मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
वैकुंठचतुर्दशी

द्वितीय परिच्छेद - वैकुंठचतुर्दशी

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


कार्तिशुक्लचतुर्दशीवैकुंठसंज्ञा साविष्णुपूजायांरात्रिव्यापिनीग्राह्या दिनद्वयेतव्द्याप्तौनिशीथप्रदोषोभयव्यापिनीग्राह्या तदुक्तंहेमाद्रौभविष्ये कार्तिकस्यसितेपक्षेचतुर्दश्यांनराधिप सोपवासस्तुसंपूज्यहरिंरात्रौजितेंद्रिय इति अस्याएवविश्वेश्वरप्रतिष्ठादिनत्वात्तत्प्रीत्यर्थंयदोपवासादिक्रियतेतदाऽरुणोदयव्यापिनीग्राह्या तदुक्तंत्रिस्थलीसेतौसनत्कुमारसंहितायाम् ‍ वर्षेचहेमलंबाख्येमासेश्रीमतिकार्तिके शुक्लपक्षेचतुर्दश्यामरुणाभ्युदयंप्रति महादेवतिथौब्राह्मेमुहूर्तेमणिकर्णिके स्नात्वाविश्वेश्वरोदेव्याविश्वेश्वरमपूजयदिति तत्पूर्वदिनेचोपवासः कार्यः ततः प्रभातेविमलेकृत्वापूजांमहाद्भुताम् ‍ दंडपाणेर्महाधाम्निवनेस्मिन्कृतपारण इतितत्रैवोक्तेः शिवरहस्येपि पूजाजागराद्युक्त्वोक्तम् ‍ ततोऽरुणोदयेजातेस्नात्वास्नात्वाचभस्मना संध्यांसमाप्यविश्वेशंमामभ्यर्च्ययथाविधि मद्भक्तान्भोजयामासुऋषयोबुभुजुस्ततइति ।

कार्तिकशुक्लचतुर्दशी ही वैकुंठचतुर्दशी होय . ती विष्णुपूजेविषयीं रात्रिव्यापिनी घ्यावी . दोन दिवशीं रात्रिव्यापिनी असतां मध्यरात्रीं व प्रदोषकालीं जी असेल ती घ्यावी . तें सांगतो - हेमाद्रींत भविष्यांत - " कार्तिकशुक्लचतुर्दशीस उपवास करुन जितेंद्रिय होऊन रात्रीं हरीचें पूजन करावें . " याच चतुर्दशीचे दिवशीं विश्वेश्वराची प्रतिष्ठा ( स्थापना ) झाली असल्यामुळें त्याच्या प्रीत्यर्थ जेव्हां उपवासादिक कर्तव्य असेल तेव्हां त्याविषयीं अरुणोदयव्यापिनी घ्यावी . तें सांगतो त्रिस्थलीसेतूंत सनत्कुमारसंहितेंत - " हेमलंब नांवाच्या संवत्सरीं श्रीमान् ‍ कार्तिकमासाचे शुक्लपक्षाची शिवतिथि जी चतुर्दशी तिचे ठायीं अरुणोदयकालीं ब्राह्ममुहूर्तावर मणिकर्णिकेमध्यें विश्वेश्वरानें स्नान करुन देवीसहवर्तमान विश्वेश्वराचें पूजन केलें आहे . " त्याचे पूर्वदिवशीं उपवास करावा . कारण , " नंतर स्वच्छ प्रातःकालीं मोठी अद्भुत पूजा करुन दंडपाणीचें मोठें वसतिस्थान अशा या वनामध्यें पारणा केली . " असें तेथेंच सांगितलें आहे . शिवरहस्यांतही - पूजा , जागर इत्यादिक सांगून सांगतात - " नंतर ते ऋषि अरुणोदय झाला असतां स्नान व भस्मस्नान हीं करुन संध्या समाप्त करुन माझी विश्वेश्वराची यथाविधि पूजा करुन माझ्या भक्तांला भोजन देऊन नंतर ऋषि भोजन करिते झाले . "

अत्रकार्तिकव्रतोद्यापनंपाद्मे कार्तिकमाहात्म्येउक्तम् ‍ अथोर्जव्रतिनः सम्यगुद्यापनविधिंशृणु ऊर्जशुक्लचतुर्दश्यांकुर्यादुद्यापनंव्रती तुलस्याउपरिष्टात्तुकुर्यान्मंडपिकांशुभाम् ‍ तुलसीमूलदेशेचसर्वतोभद्रमेवच तस्योपरिष्टात्कलशंपंचरत्नसमन्वितम् ‍ पूजयेत्तत्रदेवेशंसौवर्णंगुर्वनुज्ञया रात्रौजागरणंकुर्याद्गीतवाद्यादिमंगलैः ततस्तुपौर्णमास्यांवैसपत्नीकान्द्विजोत्तमान् ‍ त्रिंशन्मितानथैकंवास्वशक्त्यावानिमंत्रयेत् ‍ अतोदेवाइतिद्वाभ्यांजुहुयात्तिलपायसम् ‍ ततोगांकपिलांदद्यात्पूजयेद्विधिवद्गुरुमिति ।

या चतुर्दशीस कार्तिकव्रतांचें उद्यापन सांगतो - पद्मपुराणांत कार्तिकमाहात्म्यांत - " यानंतर कार्तिकव्रताचा उद्यापनविधि सांगतो , श्रवण कर ! कार्तिकव्रत करणारानें कार्तिक शुक्ल चतुर्दशीस त्या व्रताचें उद्यापन करावें . तुलसीवर सुंदर मंडप घालावा . तुलसीच्या मूलप्रदेशीं सर्वतोभद्र मंडल करुन त्याजवर पंचरत्नयुक्त कलश स्थापन करावा . त्या कलशावर गुरुच्या आज्ञेनें सुवर्णाच्या विष्णुप्रतिमेचें पूजन करावें . रात्रीं गीत , वाद्यें इत्यादिमंगल शब्दांनीं जागरण करावें . नंतर पौर्णिमेचे दिवशीं प्रातःकालीं उत्तम सपत्नीक अशा एकतीस ब्राह्मणांस अथवा आपणास शक्ति असेल तितक्या ब्राह्मणांस निमंत्रण द्यावें . ‘ अतोदेवा० ’ ‘ इदंविष्णु० ’ या दोन मंत्रांनीं तिलयुक्तपायसाचा होम करावा . नंतर कपिला गाय देऊन यथाविधि गुरुचें पूजन करावें . "

कार्तिकीपौर्णमासीपराग्राह्या अमापौर्णमास्यौपरेइतिदीपिकोक्तेः अत्रविशेषोहेमाद्रौब्राह्मे पुण्यामहाकार्तिकीस्याज्जीवेंद्वोः कृत्तिकासुच तथा आग्नेयंतुयदाऋक्षंकार्तिक्यांभवतिक्कचित् ‍ महतीसातिथिर्ज्ञेयास्नानदानेषुचोत्तमा यदातुयाम्यंभवतिऋक्षंतस्यांतिथौक्कचित् ‍ तिथिः सापिमहापुण्यामुनिभिः परिकीर्तिताप्राजापत्यंयदाऋक्षंतिथौतस्यांनराधिप सामहाकार्तिकीप्रोक्तादेवानामपिदुर्लभेति पाद्मे विशाखासुयदाभानुः कृत्तिकासुचचंद्रमाः सयोगः पद्मकोनामपुष्करेष्वतिदुर्लभः पद्मकंपुष्करेप्राप्यकपिलांयः प्रयच्छति सहित्वासर्वपापानिवैष्णवंलभतेपदम् ‍ यमः कार्तिक्यांपुष्करेस्नातः सर्वपापैः प्रमुच्यते माघ्यांस्नातः प्रयागेतुमुच्यतेसर्व किल्बिषैः अस्यामेवसायंकालेमत्स्यावतारोजात इत्युक्तंपाद्मेकार्तिकमाहात्म्ये वरान्दत्वायतोविष्णुर्मत्स्यरुप्यभवत्ततः तस्यांदत्तंहुतंजप्तंतदक्षय्यफलंस्मृतमिति अत्रत्रिपुरोत्सव उक्तोभार्गवार्चनदीपिकायाम् ‍ पौर्णमास्यांतुसंध्यायांकर्तव्यस्त्रिपुरोत्सवः दद्यादनेनमंत्रेणप्रदीपांश्चसुरालये कीटाः पतंगामशकाश्चवृक्षाजलेस्थलेयेविचरंतिजीवाः दृष्ट्वाप्रदीपंनचजन्मभागिनोभवंतिनित्यंश्वपचाहिविप्राः अत्रवृषोत्सर्गोतिप्रशस्तः तदुक्तंमात्स्ये कार्तिक्यांयोवृषोत्सर्गंकृत्वानक्तंसमाचरेत् ‍ शैवंपदमवाप्नोतिशिवव्रतमिदंस्मृतमिति अत्रकार्तिकेयदर्शनमुक्तंकाशीखंडे कार्तिक्यांकृत्तिकायोगेयः कुर्यात्स्वामिदर्शनम् ‍ सप्तजन्मभवेद्विप्रोधनाढ्योवेदपारगः इतिश्रीकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौद्वितीयपरिच्छेदेकार्तिकमासः ।

कार्तिकपौर्णमासी परा ( दुसर्‍यादिवसाची ) घ्यावी . कारण , " अमावास्या व पौर्णिमा परा घ्याव्या " असें दीपिकेंत सांगितलें आहे . या पौर्णिमेचे दिवशीं विशेष सांगतो हेमाद्रींत ब्राह्मांत - " गुरु व चंद्र कृत्तिकानक्षत्रास असतां पुण्यकारक महाकार्तिकी होते . " तसेंच - " जेव्हां कार्तिकी पौर्णिमेस कृत्तिकानक्षत्र कधीं असेल तर ती महातिथि जाणावी , ती स्नानदानाविषयीं उत्तम होय . जेव्हां कार्तिकपौर्णिमेस भरणीनक्षत्र क्कचित् ‍ असेल तेव्हां देखील ती तिथी महापुण्यकारक म्हणून मुनींनीं सांगितली आहे . जेव्हां रोहिणीनक्षत्र त्या पौर्णिमेस असेल तेव्हां ती महाकार्तिकी म्हटली आहे , ती देवांसही दुर्लभ होय . " पाद्मांत - " विशाखानक्षत्रास सूर्य व कृत्तिकानक्षत्रास चंद्र असा योग जेव्हां असेल तेव्हां तो पद्मक नांवाचा योग पुष्करतीर्थाचे ठायीं अतिदुर्लभ होय . पद्मकयोग पुष्करतीर्थाचे ठायीं प्राप्त असतां कपिला गाई जो देतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन विष्णुपदास जातो . " यम - " कार्तिकी पौर्णिमेस पुष्करतीर्थांत स्नान केलें असतां सर्व पापें जातात . माघी पौर्णिमेस प्रयागतीर्थांत स्नान केलें असतां सर्व पापांपासून मुक्त होतो . " या कार्तिकपौर्णिमेचे ठायींच सायंकालीं मत्स्यावतार झाला असें सांगतो - पद्मपुराणांत कार्तिकमाहात्म्यांत - " ज्या कारणास्तव ऋषींला वर देऊन कार्तिकी पौर्णिमेस विष्णु मत्स्यरुपी झाला म्हणून त्या तिथीचे ठायीं दान , होम , जप हे केले असतां अक्षय्य फल प्राप्त होतें . " या पौर्णिमेचे ठायीं त्रिपुरोत्सव सांगतो - भार्गवार्चनदीपिकेंत - " कार्तिकपौर्णिमेचे ठायीं संध्यासमयीं त्रिपुरोत्सव करावा . यापुढें सांगितलेल्या मंत्रानें देवालयामध्यें दीप लावावे . " तो मंत्रः - " कीटाः पतंगा मशकाश्च वृक्षा जले स्थले ये विचरंति जीवाः ॥ दृष्ट्वा प्रदीपं न च जन्मभगिनो भवंति नित्यं श्वपचा हि विप्राः ॥ " या पौर्णिमेचे ठायीं वृषोत्सर्ग करणें अति प्रशस्त होयः तें सांगतो - मत्स्यपुराणांत - " जो मनुष्य कार्तिकीपौर्णिमेस वृषोत्सर्ग करुन नक्त करील तो शिवपदास जाईल . कारण , हें शिवव्रत म्हटलें आहे . " या पौर्णिमेस कार्तिकेयस्वामीचें दर्शन सांगतो - काशीखंडांत - " कार्तिकी पौर्णिमेस कृत्तिकानक्षत्र असतां जो कार्तिकस्वामीचें दर्शन करील तो सात जन्मपर्यंत धनवान् ‍ आणि वेदपारंगत असा ब्राह्मण होईल . " इति कार्तिकमास समाप्त झाला .

N/A

References : N/A
Last Updated : June 20, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP