मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
अष्टमीचे भेद

द्वितीय परिच्छेद - अष्टमीचे भेद

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


तत्राष्टमीद्वेधा रोहिणीरहितातद्युताच आद्यापिचतुर्धा पूर्वेद्युरेवनिशीथयोगिपरेद्युरेवोभयेद्युरनुभयेद्युश्चेति तत्राद्ययोरसंदेहएव कर्मकालव्याप्तेः जन्माष्टमीरोहिणीचशिवरात्रिस्तथैवच पूर्वविद्धैवकर्तव्यातिथिभांतेचपारणमितिभृगूक्तेश्च अस्मात्केवलरोहिण्युपवासोपिसिद्धः अंत्ययोःपरैव प्रातःसंकल्पकालव्याप्तेराधिक्यात् ‍ । वर्जनीयाप्रयत्नेनसप्तमीसंयुताष्टमीतिब्रह्मवैवर्ताच्च एवमंशतः समव्याप्तावपि विषमव्याप्तौत्वाधिक्येननिर्णयः ।

आतां अष्टमीचे भेद सांगतो - अष्टमी दोन प्रकारची - रोहिणीरहिता आणि रोहिणीसहिता . पहिली रोहिणीरहिता , तिचेही चार प्रकार आहेत - पूर्वदिवशींच मध्यरात्रव्यापिनी , दुसर्‍या दिवशींच मध्यरात्रव्यापिनी , दोन्ही दिवशीं मध्यरात्रव्यापिनी , दोन्ही दिवशीं मध्यरात्रव्यापिनी नाहीं . असे चार पक्ष आहेत . त्यांमध्यें पहिल्या दोन पक्षांविषयीं संदेह नाहींच . कारण , कर्मकालव्याप्ति आहे . आणि " जन्माष्टमी , रोहिणी , व शिवरात्रि ह्या पूर्वविद्धाच कराव्या , तिथि व नक्षत्र यांच्या अंतीं पारणा करावी " असें भृगुवचनही आहे . या वचनावरुन केवळ रोहिणीचा उपवासही सिद्ध झाला . पुढच्या दोन्ही पक्षीं पराच करावी . कारण , पूर्वदिवसापेक्षां परदिवशीं प्रातः संकल्पकालीं व्याप्ति अधिक आहे . आणि " सप्तमीयुक्त अष्टमी प्रयत्नानें वर्ज्य करावी " असेम ब्रह्मवैवर्तवचनही आहे . याप्रमाणें अंशानें दोन्ही दिवशीं समव्याप्ति असतांही समजावें . अंशानें विषमव्याप्ति असेल तर जी अधिक व्याप्ति असेल ती घ्यावी .

रोहिणीयुतापिचतुर्धा पूर्वेद्युरेवनिशीथेरोहिणीयुतापरेद्युरेवोभयेद्युरनुभयेद्युश्च अत्राप्याद्ययोरसंदेहः कार्याविद्धापिसप्तम्यारोहिणीसहिताष्टमीतिपाद्मोक्तेः जयंत्यांपूर्वविद्धायामुपवासंसमाचरेदितिगारुडाच्च सप्तमीसंयुताष्टम्यांनिशीथेरोहिणीयदि भवितासाष्टमीपुण्यायावच्चंद्रदिवाकरावितिवह्निपुराणाच्च द्वितीयेऽसंदेहएव तृतीयपक्षेपरैव वर्जनीयाप्रयत्नेनसप्तमीसंयुताष्टमी सऋक्षापिनकर्तव्यासप्तमीसंयुताष्टमीतिब्रह्मवैवर्तात् ‍ चतुर्थ्यपित्रेधा पूर्वेद्युर्निशीथेष्टमीपरेह्निरोहिणी परेह्न्यष्टमीपूर्वेह्निरोहिणी उभयेद्युरुभयस्यनिशीथासंबंधोवेति आद्येपरेद्युर्जयंतीयोगस्यसत्त्वात् ‍ परैवेतिमाधवः तदुक्तंतेनैव यस्मिन् ‍ वर्षेजयंत्याख्योयोगोजन्माष्टमीतदा अंतर्भूताजयंत्यांस्यादृक्षयोगप्रशस्तित इति पूर्वविद्धाष्टमीयातुउदयेनवमीदिने मुहूर्तमपिसंयुक्तासंपूर्णासाष्टमीभवेत् ‍ कलाकाष्ठामुहूर्तापियदाकृष्णाष्टमीतिथिः नवम्यांसैवग्राह्यास्यात्सप्तमीसंयुतानहीतिपाद्मोक्तेश्च केचित्तुहेमाद्रौ अष्टम्याः प्राधान्यात्तस्याश्चपूर्वेद्युः कर्मकालव्याप्तित्वात्पूर्वैव पाद्मंतुपूर्वेह्निनिशीथेष्टम्यभावेज्ञेयं अंतर्भावोक्तिस्तुमूर्खदंध्रणमात्रमित्याहुः अन्येतुपूर्वविद्धाष्टमीवाक्येनजन्माष्टम्यांसूर्योदयेसप्तमीवेधनिषेधात् ‍ कलाघटीमात्राप्यौदयिकीग्राह्या कार्याविद्धापिसप्तम्येतिजयंतीपरं जयंत्यांपूर्वविद्धायामुपवासंसमाचरेदित्येकवाक्यत्वात् ‍ तत्रापिद्वयोर्नित्यत्वात्कालभेदाच्चोपवासद्वयंभवत्येव यदातुकेवलाष्टमीशुद्धाधिकातदात्यागहेतोः सप्तमीवेधस्याभावात्पूर्वैव यदिवाविद्धन्यूनातदापरदिनेग्राह्यतिथेरभावात्पूर्वैव एवंसर्वाण्यौदयिकवाक्यानिसप्तमीवेधपराणि येतु जन्माष्टमींपूर्वविद्धांसऋक्षांसकलामपि विहायनवमींशुद्धामुपोष्यव्रतमाचरेदितिव्यासोक्तेर्विद्धायाः क्षयेशुद्धनवम्यामुपवासः दशमीवेधेद्वादश्युपवासवदित्याहुः तेनिर्मूलत्वादुपेक्ष्याः मुहूर्तमपिसंयुतेतिरोहिणीयोगेत्याज्यत्वोक्तेः तिथ्यंतपारणवाक्यानांनिर्विषयत्वापत्तेः नचजयंतीपराणिशुद्धाधिकापरणिवाता निभृग्वाद्यैः पूर्वविद्धाष्टम्यामपितिथ्यंतेपारणोक्तेः तेनकलाकाष्ठेतिवाक्यांतरवशाज्जयंतीपरमेतत् ‍ ।

रोहिणीयुक्त अष्टमी देखील चार प्रकारची - पूर्वदिवशींच मध्यरात्रीं रोहिणीयुक्त ; दुसर्‍या दिवशींच मध्यरात्रीं रोहिणीयुक्त ; दोन्ही दिवशीं मध्यरात्रीं रोहिणीयुक्त ; दोन्ही दिवशीं मध्यरात्रीं रोहिणीरहित . येथें देखील पहिल्या दोन पक्षांविषयीं संदेह नाहीं . कारण , " सप्तमीविद्ध असली तरी रोहिणीयुक्त अष्टमी करावी " असें पाद्मवचन आहे . आणि " पूर्वविद्धजयंतीचें ठायीं उपवास करावा " असें गारुडवचनही आहे . आणि " सप्तमीयुक्त अष्टमीचे ठायीं जर मध्यरात्रीं रोहिणी असेल तर ती अष्टमी चंद्रसूर्य आहेत तोंपर्यंत पुण्य देणारी होते " असें वह्निपुराणवचनही आहे . हा प्रकार पूर्व दिवशीं रोहिणीयुक्त पक्षाविषयीं झाला . दुसर्‍या पक्षीं संदेह नाहींच . तिसर्‍या पक्षीं पराच करावी . कारण , " सप्तमीयुक्त अष्टमी , प्रयत्नानें वर्ज्य करावी . नक्षत्रयुक्त असली तरी सप्तमीयुक्त अष्टमी करुं नये " असें ब्रह्मवैवर्तवचन आहे . चवथा प्रकार ( दोन्ही दिवशीं मध्यरात्रीं रोहिणीयुक्त नाहीं ) त्याचेही तीन प्रकार आहेत - १ पूर्व दिवशीं मध्यरात्रीं अष्टमी परदिवशीं रोहिणी . २ परदिवशीं अष्टमी पूर्वदिवशीं रोहिणी . ३ दोन्ही दिवशीं दोघांच्या मध्यरात्रीं संबंध नाहीं . यांत पहिल्या पक्षीं परदिवशीं जयंतीयोग असल्यामुळें पराच करावी , असें माधव सांगतो . तें त्यानेंच सांगितलें आहे - " ज्या वर्षीं जयंतीयोग होतो , त्या वर्षीं नक्षत्रयोगाच्या प्राशस्त्यामुळें जन्माष्टमी जयंतींत अंतर्भूत होते " आणि " जी अष्टमी पूर्वविद्धा असून नवमीच्या दिवशीं सूर्योदयीं मुहूर्त ( दोन घटी ) जरी असली तरी ती संपूर्ण अष्टमी होते . ज्या वेळीं कृष्णाष्टमी तिथि कला , काष्ठा , मुहूर्तमात्र जरी नवमींत असली तरी ती घ्यावी . सप्तमीयुक्त घेऊं नये " असें पाद्मवचनही आहे . केचित् ‍ तर - हेमाद्रींत अष्टमीस प्राधान्य सांगितल्यामुळें ती पूर्वदिवशीं कर्मकालव्यापिनी असल्यामुळें पूर्वीचीच घ्यावी . वरील पाद्मवचन तर पूर्वदिवशीं मध्यरात्रीं अष्टमी नसतां जाणावें . जयंतींत अंतर्भाव जो सांगितला तो केवळ मूर्खांची प्रतारणा मात्र आहे , असें सांगतात . अन्यग्रंथकार तर - ‘ पूर्वविद्धाष्टमी या तु ’ ह्या वरील पाद्मवचनानें जन्माष्टमीस सूर्योदयीं सप्तमीवेधनिषेध केल्यामुळें कलामात्र - किंवा घटीमात्र अशी देखील सूर्योदयव्यापिनी घ्यावी . ‘ कार्या विद्धापि सप्तम्या ’ हें वरील पाद्मवचन जयंतीविषयक आहे . कारण , " पूर्वविद्ध जयंतीच्या ठिकाणीं उपवासव्रत करावें , ह्या वरील गारुडवचनाशीं एकवाक्यता होतें . असें केलें असतांही दोन्ही व्रतें नित्य असल्यामुळें व दोघांचा काल भिन्न असल्यामुळेंही दोन उपवास होतातच . ज्या वेळीं केवळ अष्टमी शुद्धाधिक म्हणजे अष्टमीची वृद्धि असेल त्या वेळीं त्यागाला कारण सप्तमीवेध , तो पूर्व दिवशीं नसल्याकारणानें पूर्वाच घ्यावी . अथवा विद्ध असून अष्टमीचा क्षय असेल त्या वेळीं पर दिवशीं ग्रहण करण्याच्या तिथीचा अभाव असल्यामुळें पूर्वाच घ्यावी . याप्रमाणें सारीं उदयव्यापि घेण्याविषयींचीं वाक्यें सप्तमीवेधविषयक आहेत . आतां जे कोणी " पूर्वविद्धा जन्माष्टमी रोहिणीयुक्त , सारी असली तरी ती टाकून शुद्ध नवमीस उपोषण करुन व्रत करावें . " ह्या व्यासवचनावरुन विद्धेचा क्षय असतां शुद्ध नवमीस उपवास करावा , दशमीविद्ध एकादशी असतां जसा द्वादशीस सांगितला तसा करावा , असें सांगतात . त्यांचें तें मत मूलरहित असल्यामुळें अग्राह्य आहे . ‘ मुहूर्तमपि संयुक्ता ’ या वचनानें रोहिणीयोग असतां त्याज्यत्व सांगितलें आहे . पूर्वविद्धाष्टमी टाकून परा अष्टमी केली असतां ‘ तिथीच्या अंती पारणा करावी ’ अशीं जीं वाक्यें त्यांना विषय सांपडणार नाहीं . तीं तिथीच्या अंतीं पारणाविधायक वचनें जयंतीविषयीं किंवा पूर्व दिवशीं शुद्ध असून दुसर्‍या दिवशीं वृद्धि असणार्‍या तिथीविषयीं होत नाहींत . कारण , भृगु इत्यादिकांनीं पूर्वविद्ध अष्टमीचे ठायीं देखील तिथीच्या अंतीं पारणा सांगितली आहे . तेणेंकरुन ‘ कला काष्ठा० ’ ह्या वरील पाद्मवचनानुरोधानें हें व्यासवचन जयंतीविषयक आहे .

तत्त्वंतु अष्टम्याः कर्मकालव्याप्तेः दिवावायदिवारात्रौनास्तिचेद्रोहिणीकला रात्रियुक्तांप्रकुर्वीतविशेषेणेंदुसंयुतामितिपूर्वोक्तवाक्यैः रोहिणीयोगाभावेग्राह्यत्वोक्तेर्वचनात्कर्मकालव्यापिनींत्यक्त्वापूर्वापरावाल्पापिरोहिणीयुताग्राह्या माधवमदनरत्ननिर्णयामृतानंतभट्टगौडमैथिलग्रंथादिष्वप्येवमिति युक्तंतुउपवासद्वयंकार्यंद्वयोर्नित्यत्वादितितुवयं अंत्ययोःपरैव सप्तमीसंयुताष्टम्यांभूत्वाऋक्षंद्विजोत्तम प्राजापत्यंद्वितीयेह्निमुहूर्तार्धंभवेद्यदि तदाष्टयामिकंपुण्यंप्रोक्तंव्यासादिभिः पुरेतिस्कांदात् ‍ मुहूर्तेनापिसंयुक्तासंपूर्णासाष्टमीभवेत् ‍ किंपुनर्नवमीयुक्ताकुलकोट्यास्तुमुक्तिदेतिपाद्माच्चेतिदिक् ‍ ।

खरा प्रकार म्हटला तर - " दिवसा किंवा रात्रीस एक कलामात्रही रोहिणीयोग नसेल तर रात्रियुक्त विशेषेंकरुन चंद्रोदययुक्त असेल ती करावी " ह्या पूर्वोक्तवचनांनीं रोहिणीयोग नसतां कर्मकालव्यापिनी अष्टमीस ग्राह्यत्व सांगितल्यावरुन पूर्वोक्त जयंतीवचनावरुन कर्मकालव्यापिनी टाकून पूर्वा किंवा परा अल्प असली तरी रोहिणीयुक्त ती घ्यावी . माधव - मदनरत्न - निर्णयामृत - अनंतभट्ट - गौड - मैथिल - इत्यादि ग्रंथांतही असेंच आहे . युक्त म्हटलें तर दोन उपवास करावे . कारण , दोन्ही नित्य आहेत , असें तर आम्हीं ( कमलाकरभट्ट ) सांगतों . हा निर्णय पूर्व दिवशीं मध्यरात्रीं अष्टमी व पर दिवशीं रोहिणी या वरील पहिल्या प्रकारचा झाला . पुढच्या दोन प्रकारांविषयीं पराच अष्टमी करावी . कारण , " सप्तमीयुक्त अष्टमीस रोहिणी नक्षत्र असून दुसर्‍या दिवशीं एक घटिका असेल तर त्या दिवशीं आठ प्रहरांचें पुण्य व्यासादिकांनीं पूर्वी सांगितलें आहे " असें स्कांदवचन आहे , आणि " दुसर्‍या दिवशीं दोन घटिका अष्टमी असली तरी ती संपूर्ण अष्टमी होईल . मग नवमीयुक्त असली तर काय सांगावें ? ती कोटि कुलांना मुक्ति देणारी आहे " असें पाद्मवचनही आहे . ही दिशा दाखविली आहे .

निंबादित्योपासकास्तुजन्माष्टमीरामनवमीशिवरात्र्यादौपूर्वेह्निकर्मकालीनांतिथिंत्यक्त्वाद्वित्रिमुहूर्तापरैवतिथिर्ग्राह्या उदयव्यापिनीग्राह्याकुलेतिथिरुपोषणे निंबार्कोभगवान्येषांवांछितार्थफलप्रद इतिहेमाद्रौमात्स्योक्तमुक्तिसप्तमीव्रतेभविष्योक्तेरित्याहुः तन्न यदिद्वितीयेदिवसेतुऋक्षतिथ्योर्युतिः स्यान्नतदोपवासः पूर्वेप्रकुर्याद्दिवसेद्वितीयेदिनेशभक्तोथतदाव्रताद्यमितिमात्स्यवाक्येनतत्रैव उपसंहारात्सर्वार्थत्वेनमानाभावात् ‍ ऋक्षतिथ्योर्हस्तसप्तम्योः अन्यथाऋषिपंचम्यादौतदापत्तिः शिष्टाचारान्नेतिचेत् ‍ न तस्यन्यायवचोविरोधेनहेयत्वात् ‍ इदानींक्कापिनिंबार्कोपासनाभावाच्चेतिसंक्षेपः ।

निंबादित्योपासक तर - जन्माष्टमी , रामनवमी , शिवरात्रि इत्यादिक व्रतांविषयीं पूर्वदिवशीं कर्मकालव्यापिनी तिथि वर्ज्य करुन दुसर्‍या दिवशीं दोन तीन मुहूर्तव्यापिनी तिथि असेल तीच घ्यावी . कारण , " ज्यांच्या कुलांत निंबार्क भगवान् ‍ वांछितार्थ फल देणारा आहे त्यांनीं उपोषणांविषयीं उदयव्यापिनी तिथि घ्यावी " असें हेमाद्रींत मात्स्योक्त मुक्तिसप्तमीव्रतांत भविष्यवचन आहे , असें सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , " जर दुसर्‍या दिवशीं नक्षत्र तिथि ( हस्त सप्तमी ) यांचा योग होईल तर सूर्यभक्तांना त्या दिवशीं उपवास नाहीं . पूर्व दिवशीं उपवास करावा , आणि दुसर्‍या दिवशीं व्रतादिक करावें . " ह्या मात्स्यवचनानें त्याच व्रताविषयीं ( हस्तयुक्त सप्तमी व्रताविषयीं ) पूर्वोक्त ( उदयव्यापिनी घ्यावी , एतदर्थबोधक ) वचनाचा उपसंहार ( पर्यवसान ) केल्यामुळें वरील भविष्यवचन सर्व उपोषणाविषयीं आहे , असें म्हणण्यास प्रमाण नाहीं . सर्व उपोषणाविषयीं आहे असें म्हटलें , तर ऋषिपंचमी इत्यादिकांचे ठायीं तें वचन प्राप्त होईल . शिष्टाचारावरुन तें प्राप्त होत नाहीं , असें म्हणूं ? तर तसें नाहीं . तें म्हणणें न्यायविरुद्ध व वचनविरुद्ध असल्यामुळें त्याज्य आहे . आणि सांप्रत कालीं कोठेंही निंबार्कोपासनाही नाहीं . असें थोडक्यांत सांगून पुरे करितों .

पारणंतु तिथिरष्टगुणंहंतिनक्षत्रंचचतुर्गुणं तस्मात्प्रयत्नतः कुर्यात्तिथिभांतेचपारणमितिब्रह्मवैवर्तात् ‍ तिथ्यर्क्षयोर्यदाछेदोनक्षत्रांतमथापिवा अर्धरात्रेथवाकुर्यात्पारणंत्वपरेहनीतिहेमाद्रौवचनाच्चार्धरात्रेप्युभयांतेन्यतरांतेवेतिमुख्यः पक्षः सर्वेष्वेवोपवासेषुदिवापारणमिष्यत इतिब्रह्मवैवर्तंत्वन्यविषयं दिनेमुख्यकाललाभेन्यतरांतेवाज्ञेयं गौडास्तु नरात्रौपारणंकुर्यादृतेवैरोहिणीव्रतात् ‍ तत्रनिश्यपितत्कुर्याद्वर्जयित्वामहानिशामिति ब्रह्मांडपुराणाद्रात्रौसार्धप्रहरमध्येकार्यं महानिशातुविज्ञेयामध्यमंमध्ययामयोः तथा मध्यमप्रहरेरात्रेर्विज्ञेयातुमहानिशेतिस्मृत्यंतरात् ‍ कल्पतरौमदनरत्नेचैवं । कामधेनौगर्गस्तु महानिशातुविज्ञेयामध्यमंप्रहरद्वयमित्याह वृद्धशातातपस्तु महानिशाद्वेघटिकेरात्रौमध्यमयामयोरित्याह वेदपाठपरमेतदित्यन्ये महानिशायामन्यतरांतेतृतीयदिनेपारणं अपरेहनीतिपारणोत्तरदिनपरत्वात् ‍ उभयांतापेक्षणादित्याहुः तत्त्वंतुमहानिशातोर्वागन्यतरांतलाभेमहानिशानिषेधः महानिशायामेवलाभेतत्रैवपारणमिति दिवोदासस्तु रजनीप्रहरंयावत्प्रवृत्तिः कर्मणोमता पारणंतावदेवेष्टंप्रमादान्नभवेद्यदीतिस्कांदादूर्ध्वंनिषेधमाह तन्निर्मूलं अशक्तौतुवह्निपुराणे भांतेकुर्यात्तिथेर्वापिशस्तंभारतपारणमिति गारुडेविष्णुधर्मेच जयंत्यांपूर्वविद्धायामुपवासंसमाचरेत् ‍ तिथ्यंतेवोत्सवांतेवाव्रतीकुर्वीतपारणं अशक्तौतु तिथ्यंतेतिथिभांतेवापारणंयत्रचोदितं यामत्रयोर्ध्वगामिन्यांप्रातरेवहिपारणा सएवोत्सवांतइतिकालादर्शोक्तेश्चेतिसंक्षेपः ।

पारणा तर - " तिथि अष्टगुण पुण्याचा नाश करिते व नक्षत्र चतुर्गुण पुण्याचा नाश करितें , यास्तव प्रयत्नानें तिथि व नक्षत्र यांच्या अंतीं पारणा करावी " ह्या ब्रह्मवैवर्तवचनावरुन ; आणि " तिथि व नक्षत्र यांचा अंत जेव्हां होईल अथवा नक्षत्राचा अंत जेव्हां होईल तेव्हां मध्यरात्रीं किंवा दुसर्‍या दिवशीं पारणा करावी " ह्या हेमाद्रींतील वचनावरुनही अर्धरात्रींही तिथि नक्षत्रांच्या अंतीं किंवा दोहोंतून एकाचे अंतीं पारणा करावी " हा मुख्य पक्ष . " सर्व उपवासांचे ठायीं दिवसा पारणा इष्ट होय . " असें जें ब्रह्मवैवर्तवचन तें तर अन्य व्रतविषयक होय . किंवा दिवसा मुख्यकाल मिळेल तर दोहोंतून एकाच्या अंतीं जाणावें . गौड तर " रोहिणीव्रतावांचून रात्रीं पारणा करुं नये , रोहिणीव्रताचे ठायीं रात्रींही पारणा करावी ; परंतु महानिशा वर्ज्य करावी " ह्या ब्रह्मांडपुराणवचनावरुन रात्रीं दीडप्रहरामध्यें पारणा करावी . कारण , ‘‘ मध्यम दोन प्रहरांचा मध्यभाग ( मधल्या आठ घटी ) महानिशा जाणावी . " तसेंच रात्रीच्या मध्यमप्रहराचे ठायीं महानिशा जाणावी " असें स्मृत्यंतर आहे . कल्पतरुंत मदनरत्नांतही असेंच आहे . कामधेनुग्रंथांत गर्ग तर - " रात्रीचे मध्यम दोन प्रहर ती महानिशा होय " असें सांगतो . वृद्धशातातप तर - " रात्रीं मध्यम दोन प्रहरांच्या दोन घटिका ती महानिशा " असें सांगतो . हें वचन वेदपाठविषयक आहे , असें अन्य ग्रंथकार म्हणतात . महानिशेचे ठायीं तिथि किंवा नक्षत्र यांतून एकाचा अंत असेल तर तिसर्‍या दिवशीं पारणा करावी . कारण , ‘ अपरेऽहनि ’ हें वरील हेमाद्रिवचन तिसर्‍या दिवसाचें बोधक असल्यामुळें दोघांच्या अंताची अपेक्षा आहे , असें सांगतात . खरा प्रकार म्हटला तर महानिशेच्या अलीकडे एकाचा अंत असेल तर महानिशेचा निषेध . महानिशेमध्येंच एकाचा अंत असेल तर तेव्हांच पारणा करावी . दिवोदास तर " रात्रीं प्रहरपर्यंत कर्माची प्रवृत्ति सांगितली आहे , तोंपर्यंतच पारणा इष्ट आहे " ह्या स्कांदवचनावरुन प्रहरापुढें पारणेचा निषेध सांगतो , तें निर्मूल होय . अशक्त असेल तर सांगतो वह्निपुराणांत - " नक्षत्रांतीं किंवा तिथ्यंतीं पारणा प्रशस्त होय . " गारुडांत विष्णुधर्मांत - " व्रती यानें पूर्वविद्ध जयंतीचे ठायीं उपवास करावा आणि तिथीच्या अंतीं किंवा उत्सवाच्या अंतीं पारणा करावी . " शक्ति नसेल तर सांगतो - " ज्या ठिकाणीं तिथीच्या अंतीं किंवा तिथि व नक्षत्र यांच्या अंतीं पारणा सांगितली आहे , त्या ठिकाणीं तिथि तीन प्रहरांहून अधिक असेल तर प्रातःकालींच पारणा करावी . " कारण , तोच उत्सवांत आहे , असें कालादर्शाचें वचनही आहे . याप्रमाणें हें संक्षेपानें सांगितलें आहे , असें समजावें .

अष्टम्यांविशेषोहेमाद्रौभविष्ये ततोऽष्टम्यांतिलैः स्नातोनद्यादौविमलेजले सुदेशेशोभनंकुर्याद्देवक्याः सूतिकागृहं तन्मध्येप्रतिमास्थाप्यासाचाप्यष्टविधास्मृता कांचनीराजतीताम्रीपैत्तलीमृन्मयीतथा वार्क्षीमणिमयीचैववर्णकैर्लिखिताथवा सर्वलक्षणसंपूर्णापर्यंकेचपटावृते देवकींतत्रचैकस्मिन् ‍ प्रदेशेसूतिकागृहे प्रस्रुतांचप्रसूतांचस्थापयेन्मंचकोपरि मांतत्रबालकंसुप्तंपर्यंकेस्तनपायिनं यशोदांतत्रचैकस्मिन्प्रदेशेसूतिकागृहे तद्वच्चकल्पयेत्पार्थप्रसूतवरकन्यकां कश्यपोवसुदेवोयमदितिश्चैवदेवकी शेषोवैबलभद्रोयंयशोदाक्षितिरन्वभूत् ‍ नंदः प्रजापतिर्दक्षोगर्गश्चापिचतुर्मुखः गौर्धेनुः कुंजरश्चैवदानवाः शस्त्रपाणयः लेखनीयाश्चतत्रैवकालियोयमुनाह्रदे इत्येवमादियत्किंचिच्छक्यतेचरितंमम लेखयित्वाप्रयत्नेनपूजयेद्भक्तितत्परः मंत्रेणानेनकौंतेयदेवकींपूजयेन्नरः गायद्भिः किन्नराद्यैः सततपरिवृतावेणुवीणानिनादैः श्रृंगारादर्शकुंभप्रवरकृतकरैः किंकरैः सेव्यमाना पर्यंकेस्वास्तृतेयामुदिततरमुखीपुत्रिणीसम्यगास्तेसादेवीदेवमाताजयतिसुतनयादेवकीकांतरुपा पादौसंवाहयंतीश्रीर्देवक्याश्चरणांतिके निषण्णापंकजेपूज्यानमोदेव्यैश्रियेइति ।

अष्टमीचे दिवशीं विशेष विधि सांगतो - हेमाद्रींत भविष्यांत - " त्या जन्माष्टमीचे दिवशीं तिळ वाटून अंगास लावून नद्यादिकांच्या स्वच्छ जलामध्यें स्नान करुन उत्तम प्रदेशीं देवकीचें सुंदर सूतिकागृह करावें , व त्यामध्यें कृष्णाची प्रतिमा ( मूर्ति ) स्थापावी . ती आठ प्रकारची सांगितली आहे ती अशी - सुवर्ण , रजत , ताम्र , पित्तल , मृत्तिका , वृक्ष , मणि यांची अथवा रंगांनीं लिहिलेली अशी सर्व लक्षणयुक्त ( कृष्णाची ) प्रतिमा वस्त्रावृत पलंगावर ठेवून , त्या सूतिकागृहामध्यें एका प्रदेशीं मंचकावर प्रसूत झालेल्या व दुग्ध स्त्रवणार्‍या अशा देवकीचें स्थापन करावें . त्या पर्यंकावर निजलेला व स्तनपान करणारा असा जो मी बालक याचें ( कृष्णाचें ) स्थापन करावें , व त्या सूतिकागृहामध्यें एका प्रदेशीं यशोदा व तिला झालेली कन्या अशीं पूर्वीप्रमाणेंच स्थापावीं . वसुदेव हा कश्यप , देवकी ही अदिति , बलराम हा शेष , यशोदा ही पृथ्वी आहे , नंद हा प्रजापति दक्ष , गर्ग हा ब्रह्मदेव आहे . गाय ही धेनु , हती , शस्त्र धरणारे दानव हे सर्व तेथें लिहावे . तसाच यमुनेचा ह्रद लिहून त्यामध्यें कालिया सर्प लिहावा . इत्यादिक जें कांहीं माझें चरित्र लिहिण्यास शक्य आहे तें लिहून प्रयत्नानें भक्तियुक्त होऊन पूजन करावें व देवकीचेंही पूजन करावें . पूजाध्यानमंत्रः - " गायद्भिः किंनराद्यैः सततपरिवृता वेणुवीणानिनादैः श्रृंगारादर्शकुंभप्रवरकृतकरैः किंकरैः सेव्यमाना ॥ पर्यंके स्वास्तृते या मुदिततरमुखी पुत्रिणी सम्यगास्ते सा देवी देवमाता जयति सुतनया देवकी कांतरुपा ॥१॥ " " देवकीचे चरणाजवळ ( कृष्णाचें ) पादसंवाहन करणार्‍या व कमलांत बसलेल्या अशा लक्ष्मीचें " नमो देव्यै श्रिये " या मंत्रानें पूजन करावें . "

अर्धरात्रेवसोर्धारांपातयेद्गुडसर्पिषा नाडीवर्धापनंषष्ठीनामादेः करणंमम ततोमंत्रेणवैदद्याच्चंद्रायार्घ्यंसमाहितः शंखेतोयंसमादायपुष्पकुशचंदनं जानुभ्यांधरणींगत्वाचंद्रायार्घ्यंनिवेदयेत् ‍ क्षीरोदार्णवसंभूत अत्रिगोत्रसमुद्भव गृहाणार्घ्यंशशांकेदंरोहिण्यासहितोमम ज्योत्स्नापतेनमस्तुभ्यंनमस्तेज्योतिषांपते नमस्तेरोहिणीकांत अर्घ्यंनः प्रतिगृह्यतां यथापुत्रंहरिंलब्ध्वाप्राप्तातेनिर्वृतिः परा तामेवनिर्वृतिंदेहिसुपुत्रंदर्शयस्वमे इतिदेवक्यर्घ्यः ततः पुष्पांजलिंदत्वायामेयामेप्रपूजयेत् ‍ प्रभातेब्राह्मणान् ‍ शक्त्याभोजयेद्भक्तिमान्नरः ओंनमोवासुदेवायगोब्राह्मणहितायच शांतिरस्तुशिवंचास्तुइत्युक्त्वामांविसर्जयेत् ‍ इदंप्रतिमासकृष्णाष्टम्यामप्युक्तंमदनरत्नेवह्निपुराणे प्रतिमासंचतेपूजामष्टम्यांयः करिष्यति ममचैवाखिलान् ‍ कामान् ‍ ससंप्राप्स्यत्यसंशयं तथा अनेनविधिनायस्तुप्रतिमासंनरेश्वर करोतिवत्सरंपूर्णंयावदागमनंहरेः दद्याच्छय्यांसुसंपूर्णांभोगीरत्नैरलंकृतां इतिजन्माष्टमीव्रतं ।

मध्यरात्रीं गुड व घृत यांची वसोर्धारा घालावी . नालच्छेदन , षष्ठीपूजन , नामकरण इत्यादिक माझें ( कृष्णाचें ) करावें . नंतर समाहितचित्त होऊन चंद्राला अर्घ्य द्यावें . त्याचा प्रकार - शंखामध्यें उदक घेऊन त्यांत पुष्प , दर्भ , चंदन घालून गुडघ्यांनीं भूमिस्पर्श करुन ( गुडघे भूमीवर टेंकून ) चंद्राला अर्घ्य द्यावें . " त्याचा मंत्र : - " क्षीरोदार्णवसंभूत अत्रिगोत्रसमुद्भव ॥ गृहाणार्घ्यं शशांकेदं रोहिण्या सहितो मम ॥ ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते ज्योतिषांपते ॥ नमस्ते रोहिणीकांत अर्घ्यं नः प्रतिगृह्यतां " ॥ " यथा पुत्रं हरिं लब्ध्वा प्राप्ता ते निर्वृतिः परा ॥ तामेव निर्वृतिं देहि सुपुत्रं दर्शयस्व मे " ॥ हा देवकीच्या अर्घ्याचा मंत्र . " नंतर पुष्पांजलि देऊन प्रहराप्रहराचे ठायीं पूजन करावें . भक्तियुक्त होऊन प्रातःकालीं यथाशक्ति ब्राह्मणभोजन घालावें . " ॐनमो वासुदेवाय गोब्राह्मणहिताय च ॥ शांतिरस्तु शिवं चास्तु " असें म्हणून माझें विसर्जन करावें " हें कृत्य प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षाच्या अष्टमीस करण्याविषयीं सांगितलें आहे . मदनरत्नांत वह्निपुराणांत - " प्रत्येक मासाचे कृष्णाष्टमीचे ठायीं तुझी ( देवकीची ) पूजा जो करील व माझी ( कृष्णाची ) ही पूजा जो करील त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील यांत संशय नाहीं . " तसेंच " या विधीनें जो प्रत्येक महिन्यामध्यें जोंपर्यंत हरीचें आगमन होईल ( जन्माष्टमी येईल ) तोंपर्यंत सार्‍या वर्षभर पूजन करील व पूर्वीं सांगितलेली शय्या रत्नांनीं अलंकृत करुन देईल त्याला सर्व भोग प्राप्त होतील . " ॥ इति जन्माष्टमीव्रताचा निर्णय समाप्त झाला ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP