मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
मकरसंक्रांती

द्वितीय परिच्छेद - मकरसंक्रांती

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


मकरसंक्रांतौहेमाद्रिमतेपरतश्चत्वारिंशद्धटिकाः पुण्याः त्रिंशत्कर्काटकेनाड्योमकरेतुदशाधिकाइतिब्रह्मवैवर्तात् ‍ माधवमतेतुविंशतिः त्रिंशत्कर्काटकेपूर्वामकरेविंशतिः परेतिवृद्धवसिष्ठोक्तेः यदातुसूर्यास्तात्पूर्वंसंक्रांतिर्भवतितदोभयमतेपूर्वमेवपुण्यकालः रात्रौतुप्रदोषेनिशीथेवामकरसंक्रमेमाधवमतेद्वितीयदिनएवपुण्यम् ‍ यद्यस्तमयवेलायांमकरंयातिभास्करः प्रदोषेवार्धरात्रेवास्नानंदानंपरेहनीतिवृद्धगार्ग्यवचनात् ‍ अस्तमयंप्रदोषः प्रदोषेपूर्वरात्रे कार्मुकंतुपरित्यज्यझषसंक्रमतेरविः प्रदोषेवार्धरात्रेवास्त्रानंदानंपरेऽहनीतिभविष्योक्तेश्च तदाभोगः परेहनीतिहेमाद्रौपाठः कालादर्शनिर्णयामृतमदनपारिजातादयोप्येवमूचुः दाक्षिणात्याश्चैतदेवाद्रियते यत्तुहेमाद्रिणाऽऽद्योवाशब्दोयथार्थे द्वितीयस्तथार्थे यथाप्रदोषेपूर्वेद्युस्तथार्धरात्रेपरेऽह्नीत्युक्तम् ‍ तस्मैनमोस्तु तेनपरेऽह्निपुण्यंवक्तुंप्रदोषेइति दिनद्वयेपुण्यनिरासार्थंअर्धरात्रग्रहणम् ‍ हेमाद्रिस्मृत्यर्थसारानंतभट्टादिमतेतुनिशीथात्पूर्वंपश्चाच्चसंक्रांतौपूर्वदिनेपरदिनेवापुण्यं धनुर्मीनावतिक्रम्यकन्यांचमिथुनंतथा पूर्वापरविभागेनरात्रौसंक्रमणंयदा दिनांतेपंचनाड्यस्तुतदापुण्यतमाः स्मृताः उदयेपितथापंचदैवेपित्र्येचकर्मणीतिस्कांदवचनात् ‍ पूर्वापरविभागेनेतिमकरकर्कभिन्नविषयम् ‍ पूर्वोक्तवचोविरोधादितिमदनरत्नेउक्तम् ‍ षडशीतिमुखेऽतीतेअतीतेचोत्तरायणे इत्यादिविरोधाच्च तेनपूर्वैकवाक्यतयाऽयमर्थः रात्रौपूर्वभागेमकरसंक्रमेपरेऽह्निउदयेपंचनाड्यः पुण्याः रात्रावपरभागेकर्कसंक्रमेपूर्वदिनांतेपंचनाड्य इति एवंसर्वेषामविरोधः मकरेसामान्येनपरदिनेपुण्यत्वेपिपुण्यातिशयार्थमिदम् ‍ ।

मकरसंक्रांतीचे ठायीं हेमाद्रीच्या मतीं पुढच्या चाळीस घटिका पुण्यकाळ . कारण , " कर्कसंक्रांतीचे ठायीं तीस घटिका पुण्यकाळ . आणि मकराचे ठायीं दहा घटिका अधिक पुण्यकाळ " असें ब्रह्मवैवर्त वचन आहे . माधवाच्या मतीं तर मकराचे ठायीं वीस घटिका पुण्यकाळ . कारण , " कर्कसंक्रांतीचेठायीं पहिल्या तीस घटिका आणि मकराचेठायीं पुढच्या वीस घटिका पुण्यकाळ . " असें वृद्धवसिष्ठाचें वचन आहे . ज्या वेळीं सूर्याच्या पूर्वीं दिवसा संक्रांत होते त्या वेळीं दोघांच्या ( हेमाद्रीच्या व माधवाच्या ) मतीं पूर्वीच पुण्यकाळ . आतां रात्रीं संक्रांत झाली तर मग ती प्रदोषकालीं झालेली असो किंवा मध्यरात्रीं झालेली असो , मकरसंक्रांतीचे ठायीं माधवाच्या मतीं दुसर्‍या दिवशींच पुण्यकाळ . कारण , " जर प्रदोषकालीं किंवा पूर्वरात्रीं अथवा मध्यरात्रीं सूर्य मकरास जाईल तर स्नान व दान परदिवशीं करावें " असें वृद्धगार्ग्यवचन आहे . ह्या वचनांतील ‘ अस्तमय ’ शब्दाचा अर्थ प्रदोष , आणि ‘ प्रदोष ’ शब्दाचा अर्थ पूर्वरात्र समजावा . आणि ‘ प्रदोषकालीं अथवा अर्धरात्रीं सूर्य धनुःसंक्रांतीला सोडून मकरास गेला तर स्नान , दान परदिवशीं करावें " असें भविष्यपुराणवचनही आहे . ‘ स्नानं दानं परेऽहनि ’ या स्थानीं ‘ तदा भोगः परेहनि ’ असा हेमाद्रींत पाठ आहे . अर्थ - त्या वेळीं भोगी परदिवशीं करावी . कालादर्श , निर्णयामृत , मदनपारिजात इत्यादिक ग्रंथकारही असेंच सांगते झाले . दाक्षिणात्य लोक हेंच मत ( परदिवशींच पुण्यकाळ ) घेतात . आतां जें हेमाद्रीनें सांगितलें कीं , ‘ प्रदोषे वाऽर्धरात्रे वा ’ या ठिकाणचा पहिला ‘ वा ’ शब्द ‘ यथा ’ शब्दाच्या अर्थी आहे , व दुसरा ‘ वा ’ शब्द ‘ तथा ’ शब्दाच्या अर्थीं आहे , म्हणजे जसा प्रदोषकालीं संक्रांत असतां पूर्वदिवशीं पुण्यकाळ तसा अर्धरात्रीं संक्रांत असतां परदिवशीं पुण्यकाळ ; असें सांगितलें , त्या हेमाद्रीला नमस्कार असो . वाशब्दाचा असा अर्थ करणें बरोबर नसल्यामुळें प्रदोषकालीं संक्रांत झाली असतां इतर वचनानें अप्राप्त असा परदिवशीं पुण्यकाल सांगण्याकरितां ‘ प्रदोष ’ या पदाचें ग्रहण केलें आहे . अर्धरात्रीं संक्रांत असतां इतर सामान्य वचनांनीं दोन दिवस ( पूर्व व पर ) पुण्यकाल प्राप्त झाला त्याच्या निराकरणार्थं ‘ अर्धरात्र या पदाचें ग्रहण केलें आहे . हेमाद्रि , स्मृत्यर्थसार , अनंतभट्ट इत्यादिकांच्या मतीं तर मध्यरात्रीच्या पूर्वी व पश्चात् ‍ संक्रांत झाली असतां पूर्वदिवशीं किंवा परदिवशीं पुण्यकाळ . कारण , " धनु , मीन , कन्या , मिथुन या संक्रांतीला सोडून पूर्वरात्रीं किंवा अपररात्रीं जर पुढच्या संक्रांतींस ( मकर , मेष , तूळ , कर्क यांस ) सूर्य जाईल तर पूर्वदिवसाचे अंतीं पांच घटिका व पर दिवसाचे उदयीं तशाच पांच घटिका दैव पित्र्य कर्माविषयीं पुण्यकाळ सांगितला आहे " असें स्कांदवचन आहे . आतां ‘ पूर्वरात्रीं व अपररात्रीं ’ असें जें म्हटलें तें मकर व कर्क यांवांचून इतरविषयक आहे . कारण , पूर्वी सांगितलेल्या ‘ प्रदोषे वार्धरात्रे वा स्नानं दानं परेहनि ’ या वचनाशीं विरोध येतो ; असें मदनरत्नांत सांगितलें आहे . आणि ‘ षडशीतिमुख व उत्तरायण अतिक्रांत असतां पुण्यकाळ नाहीं ’ इत्यादि वचनांचा विरोध येतो . तेणेंकरुन ‘ प्रदोषे वार्धरात्रे वा ’ या पूर्ववचनाची व ‘ पूर्वापरविभागेन ’ ह्या वचनाची एकवाक्यता ( एक अन्वय ) करुन असा अर्थ होतो कीं , रात्रीच्या पूर्वभागीं मकरसंक्रांत झाली असतां परदिवशीं उदयकालीं पांच घटिका पुण्यकाळ . आणि रात्रीच्या अपरभागीं कर्क संक्रांत झाली असतां पूर्व दिवसाचे अंतीं पांच घटिका पुण्यकाळ , असा अर्थ केला म्हणजे सर्व वाक्यांचा विरोध येत नाहीं . मकराचे ठायीं वरील वचनांनीं सामान्यतः पुढचा दिवस पुण्यकाळ सांगितला तरी अतिशय पुण्य पांच घटिका , असें सांगण्याकरितां हें वचन आहे .

यत्तु देवलयज्ञपार्श्वौ आसन्नसंक्रमंपुण्यंदिनार्धंस्नानदानयोः रात्रौसंक्रमणेभानोर्विषुवत्ययनेदिवेति अत्रमाधवः अयनेदिवाजातेतदर्धंपुण्यम् ‍ कर्केपूर्वंमकरेंऽत्यम् ‍ एतन्मध्यंदिनायनपरमिति हेमाद्रिस्तु रात्रौविषुवत्यासन्नदिनार्धंपुण्यम् ‍ अयनेत्वासन्नदिनंपुण्यम् ‍ दिनेइतिपाठेउभयत्रदिनार्धंपुण्यमित्याह एतदेवोक्तंदीपिकायाम् ‍ अथायनमधः पश्चान्निशीथाद्भवेद्यद्यासन्नमहस्तदर्धमथवापुण्यमिति तत्त्वंतु आसन्नसंक्रममित्यस्यविषुवत्येवान्वयः अयनेरात्रौसतिदिनेपुण्यम् ‍ कस्मिन्नित्यपेक्षायांकर्केपूर्वेऽह्निमकरेऽपरेह्निइतिवाक्यांतरवशादर्थेउच्यमानेनकोपिविरोधः यत्त्वनंतभट्टः अथसंक्रमणंभानोर्निशीथात्प्राग्यदाभवेत् ‍ अयनंविषुवंतत्रप्राग्दिनांतिमनाडिकाः पंचपुण्यतमाः पश्चान्निशीथाच्चेद्भवेत्तथा आद्याः परदिनस्यापितद्वदित्येषनिर्णय इति अपरार्केप्येवम् ‍ अस्तंगतेयदासूर्येझषंयातिदिवाकरः प्रदोषेवार्धरात्रेवातदापुण्यंदिनद्वयमितिबौधायनवचनाद्दिनद्वयंवापुण्यकालः तदापुण्यंदिनांतरमितिमदनरत्नेपाठः गुर्जरप्राच्योदीच्यास्त्विदमेवाद्रियंते अत्रापिपूर्ववव्द्याख्येयम् ‍ तिथितत्त्वादयोगौडग्रंथास्तुप्रदोषार्धरात्रभिन्नेरात्रेः पूर्वभागेपूर्वदिनेपरभागेचपरदिनेपुण्यमन्यसंक्रांतिवद्विशिष्यतयोर्निर्देशात् ‍ प्रदोषश्च प्रदोषोऽस्तमयादूर्ध्वंघटिकाद्वयमिष्यते इतिवत्सोक्त इत्याहुः तन्न अस्तंगत इतित्रितयवैयर्थ्यापत्तेः अतः प्रदोषपदेनतद्भिन्नैवरात्रिरुच्यते अतएवयावन्नोदयते रविरितिवृद्धगार्ग्यादिभिर्दक्षिणायनेपूर्वरात्रौसंक्रमेपूर्वदिनमुक्तम् ‍ वत्सोक्तिरप्यध्ययनादिपरा इहतुत्रिमुहूर्त एवप्रदोषः ।

आतां जें देवल यज्ञपार्श्व सांगतात - " संक्रांतीच्या जवळचें दिवसाचें अर्ध स्नानदानांविषयीं पुण्य आहे . रात्रीं विषुव ( मेष , तुला ) संक्रांत असतां व अयन ( मकर , कर्क ) असतां दिवसा पुण्यकाळ . " येथें माधव - अयनसंक्रांति दिवसा झाली असतां दिवसाचें अर्ध पुण्यकाळ . त्यांत कर्कसंक्रांत असतां पहिलें अर्ध आणि मकर असतां पुढचें अर्ध पुण्य . हें सांगणें दोनप्रहरीं अयनसंक्रांत असतां तद्विषयक समजावें , असें सांगतो . हेमाद्रि तर - रात्रीं विषुवसंक्रांत असतां जवळचे दिवसाचें अर्ध पुण्य . आणि अयनसंक्रांत रात्रीं असेल तर जवळचा दिवस पुण्यकाळ . वरील वचनांत ‘ अयने दिने ’ असा पाठ असतां दोन्ही ठिकाणीं ( विषुवसंक्रांती व अयनसंक्रांतीचे ठायीं ) दिवसाचें अर्ध पुण्यकाळ असें सांगतो . हेंच सांगतो - दीपिकेंत - " मध्यरात्रींच्या आंत किंवा बाहेर अयनसंक्रांति होईल तर जवळचा दिवस किंवा जवळच्या दिवसाचें अर्ध पुण्यकाळ . " खरा प्रकार म्हटला तर - वरील देवल - यज्ञपार्श्ववचनांत ‘ आसन्नसंक्रमं ’ याचा अन्वय ‘ विषुवति ’ याजकडेसच करावयाचा आहे . म्हणजे रात्रीं विषुवसंक्रांति झाली असतां जवळचें दिनार्ध पुण्य , असा अर्थ . आणि रात्रीं अयनसंक्रांति झाली असतां दिवसा पुण्य . आतां कोणत्या दिवशीं अशी आकांक्षा झाली असतां कर्काचे ठायीं पूर्वदिवशीं व मकराचे ठायीं परदिवशीं , असा इतर वाक्यानुरोधानें अर्थ केला असतां कोणताही विरोध येत नाहीं . आतां जें अनंतभट्ट सांगतो कीं , " ज्या वेळीं सूर्याची अयन किंवा विषुव संक्रांति मध्यरात्रीच्या पूर्वीं होईल त्यावेळीं पूर्व दिवसाच्या शेवटच्या पांच घटिका पुण्यकाळ . आणि मध्यरात्रीच्या पुढें होईल त्या वेळीं पुढच्या दिवसाच्या तशाच पहिल्या पांच घटिका पुण्यकाळ , हा निर्णय समजावा . " अपरार्कांतही असेंच आहे . " ज्या वेळीं सूर्य अस्तंगत असतां मकरास जातो किंवा प्रदोषकाळीं अथवा अर्धरात्रीं मकरास जातो त्या वेळीं पूर्व व पर दोनदिवशीं पुण्यकाळ . " ह्या बौधायनवचनावरुन अथवा दोन दिवस पुण्यकाळ . ‘ तदा पुण्यं दिनद्वयं ’ या ठिकाणीं ‘ तदा पुण्यं दिनांतरं ’ असामदनरत्नांत पाठ आहे गुर्जर , प्राच्य व उदीच्य लोक तर हेंच मत स्वीकारितात . या अनंतभट्टादि मताची देखील पूर्वींप्रमाणें ( म्हणजे रात्रीं कर्कसंक्रांति असतां पूर्वदिवशीं व मकर असतां परदिवशीं पुण्यकाळ अशी ) व्याख्या करावी . तिथितत्त्व - इत्यादि गौड ग्रंथकार तर - प्रदोष व अर्धरात्र वर्ज्य करुन रात्रीच्या पूर्वभागीं संक्रांत असतां पूर्वदिवशीं पुण्य , आणि रात्रीच्या परभागीं संक्रांत असतां परदिवशीं पुण्य ; इतर संक्रांतीप्रमाणें समजावें . आणि प्रदोषीं किंवा मध्यरात्रीं दोन दिवस पुण्यकाळ . कारण , विशेषेंकरुन प्रदोष व अर्धरात्र यांचें ग्रहण वरील वचनांत आहे . प्रदोष म्हणजे ‘ अस्तानंतर दोन घटिका प्रदोषकाळ आहे ’ या वत्सवचनानें सांगितलेला प्रदोषकाळ समजावा , असें सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , त्याच वचनांत ‘ अस्तंगते ’ हें तिसरें पद व्यर्थ होईल . म्हणून ‘ प्रदोष ’ या पदानें प्रदोषभिन्नच पूर्व रात्रि समजावी . म्हणूनच - " जोपर्यंत सूर्याचा उदय झाला नाहीं तोंपर्यंत संक्रांत असतां " ह्या वृद्धगाग्यादि वचनांनीं दक्षिणायनाचे ठायीं ( कर्काचे ठायीं ) पूर्वरात्रीं संक्रांत असतां पूर्व दिवस पुण्यकाळ सांगितला आहे . वत्सानें सांगितलेला प्रदोष तो देखील अध्ययनादिविषयक आहे . या ठिकाणीं तर तीन मुहूर्तच प्रदोष समजावा .

मकरेदानविशेषोहेमाद्रौस्कांदे धेनुंतिलमयींराजन्दद्याद्यश्चोत्तरायणे सर्वान्कामानवाप्नोतिविंदतेपरमंसुखम् ‍ विष्णुधर्मे उत्तरेत्वयनेविप्रावस्त्रदानंमहाफलम् ‍ तिलपूर्णमनड्वाहंदत्वारोगैः प्रमुच्यते व इति शिवरहस्येपि तस्यांकृष्णातिलैः स्नानंकार्यंचोद्वर्तनंशुभैः तिलादेयाश्चविप्रेभ्यः सर्वदैवोत्तरायणे तिलतैलेनदीपाश्चदेयाः शिवगृहेशुभाः कल्पतरौकालिकापुराणे होमंतिलैः प्रकुर्वीतसर्वदैवोत्तरायणे तान्योदेवायविप्रेभ्योहाटकेनसमंददेत् ‍ उत्तरायणमासाद्यनरः कस्मात्सशोचति तथा मकरेरात्रावपिश्राद्धादिभवतीत्युक्तंप्राक् ‍ ।

मकरसंक्रांतीचे ठायीं विशेष दान सांगतो हेमाद्रींत स्कांदांत - ‘‘ जो मनुष्य उत्तरायणांत तिलमय धेनूचें दान करितो त्याला सर्व काम प्राप्त होतात व तो परमसुख पावतो . " विष्णुधर्मांत - " उत्तरायणसमयीं वस्त्रदान मोठें फल देणारें आहे . तिळांच्या वृषभाचें दान केलें असतां रोगांपासून मुक्त होतो . " शिवरहस्यांतही - " मकरसंक्रांतीचे ठायीं चांगले काळे तीळ वाटून अंगास लावून तिलयुक्त उदकानें स्नान करावें . उत्तरायणसंक्रांतीचे ठायीं सर्वदा ब्राह्मणास तीळ द्यावे . शिवमंदिरांत तिळांच्या तेलाचे दीप सुंदर लावावे " कल्पतरुंत कालिकापुराणांत - " उत्तरायणांत सर्वदा तिळांनीं होम करावा . जो मनुष्य उत्तरायण प्राप्त असतां देवाला व ब्राह्मणांना सुवर्णसहित तीळ देईल त्याला शोक कां होईल ! अर्थात् ‍ त्याला शोक होणार नाहीं . " तसेंच मकरसंक्रांतीचे ठायीं रात्रीं देखील श्राद्धादिक होतें , असें पूर्वीं प्रथमपरिच्छेदांत सांगितलें आहे .

माघामायांयोगविशेषोर्धोदयः प्रागेवोक्तः माघकृष्णचतुर्दश्यांयमतर्पणमुक्तंहेमाद्रौयमेन अनर्काभ्युदितेकालेमाघकृष्णचतुर्दशीम् ‍ स्नातः संतर्प्यतुयमंसर्वपापैः प्रमुच्यत इति ।

माघी अमावास्येस ( शुक्लपक्षादि मासानें पौषी अमावास्येस ) अर्धोदय योग होत असतो त्याचा निर्णय येथेंच पूर्वीं पौषमासांत सांगितला आहे . माघ कृष्णचतुर्दशीस यमतर्पण सांगतो हेमाद्रींत यम - " माघकृष्णचतुर्दशीस पहांटेस उठून सूर्योदयाचे पूर्वीं स्नान करुन यमाचें तर्पण करणारा सर्व पापांपासून मुक्त होतो . "

N/A

References : N/A
Last Updated : June 21, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP