मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
महालयश्राद्धाच्या देवता

द्वितीय परिच्छेद - महालयश्राद्धाच्या देवता

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां महालयश्राद्धाच्या देवता सांगतो .

अथात्रदेवताः संग्रहे तातांबात्रितयंसपत्नजननीमातामहादित्रयंसस्त्रिस्त्रीतनयादितातजननीस्वभ्रातरस्तत्स्त्रियः तातांबात्मभगिन्यपत्यधवयुग्जायापितासद्गुरुः शिष्याप्ताः पितरोमहालयविधौतीर्थेतथातर्पणे अस्यार्थः तातत्रयीपितृत्रयी अंबात्रयीच स्मृत्यर्थसारेपि महालयेमातृश्राद्धंपृथक् ‍ प्रशस्तमिति अत्रविशेषः स्मृतिदर्पणे गालवः अनेकामातरोयस्यश्राद्धेचापरपक्षिके अर्घ्यदानंपृथक्कुर्यात्पिंडमेकंतुनिर्वपेत् ‍ जीवन्मातृकस्तुसापत्नमातुरेकोद्दिष्टंकुर्यान्नपार्वणम् ‍ श्राद्धदीपकलिकायांतुपार्वणमुक्तं अन्वष्टक्यंचयन्मातुर्गयाश्राद्धंमहालयम् ‍ पितृपत्नीषुचश्राद्धंकार्यंपार्वणवद्भवेदितिबृहन्मनूक्तेः सस्त्रीतिमातामहानांसपत्नीकत्वेपिविभवेसतिमातामहीनांपृथक् ‍ कार्यम् ‍ महालयेगयाश्राद्धेवृद्धौचान्वष्टकासुच ज्ञेयंद्वादशदैवत्यंतीर्थेप्रौष्ठेमघासुचेतिनिगमोक्तेः हेमाद्रिमतेत्वत्रनदैवत्यमेव महालयेगयाश्राद्धेवृद्धौचान्वष्टकासुच नवदैवत्यमत्रेष्टंशेषंषाट् ‍ पौरुषंविदुरितिविष्णुधर्मोक्तेः तातभ्रातापितृव्यः जननीभ्रातामातुलः तत्स्त्रियः पितृव्यस्त्रीमातुलानीभ्रातृजायाः पितृष्वसृमातृष्वसृस्वभगिन्योपत्यभर्तृयुक्ताः तेनसापत्यायैसधवायैइतिप्रयोगोज्ञेयः एतासुसतीषुनतद्भर्त्रादेर्दानम् ‍ द्वारलोपात् ‍ जायापिताश्वशुरः श्वश्रूरप्यत्रोपलक्ष्या अत्रमूलंस्मृतिचंद्रिकायांज्ञेयम् ‍ ।

संग्रहांत - " पितृत्रयी ; मातृत्रयी ; सापत्नमाता ; मातामहत्रयी सपत्नीक ; पत्नी ; पुत्र ; कन्या ; पितृव्य , मातुल , भ्राता हे व ह्यांच्या स्त्रिया ( म्हणजे पितृव्यस्त्री , मातुलानी व भातृजाया ); पितृभगिनी , मातृभगिनी , आत्मभगिनी ह्या सभर्तृक , व सापत्य ; श्वशुर ; गुरु ; शिष्य ; आप्त ; हे पितर महालयश्राद्धांत , तीर्थश्राद्धांत आणि तर्पणाविषयीं समजावे " हा अर्थ सामान्य झाला . आतां विशेषेंकरुन सांगतो - येथें मातृत्रयी पृथक् ‍ सांगितली . स्मृत्यर्थसारांतही महालयांत मातृश्राद्ध पृथक् ‍ करणें प्रशस्त होय . येथें मातेविषयीं विशेष सांगतो गालव - " ज्याला अनेक माता आहेत त्यानें अपरपक्षश्राद्धांत अर्घ्यदान वेगवेगळें करावें . आणि पिंड सर्वांना एक द्यावा . " जीवन्मातृकानें सापत्नमातेचें एकोद्दिष्ट करावें , पार्वण करुं नये . श्राद्धदीपकलिकेंत तर पार्वण सांगितलें आहे . कारण , " मातेचें जें अन्वष्टक्य , गयाश्राद्ध , महालय , आणि पित्याच्या पत्नीविषयीं करावयाचें श्राद्ध तें पार्वणयुक्त होतें " असें बृहन्मनूचें वचन आहे . वरील संग्रहवचनांत मातामह सपत्नीक सांगितले तरी द्रव्यानुकूल्य असतां मातामहींचें पृथक् ‍ करावें . कारण , " महालय , गयाश्राद्ध , वृद्धिश्राद्ध , अन्वष्टकाश्राद्ध , तीर्थश्राद्ध , प्रौष्ठपदीश्राद्ध आणि मघाश्राद्ध यांचे ठायीं बारा देवतांचें ( पितृत्रयी , मातृत्रयी , मातामहत्रयी मातामहीत्रयी यांचें ) श्राद्ध जाणावें . " असें निगमवचन आहे . हेमाद्रिमतीं तर येथें नवदेवताकच आहे . कारण , " महालय , गयाश्राद्ध , वृद्धिश्राद्ध , अन्वष्टका यांचे ठायीं नवदेवताक श्राद्ध इष्ट आहे . इतर श्राद्ध षटूदेवताक , असें सांगतात . " असें विष्णुधर्मवचन आहे . ‘ तातजननीस्वभ्रातरस्तत्स्त्रियः ’ याचा अर्थ - तातभ्राता म्हणजे पितृव्य , जननीभ्राता म्हणजे मातुल , आणि स्वभ्राता , हे व यांच्या स्त्रिया म्हणजे पितृव्यस्त्री , मातुलानी , आणि भ्रातृजाया ह्या होत . ‘ तातांबात्मभगिन्यपत्यधवयुक् ‍ ’ याचा अर्थ - पितृष्वसा ( आत्या ), मातृष्वसा ( मावशी ), आत्मभगिनी , ह्या अपत्यभर्तृयुक्त होत . म्हणजे ‘ सापत्यायै सधवायै ’ असा प्रयोग समजावा . ह्या जीवंत असतां त्याच्या भर्त्याला व अपत्यांना श्राद्धदान नाहीं . कारण , त्यांच्या द्वारानें भर्ता इत्यादिकांना दान सांगितलें , तें द्वार नसल्यामुळें भर्त्रादिकांला नाहीं . जायापिता म्हणजे श्वशुर . येथें उपलक्षणेंकरुन श्वश्रू ( सासू ) ही समजावी . ह्या संग्रहवचनाला मूल स्मृतिचंद्रिकेंत जाणावें .

अत्रपार्वणैकोद्दिष्टव्यवस्थोक्ताहेमाद्रौपुराणांतरे उपाध्यायगुरुश्वश्रूपितृव्याचार्यमातुलाः श्वशुरभ्रातृतत्पुत्रपुत्रर्त्विक्शिष्यपोषकाः भगिनीस्वामिदुहितृजामातृभगिनीसुताः पितरौपितृपत्नीनांपितुर्मातुश्चयास्वसा सखिद्रव्यदशिष्याद्यास्तीर्थेचैवमहालये एकोद्दिष्टविधानेनपूजनीयाः प्रयत्नत इति इतरेषांपित्रादीनांपार्वणमर्थसिद्धम् ‍ अत्रक्रमान्यत्वेप्याचाराव्द्यवस्था अशक्तौतुपृथिवीचंद्रोदयेचतुर्विंशतिमते एकस्मिन्ब्राह्मणेसर्वानाचार्यादीन्प्रपूजयेत् ‍ दशद्वादशवापिंडान्दद्यादकरणंनतु एकोद्दिष्टस्वरुपंचाहयाज्ञवल्क्यः एकोद्दिष्टंदेवहीनमेकार्घ्यैकपवित्रकम् ‍ आवाहनाग्नौकरणरहितंत्वपसव्यवदिति अत्रैकपाकोवैश्वदेवतंत्रंपिंडंबर्हिश्चैकमिति स्मृत्यर्थसारेउक्तम् ‍ अत्रपाणिहोमः पिंडाश्चात्रद्विजांतिक इत्याहप्रयोगपारिजातेआचार्यः काम्यमभ्युदयेष्टम्यामेकोद्दिष्टमथाष्टमम् ‍ चतुर्ष्वेषुकरेहोमः पिंडाश्चात्रद्विजांतिक इति पार्वणैकोद्दिष्टयोः समानतंत्रत्वेतुअग्निसमीपएव अत्रधुरिलोचनौवैश्वदेवौ अपिकन्यागतेसूर्येकाम्येचधुरिलोचनौइतिहेमाद्रावादित्यपुराणात् ‍ अत्रप्रतिदिनंभिन्नप्रयोगत्वाद्दक्षिणाभेदोवाप्रयोगैक्यादंते एववादक्षिणेतिहेमाद्रौउक्तम् ‍ ।

ह्या देवतांविषयीं पार्वण कोणाचें व एकोद्दिष्ट कोणाचें ती व्यवस्था सांगतो हेमाद्रींत पुराणांतरांत - " उपाध्याय , गुरु , श्वश्रू , पितृव्य , आचार्य , मातुल , श्वशुर , भ्राता , भ्रातृपुत्र , पुत्र , ऋत्विक् ‍ शिष्य , पोषक , भगिनी , स्वामी , कन्या , जामाता , भगिनीपुत्र , पित्याच्या पत्नीचे मातापितर , पितृष्वसा , मातृष्वसा , सखा , द्रव्यद , शिष्य इत्यादिकांची तीर्थांत , व महालयांत एकोद्दिष्टविधीकरुन प्रयत्नानें पूजा करावी . " इतर पिता इत्यादिकांचें पार्वण अर्थात् ‍ सिद्ध झालें . ह्या पुराणांतरवचनांत क्रम निराळा सांगितला आहे , तरी त्या क्रमाची आचारावरुन व्यवस्था जाणावी . शक्ति नसेल तर सांगतो - पृथ्वीचंद्रोदयांत चतुर्विंशतिमतांत - " एका ब्राह्मणावर सर्व आचार्यादिकांची पूजा करावी . दहा किंवा बारा पिंड द्यावे . परंतु केल्यावांचून राहुं नये . " एकोद्दिष्टाचें स्वरुप सांगतो याज्ञवल्क्य - " ज्यांत देव नाहींत , एक अर्घ्य व एक पवित्रक असतें , आवाहन व अग्नौकरण नाहीं , अपसव्यानें सारें होतें , तें एकोद्दिष्ट होय . " एकोद्दिष्टांत पाक एक , वैश्वदेवाचें तंत्र , पिंड व बर्हि एक , असें स्मृत्यर्थसारांत सांगितलें आहे . एकोद्दिष्टांत ब्राह्मणाचे हातावर होम व पिंड ब्राह्मणाच्या समीप द्यावे , असें सांगतो प्रयोगपारिजातांत आचार्य - " काम्यश्राद्ध , आभ्युदयिकश्राद्ध , अष्टमीश्राद्ध , एकोद्दिष्ट ह्या चार श्राद्धांमध्यें ब्राह्मणाच्या हातावर होम आणि पिंड ब्राह्मणाच्या समीप द्यावे . " पार्वण व एकोद्दिष्ट यांचें एक तंत्र असेल तर अग्निसमीपच होम होतो . ह्या महालयश्राद्धांत धुरिलोचन विश्वेदेव समजावे . कारण , " कन्यागतसूर्य असतां करावयाचे श्राद्धांत ( महालयांत ) व काम्यश्राद्धांत धुरिलोचन विश्वेदेव " असें हेमाद्रींत आदित्यपुराणवचन आहे . ह्या पक्षांत प्रतिदिवशीं भिन्न प्रयोगानें श्राद्ध असतां दक्षिणा वेगवेगळी द्यावी . अथवा एक प्रयोगानें श्राद्ध असतां अंतींच दक्षिणा , असें हेमाद्रींत सांगितलें आहे .

एतच्चसंन्यस्तपितृकादिनाजीवत्पितृकेणापिकार्यं वृद्धौतीर्थेचसंन्यस्तेतातेचपतितेसति येभ्यएवपितादद्यात्तेभ्योदद्यात्स्वयंसुत इतिकात्यायनोक्तेः यत्तुकौंडिन्यः दर्शश्राद्धंगयाश्राद्धंश्राद्धंचापरपक्षिकम् ‍ नजीवत्पितृकः कुर्यात्तिलैस्तर्पणमेवचेति तत्संन्यस्तपित्राद्यतिरिक्तविषयम् ‍ काम्यश्राद्धपरंवा अत्रबहुवक्तव्यंश्रीपितृकृतजीवत्पितृकनिर्णयेज्ञेयम् ‍ एतच्चजीवत्पितृकेणपिंडरहितंकार्यम् ‍ मुंडनंपिंडदानंचप्रेतकर्मचसर्वशः नजीवत्पितृकः कुर्याद्गुर्विणीपतिरेवचेतिदक्षेणतस्यपिंडनिषेधात् ‍ अन्वष्टक्यमातृवार्षिकादौतुवचनाद्भवतीतिचक्ष्यामः तथाछागलेयः पिंडोयत्रनिवर्तेतमघादिषुकथंचन सांकल्पंतुतदाकार्यंनियमाद्ब्रह्मवादिभिः सांकल्पस्वरुपंचवक्ष्यते ।

हें श्राद्ध ( महालय ) ज्याचा पिता संन्याशी वगैरे आहे अशा जीवत्पितृकानें देखील करावें . कारण , वृद्धिकर्माचे ठायीं , तीर्थाचे ठायीं आणि पिता संन्यस्त ( संन्याशी ) व पतित असतां ज्यांचें श्राद्ध पित्यानें करावयाचें त्यांचें श्राद्ध स्वतः पुत्रानें करावें . असें कात्यायनवचन आहे . आतां जें कौंडिण्य - " दर्शश्राद्ध , गयाश्राद्ध , आपरपक्षिकश्राद्ध हीं जीवत्पितृकानें करुं नयेत . आणि जीवत्पितृकानें तिलतपर्णही करुं नये " असें सांगतो , तें ज्याचा पिता संन्यस्त वगैरे आहे त्यावांचून इतरविषयक किंवा काम्यश्राद्धविषयक समजावें . या ठिकाणीं बहुत सांगावयाचें तें पित्यानें ( रामकृष्णभट्टानें ) केलेल्या जीवत्पितृकनिर्णयांत जाणावें . हें महालयश्राद्ध जीवत्पितृकानें पिंडरहित करावें . कारण , ‘‘ क्षौर , पिंडदान , आणि सर्वप्रेतकर्म हीं जीवत्पितृकानें व गर्भिणीपतीनें करुं नयेत . " या दक्षवचनानें जीवत्पितृकाला पिंडदानकर्माचा निषेध केला आहे . अन्वष्टक्य , व मातेचें वार्षिक इत्यादिकांत तर करण्याविषयीं वचन असल्यावरुन जीवत्पितृकाला पिंडदान कर्म होतें , असें पुढें सांगूं . तसेंच छागलेय - " ज्या मघादिश्राद्धांत पिंडाची निवृत्ति कशीही झालेली असो त्या ठिकाणीं ब्रह्मवेत्त्यांनीं नियमानें ( निश्चयानें ) सांकल्पश्राद्ध करावें . " सांकल्पश्राद्धाचें स्वरुप पुढें ( तृतीयपरिच्छेदोत्तरार्धीं ) सांगूं .

अत्रश्राद्धांगतर्पणंपक्षश्राद्धेप्रतिदिनंश्राद्धोत्तरम् ‍ सकृन्महालयेतुपरेह्निकार्यम् ‍ तदुक्तंनारदीये पक्षश्राद्धंयदाकुर्यात्तर्पणंतुदिनेदिने सकृन्महालयेचैवपरेहनितिलोदकम् ‍ गर्गोपि पक्षश्राद्धेहिरण्येच अनुव्रज्यतिलोदकमिति तथाप्रयोगपारिजातेगर्गः कृष्णेभाद्रपदेमासिश्राद्धंप्रतिदिनंभवेत् ‍ पितृणांप्रत्यहंकार्यंनिषिद्धाहेपितर्पणं सकृन्महालयेश्वः स्यादष्टकास्वंतएवहि इदंनिषिद्धदिनेपिकार्यम् ‍ तिथितीर्थविशेषेषुकार्यंप्रेतेचसर्वदेति स्मृत्यर्थसारोक्तेः तीर्थेतिथिविशेषेचगयायांप्रेतपक्षके निषिद्धेपिदिनेकुर्यात्तर्पणंतिलमिश्रितमितिस्मृतिरत्नावल्यांवचनाच्च ।

ह्या महालयश्राद्धांत श्राद्धांगतर्पण पक्षश्राद्धाचे ठायीं प्रतिदिवशीं श्राद्धोत्तर करावें . सकृन्महालयाचे ठायीं तर दुसर्‍या दिवशीं करावें . तें सांगतो नारदीयांत - " ज्या वेळीं पक्षश्राद्ध करील त्या वेळीं दररोज तर्पण करावें . सकृन्महालयाचे ठायीं परदिवशीं तिलोदक द्यावें . " - गर्गही - " पक्षश्राद्धांत व हिरण्यश्राद्धांत श्राद्धोत्तर ब्राह्मणांस पोंचवून तिलोदक द्यावें . " तसेंच प्रयोगपारिजातांत गर्ग - " भाद्रपदमासाचे कृष्णपक्षांत पितरांचें प्रतिदिवशींच श्राद्ध होतें , त्या ठिकाणें प्रत्यहीं निषिद्धदिवशीं देखील पितरांचें तर्पण करावें . सकृन्महालयाचे ठायीं दुसर्‍या दिवशीं करावें . आणि अष्टकांत अंतींच होतें . " हें महालयश्राद्धांगतर्पण निषिद्धदिवशींही करावें . कारण , " विशेष तिथि , विशेष तीर्थ यांचे ठायीं आणि मृत असतां सर्वदा तर्पण करावें . " असें स्मृत्यर्थसारांत उक्त आहे . आणि " तीर्थ , विशेषतिथि , गया , पितृपक्ष यांचे ठायीं निषिद्धदिवशीं देखील तिलमिश्रित तर्पण करावें " असें स्मृतिरत्नावलींत वचनही आहे .

एतच्चश्राद्धंमलमासेनकार्यम् ‍ तदाहभृगुः वृद्धिश्राद्धंतथासोममग्न्याधेयंमहालयम् ‍ राजाभिषेकंकाम्यंचन कुर्याद्भानुलंघित इति हेमाद्रौनागरखंडे नभोवाथनभस्योवामलमासोयदाभवेत् ‍ सप्तमः पितृपक्षः स्यादन्यत्रैवतुपंचमः ।

हें महालयश्राद्ध मलमासांत करुं नये . तें सांगतो भृगु - " वृद्धिश्राद्ध , सोमयाग , अग्न्याधान , महालय , राज्याभिषेक आणि काम्यकर्म हीं मलमासांत करुं नयेत . " हेमाद्रींत नागरखंडांत " श्रावण किंवा भाद्रपद जेव्हां मलमास होईल तेव्हां आषाढीपासून सातवा पक्ष पितृपक्ष होतो . व मलमास नसतां पांचवा पितृपक्ष होतो . "

एतच्चपित्रोर्मरणेप्रथमाब्देकृताकृतमितित्रिस्थलीसेतौभट्टाः इदंचनित्यंकाम्यंच पुत्रानायुस्तथारोग्यमैश्वर्यमतुलंतथा प्राप्नोतिपंचमेदत्वाश्राद्धंकामान्सुपुष्कलानितिजाबाल्युक्तेः वृश्चिकेसमतिक्रांतेपितरोदैवतैः सह निःश्वस्यप्रतिगच्छंतिशापंदत्वासुदारुणमितिकार्ष्णाजिनिवचनाच्च तदतिक्रमेप्रायश्चित्तमुक्तमृग्विधाने दुरोअश्वस्यमंत्रंचदशमासंद्विमासयोः महालयंयदान्यूनंतदासंपूर्णमेतितदिति द्विमासयोः कन्यातुलयोर्महालयश्राद्धंयदाहीनमित्यर्थः अत्रभरण्यांश्राद्धमतिप्रशस्तम् ‍ । तदुक्तंपृथिवीचंद्रोदयेमात्स्ये भरणीपितृपक्षेतुमहतीपरिकीर्तिता अस्यांश्राद्धंकृतंयेनसगयाश्राद्धकृद्भवेत् ‍ पृथिवीचंद्रोदयेश्रीधरीयेबृहस्पतिः नभस्यापरपक्षस्यद्वितीयायदियाम्यभे तृतीयाचाग्निताराभिः सहिताप्रीतिदापितुः ।

हें महालयश्राद्ध मातापिता मृत असतां प्रथमवर्षी कृताकृत ( केलें असतां फल आहे व न केलें तर दोष नाहीं ) असें त्रिस्थलीसेतूंत भट्ट सांगतात . हें श्राद्ध नित्य व काम्य आहे . कारण , " पांचव्या पक्षांत श्राद्ध दिलें असतां पुत्र , आयुष्य , आरोग्य , अतुल ऐश्वर्य , आणि पुष्कळ मनोरथ यांची प्राप्ति होते " असें जाबालिवचन आहे , यावरुन काम्य होतें . आणि वृश्चिकसंक्रांत अतिक्रांत झाली असतां ( वृश्चिकसंक्रांतीपर्यंत श्राद्ध केलें नसतां ) देवतासहित पितर श्वासोच्छ्वास टाकून दारुण शाप देऊन जातात " असें कार्ष्णाजिनिवचनही आहे . यावरुन नित्य सिद्ध होतें . श्राद्धावांचून वृश्चिकसंक्रांत झाली असतां प्रायश्चित्त सांगतो ऋग्विधानांत - " ज्या वेळीं दोन मासांत ( कन्या व तूळ या दोन संक्रांतींत ) महालयश्राद्ध होणार नाहीं त्या वेळीं ‘ दुरोअश्वस्य० ’ ह्या मंत्राचा दहा महिने जप करावा , म्हणजे तें महालयश्राद्ध संपूर्ण होतें . " ह्या पक्षांत भरणीवर श्राद्ध अतिप्रशस्त आहे . तें सांगतो पृथ्वीचंद्रोदयांत मात्स्यांत - " पितृपक्षांतील भरणी मोठी सांगितली आहे . हिच्या ठिकाणीं ज्यानें श्राद्ध केलें त्याला गयाश्राद्धाचें फल प्राप्त होतें . " पृथ्वीचंद्रोदयांत श्रीधरीयांत बृहस्पति - " भाद्रपदाच्या कृष्णपक्षाची द्वितीया जर भरणीनक्षावर असेल आणि तृतीया कृत्तिकायुक्त असेल तर ती पित्याला प्रीतिदायक आहे ."

एतत्पक्षेषष्ठीयोगविशेषेणकपिलासंज्ञा तदुक्तंवाराहे नभस्यकृष्णपक्षेतुरोहिणीपातभूसुतैः युक्ताषष्ठीपुराणज्ञैः कपिलापरिकीर्तिता व्रतोपवासनियमैर्भास्करंतत्रपूजयेत् ‍ कपिलांचद्विजाग्र्यायदत्त्वाक्रतुफलंलभेत् ‍ पुराणसमुच्चये भाद्रेमास्यसितेपक्षेभानौचैवकरेस्थिते पातेकुजेचरोहिण्यांसाषष्ठीकपिलाभवेत् ‍ अत्रदर्शांतत्वेन महालयोभाद्रपदकृष्णपक्षोज्ञेयइत्युक्तंनिर्णयामृतेहेमाद्रौच हस्तार्कस्तुफलातिशयार्थः संयोगेतुचतुर्णांवैनिर्दिष्टापरमेष्ठिनेतितत्रैवोक्तेः अत्रविशेषोहेमाद्रौस्कांदे देवदारुंतथोशीरंकुंकुमैलामनः शिलाम् ‍ पत्रकंपद्मकंयष्टिमधुगव्येनपेषयेत् ‍ क्षीरेणालोड्यकल्केनस्नानंकुर्यात्समंत्रकम् ‍ आपस्त्वमसिदेवेशज्योतिषांपतिरेवच पापंनाशयमेदेवेवाड्मनः कायकर्मजम् ‍ पंचगव्यकृतस्नानः पंचभंगैस्तुमार्जयेत् ‍ पंचभंगैः पंचपल्लवैः तथा रत्नैर्नानाविधैर्युक्तंसौवर्णंकारयेद्रविं शक्तितस्तुपलादूर्ध्वंतदर्धंकर्षतोपिवा सौवर्णमरुणंकुर्यान्नौकांचैवतथारथम् ‍ तथा अल्पवित्तोपियः कश्चित्सोपिकुर्यादिमंविधिम् ‍ प्रभासखंडे स्थापयेदव्रणंकुंभंचंदनोदकपूरितम् ‍ रक्तवस्त्रयुगच्छन्नंताम्रपात्रेणसंयुतम् ‍ रथोरौक्मपलस्यैवएकचक्रः सुचित्रितः सौवर्णपलसंयुक्तांमूर्तिंसूर्यस्यकारयेत् ‍ ततः सूर्यंकपिलांचषोडशोपचारैः संपूज्यदद्यात् ‍ दिव्यमूर्तिर्जगच्चक्षुर्द्वादशात्मादिवाकरः कपिलासहितोदेवोमममुक्तिंप्रयच्छतु यस्मात्त्वंकपिलेपुण्यासर्वलोकस्यपावनी प्रदत्तासहसूर्येणमममुक्तिप्रदाभवेति विशेषांतरं तत्रैवज्ञेयमितिदिक् ‍ ।

ह्या पक्षांतील षष्ठी विशेषयोगानें कपिलानांवाची होते . तें सांगतो वराहांत - " भाद्रपदाच्या कृष्णपक्षांत रोहिणीनक्षत्र , व्यतीपात , व भौमवार यांनीं युक्त जी षष्ठी ती प्राचीन ऋषींनीं कपिला म्हटली आहे . त्या षष्ठीस व्रत , उपवास , नियम यांहींकरुन भास्कराची पूजा करावी . आणि कपिला गाई ब्राह्मणश्रेष्ठाला द्यावी म्हणजे यज्ञाचें फल प्राप्त होतें . " पुराणसमुच्चयांत - " भाद्रपदमासीं कृष्णपक्षांत सूर्य हस्तनक्षत्रीं असतां व्यतीपात , भौमवार , रोहिणीनक्षत्र यांचे ठायीं जी षष्ठी ती कपिला होते . " ह्या षष्ठीविषयीं दर्शांत चांद्रमानानें महालयरुप भाद्रपदकृष्णपक्ष जाणावा , असें सांगितलें आहे निर्णयामृतांत हेमाद्रींत . हस्ताला सूर्य असला म्हणजे फल अतिशय आहे . पण नसला तरी " चवघांचा ( षष्ठी , रोहिणी , व्यतीपात , भौमवार यांचा ) योग असतां ब्रह्मदेवानें कपिला षष्ठी म्हणून सांगितली आहे . " असें तेथेंच सांगितलें आहे . एथें विशेष सांगतो हेमाद्रींत स्कांदांत - " देवदार , वाळा , केशर , वेलची , मनशीळ , तमालपत्र , पद्मकाष्ठ , ज्येष्ठमध हे पदार्थ गाईच्या दुधांत वाटून अंगास लावून समंत्रक स्नान करावें . स्नानमंत्र - आपस्त्वमसि देवेश ज्योतिषां पतिरेव च ॥ पापं नाशय मे देव वाड्मनः कायकर्मजम् ‍ ॥ पंचगव्यानें स्नान करुन पंचपल्लवांनीं मार्जन करावें . " तसेंच " शक्तीच्या मानानें चार कर्षांहून अधिक सुवर्णाची किंवा दोन कर्षांची अथवा एक कर्षाची सूर्यमूर्ति नानाविधरत्नांनीं युक्त अशी करावी . सोन्याचा अरुण , नौका व रथ करावा . " तसेंच " जो कोणी अल्पद्रव्यवान् ‍ असेल त्यानें देखील हा विधि करावा . " प्रभासखंडांत - " चंदनोदकानें भरलेला छिद्ररहित कलश , दोन वस्त्रांनीं आच्छादित व ताम्रपत्रानें युक्त असा स्थापन करावा . चार कर्ष सुवर्णाचाच एकचक्री उत्तमचित्रयुक्त असा रथ असावा . चार कर्ष सुवर्णाची सूर्याची मूर्ति करावी . " तदनंतर सूर्य व कपिला गाई यांची षोडशोपचार पूजा करुन ब्राह्मणाला द्यावी . दानमंत्र - " दिव्यमूर्तिर्जगच्चक्षुर्द्वादशात्मा दिवाकरः ॥ कपिलासहितो देवो मम मुक्तिं प्रयच्छतु ॥ यस्मात्वं कपिले पुण्या सर्वलोकस्य पावनी ॥ प्रदत्ता सह सूर्येण मम मुक्तिप्रदा भव ॥ " इतर विशेष तेथेंच जाणावा . ही दिशा समजावी .

इयमेवचंद्रषष्ठी साचंद्रोदयव्यापिनीग्राह्या उभयत्रतथात्वेपूर्वा तदुक्तंभविष्ये तद्वद्भाद्रपदेमासिषष्ठ्यांपक्षेसितेतरे चंद्रषष्ठीव्रतंकुर्यात्पूर्ववेधः प्रशस्यते चंद्रोदयेयदाषष्ठीपूर्वाहेवापरेहनि चंद्रषष्ठ्यसितेपक्षेसैवोपोष्याप्रयत्नत इति ।

हीच चंद्रषष्ठी होय , ती चंद्रोदयव्यापिनी घ्यावी . दोन दिवशीं चंद्रोदयव्यापिनी असेल तर पूर्वा घ्यावी . तें सांगतो भविष्यांत - " भाद्रपदांत कृष्णपक्षांत षष्ठीस चंद्रषष्ठीव्रत करावें . तेथें पूर्वविद्धा षष्ठी प्रशस्त आहे . कृष्णपक्षांत चंद्रोदयीं पूर्वदिवशीं किंवा परदिवशीं जेव्हां षष्ठी असेल तेव्हां ती चंद्रषष्ठी होय , तिचेंच उपोषण प्रयत्नानें करावें .

अष्टम्यामाश्वलायनेनमघावर्षसंज्ञंश्राद्धमुक्तं एतेनमाघ्यावर्षंप्रौष्ठपद्याअपरपक्षेइति इदंसप्तम्यादिषुत्रिष्वहः सुकार्यमितिनारायणवृत्तिः हरदत्तस्तुमघायुक्तवर्षासुभवंत्रयोदशीश्राद्धमितिव्याचख्यौ पृथ्वीचंद्रोदयेब्राह्मे आषाढ्याः पंचमेपक्षेगयामध्याष्टमीस्मृता त्रयोदशीगजच्छायागयातुल्यातुपैतृके ।

ह्या पक्षांतील अष्टमीस आश्वलायनानें माघ्यावर्ष नांवाचें श्राद्ध सांगितलें आहे , तें असें - " येणेंकरुन प्रौष्ठपदीच्या अपरपक्षांत माघ्यावर्षश्राद्ध व्याख्यात झालें . " हें माघ्यावर्ष सप्तमी , अष्टमी , नवमी ह्या तीन दिवशीं करावें , अशी नारायणवृत्ति आहे . हरदत्त तर - मघायुक्त वर्षाऋतूंत होणारें तें माघ्यावर्ष म्हणजे त्रयोदशीश्राद्ध असें व्याख्यान करिता झाला . पृथ्वीचंद्रोदयांत ब्राह्मांत - " आषाढीपासून पांचव्या पक्षांतील मधली अष्टमी गया म्हटली आहे . आणि त्रयोदशी गजच्छाया होय . ती पैतृककर्माविषयीं गयातुल्य फल देणारी आहे . "

N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP