मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
बोधिनीविधि

द्वितीय परिच्छेद - बोधिनीविधि

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .

अथवाराहोक्तोबोधिनीविधिः एकादश्यांरात्रौकुंभेघृतपात्रोपरिहैमंमाषमितंमत्स्यंपंचामृतेनसंस्नाप्यकुंकुमपीतवस्त्रयुगपद्माद्यैः संपूज्यमत्स्यादिदशावतारान्संपूज्यजागरंकृत्वाप्रातर्देवमाचार्यंचवस्त्राद्यैः संपूज्य जगदादिर्जगद्रूपोजगदादिरनादिमान् जगदाद्योजगद्योनिः प्रीयतांमेजनार्दन इतिनत्वादक्षिणांदत्वाब्राह्मणान्भोजयेदिति तथाब्राह्मे महातूर्यरवैरात्रौभ्रामयेत्स्यंदनेस्थितम् उत्थितंदेवदेवेशंनगरेपार्थिवः स्वयम्‍ चतुरोवार्षिकान्मासान्नियमंयस्ययत्कृतम् कथयित्वाद्विजेभ्यस्तद्दद्याद्भक्त्यासदक्षिणम् यस्यभक्ष्यस्यनियमः कृतस्तद्दव्यंदद्यादित्यर्थः इदंशुक्रास्तादावपिकार्यम् आशौचेतुपूजामन्येनकारयेत्‍ कार्तिकशुक्लद्वादशीपौर्णमासीचमन्वादिः सापौर्वाह्णिकीग्राह्या अन्यत्प्रागुक्तम् ।

आतां वाराहपुराणोक्त बोधिनीविधि सांगतो - एकादशीचे दिवशीं रात्रीं कुंभावर घृतपात्र ठेऊन त्याजवर माषप्रमाण सुवर्णाचा मत्स्य ठेवून त्याला पंचामृतानें स्नान घालून केशर, पिंवळीं दोन वस्त्रें, कमळें इत्यादिकांनीं त्या मत्स्याची पूजा करुन व मत्स्यादिदशावतारांची पूजा करुन जागरण करुन प्रातःकालीं देव आणि आचार्य यांची वस्त्रादिकांनीं पूजा करुन, “ जगदादिर्जगद्रूपो जगदादिरनादिमान्‍ ॥ जगदाद्यो जगद्योनिः प्रीयतां मे जनार्दनः ” या मंत्रानें नमस्कार करुन दक्षिणा देऊन ब्राह्मणभोजन करावें. तसेंच ब्राह्मांत - “ रात्रीं वाद्यांचा मोठा गजर करुन उत्थित देवाला रथावर बसवून तो रथ स्वतां राजानें नगरामध्यें फिरवावा. ” “ चार महिने ज्यानें ज्या पदार्थाचा नियम केला असेल तो पदार्थ ब्राह्मणाला सांगून भक्तीनें दक्षिणासहित तो द्यावा. ” म्ह० जो भक्ष्य पदार्थ वर्ज्य केला असेल तो द्यावा असा अर्थ. हा सर्व विधि शुक्र, गुरु यांचें अस्त वगैरे असतांही करावा. आशौच असेल तर पूजा अन्याकडून करवावी. इतर नियम स्वतः करावे. कार्तिकशुक्लद्वादशी व पौर्णिमा ह्या मन्वादिक होत. ती मन्वादिक तिथि पूर्वाह्णव्यापिनी घ्यावी. इतर निर्णय पूर्वीं ( चैत्र शुक्लतृतीयाप्रसंगीं ) सांगितला आहे. 

N/A

References : N/A
Last Updated : June 20, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP