मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
अर्धोदय योग

द्वितीय परिच्छेद - अर्धोदय योग

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


पौषामावास्यायामर्धोदयोयोगविशेषः तदुक्तंमदनरत्नेमहाभारते अमार्कपातश्रवणैर्युक्ताचेत्पौषमाघयोः अर्धोदयः सविज्ञेयः कोटिसूर्यग्रहैः सम इति पौषमाघयोर्मध्यवर्तिनीपौषीपौर्णमास्युत्तरामावास्येत्यर्थ इति भट्टाः मदनरत्नेपौषस्यचमाघस्यचेत्यर्थ उक्तः तन्न हेमाद्रिविरोधात् ‍ तत्रहिमाघएवोक्तः तथा दिवैवयोगः शस्तोयंनतुरात्रौकदाचनेति इदमर्धमन्यनिबंधेष्वभावान्निर्णयामृतमात्रोक्तेर्निर्मूलमेव तेनहेमाद्यादिमतेरात्रावर्धोदयोभवत्येव केचित्तुकिंचिदूनोमहोदय इत्याहुस्तन्निर्मूलम् ‍ हेमाद्रौमदनरत्नेचस्कांदे माघामायांव्यतीपातेआदित्येविष्णुदैवते अर्धोदयंतदित्याहुः सहस्रार्कग्रहैः समम् ‍ तत्रैव माघमासेकृष्णपक्षेपंचदश्यांरवेर्दिने वैष्णवेनतुऋक्षेणव्यतीपातेसुदुर्लभे व्रतंकुर्यादित्यग्रेऽन्वयः तत्रैव ब्रह्मविष्णुमहेशानांसौवर्णीः पलसंख्यया प्रतिमास्तुप्रकर्तव्यास्तदर्धेनद्विजोत्तम सार्धंशतत्रयंशंभोर्द्रोणानांतिलपर्वतः कर्तव्यौपर्वतौविष्णुरुद्रयोः पूर्वसंख्यया शंभुरत्रब्रह्मा शय्यात्रयंततः कुर्यादुपस्करसमन्वितम् ‍ तिलैर्होमंकृत्वाप्रतिमांदद्यादित्युक्तम् ‍ स्कांदे अर्धोदयेतुसंप्राप्तेसर्वंगंगासमंजलम् ‍ शुद्धात्मानोद्विजाः सर्वेभवेयुर्ब्रह्मसंमिताः यत्किंचिद्दीयतेदानंतद्दानंमेरुसन्निभमिति ।

पौष अमावास्येस अर्धोदय म्हणून विशेष योग होतो . तो सांगतो - मदनरत्नांत महाभारतांत - पौषमाघांची अमावास्या रविवार , व्यतीपात , श्रवणनक्षत्र यांनीं युक्त झाली तर तो अर्धोदय योग जाणावा . तो कोटि सूर्यग्रहणांशीं समान आहे . " पौष व माघ या दोन मासांच्या मधली म्हणजे पौषीपौर्णिमेच्या पुढची अमावास्या , असा अर्थ , असें नारायणभट्ट सांगतात . मदनरत्नांत पौषाची आणि माघाची अमावास्या , असा अर्थ सांगितला आहे . तो बरोबर नाहीं . कारण , हेमाद्रीचा विरोध येतो . त्या हेमाद्रींत माघमासाचेच अमावास्येस अर्धोदय योग सांगितला आहे , तो पौर्णिमांत मास धरुन समजावा . तसेंच - " हा योग दिवसासच प्रशस्त आहे . रात्रीं कधींही प्रशस्त नाहीं . " हा अर्धा श्लोक इतर निबंध ग्रंथांत नसून केवळ निर्णयामृतांत सांगितल्यामुळें निर्मूलच आहे . यावरुन हेमाद्यादिमतीं रात्रीं अर्धोदय योग होतच आहे . केचित् ‍ तर " किंचित् ‍ न्यून ( कांहीं योग कमी ) असेल तर तो महोदय होतो " असें सांगतात . तें निर्मूल आहे . हेमाद्रींत मदनरत्नांत स्कांदांत - " माघ अमावास्येस व्यतीपात , रविवार , श्रवणनक्षत्र हीं असतां त्याला अर्धोदय असें म्हणतात . तो सहस्र सूर्यग्रहणांशीं समान आहे . " तेथेंच - " माघमासांत कृष्णपक्षीं अमावास्येस रविवार , श्रवणनक्षत्र , आणि व्यतीपात असतां व्रत करावें . " तेथेंच - " ब्रह्मा , विष्णु , महेश्वर यांच्या पलप्रमाण सुवर्णाच्या प्रतिमा कराव्या अथवा त्याच्या अर्धानें कराव्या . आणि साडेतीनशें द्रोणपरिमित तिलांचा पर्वत ब्रह्मदेवप्रीत्यर्थ करावा . विष्णु व रुद्र यांचेकरितां दोन तिलपर्वत वरील प्रमाणानें करावे . नंतर उपसाहित्यासहित तीन शय्या कराव्या . त्यांजवर प्रतिमांचें पूजन करुन तिलांनीं होम करुन प्रतिमांचें दान करावें " असें सांगितलें आहे . स्कांदांत - " अर्धोदय प्राप्त झाला असतां सर्व उदक गंगासम होय . सर्व ब्राह्मण ब्रह्मतुल्य शुद्धात्मे होत . जे कांहीं दान द्यावे , तें मेरुतुल्य होतें . "

अत्रदानविशेषोनिर्णयामृतेस्कांदे चतुःषष्टिपलंमुख्यममत्रंतत्रकारयेत् ‍ चत्वारिंशत्पलंवाथपंचविंशतिरेववा अमत्रंपात्रम् ‍ तच्चकांस्यमयमित्युक्तंतत्रैव एवंसुघटितंकार्यंकांस्यभाजनमुत्तममिति तथा निधायपायसं तत्रपद्ममष्टदलंलिखेत् ‍ पद्मस्यकर्णिकायांतुकर्षमात्रंसुवर्णकम् ‍ तदभावेतदर्धंवातदर्धंवापिकारयेत् ‍ भूमौतुतंडुलैः शुद्धैः कृत्वाष्टदलमुत्तमम् ‍ अमत्रंस्थापयेत्तत्रब्रह्मविष्णुशिवात्मकम् ‍ तेषांपूजाततः कार्याश्वेतमाल्यैस्तुशोभनैः वस्त्रादिभिरलंकृत्यब्राह्मणायनिवेदयेत् ‍ मंत्रस्तु सुवर्णपायसामत्रंयस्मादेतत्र्त्रयीमयम् ‍ आपत्तेस्तारकंयस्मात्तद्गृहाणद्विजोत्तम समुद्रमेखलांपृथ्वींसम्यद्गातुश्चयत्फलम् ‍ तत्फलंलभतेमर्त्यः कृत्वेदंदानमुत्तममिति इतिश्रीकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौपौषमासः ॥

या अर्धोदयीं विशेष दान सांगतो - निर्णयामृतांत स्कांदांत - त्या अर्धोदयीं पर्वाचेठायीं चौसष्ठ पलप्रमाण मुख्य पात्र करावें . अथवा चाळीस पलांचें किंवा पंचवीस पलांचें पात्र करावें . " " तें पात्र कांस्यमय असावें असें तेथेंच सांगितलें आहे तें असे - " असें चांगले घडलेलें कांस्यपात्र उत्तम करावें . " तसेंच " त्या पात्रांत पायस ठेऊन त्यांत अष्टदल कमल काढावें . त्याच्या कर्णिकेचे ठायीं एककर्ष सुवर्ण ठेवावें . तितकें नसेल तर त्याचें अर्ध अथवा अर्धाचें अर्ध ठेवावें . भुईवर शुद्ध तंदुलांनीं उत्तम अष्टदल करुन त्यावर तें ब्रह्म - विष्णु - शिवात्मक पात्र ठेऊन नंतर त्या ब्रह्मविष्णुशिवांची ( म्हणजे कांस्यपात्रावर ब्रह्माची , पायसावर विष्णूची , सु्वर्णावर शिवाची ) पूजा सुंदर श्वेतपुष्पांनीं करावी , आणि वस्त्रादिकांनीं अलंकृत करुन तें ब्राह्मणाला द्यावें . दानमंत्रः - सुवर्णपायसामत्रं यस्मादेतत्र्त्रयीमयं ॥ आपत्तेस्तारकं यस्मात्तद्गृहाण द्विजोत्तम ॥ समुद्रवलयांकित पृथ्वीच्या उत्तम दानानें दात्याला जें फल प्राप्त होतें तें फल मनुष्यास हें उत्तम दान करुन प्राप्त होतें " इति पौषमासनिर्णय समाप्त झाला .

N/A

References : N/A
Last Updated : June 21, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP