मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद| उत्सर्जन द्वितीय परिच्छेद तिथिनिर्णयः दशावतारजयंत्या चैत्रशुक्लपंचमी दमनारोपणविधि अनंगव्रत वैशाखमास परशुरामजयंती नृसिंहजयंती वैशाखपौर्णमासी ज्येष्ठमास वटसावित्रीव्रत आषाढमास चातुर्मास्यव्रत श्रावणमास नदींस रजोदोष श्रावणशुक्ल तृतीया उपाकर्म ( श्रावणी ) श्रावणांत ओषधी कर्मकाल उत्सर्जन कार्ष्णाजिनि भाद्रपद जन्माष्टमी अष्टमीचे भेद भाद्रपद अमावास्या भाद्रपदशुक्ल तृतीया वरदचतुर्थी ऋषिपंचमी सूर्यषष्ठी दूर्वाष्टमी भाद्रपदशुक्ल द्वादशी श्रवणद्वादशी श्रवणद्वादशीव्रत वामनव्रत अनंतव्रत अगस्त्यार्घ्य आश्विनमास महालयश्राद्ध श्राद्ध गौणकाल महालयश्राद्धाच्या देवता महालक्ष्मीव्रत अन्वष्टकाश्राद्ध नवमीश्राद्ध त्रयोदशीश्राद्ध चतुर्दशीश्राद्ध मातामहश्राद्ध देवीनवरात्र देवीपूजा वैधृति योग कुमारींची पूजा नवरात्रांत वेदपारायण आशौचांत विशेष षष्ठी देवीत्रिरात्र देवीचे मूर्तिस्थापनाविषयीं सप्तमीपूजाविधि महाष्टमी विष्णुधर्मोत्तरांतील मंत्र सिंहासनमंत्र होमाविषयीं विशेष प्रकार शतचंडीविधान सहस्रचंडीविधान नवरात्रपारणानिर्णय विजयादशमी आश्विनपौर्णमा कार्तिकमासकृत्यें तुलसीकाष्ठमालाधारण कार्तिकमासांत ग्राह्य पदार्थ करकचतुर्थी यमतर्पण गोक्रीडन बलिप्रतिपदा युगादि तिथि भीष्मपंचक व्रत बोधिनीविधि वैकुंठचतुर्दशी मार्गशीर्षमासकृत्यें नागपूजा चंपाषष्ठी पिशाचमोचनी तीर्थ दत्तात्रेयाचा अवतार अष्टकाश्राद्ध काम्यव्रत पौषमासकृत्यें अर्धोदय योग माघमासांतील कृत्यें मकरसंक्रांती तिलचतुर्थी रथसप्तमी भीष्माष्टमी कुंभसंक्रांती शिवरात्रिनिर्णय प्रतिमासशिवरात्रिव्रत युगादि अमावास्या होलिकोत्सव वसंतोत्सव द्वितीय परिच्छेद - उत्सर्जन निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे. Tags : nirnay sindhupustakग्रंथनिर्णयसिंधु उत्सर्जन Translation - भाषांतर आतां प्रसंगेंकरुन इथेंच उत्सर्जन सांगतों.अथप्रसंगादत्रैवोत्सर्जनमुच्यते तच्चपौषमासेरोहिण्यांतत्कृष्णाष्टम्यांवाकार्यं पौषमासस्यरोहिण्यामष्टकायामथापिवा जलांतेछंदसांकुर्यादुत्सर्गंविधिवद्बहिरितियाज्ञवल्क्योक्तेः श्रावण्यांप्रौष्ठपद्यांवोपाकृतौक्रमेणपौषशुक्लप्रतिपदिमाघशुक्लप्रतिपदिवाकार्यं अर्धपंचमान्मासानधीयीतेतितेनैवोक्तेः अर्धः पंचमोयेषु सार्धचतुर इत्यर्थः यत्तुहारीतः अर्धपंचमान्मासानधीत्योर्ध्वमुत्सृजेत् पंचार्धषष्ठान्वेतितदाषाढ्युपाकर्मविषयं बौधायनास्तु पौष्यांमाघ्यांवाकुर्युः पौष्यांमाघ्यांचोत्सृजेदितितत्सूत्रात् तैत्तिरीयैस्तु तैष्यांकार्यं तैष्यांपौर्णमास्यांरोहिण्यांवाविरमेदितितत्सूत्रात् बह्वृचैस्तुमाघ्यांकार्यं अध्यायोत्सर्जनंमाघ्यांपौर्णमास्यांविधीयत इतिकारिकोक्तेः कातीयास्तुभाद्रपदेकुर्युः उत्सर्गश्चेतिनंदादितिथ्यांप्रौष्ठपदेपिवेतिकात्यायनोक्तेः सामगास्तुसिंहार्केपुष्येकुर्युः तथाचसिंहेरवौत्वितिगार्ग्यवचनंपूर्वमुक्तं सर्वैरुपाकर्मदिनेवाकार्यं पुष्येतूत्सर्जनंकुर्यादुपाकर्मदिनेथवेतिहेमाद्रौखादिरगृह्योक्तेः यदासिंहस्थेसूर्येसतितन्मध्यस्थहस्तनक्षत्रात्प्राक्पुष्यः कर्कटस्थोभवति तदातस्मिन्पुष्येउत्सर्गंकृत्वातदुत्तरहस्तेउपाकर्मसामगाः कुर्यः मासेप्रौष्ठपदेहस्तात्पुष्यः पूर्वोभवेद्यदा तदाचश्रावणेकुर्यादुत्सर्गंछंदसांद्विज इतितत्रैवपरिशिष्टोक्तेः अत्रद्वावपिसौरौमासौज्ञेयौ तेषांसौरस्यैवोक्तेः ।तें पौषमासांत रोहिणीनक्षत्रावर किंवा पौष कृष्ण अष्टमीस करावें. कारण, “ पौषमासीं रोहिणी नक्षत्रावर किंवा कृष्णाष्टमीस वेदांचा यथाविधि उत्सर्ग बाहेर उदकाजवळ करावा ” असें याज्ञवल्क्यवचन आहे. श्रावणी किंवा भाद्रपदी पौर्णिमेस उपाकरण केलें असतां अनुक्रमानें पौषशुक्लप्रतिपदेस किंवा माघशुक्लप्रतिपदेस उत्सर्जन करावें. कारण, “ साडेचार महिने अध्ययन करावें ” असें याज्ञवल्क्यानेंच सांगितलें आहे. आतां जें हारीत “ अर्धपंचम ( साडेचार ) किंवा अर्धषष्ठ ( साडेपांच ) महिने अध्ययन करुन पुढें उत्सर्जन करावें, ” असें सांगतो, तें आषाढी पौर्णिमेस उपाकरण केलें असतां तद्विषयक होय. बौधायनांनीं तर पौषी किंवा माघी पौर्णिमेस करावें. कारण, ‘ पौषी पौर्णिमेस किंवा माघी पौर्णिमेस उत्सर्जन करावें. ” असें बौधायनसूत्र आहे. तैत्तिरीयांनीं तर पौषी पौर्णिमेस करावें. कारण, “ पौषी पौर्णिमेस किंवा रोहिणी नक्षत्रीं ( तैत्तिरीयांनीं ) उत्सर्जन करावें ” असें त्याचें सूत्र आहे. ऋग्वेदीयांनीं तर माघी पौर्णिमेस करावें. कारण, “ वेदांचें उत्सर्जन माघी पौर्णिमेस करावें ” असें कारिकेंत उक्त आहे. कात्यायनशाखीयांनीं तर भाद्रपदमासीं करावें. कारण, “ भाद्रपदमासीं प्रतिपदादि तिथीस उत्सर्ग करावा ” असें कात्यायनवचन आहे. सामगांनीं तर सिंहाचा सूर्य असतां पुष्यनक्षत्रीं करावें. कारण, “ सिंहस्थ सूर्य असतां पुष्यनक्षत्रीं करावें ” असें गार्ग्यवचन पूर्वीं सांगितलें आहे. अथवा सर्वांनीं उपाकर्मदिवशीं करावें. कारण, “ पुष्यनक्षत्रीं अथवा उपाकर्मदिवशीं उत्सर्जन करावें ” असें हेमाद्रींत खादिर गृह्यसूत्रवचन आहे. जेव्हां सिंहस्थ सूर्य असतां त्यांतील हस्तनक्षत्राच्या पूर्वी पुष्यनक्षत्र कर्कसंक्रांतींत होईल तेव्हां त्या पुष्यनक्षत्रीं उत्सर्जन करुन पुढील हस्तनक्षत्रावर उपाकर्म सामवेदीयांनीं करावें. कारण, “ भाद्रपदमासीं हस्ताच्या पूर्वी पुष्य जेव्हां होईल तेव्हां श्रावणांत वेदांचें उत्सर्जन द्विजानें करावें ” असें हेमाद्रींतच परिशिष्टवचन आहे. येथें श्रावण व भाद्रपद हे दोनही मास सौर घ्यावे. कारण त्यांना सौरच मास उक्त आहेत. N/A References : N/A Last Updated : May 28, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP