TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
महालक्ष्मीव्रत

द्वितीय परिच्छेद - महालक्ष्मीव्रत

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


महालक्ष्मीव्रत

आश्विनकृष्णाष्टम्यांमहालक्ष्मीव्रतं तत्रनिर्णयामृते पुराणसमुच्चये श्रियोर्चनंभाद्रपदेसिताष्टमीं प्रारभ्यकन्यामगतेचसूर्ये समापयेत्तत्रतिथौचयावत्सूर्यस्तुपूर्वार्धगतोयुवत्याइति तत्रैव कन्यागतेर्केप्रारभ्यकर्तव्यंनश्रियोर्चनं हस्तप्रांतदलस्थेर्केतद्व्रतंनसमापयेत् पूजनीयागृहस्थानामष्टमीप्रावृषिश्रियः दोषैश्चतुर्भिः संत्यक्ता सर्वसंपत्करीतिथिः तथा पुत्रसौभाग्यराज्यायुर्नाशिनीसाप्रकीर्तिता तस्मात्सर्वप्रयत्नेनत्याज्याकन्यागतेरवौ विशेषेणपरित्याज्यानवमीदूषितायदीति दोषचतुष्ट्यंतत्रैवोक्तं त्रिदिनेचावमेचैवअष्टमींनोपवासयेत् पुत्रहानवमीविद्धास्वघ्नीहस्तार्धगेरवाविति त्रिदिनावमदिनलक्षणंचरत्नमालायाम् यत्रैकः स्पृशतितिथिद्वयावसानंवारश्चेदवमदिनंतदुक्तमार्यैः यः स्पर्शाद्भवतितिथिस्त्रयस्यचाह्नांत्रिद्युस्पृक्कथितमिदंद्वयंचनेष्टम्‍ एतेचसर्वेनिषेधाः प्रथमारंभविषयाः मध्येतुसतिसंभवेज्ञेयाः व्रतस्यषोडशाब्दसाध्यत्वेनमध्येत्यागायोगात् इयंचंद्रोदयव्यापिनीग्राह्या तत्रैवपूजाद्युक्तेः परदिनेचंद्रोदयादूर्ध्वंत्रिमुहूर्तव्यापित्वेपरैवकार्या अन्यथापूर्वैव पूर्वावापरविद्धावाग्राह्याचंद्रोदयेसदा त्रिमुहूर्तापिसापूज्यापरतश्चोर्ध्वगामिनीतिमदनरत्नेनिर्णयामृतेचसंग्रहोक्तेः अर्धरात्रमतिक्रम्यवर्ततेयोत्तरातिथिः तदातस्यांतिथौकार्यंमहालक्ष्मीव्रतंसदेतिवचनाच्चेतिसंक्षेपः इतिमहालक्ष्मीव्रतनिर्णयः ।

आश्विनकृष्ण अष्टमीस महालक्ष्मीव्रत सांगितलें आहे. त्याविषयीं सांगतो निर्णयामृतांत पुराणसमुच्चयांत - “ सूर्य कन्याराशीस गेला नसतां भाद्रपदशुक्लाष्टमीस लक्ष्मीपूजन आरंभून कन्याराशीच्या पूर्वार्धांत सूर्य आहे तोंपर्यंत त्या अष्टमी तिथीस समाप्त करावें - ” तेथेंच - “ कन्यागत सूर्य असतां लक्ष्मीपूजन आरंभून करुं नये. हस्तनक्षत्राच्या शेवटच्या अंशीं सूर्य असतां तें व्रत समाप्त करुं नये. प्रावृडऋतूंतील लक्ष्मीची अष्टमी गृहस्थांना पूजनीय अहे. ती तिथि चार दोषांनीं वर्जित असतां सर्वसंपत्ति देणारी होते. ” तसेंच - “ सूर्य कन्यागत असतां पुत्र, सौभाग्य, राज्य, आयुष्य यांचा नाश करणारी म्हटली आहे; तस्मात्‍ ती सर्वप्रयत्नानें त्याज्य आहे. जर नवमीनें दूषित असेल तर विशेषेंकरुन टाकावी. ” ते चार दोष तेथेंच सांगतो - “ त्रिदिन, आणि अवम असतां अष्टमीचें उपोषण करुं नये. नवमीविद्ध असतां पुत्रहानि करणारी आणि हस्तनक्षत्रार्धांत रवि असतां आपला नाश करणारी आहे म्हणून तिचेंही उपोषण करुं नये. ” त्रिदिन आणि अवमदिन यांचें लक्षण सांगतो रत्नमालेंत - “ ज्या दिवशीं एक वार दोन तिथींच्या अंताला स्पर्श करितो त्या दिवसास अवमदिन ( क्षयदिवस ) असें आर्य म्हणतात. तीन दिवसांना ( वारांना ) स्पर्श करणारी जी तिथि ती त्रिद्युस्पृक्‍ ( त्रिदिन, वृद्धि ) म्हटली आहे, हीं दोन्ही ( क्षय आणि वृद्धि ) इष्ट नाहींत. ” हे सारे निषेध प्रथमारंभाविषयीं आहेत. द्वितीयादि वर्षीं वर्ज्य करण्याचा संभव असेल तर वर्ज्य करावे. दोष असल्यामुळें व्रत टाकूं नये. कारण, हें व्रत सोळा वर्षांनीं साध्य होत असल्यामुळें मध्यें टाकतां येत नाहीं. ही अष्टमी चंद्रोदयव्यापिनी घ्यावी. कारण, चंद्रोदयींच पूजादिक सांगितलीं आहेत. दुसर्‍या दिवशीं चंद्रोदयानंतर तीन मुहूर्तव्यापिनी असेल तर पराच करावी. अन्यथा पूर्वाच करावी. कारण, “ चंद्रोदयीं असलेली पूर्वा किंवा परा सर्वदा घ्यावी. दुसर्‍या दिवशीं चंद्रोदयानंतर तीन मुहूर्त असेल तर तीच घ्यावी. ” असें मदनरत्नांत व निर्णयामृतांत संग्रहवचन आहे. आणि “ जी उत्तरातिथि अर्धरात्रीच्या पुढें आहे त्या वेळीं त्या तिथीस महालक्ष्मीव्रत सदा करावें ” असें वचनही आहे. हें संक्षेपानें सांगितलें आहे असें समजावें. असा महालक्ष्मीव्रताचा निर्णय समजावा.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-05-31T00:05:50.3300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

डोक्‍यावर मिरे वाटणें

  • डोई पहा. मिर्‍यांची आग फार होते. ते नवर्‍याच्या डोक्‍यावर वाटण्याला स्‍त्रीचे वर्चस्‍व केवढे पाहिजे? 
  • वरचष्‍मा करणें 
  • वरचढपणा करणें 
  • आपल्‍या तंत्राने वागावयास लावणें. ‘सगळ्यांच्या डोक्‍यावर मिरे वाटण्यासाठी हा नाना पुन्हा परतेल.’ -अस्‍तंभा ५४. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारीच स्पर्श का करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.