मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
सिंहासनमंत्र

द्वितीय परिच्छेद - सिंहासनमंत्र

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अथसिंहासनमंत्रः विजयोजयदोजेतारिपुघातीशुभंकरः दुःखहाधर्मदःशांतः सर्वारिष्टविनाशनः एतेवैसन्निधौयस्मात्तवसिंहामहाबलाः तेनसिंहासनेतित्वंदेवैर्मंत्रैश्चगीयसे त्वयिस्थितः शिवः शांतस्त्वयिशक्रः सुरेश्वरः नमस्तेसर्वतोभद्रभद्रदोभवभूपतेः त्रैलोक्यजयसर्वस्वसिंहासननमोस्तुते तथैवकर्मचिह्नानिस्वानिपूज्यानिशिल्पिभिः लौहाभिसारिकंकर्मकृत्वैवंमंत्रपूर्वकम् ‍ नियमंकृत्वातथाष्टम्यांपूर्वाह्णेस्नानमाचरेत् ‍ कुंकुमचंदनचंपकचतुः समैः शैलपिष्टैश्च चर्चितगात्रींदेवींकुसुमैरभ्यर्चयेद्बहुभिः कुमुदैः सपद्मपुष्पैः सदीपधूपैः सनैवेद्यैः मांसैर्बल्युपहारैर्मंगलशब्दैः समुच्छलितैः विहितच्छत्रैर्यानैः स्यंदनसितशस्त्रधारिजनलोकैः तुष्टैः पश्वस्त्रादितु निवेद्यतेसर्वमेवभगवत्यै दुर्गासापूजनीयाचतद्दिनेद्रोणपुष्पकैः ततः खड्गंनमस्कृत्यशत्रूणांवधसिद्धये इच्छेत विजयंराज्यंसुभिक्षंचात्मनेनृपः पुनः पुनः प्रणम्यार्यांसंस्मरन्ह्रदयेशिवाम् ‍ सर्वंकृत्वेतिकौरव्य अष्टम्यांजागरं निशि नटनर्तकगीतैश्चकारयेच्चमहोत्सवम् ‍ एवंह्रष्टैर्निशांनीत्वाप्रभातेअरुणोदये घातयेन्महिषान्मेषानग्रतोनतकंधरान् ‍ शतमर्धशतंवापितदर्धंवायथेच्छया सुरासवभृतैः कुंभैस्तर्पयेत्परमेश्वरीम् ‍ कापालिकेभ्यस्तद्देयंदासी दासजनेतथा ततोपराह्णसमयेनवम्यांवैरथेस्थिताम् ‍ भवानींभ्रामयेद्राष्ट्रेस्वयंराजासशब्दवान् ‍ कश्चिच्चोपोषितोवीरोविधृतोऽन्येनखड्गवान् ‍ भूतेभ्यस्तुबलिंदद्यान्मंत्रेणानेनसामिषम् ‍ सरक्तंसजलंचान्नंगंधपुष्पाक्षतैर्युतम् ‍ त्रींस्त्रीन्वारान्समूलेनदिग्विदिक्षुकिरेद्बलिम् ‍ मंत्रश्च बलिंगृह्णंत्विमंदेवाआदित्यावसवस्तथा मरुतश्चाश्विनौ रुद्राः सुपर्णाः पन्नगाग्रहाः असुरायातुधानाश्चपिशाचोरगराक्षसाः डाकिन्योयक्षवेतालायोगिन्यः पूतनाः शिवाः जृंभकाः सिद्धगंधर्वामालाविद्याधरानगाः दिक्पालालोकपालाश्चयेचविघ्नविनायकाः जगतांशांतिकर्तारोब्रह्माद्याश्चमहर्षयः माविघ्नंमाचमेपापंमासंतुपरिपंथिनः सौम्याभवंतुतृप्ताश्चभूतप्रेताः सुखावहाइति इतिमहाष्टमी ।

सिंहासनमंत्र - " विजयो जयदो जेता रिपुघाती शुभंकरः ॥ दुःखहा धर्मदः शांतः सर्वारिष्टविनाशनः ॥ एते वै संनिधौ यस्मात्तव सिंहा महाबलाः ॥ तेन सिंहासनेति त्वं देवैर्मंत्रैश्च गीयसे ॥ त्वयि स्थितः शिवः शांतस्त्वयि शक्रः सुरेश्वरः ॥ नमस्ते सर्वतोभद्र भद्रदो भव भूपतेः ॥ त्रैलोक्यजयसर्वस्व सिंहासन नमोस्तु ते ॥ " " तशींच शिल्प्यांनीं आप आपल्या कामाचीं आयुधें असतील त्यांची पूजा करावी . या प्रकारें लौहाभिसारिक कर्म मंत्रपूर्वक करुन नंतर नियम करुन अष्टमीच्या दिवशीं पूर्वाह्णीं स्नान करावें . केशर , चंदन , अगर , चंपक , ह्या चवघांबरोबर शैलपिष्ट घेऊन देवीच्या शरीरास उटी लावून बहुत पुष्पांनीं तिची पूजा करावी . चंद्रविकासी कमलें , सूर्यविकासी कमलें , धूप , दीप , नैवेद्य , मांस , बली , उपहार , मंगलशब्द या उपचारांनीं पूजा करावी , छत्र धारण करणारे , वाहनावर बसलेले , रथावर बसलेले , शस्त्र धरणारे अशा आनंदित जनांनीं पशु - अस्त्र इत्यादि सर्व भगवतीला अर्पण करावें . राजानें त्या दिवशीं त्या दुर्गेचेम द्रोणपुष्पांनीं पूजन करावें . नंतर शत्रूंच्या वधाकरितां खड्गाला नमस्कार करुन आपला विजय , राज्य व सुभिक्ष यांची इच्छा राजानें करावी . ह्रदयामध्यें कल्याणकारक देवीचें स्मरण करीत तिला वारंवार नमस्कार करुन अष्टमीस रात्रीं जागरण करावें , नाच , तमाशा , गाणें यांहींकरुन मोठा उत्सव करावा . याप्रमाणें आनंदानें रात्र घालवून प्रभातकाळीं अरुणोदयीं देवीच्या अग्रभागीं शंभर , किंवा पन्नास अथवा पंचवीस आपल्या इच्छेप्रमाणें महिष व मेंढे मारावे . त्यांच्या रक्तमांसांनीं , आणि मद्य , आसव यांनीं पूर्ण भरलेल्या कुंभांनीं परमेश्वरी देवीला तृप्त करावें . तें मद्यमांसादिक कापालिकांना व दासीदासांना द्यावें . नंतर नवमीचे दिवशीं अपराह्णीं स्वतः राजानें देवीला रथावर बसवून वाद्यघोष करीत नगरांत फिरवावें . अन्यानें धरलेल्या कोणी एका वीरानें उपोषित राहून हातांत खड्ग घेऊन मूलमंत्रासहित पुढें सांगावयाच्या मंत्रानें आमिष , रक्त , जल , गंध , पुष्पें , अक्षता यांनीं युक्त अन्नाचा बलि द्यावा . तो बलि दिशा विदिशांचे ठायीं तीन तीन वेळ द्यावा . " बलिदानाचा मंत्र - " बलिं गृह्णंत्विमं देवा आदित्या वसवस्तथा ॥ मरुतश्चाश्विनौ रुद्राः सुपर्णाः पन्नगा ग्रहाः ॥ असुरा यातुधानाश्च पिशाचोरगराक्षसाः ॥ डाकिन्यो यक्षवेताला योगिन्यः पूतनाः शिवाः ॥ जृंभकाः सिद्धगंधर्वा माला विद्याधरा नगाः ॥ दिक् ‍ पाला लोकपालाश्च ये च विघ्नविनायकाः ॥ जगतां शांतिकर्तारो ब्रह्माद्याश्च महर्षयः ॥ मा विघ्नं मा च मे पापं मा संतु परिपंथिनः ॥ सौम्या भवंतु तृप्ताश्च भूतप्रेताः सुखावहाः " ॥ इति महाष्टमी ॥

महानवमीतुपूर्वयुताग्राह्या पूर्वोक्तवचनात् ‍ नवमीदुर्गाव्रतेश्रावणीतिदीपिकोक्तेः श्रावणीदुर्गनवमी दूर्वाचैवहुताशनी पूर्वविद्धाप्रकर्तव्याशिवरात्रिर्बलेर्दिनमितिहेमाद्रौपाद्मोक्तेश्च भविष्येपि आश्वयुक् ‍ शुक्लपक्षेतुअष्टमीमूलसंयुता सामहानवमीनामत्रैलोक्येपिसुदुर्लभेति मूलमुपलक्षणम् ‍ दुर्गापूजासुनवमीमूलाद्यृक्षत्रयान्विता महतीकीर्तितातस्यांदुर्गामहिषमर्दिनीइति मदनरत्नेलैंगात् ‍ अत्रपूजयेदित्यग्रेशेषः यानितु साकार्योदयगामिन्यामित्यादिप्रागुक्तानितानिनवमीभिन्नतिथिपराणि नवम्यांविशेषोक्तेः वेधश्चमुहूर्तत्रयेणैवज्ञेयः यद्यपिहेमाद्रिमतेमुहूर्तद्वयात्मापिवेधोस्तितथापिसूर्योदयएवसः सायंतुत्रिमुहूर्तएव तदुक्तंदीपिकायाम् ‍ त्रिमुहूर्तगातुसकलासायमिति माधवोपि सायंतूत्तरयातद्वन्न्यूनयानतुविध्यत इति तेनत्रिमुहूर्तयोगेपूर्वानवमी पूर्वोक्तवचनात् ‍ नकुर्यान्नवमींतातदशम्यांतुकदाचनेतिस्कांदेपरानिषेधाच्च त्रिमुहूर्तयोगाभावेतुनिषिद्धपिपरैवकार्येतिनिष्कर्षः ।

महानवमी तर अष्टमीयुक्त घ्यावी . कारण , " अष्टमी नवमीयुक्त घ्यावी आणि नवमी अष्टमीयुक्त घ्यावी . असें पूर्वीं पाद्मवचन सांगितलें आहे . " दुर्गाव्रताविषयीं नवमी व श्रावणी पौर्णिमा ह्या पूर्वविद्धा घ्याव्या " अशी दीपिकाही आहे . आणि " श्रावणी , दुर्गानवमी , दूर्वाअष्टमी , हुताशनी , शिवरात्रि , व बलिप्रतिपदा ह्या पूर्वविद्धा कराव्या . " असें हेमाद्रींत पाद्मवचनही आहे . भविष्यांतही - " आश्विनशुक्लपक्षांतली मूलनक्षत्रयुक्त अष्टमी ती महानवमी होय , ती त्रैलोक्यामध्येंही अत्यंत दुर्लभ . " वरील वचनांत ‘ मूलसंयुता ’ असें जें पद तें मूलादि तीन नक्षत्रांचें उपलक्षण आहे , म्हणजे मूलादि तीन नक्षत्रांतून कोणत्या एकानक्षत्रानें युक्त अष्टमी ती महानवमी असा अर्थ . कारण , " दुर्गापूजेविषयीं नवमी मूल पूर्वाषाढा व उत्तराषाढा या तीन नक्षत्रांनीं युक्त ती महती म्हटली आहे , तिचे ठायीं महिषासुरमर्दिनी दुर्गा पुजावी . " असें मदनरत्नांत लिंगपुराणवचन आहे . आतां जीं " शरत्काले महापूजा क्रियते या च वार्षिकी । सा कार्योदयगामिन्यां न तत्र तिथियुग्मता " हें वचन प्रतिपदानिर्णयांत उक्त आहे ; आणि " तिथावुदयगामिन्यां सर्वास्ताः कारयेत्तु यः " हें वचन सप्तमीनिर्णयांत उक्त आहे . इत्यादि वचनें ती नवमीभिन्न तिथिविषयक आहेत . कारण , नवमीस विशेष निर्णय ( अष्टमीविद्धा घ्यावी ) असा सांगितला आहे . वेध सांगितला तो तीन मुहूर्तांनींच जाणावा . जरी हेमाद्रिमतीं दोन मुहूर्तही वेध आहे तरी तो वेध सूर्योदयींच समजावा . सायंकालीं वेध तीन मुहूर्तच आहे . तें सांगतो - दीपिकेंत - " सायंकालीं त्रिमुहूर्तगामिनी तिथि ती संपूर्ण समजावी . " माधवही - " सायंकालीं तर उत्तर तिथि त्रिमुहूर्ताहून न्यून असतां तिनें प्रातःकालीन तिथीप्रमाणें विद्ध होत नाहीं . " तेणेंकरुन सायंकालीं तीन मुहूर्त असतां पूर्वा नवमी घ्यावी . कारण , अष्टमीयुक्त नवमी घ्यावी , असें पूर्वीं सांगितलेलें वचन आहे . आणि " दशमीचे दिवशीं नवमी कधींही करुं नये " असा स्कांदांत पर नवमीचा निषेधही केला आहे . त्रिमुहूर्त योग नसेल तर निषिद्ध असली तरी पराच करावी , हा निष्कर्ष ( मथितार्थ ) समजावा .

यत्तुनवम्यांचजपंहोमंसमाप्यश्रवणेपिवेतिसंग्रहोक्तेः व्रतंचजागरश्चैवनवम्यांविधिवद्बलिरितिदेवीपुराणाच्च नवम्यांहोमबल्यादिविहितं तत्र आश्वयुक् ‍ शुक्लनवमीमुहूर्तंवाकलायदि सातिथिः सकलाज्ञेयालक्ष्मीविद्याजयार्थिभिरिति सौरपुराणात् ‍ सूर्योदयेपरंरिक्तापूर्णास्यादपरायदि बलिदानंप्रकर्तव्यंतत्रदेशेशुभावहम् ‍ बलिदानेकृतेष्टम्यांपुत्रभंगोभवेन्नृपेतिमदनरत्नेदेवीपुराणाच्च बल्यादौपराकार्या उपवासादौतुपूर्वेतिमदनरत्नेउक्तम् ‍ प्रतापमार्तंडेप्येवम् ‍ यत्तु अष्टम्यांबलिदानेनपुत्रनाशोभवेद्धुवमितिकालिकापुराणं तत्संधिपूजापरं अष्टमीनवमीसंधौतृतीयाखलुकथ्यत इतितत्रैवतदुक्तेः कामरुपनिबंधे अष्टम्याः शेषदंडश्चनवम्याः पूर्वएवच तत्रयाक्रियतेपूजाविज्ञेयासामहाफला अष्टमीमात्रेभवत्येव आश्विनेपूजयित्वातुअर्धरात्रेष्टमीषुच घातयंतिपशून् ‍ भक्त्यातेभवंतिमहाबलाः तथा कन्यासंस्थेरवावीषेशुक्लाष्टम्यांप्रपूजयेत् ‍ सोपवासोनिशार्धेतुमहाविभवविस्तरैः तथा पशुघातश्चकर्तव्योगवयाजवधस्तथेतिरुपनारायणीयेदेवीपुराणात् ‍ तत्रैवभविष्ये तस्मादियंमहापुण्यानवमीपापनाशिनी उपोष्यासुप्रयत्नेनसततंसर्वपार्थिवैः निर्णयदीपेतुमहानवमीपरदिने पराह्णव्यापित्वेपरा अन्यथापूर्वा आवर्तनात्पूर्वकालेनवमीस्यात्परेहनि दुर्गार्चातत्रपूर्वेद्युः पूर्वाह्णेत्वष्टमीयदीतिधौम्यवचनादित्युक्तम् ‍ अस्यतुशारदानवमीविषयत्वंसमूलत्वंचविमृश्यम् ‍ यानितु नंदायांज्वलतेवह्निः पूर्णायांपशुघातनम् ‍ भद्रायांगोकुलक्रीडातत्रराज्यंविनश्यतीति नवम्यामपराह्णेतुबलिदानंप्रशस्यते दशमींवर्जयेत्तत्रनात्रकार्याविचारणेति नंदायादर्शनेरक्षाबलिदानंदशासुच भद्रायागोकुलक्रीडादेशनाशायजायत इतिब्रह्मवैवर्तनारदादिवचनानितानिशुद्धाधिकनिषेधपराणीतिमदनरत्ने तथाकालिकापुराणे नवम्यांबलिदानंतुकर्तव्यंवैयथाविधि जपंहोमंचविधिवत्कुर्यात्तत्रविभूतये केचित्तुपूर्वाषाढायुताष्टम्यांपूजाहोमाद्युपोषणमितिपूर्वोक्तदेवीपुराणादष्टम्यांहोममाहुः अन्येतुद्विविधवाक्यवशादष्टम्यामारभ्यनवम्यांसमापयंति समुच्चयस्तुयुक्तः रुद्रयामलेतुविकल्प उक्तः तत्तुनिर्मूलम् ‍ दुर्गाभक्तितरंगिण्यादिगौडग्रंथेष्वपिनवम्यांहोमउक्तः ।

आतां जें " नवमीस किंवा श्रवणनक्षत्रावर जप , होम समाप्त करुन " ह्या संग्रहवचनावरुन ; आणि " नवमीस व्रत , जागर , यथाविधि बलिदान हीं करावीं . " ह्या देवीपुराणवचनावरुनही नवमींत बलि , होम इत्यादि विहित आहे , त्या ठिकाणीं " आश्विन शुक्ल नवमी मुहूर्तमात्र किंवा कलामात्र असेल तर ती तिथि लक्ष्मी , विद्या , जय , इच्छिणारांनीं सकल समजावी " ह्या सौरपुराणवचनावरुन ; आणि " जर सूर्योदयीं रिक्ता ( नवमी ) व पुढें पूर्णा ( दशमी ) असेल तर त्या दिवशीं बलिदान करावें , तें त्या देशीं शुभावह होतें . अष्टमींत बलिदान केलें असतां पुत्रनाश होईल " ह्या मदनरत्नांतील देवीपुराणवचनावरुनही बलि - होमादिकांविषयीं परा करावी . उपवासादिकांविषयीं तर पूर्वा करावी , असें मदनरत्नांत उक्त आहे . प्रतापमार्तेडांतही असेंच आहे . आतां जें " अष्टमींत बलिदान केल्यानें निश्चयानें पुत्रनाश होईल " असें कालिकापुराणवचन तें संधिपूजाविषयक आहे . कारण , " अष्टमी व नवमी यांच्या संधीचे ठायीं तृतीया पूजा सांगितली आहे . " अशी तेथेंच ती संधीपूजा आहे . कामरुपनिबंधांत - " अष्टमीची शेवटची घटिका आणि नवमीची आद्य घटिका त्या ठिकाणीं जी पूजा केली जाते ती महाफलदायक जाणावी . " केवळ अष्टमींत पूजा होतच आहे . कारण , " आश्विनमासीं अष्टमीचे ठायीं मध्यरात्रीं पूजन करुन भक्तीनें पशूंचा घात करितात ते महाबल होतात . " तसेंच कन्याराशीस सूर्य असतां " आश्विनमासीं शुक्लाष्टमीस उपवास करुन मध्यरात्रीं मोठ्या विभवविस्तरांनीं पूजन करावें . " तसेंच " पशुवध करावा , आणि गवय व अज ( बोकड ) यांचा वध करावा . " असें रुपनारायणीयांत - देवीपुराणवचन आहे . तेथेंच भविष्यांत - " त्या कारणास्तव ही नवमी महापुण्या व पापनाशिनी आहे . सर्व राजांनीं हिचें प्रयत्नानें सतत उपोषण करावें . " निर्णयदीपांत तर - महानवमी परदिवशीं अपराह्णव्यापिनी असतां परा करावी ; परदिवशीं अपराह्णव्यापिनी नसतां पूर्वा करावी . कारण , " दुसर्‍या दिवशीं आवर्तनकालाच्या ( मध्याह्नीं सूर्य फिरण्याच्या ) पूर्वीं नवमी संपत असेल व पूर्वदिवशीं पूर्वाह्णीं अष्टमी असेल तर दूर्गेची पूजा पूर्वदिवशीं करावी . " असें धौम्यवचन आहे , असें सांगितलें . हें वचन तर ह्या नवमीविषयक आहे व समूल आहे , याचा विचार करावा . आतां जीं - " नंदेवर ( प्रतिपदेंत ) अग्निप्रज्वलन ( होळी पेटविणें ), दशमींत पशुघात करणें , कार्तिकशुक्ल द्वितीयेचे ठायीं गोकुलक्रीडा अशीं जेथें होतात तेथें राज्यनाश होतो . " " नवमींत अपराह्णीं बलिदान प्रशस्त आहे . बलिदानाविषयीं दशमी सोडावी , याविषयीं विचार करुं नये . " " प्रतिपदेचे ठायीं रक्षाबंधन , दशमींत बलिदान , भद्रेचे ठायीं ( कार्तिकशुक्लद्वितीयेचे ठायीं ) गोकुलक्रीडा , हीं देशनाशास कारण होतात " अशीं ब्रह्मवैवर्त - नारद इत्यादिकांची वचनें आहेत तीं पूर्वदिवशीं शुद्ध असून परदिवशीं उर्वरित पूर्वतिथिनिषेधक आहेत , असें मदनरत्नांत उक्त आहे . तसेंच कालिकापुराणांत - " नवमीचे ठायीं यथाविधि बलिदान , जप , होम , हीं करावीं ; तेणेंकरुन ऐश्वर्य प्राप्त होतें . " कोणी ग्रंथकार तर " पूर्वाषाढायुक्त अष्टमीस पूजा , होम , उपोषण इत्यादि करावीं " ह्या पूर्वोक्त देवीपुराणवचनावरुन अष्टमीस होम करावा असें सांगतात . अन्य पंडित तर - दोन प्रकारचीं वाक्यें असल्यामुळें , अष्टमींत होम आरंभ करुन नवमींत समाप्त करितात . अष्टमींत व नवमींत दोन्हीं दिवशीं करणें हें तर युक्त आहे . रुद्रयामलांत तर अष्टमींत किंवा नवमींत असा विकल्प सांगितला आहे , तो तर निर्मूल आहे . दुर्गाभक्तितरंगिण्यादिक गौडग्रंथांतही नवमींत होम सांगितला आहे .

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP