवळ्या , तुरी हीं धान्यें द्विदल होत . हीं नवीं किंवा जुनीं असलीं तरी सोडावीं ". या द्विदलाविषयीं केचित् ‍ ग्रंथकार - उत्पत्तिसमयीं ज्याचीं दोन दलें होतात , तें भूतपूर्वगतीनें ( पूर्वीं द्विदल असल्यामुळें ) द्विदल म्हटलें आहे , असें सांगतात . उदाहरणही देतात - " ज्या धान्यामध्यें अंकुरावांचून बीजच द्विदल झालेलें दृष्टीस पडतें तें द्विदल म्हटलें आहे . "

अन्य ग्रंथकार तर - असा अर्थ , द्विदलशब्दाची उत्पत्तिसमयीं द्विदलावर लक्षणा करुन करावयाचा आहे , व या ठिकाणीं तशी लक्षणा करण्याविषयीं प्रमाण नसल्यामुळें ‘ बीजमेव समुद्भूतं० ’ हें वचन मूलरहित असल्यामुळें ज्याचें स्वरुप द्विदलात्मक आहे तेंच वर्ज्य करावें , असें सांगतात . तसेंच नारदीयांत - " कार्तिकमासांत तैल , मधु , कांस्यपात्रभोजन , शुक्त ( पर्युषित , शिळें ), संधित ( लवणयुक्त शाक , लोणचें ) हीं सोडावीं . " तेथेंच " कार्तिकमासीं विष्णुमूर्तींच्या पुढें दीप लावला असतां स्वर्गास जातो . " तसेंच " कार्तिकमासांत मंत्रदीक्षा घेतली असतां मनुष्यांस जन्मापासून सोडविते . " तसेंच " कार्तिकमासीं कृच्छ्रव्रत करणारा किंवा प्राजापत्यव्रत करणारा किंवा एकांतरोपवासी अथवा त्रिरात्र उपोषण करणारा , अथवा सहा , बारा , पंधरा दिवस किंवा एक महिना एकभक्त , नक्त , अयाचित , उपवास अथवा भिक्षान्न भक्षण करणारा परमपदास जातो . " अन्यही नियम पूर्वीं चातुर्मास्यारंभीं सांगितले आहेत .

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP