मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
भीष्मपंचक व्रत

द्वितीय परिच्छेद - भीष्मपंचक व्रत

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


कार्तिकशुक्लैकादश्यांभीष्मपंचकव्रतमुक्तंनारदीये अतोनरैः प्रयत्नेनकर्तव्यंभीष्मपंचकम् ‍ कार्तिकस्यामलेपक्षेस्नात्वासम्यग्यतव्रतः एकादश्यांतुगृह्णीयाद्व्रतंपंचदिनात्मकमिति तद्विधिस्तुगोमयेनस्नात्वामौनीपंचामृतैः पंचगव्यैर्विष्णुंसंस्नाप्यसंपूज्यपायसंनिवेद्यद्वादशाक्षरमष्टोत्तरशतंजप्त्वा ओंनमोविष्णव इतिषडक्षरेणघृताक्तान्यवान्व्रीहींश्चाष्टोत्तरशतंहुत्वाभूमौस्वपेत् ‍ एवंपंचदिनेषुकुर्यात् ‍ विशेषस्त्वाद्येऽह्निहरेः पादौकमलैः संपूज्यत्रिर्गोमयंप्राश्यम् ‍ द्वितीयेऽह्निबिल्वपत्रैर्जानुनीसंपूज्यगोमूत्रम् ‍ त्रयोदश्यांभृंगराजेननाभिंसंपूज्यक्षीरम् ‍ चतुर्दश्यांकरवीरैः स्कंधंसंपूज्यदधि पौर्णमास्यांहोमांतेलौहींपापप्रतिमांखड्गचक्रहस्तांकृष्णवस्त्रेणवेष्टितांप्रस्थतिलोपरिस्थांकृत्वाधर्मराजनामभिः करवीरैः संपूज्य यदन्यजन्मनिकृतमिहजन्मनिवापुनः तत्सर्वंप्रशमंयातुमत्पापंतवपूजनादितिपुष्पांजलिंक्षिप्त्वाकृष्णप्रतिमांचसंपूज्यविप्रायदत्वाविप्रान्संभोज्यदक्षिणांदत्वापंचगव्यंप्राश्यपौर्णमास्यांनक्तंभुंजीतेतिलघुनारदीये पंचगव्यप्राशनंषडक्षरेणेतिहेमाद्रिः हेमाद्रौभविष्येतु शाकैर्मुन्यन्नैर्वापंचाहंवर्तनमुक्तम् ‍ अंतेप्युक्तम् ‍ यद्भीष्मपंचकमितिप्रथितंपृथिव्यामेकादशीप्रभृतिपंचदशीनिरुद्धम् ‍ मुन्यन्नभोजनपरस्यनरस्यतस्मिन्निष्टंफलंदिशतिपांडवशार्ड्गधन्वेति तथापाद्मे पंचाहंपंचगव्याशीभीष्मायार्घ्यंच पंचसु अहः स्वपितथादद्यान्मंत्रेणानेनसुव्रत सत्यव्रतायशुचयेगांगेयायमहात्मने भीष्मायैतद्ददाम्यर्घ्यमाजन्मब्रह्मचारिणे वैयाघ्रपद्यगोत्रायेतिच सव्येनानेनमंत्रेणतर्पणंसार्ववर्णिकमिति ।

कार्तिकशुक्ल एकादशीस भीष्मपंचक व्रत सांगतो नारदीयपुराणांत - " मनुष्यांनीं प्रयत्नानें भीष्मपंचकव्रत करावें . व्रताचा चांगला निश्चय करुन कार्तिकशुक्ल पक्षाच्या एकादशीस स्नान करुन पांचदिवसांचें व्रत घ्यावें . " त्या व्रताचा विधि - गोमय अंगास लावून स्नान करुन मौन करुन पंचामृतें व पंचगव्यें यांनीं विष्णूला स्नान घालून पूजन करुन पायसाचा नैवेद्य अर्पण करुन द्वादशाक्षर मंत्राचा अष्टोत्तरशत ( १०८ ) जप करुन " ॐ नमो विष्णवे " या षडक्षर मंत्रानें घृतयुक्त यव व व्रीही यांचा अष्टोत्तरशत होम करुन भूमीवर निद्रा करावी . असें पांचदिवस व्रत करावें . आतां प्रतिदिवशीं विशेष म्हटला म्हणजे - पहिल्या दिवशीं हरीचे पाय कमलांनीं पुजून तीन वेळ गोमय प्राशन करावें . दुसर्‍य़ा दिवशीं बिल्वपत्रांनीं जानूंची पूजा करुन गोमूत्र भक्षण करावें . त्रयोदशीस भृंगराज ( माका ) यानें नाभीचें पूजन करुन दुग्ध प्राशन करावें . चतुर्दशीस करवीर ( कह्णेर ) पुष्पांनीं स्कंधांची पूजा करुन दधि प्राशन करावें . पौर्णिमेस होम झाल्यावर लोखंडाची पापाची प्रतिमा खड्गचक्रयुक्त हस्ताची करुन कृष्णवस्त्रानें वेष्टित करुन प्रस्थ ( शास्त्रीय शेर ) प्रमाण तिलांवर ठेऊन धर्मराज्याच्या नामांनीं करवीरपुष्पांनीं पूजा करुन " यदन्यजन्मनि कृतमिह जन्मनि वा पुनः ॥ तत्सर्वं प्रशमं यातु मत्पापं तव पूजनात् ‍. " या मंत्रानें पुष्पांजलि देऊन कृष्णप्रतिमेचेंही पूजन करुन ब्राह्मणाला तिचें दान करुन ब्राह्मणभोजन घालून दक्षिणा देऊन पंचगव्य प्राशन करुन पौर्णमासीच्या दिवशीं नक्त ( रात्रि ) भोजन करावें . असें हें व्रत लघुनारदीयांत सांगितलें आहे . पंचगव्य प्राशन षडक्षरमंत्रानें करावें , असें हेमाद्रि सांगतो . हेमाद्रींत भविष्यपुराणांत तर - शाक भक्षण करुन किंवा मुनींचीं अन्नें , देवभात वगैरे भक्षण करुन हें पंचदिनात्मक व्रत करावें , असें सांगितलें आहे . याप्रमाणें व्रत सांगून अंतींही असें सांगतो कीं , - " एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत करावयाचें म्हणून जें भीष्मपंचक व्रत पृथ्वीवर प्रसिद्ध आहे त्या व्रताचेठायीं मुन्यन्न भक्षण करणार्‍या मनुष्याला शार्ड्गधन्वा भगवान् ‍ इष्ट फल देतो . " तसेंच पाद्मांत - " पांच दिवस पंचगव्य प्राशन करुन राहावें व पांचही दिवस या पुढील मंत्रानें भीष्माला अर्घ्य द्यावें . " अर्घ्यमंत्रः - " सत्यव्रताय शुचये गांगेयाय महात्मने ॥ भीष्मायैतद्ददाम्यर्घ्यमाजन्मब्रह्मचारिणे . " आणि " वैयाघ्रपद्यगोत्राय सांकृत्यप्रवराय च ॥ गंगापुत्राय भीष्माय प्रदास्येहं तिलोदकं ॥ हा मंत्र म्हणून सव्यानें तर्पण सर्व वर्णांनीं करावें . "

कार्तिशुक्लद्वादश्यांरेवतीनक्षत्रयोगरहितायांपारणंकार्यम् ‍ तदुक्तम् ‍ आभाकासितपक्षेषुमैत्रश्रवणरेवती संगमेनहिभोक्तव्यंद्वादशद्वादशीर्हरेदिति यदातुरेवतीयोगरहिताद्वादशीसर्वथानलभ्यतेतदारेवत्याश्चतुर्थपादंवर्जयेत् ‍ वचनंतुप्रागुक्तम् ‍ लघुनारदीये कार्तिकेशुक्लपक्षस्यकृत्वाचैकादशींनरः प्रातर्दत्वाशुभान्कुंभान्प्रयातिहरिमंदिरम् ‍ मदनरत्नेवाराहे एकादशीसोमयुक्ताकार्तिकेमासिभामिनि उत्तराभाद्रसंयोगेअनंतासाप्रकीर्तिता तस्यांयत्क्रियतेभद्रेसर्वमानंत्यमश्नुते ।

कार्तिकशुक्ल द्वादशीचे दिवशीं पारणा करणें ती रेवतीनक्षत्ररहित द्वादशीचे ठायीं करावी . तेंच सांगतो - " आषाढ , भाद्रपद , कार्तिक यांच्या शुक्लपक्षांतील द्वादशींस अनुक्रमानें अनुराधा , श्रवण , रेवती ह्या नक्षत्रांच्या योगावर भोजन करुं नये ; केलें तर बारा द्वादशींचें पुण्य जातें . " जेव्हां रेवतीयोगरहित द्वादशी सर्वथा मिळणार नाहीं तेव्हां रेवतीचा चतुर्थ चरण सोडावा . याविषयीं वचन तर पूर्वीं ( आषाढशुक्लद्वादशीपारणाप्रसंगीं ) सांगितलें आहे . लघुनारदीयांत - " कार्तिकशुक्ल एकादशी करुन प्रातःकालीं शुभ उदकुंभ देणारा वैकुंठास जातो . " मदनरत्नांत वाराहांत - " कार्तिकमासाची एकादशी सोमवार व उत्तराभाद्रपदा नक्षत्र यांनीं युक्त असतां ती अनंता म्हटली आहे . तिचे ठायीं जें व्रतादि केलें असेल तें सर्व अनंत होतें . "

अस्यामेवरात्रौदेवोत्थापनमुक्तंहेमाद्रौबाह्मे एकादश्यांचशुक्लायांकार्तिकेमासिकेशवम् ‍ प्रसुप्तंबोधयेद्रात्रौश्रद्धाभक्तिसमन्वित इति मदनरत्नेभविष्ये कार्तिकेशुक्लपक्षेतुएकादश्यांपृथासुत मंत्रेणानेनराजेंद्रदेवमुत्थापयेद्दिजः रामार्चनचंद्रिकादौतुद्वादश्यामुक्तम् ‍ पारणाहेपूर्वरात्रेघंटादीन्वादयेन्मुहुरिति अत्रदेशाचारतोव्यवस्था तत्रैवदेवदेवस्यस्नानंपूर्वंमहद्भवेत् ‍ महापूजांततः कृत्वादेवमुत्थापयेत्सुधीः मंत्रास्तुवाराहपुराणेउक्ताः ॐब्रह्मेंद्ररुद्राग्निकुबेरसूर्यसोमादिभिर्वंदितवंदनीय बुध्यस्वदेवेशजगन्निवासमंत्रप्रभावेणसुखेनदेव इयंतुद्वादशीदेवप्रबोधार्थंविनिर्मिता त्वयैवसर्वलोकानांहितार्थंशेषशायिना उत्तिष्ठोत्तिष्ठगोविंदत्यजनिद्रांजगत्पते त्वयिसुप्तेजगन्नाथजगत्सुप्तंभवेदिदम् ‍ उत्थितेचेष्टतेसर्वमुत्तिष्ठोत्तिष्ठमाधव गतामेघावियच्चैवनिर्मलंनिर्मलादिशः शारदानिचपुष्पाणिगृहाणममकेशव इदंविष्णुरितिप्रोक्तोमंत्र उत्थापनेहरेरिति एवंदेवमुत्थाप्यतदग्रेचातुर्मास्यव्रतसमाप्तिंकुर्यात् ‍ तदुक्तंभारते चतुर्धागृह्यवैचीर्णंचातुर्मास्यव्रतंनरः कार्तिकेशुक्लपक्षेतुद्वादश्यांतत्समापयेत् ‍ लघुनारदीये चातुर्मास्यव्रतानांचसमाप्तिः कार्तिकेस्मृता मंत्रश्चनिर्णयामृतेसनत्कुमारेणोक्तः इदंव्रतंमयादेवकृतंप्रीत्यैतवप्रभो न्यूनंसंपूर्णतांयातुत्वत्प्रसादाज्जनार्दनेति ।

याच एकादशीस रात्रीं देवोत्थापन ( देवास जागृत करणें ) सांगतो - हेमाद्रींत ब्राह्मांत " निजलेल्या भगवंताला कार्तिकशुक्ल एकादशीचे दिवशीं रात्रीं श्रद्धा व भक्तियुक्त होऊन उठवावें . " मदनरत्नांत भविष्यांत - " कार्तिकशुक्ल एकादशीचे दिवशीं ब्राह्मणानें पुढील मंत्रानें देवाला जागृत करावें . " रामार्चनचंद्रिकादिग्रंथांत तर द्वादशीचे दिवशीं जागृत करणें सांगितलें आहे . तें असें - " पारणादिवशीं पूर्वरात्रीं वारंवार घंटादिक वाजवावीं . " वरील वचनांवरुन एकादशीस प्रबोधोत्सव करावा , असें होतें , आणि रामार्चनचंद्रिकेवरुन द्वादशीस करावा , असें होतें , आतां करावा कधीं म्हणाल तर ज्या देशांत जसा आचार असेल तसा करावा . त्या उत्थापनसमयींच देवाला पूर्वीं मोठें स्नान घालावें नंतर महापूजा करुन देवाला उठवावें . " मंत्र तर वराहपुराणांत सांगितले आहेत . ते असेः - " ब्रह्मेंद्ररुद्राग्नि कुबेरसूर्यसोमादिभिर्वंदित वंदनीय ॥ बुध्यस्व देवेश जगन्निवास मंत्रप्रभावेण सुखेन देव ॥ इयं तु द्वादशी देव प्रबोधार्थं विनिर्मिता ॥ त्वयैव सर्वलोकानां हितार्थं शेषशायिना ॥ उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद त्यज निद्रां जगत्पते ॥ त्वयि सुप्ते जगन्नाथ जगत्सुप्तं भवेदिदम् ‍ ॥ उत्थिते चेष्टते सर्वमुत्तिष्ठोत्तिष्ठ माधव ॥ गता मेघा वियच्चैव निर्मलं निर्मला दिशः ॥ शारदानि च पुष्पाणि गृहाण मम केशव . " " इदं विष्णु० हा मंत्रही भगवंताच्या उत्थापनाविषयीं सांगितला आहे . " याप्रमाणें देवाला उठवून त्याच्या पुढें चातुर्मास्यव्रतांची समाप्ति करावी . तें सांगतो - भारतांत - " आषाढांत चारप्रकारचें व्रत घेऊन आचरण केलें असेल त्याची समाप्ति कार्तिकशुक्ल द्वादशीस करावी . " लघुनारदीयांत - " चातुर्मास्यव्रतांची समाप्ति कार्तिकमासांत सांगितली आहे . " त्याचा मंत्र निर्णयामृतांत सनत्कुमारानें सांगितला , तो असा - " इदं व्रतं मया देव कृतं प्रीत्यै तव प्रभो ॥ न्यूनं संपूर्णतां यातु त्वत्प्रसादाज्जनार्दन . "

N/A

References : N/A
Last Updated : June 19, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP