मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
आश्विनपौर्णमा

द्वितीय परिच्छेद - आश्विनपौर्णमा

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आश्विनपौर्णमासीपराग्राह्या सावित्रीव्रतमंतरेणभवतोमापौर्णमास्यौपरेइतिदीपिकोक्तेः अत्रविशेषस्तिथितत्त्वेलैंगे आश्विनेपौर्णमास्यांतुचरेज्जागरणंनिशि कौमुदीसासमाख्याताकार्यालोकैर्विभूतये कौमुद्यांपूजयेल्लक्ष्मीमिंद्रमैरावतस्थितम् ‍ सुगंधिर्निशिसद्वेष अक्षैर्जागरणंचरेत् ‍ तथा निशीथेवरदालक्ष्मीः कोजागर्तीतिभाषिणी तस्मैवित्तंप्रयच्छामिअक्षैः क्रीडांकरोतियइति ।

आश्विनपौर्णमासी परा घ्यावी . कारण , " सावित्रीव्रतावांचून अमावास्या व पौर्णमासी ह्या दुसर्‍या दिवशींच्या घ्याव्या . " असेम दीपिकावचन आहे . या पौर्णिमेचे दिवशीं विशेष कृत्य सांगतो - तिथितत्त्वांत लिंगपुराणांत - " आश्विन पौर्णमासीचे दिवशीं रात्रौ जागरण करावें . ती पौर्णिमा कौमुदी म्हटली आहे . लोकांनीं ऐश्वर्यप्राप्तीकरितां ती करावी . या कौमुदीचे ठायीं रात्रौ लक्ष्मी व ऐरावतावर बसलेला इंद्र यांचें पूजन करुन सुगंधि द्रव्यें अंगास लावून उत्तम वेष ( पोषाक ) करुन फांशांनीं खेळून जागरण करावें . ’’ तसेंच " मध्यरात्रीं वरदालक्ष्मी , ‘ कोण जागरण करीत आहे , जो फांशांनीं खेळून जागरण करीत असेल त्यास मी द्रव्य देतें ’ असें बोलते . "

अत्रैवाश्वयुजीकर्मोक्तमाश्वलायनेन आश्वयुज्यामाश्वयुजीकर्मेति तच्छेषपर्वणिकार्यम् ‍ विकृतित्वात् ‍ तत्रपूर्वाह्णव्यापिनीग्राह्या दैवकर्मत्वात् ‍ आग्रयणंतुपर्वणिकार्यम् ‍ शरद्याग्रयणंनामपर्वणिस्यात्तदुच्यत इतिशौनकोक्तेः तत्रापिशेषपर्वणिकार्यमितिप्रागुक्तं तच्चव्रीहिभिरिष्ट्वाव्रीहिभिरेवयजेतयवेभ्योयवैरिष्ट्वायवैरेवयजेतव्रीहिभ्य इतिश्रुत्यादर्शपूर्णमासयोरेककर्मत्वेनैकद्रव्यनियमाद्दर्शेष्ट्याः परंपौर्णमासेष्ट्याश्चप्राग्भवतीतिहेमाद्यादयः दर्शेष्ट्याः परमुक्तमाग्रयणकंप्राक्पौर्णमासाच्चतदितिदीपिकोक्तेश्च तच्चाग्रयणंत्रेधा व्रीह्याग्रयणंयवाग्रयणंश्यामाकाग्रयणंचेति एषांकालःश्रुतौ गृहमेधीव्रीहियवाभ्यांशरद्वसंतयोर्यजेतश्यामाकैर्नीवारैर्वर्षास्वापत्कालेनान्येनपुराणैर्वेति आपस्तंबोपि वर्षासुश्यामाकैर्यजेत शरदिव्रीहिभिर्वसंतेयवैर्यथर्तुवेणुयवैरिति तत्रापिश्यामाकाग्रयणमनित्यमितरेतुअनाहिताग्नेर्नित्ये यवाग्रयणंचकार्यमितिस्मार्तवृत्तावुक्तत्वात् ‍ सूत्रेव्रीहियवदेवतासंबद्धानामेवमंत्राणामाम्नानाच्च आहिताग्नेस्तुयवाग्रयणस्याप्यनित्यत्वम् ‍ अपिवाक्रियायवेष्वितिसूत्रात् ‍ यद्वाव्रीह्याग्रयणेनसमानतंत्रता श्यामाकैस्तुप्रस्तरंकुर्यान्नाग्रयणम् ‍ यदिवातदपिसमानतंत्रमित्यादिनारायणवृत्तौपरिश्रमवतांसुलभमित्यलम् ‍ ॥

याच पौर्णिमेस आश्वयुजीकर्म आश्वलायन सांगतोः - " आश्विनी पौर्णिमेचे ठायीं आश्वयुजीकर्म करावें . " तें आश्वयुजीकर्म शेष ( उर्वरित ) पर्वाचे ठायीं करावें . कारण , ही विकृति आहे . त्या आश्वयुजीकर्माविषयीं पूर्वाह्णव्यापिनी पौर्णिमा घ्यावी . कारण , हें दैवकर्म आहे . आग्रयण तर पर्वाचे ठायीं ( अमावास्येस किंवा पौर्णमेस ) करावें . " शरदृतूंत आग्रयण पर्वाचे ठायीं होतें , तें सांगतों . " असें शौनकवचन आहे . तेंही उर्वरित पर्वाचे ठायीं करावें , असें पूर्वीं सांगितलें आहे . तें आग्रयण , " यव होण्याच्या पूर्वीं ( पौर्णिमेस ) व्रीहींनीं होम करुन ( अमावास्येस ) व्रीहींनींच होम करावा . व्रीहि होण्याच्या पूर्वीं ( पौर्णिमेस ) यवांनीं होम करुन ( अमावास्येस ) यवांनींच करावा . " ह्या श्रुतीवरुन दर्शपूर्णमासयाग हें एक कर्म असल्यामुळें एक द्रव्याचा नियम असल्याकारणानें ( आग्रयण ) दर्शेष्टीनंतर आणि पौर्णमासेष्टीच्या पूर्वीं होतें , असें हेमाद्रिप्रभृति ग्रंथकार सांगता . आणि " दर्शेष्टीनंतर व पौर्णमासेष्टीच्या पूर्वीं तें आग्रयण सांगितलें आहे . " असें दीपिकावचनही आहे . त्या आग्रयणाचे प्रकार तीन आहेत . व्रीह्याग्रयण , यवाग्रयण , आणि श्यामाकाग्रयण . ह्या आग्रयणांचा काल सांगतो श्रुतींत - " गृहस्थाश्रम्यानें शरद् ‍ ऋतूंत व्रीहींनीं आणि वसंतऋतूंत यवांनीं होम करावा . श्यामाक ( सांवे ), नीवार ( तृणधान्यें ) यांहींकरुन वर्षाऋतूंत व आपत्कालीं होम करावा . इतर द्रव्यानें किंवा जुन्या व्रीह्यादिकांनीं होम करुं नये . " आपस्तंबही - " वर्षाऋतूंत श्यामाकांनीं यजन करावें . शरदृतूंत व्रीहींनीं , वसंतांत यवांनीं यजन करावें . वेणुयवांनीं ज्या ऋतूंत उत्पन्न होतील त्या ऋतूंत यजन करावें . " त्या तीन आग्रयणांमध्यें श्यामाकाग्रयण अनित्य आहे . इतर दोन आग्रयणें तर अनाहिताग्नि ( आधान न केलेल्या ) गृहस्थाला नित्य आहेत . कारण , " व्रीह्याग्रयण करुन यवाग्रयणही करावें . " असें स्मार्तवृत्तींत सांगितलें आहे . आणि सूत्राचे ठायीं व्रीहि - यव देवतायुक्तच मंत्रही सांगितले आहेत . आहिताग्नीला तर यवाग्रयणही अनित्य आहे . कारण , ‘ अथवा क्रिया ( कर्मै ) यवांचे ठायीं होतात ’ असें सूत्र आहे . अथवा आहिताग्नीला यवाग्रयण व्रीह्याग्रयणाशीं समानतंत्रानें ( एकतंत्रानें ) होतें . श्यामाकांनीं तर प्रस्तर करावा . म्हणजे श्यामाक तृणांचा प्रस्तर ( मुष्टि ) करुन स्रुवेच्या उत्तरेस पसरुन त्याजवर स्रुचा ठेवावी , आग्रयण करुं नये . अथवा तें श्यामाकाग्रयणही एकतंत्रानें करावें इत्यादि प्रकार नारायणवृत्तींत सांगितला आहे , तो पाहण्याचा वगैरे परिश्रम करणारांस समजण्यास सुलभ आहे . इतकें सांगून पुरे करितों .

इदंचपर्वाभावेशुक्लपक्षेदेवनक्षत्रेकृत्तिकादिविशाखांतेकार्यमितिस्मृत्यर्थसारेउक्तम् ‍ बौधायनीयेकेशवस्वामिनाप्येवमुक्तम् ‍ परिशिष्टे श्यामाकैर्वीहिभिश्चैवयवैश्चान्योन्यकालतः प्राग्यष्टुंयुज्यतेवश्यंनह्यत्राग्रयणात्ययः त्रिकांडमंडनोप्येवम् ‍ यदात्वेतदाश्विनपौर्णमास्यांक्रियतेतदैककालत्वादाश्वयुजीकर्मणोस्यचसमानतंत्रताभवति तदेतद्वृत्तिकृताएकबर्हिरिध्माज्येतिसूत्रेस्पष्टमुक्तम् ‍ अस्याकरणेप्रायश्चित्तमुक्तंस्मृतिचंद्रिकायांकात्यायनेन नित्ययज्ञात्ययेचैववैश्वदेवद्वयस्यच अनिष्ट्वानवयज्ञेननवान्नप्राशनेतथा भोजनेपतितान्नस्यचरुर्वैश्वानरोभवेत् ‍ कारिकापि अकृताग्रयणोऽश्नीयान्नवान्नंयदिवैनरः वैश्वानरायकर्तव्यश्चरुः पूर्णाहुतिस्तुवेति ऋग्विधानेतु समिंद्ररायामंत्रंचवर्षेवर्षेजपेच्छतम् ‍ आग्रयणंयदान्यूनंतदासंपूर्णमेतितदित्युक्तम् ‍ एतच्चापदिमलमासेकार्यमन्यथानेतिप्रागुक्तम् ‍ अन्योप्याहिताग्न्यादिविशेषः शौनकादेर्ज्ञेय इत्यलंबहुना इत्याश्विनमासः ॥

हें आग्रयण पर्वाचे अभावीं शुक्लपक्षांत कृत्तिकांपासून विशाखांपर्यंत ह्या देवनक्षत्रांवर करावें , असें स्मृत्यर्थसारांत सांगितलें आहे . बौधायनीयांत ( बौधायनसूत्रव्याख्येंत ) केशवस्वामीनें देखील असेंच सांगितलें आहे . परिशिष्टांत " व्रीहिकालाच्या पूर्वीं श्यामाकांनीं , यवकालाच्या पूर्वीं व्रीहींनीं , श्यामाककालाच्या पूर्वीं यवांनीं होम करावा . असें केलें असतां आग्रयणाचा अतिक्रम होत नाहीं . " त्रिकांडमंडनही असेंच सांगतो . जेव्हां हें आग्रयण आश्विनपौर्णमासीस करावयाचें असेल तेव्हां आश्वयुजीकर्म व आग्रयण यांचा एक काल असल्यामुळें एकतंत्रानें होतें , तो हा प्रकार " एकबर्हिरिध्माज्यस्विष्टकृतः ’ ह्या गृह्यसूत्रावर वृत्तिकारानें स्पष्ट सांगितला आहे . आग्रयण न केलें असतां प्रायश्चित्त सांगतो - स्मृतिचंद्रिकेंत कात्यायन - " नित्ययज्ञाचा लोप असतां , सायंप्रातर्वैश्वदेवांचा लोप असतां , नवान्नानें होम न करितां नवान्नभक्षण झालें असतां , आणि पतितान्नाचें भोजन केलें असतां वैश्वानरचरु करावा . " कारिकाही - " आग्रयण केल्यावांचून जर मनुष्य नवान्न भक्षण करील तर वैश्वानरदेवतेला चरु करावा , किंवा पूर्णाहुति करावी . " ऋग्विधानांत तर - " प्रतिवर्षीं ‘ समिंद्रराया० ’ ह्या मंत्राचा शंभर जप करावा , म्हणजे जेव्हां आग्रयण न्यून झालें असेल तेव्हां तें संपूर्ण होतें " असें सांगितलें आहे . हें आग्रयण आपत्काल असतां मलमासांत करावें . आपत्काल नसतां मलमासांत करुं नये , असें पूर्वीं सांगितलें आहे . आहिताग्नि इत्यादिकांचा इतरही विशेष शौनकादि ग्रंथावरुन जाणावा . आतां बहुत सांगत नाहीं . इति आश्विनमासः ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP