मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
युगादि अमावास्या

द्वितीय परिच्छेद - युगादि अमावास्या

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


माघामावास्यायुगादिः तदुक्तम्‍ माघमासेत्वमावास्येति अन्यत्प्राग्वत‍ तथान्योपिविशेषोविष्णुपुराणे माघासितेपंचदशीकदाचिदुपैतियोगंयदिवारुणेन ऋक्षेणकालः सपरः पितृणांनह्यल्पपुण्यंर्नृपलभ्यतेऽसाविति वारुणंशतभिषक् इदंचकुंभादित्येज्ञेयमितिहेमाद्रिः भारते कालेधनिष्ठायदिनामतस्मिन् भवेत्तुभूपालतदापितृभ्यः दत्तंतिलान्नंप्रददातितृप्तिंवर्षायुतंतत्कुलजैर्मनुष्यैरिति ।

माघमासाची अमावास्या ही युगादि आहे. तें सांगतो - “ माघमासांत अमावास्या युगादि समजावी. ” युगादीविषयीं इतर निर्णय पूर्वीं ( वैशाखशुक्लतृतीयानिर्णया ) प्रमाणें समजावा. तसाच अन्यही विशेष सांगतो विष्णुपुराणांत - “ माघकृष्ण अमावास्येस शततारका नक्षत्राचा योग जर कदाचित्‍ प्राप्त होईल तर तो काल पितरांना अति पुण्यकारक आहे. हा योग अल्पपुण्याच्या मनुष्यांस प्राप्त होत नाहीं. ” हा योग कुंभराशीस सूर्य असतां जाणावा, असें हेमाद्रि सांगतो. भारतांत - “ माघकृष्ण अमावास्येस जर धनिष्ठा नक्षत्र असेल तर त्या कालीं आप आपल्या कुलोत्पन्न मनुष्यांनीं पितरांना दिलेलें तिळांसहित अन्न त्या पितरांची दहा हजार वर्षैपर्यंत तृप्ति करितें. ”

N/A

References : N/A
Last Updated : June 21, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP