मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
युगादि तिथि

द्वितीय परिच्छेद - युगादि तिथि

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


कार्तिकशुक्लनवमीयुगादिः सापौर्वाह्णिकीग्राह्या शुक्लपक्षस्थत्वात् ‍ अत्रपिंडरहितंश्राद्धंकर्तव्यम् ‍ अन्यत्प्रागुक्तम् ‍ अत्रैवविष्णुत्रिरात्रमुक्तंहेमाद्रौपाद्मे कार्तिकेशुक्लनवमीमवाप्यविजितेंद्रियः हरिंविधायसौवर्णंतुलस्यासहितंविभुम् ‍ पूजयेद्विधिवद्भक्त्याव्रतीतत्रदिनत्रयम् ‍ एवंयथोक्तविधिनाकुर्याद्वैवाहिकंविधिमिति ।

कार्तिकशुक्लनवमी ही युगादि तिथि होय . ती पूर्वाह्णव्यापिनी घ्यावी . कारण , शुक्लपक्षांतील युगादि पूर्वाह्णव्यापिनी घ्याव्या , असें सांगितलें आहे . या नवमीचे ठायीं पिंडरहित श्राद्ध करावें . अन्य सर्व प्रकार पूर्वीं वैशाखमासांत अक्षयतृतीयाप्रसंगीं सांगितला आहे . एथेंच विष्णुत्रिरात्रव्रत सांगतो - हेमाद्रींत पाद्मांत - " कार्तिकशुक्लनवमी प्राप्त असतां व्रत धारण करुन जितेंद्रिय होऊन तुलसीसहित हरीची सुवर्णाची मूर्ति करुन तीन दिवस भक्तीनें यथाशास्त्र पूजा करावी आणि शास्त्रोक्त विधीनें तुलसीसहित हरीचा विवाह करावा . "

N/A

References : N/A
Last Updated : June 19, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP