मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
अनंगव्रत

द्वितीय परिच्छेद - अनंगव्रत

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


चैत्रशुक्लत्रयोदश्यामनंगव्रतं तत्रसापूर्वाग्राह्या त्रयोदशतिथिः पूर्वः सितइतिदीपिकोक्तेः चैत्रशुक्लचतुर्दशीपूर्वाग्राह्या मधोःश्रावणमासस्यशुक्लायातुचतुर्दशी सारात्रिव्यापिनीग्राह्यानान्याशुक्लाकदाचनेतिहेमाद्रौबौधायनोक्तेः परापूर्वाह्णगामिनीतिवापाठः अत्रकेचिद्यथाश्रुतमेवार्थंवर्णयंति निशिभ्रमंतिभूतानिशक्तयःशूलभृद्यतः अतस्तत्रचतुर्दश्यांसत्यांतत्पूजनंभवेदितिब्रह्मवैवर्तात्‍ हेमाद्रिमाधवादि लिखनमप्येवं संप्रदायविदस्त्वाहुः चतुर्दशीतुकर्तव्यात्रयोदश्यायुताविभोइतिस्कांदमुत्सर्गः तदपवादश्च तृतीयैकादशी षष्ठीशुक्लपक्षेचतुर्दशी पूर्वविद्धानकर्तव्याकर्तव्यापरसंयुतेतिनारदीयवचनं तदपवादश्च मधोः श्रावणमासस्येति तत्रापवादाभावेपुनरुत्सर्गस्यस्थितिरितिन्यायेनपूर्वविद्धैवग्राह्येतिसिध्यति ब्रह्मवैवर्तंतु सामान्यरुपमन्यत्रसावकाशमिति तेनपूर्वदिनेमुहूर्तत्रयवेधेपूर्वा अन्यथोत्तरेति ।

चैत्रशुद्ध त्रयोदशीस अनंगव्रत सांगितलें आहे. त्याविषयीं त्रयोदशी पूर्वविद्धा घ्यावी; कारण, “ शुक्लपक्षीं त्रयोदशी तिथि पूर्वा घ्यावी ” असें दीपिकेंत सांगितलें आहे, चैत्रशुक्लचतुर्दशी पूर्वा घ्यावी; कारण, “ चैत्र व श्रावण या मासांतील जी शुक्लचतुर्दशी ती रात्रिव्यापिनी घ्यावी, इतर शुक्लचतुर्दशी रात्रिव्यापिनी कदापि घेऊं नये ” असें हेमाद्रींत बौधायनाचें वचन आहे. ह्या वचनाच्या शेवटच्या चरणीं ‘ परा पूर्वाह्णगामिनी ’ म्हणजे अन्यमासांतील शुक्लचतुर्दशी पूर्वाह्णगामिनी ( उत्तरविद्धा ) घ्यावी असा पाठ आहे. येथें केचित्‍ यथाश्रुत ( रात्रिव्यापिनी असाच ) अर्थ वर्णन करतात. पूर्वविद्धा असें म्हणत नाहींत; कारण, “ भूतें, शक्ति, शूलभृत्‍ ( शिव ) हे रात्रीं भ्रमण करितात, यास्तव रात्रीं चतुर्दशी असतां त्यांचें पूजन करावें ” असें ब्रह्मवैवर्तवचन आहे. हेमाद्रि, माधव इत्यादिकांचाही लेख असाच आहे. संप्रदायवेत्ते तर असें सांगतात कीं, “ त्रयोदशीनें युक्त अशी चतुर्दशी करावी ” हें स्कंदपुराणांतील वचन उत्सर्ग ( सामान्यविधि ) आहे. त्याचा अपवाद - “ शुक्लपक्षांतील तृतीया, एकादशी, षष्ठी, आणि चतुर्दशी ह्या पूर्वविद्धा करुं नयेत. परविद्धा कराव्या ” हें नारदवचन होय. ह्या नारदवचनाचा अपवाद - “ चैत्र व श्रावण यांची शुद्धचतुर्दशी रात्रिव्यापिनी घ्यावी ” हें पूर्वोक्त बौधायनवचन होय. तेथें अपवादाचा ( नारदवचनाचा ) अपवादानें ( बौधायनवचनानें ) बाध केला असतां उत्सर्गाची ( स्कांदवचनाची ) स्थिति राहते, या न्यायानें पूर्वविद्धाच घ्यावी, असें सिद्ध होतें. ब्रह्मवैवर्तवचन तर सामान्य असल्यामुळें या चैत्र व श्रावण चतुर्दशीवांचून इतर ठिकाणीं प्रवृत्त होतें. तेणेंकरुन पूर्व दिवशीं चतुर्दशीस तीन मुहूर्तपर्यंत त्रयोदशीचा वेध असेल तर पूर्वीची घ्यावी. अधिक वेध असेल तर उत्तरा घ्यावी.

चैत्रपूर्णिमासामान्यनिर्णयात्परैव अत्रविशेषोनिर्णयामृतेविष्णुस्मृतौ चैत्रीचित्रायुताचेत्स्यात्तस्यांचित्रवस्त्रप्रदानेनसौभाग्यमाप्नोतीति तथाब्राह्मे मंदेवार्केगुरौवापिवारेष्वेतेषुचैत्रिका तत्राश्वमेधजंपुण्यंस्नानश्राद्धादिभिर्लभेदिति अत्रसर्वदेवानांदमनपूजोक्ता तत्रैववायवीये संवत्सरकृतार्चायाः साफल्यायाखिलान्सुरान् दमनेनार्चयेच्चैत्र्यांविशेषेणसदाशिवमिति अत्रस्वीयतिथ्यासमुच्चय इतिकेचित्‍ स्वीयतिथ्यामकरणेत्रदमनपूजनमित्यन्ये दीक्षिततदितरविषयत्वेनव्यवस्थेत्यपरे इयंमन्वादिरपि साचपूर्वमुक्ता ।

चैत्री पौर्णिमा सामान्य निर्णयेंकरुन पराच करावी. येथें विशेष विधि निर्णयामृतांत विष्णुस्मृतींत “ चैत्री पौर्णिमा चित्रानक्षत्रानें युक्त असतां चित्रवस्त्रदान करावें, तेणेंकरुन सौभाग्य प्राप्त होतें ” तसेंच ब्राह्मांत - “ शनि, रवि, गुरु या वारीं चैत्री पौर्णिमा असेल तर त्या दिवशीं स्नान व श्राद्धादिक करावें, तेणेंकरुन अश्वमेघफल प्राप्त होतें. ” चैत्री पौर्णिमेस सर्व देवांची दमनपूजा सांगितली आहे. तेथेंच वायुपुराणांत - ‘‘ वर्षपर्यंत केलेल्या पूजेच्या साफल्यार्थ सर्व देवांचें चैत्री पौर्णिमेस दमनकानें पूजन करावें. सदाशिवाचें तर विशेषेंकरुन पूजन करावें. ” ही दमनकपूजा त्या त्या देव तांच्या तिथींस करुन पौर्णिमेसही करावी, असें केचित्‍ म्हणतात. स्वकीयतिथींस ( त्या त्या देवांच्या तिथीस ) न केलें तर याच पौर्णिमेस सर्व देवतांचे दमनकाचें पूजन करावें असें अन्य म्हणतात. मंत्रदीक्षावंतांनीं त्या त्या तिथींस व इतरांनीं या पौर्णिमेस करावें, अशी व्यवस्था करावी, असें दुसरे आचार्य म्हणतात. ही पौर्णिमा मन्वादिकही आहे, ती पूर्वीं सांगितली.

चैत्रकृष्णत्रयोदश्यांमहावारुणीसंज्ञोयोगोगौडेषुप्रसिद्धः तदुक्तंवाचस्पतिकृतौशूलपाणौचस्कांदे वारुणेनसमायुक्तामधौकृष्णात्रयोदशी गंगायांयदिलभ्येतसूर्यग्रहशतैः समा शनिवारसमायुक्तासामहावारुणीस्मृता गंगायांयदिलभ्येतकोटिसूर्यग्रहैः समा शुभयोगसमायुक्ताशनौशतभिषायदि महामहेतिविख्यातात्रिकोटिकुलमुद्धरेत् तत्रैवज्योतिषे चैत्रासितेवारुणऋक्षयुक्तात्रयोदशीसूर्यसुतस्यवारे योगेशुभेसामहतीमहत्यागंगाजलेर्कग्रहकोटितुल्येति त्रिस्थलीसेतौब्रह्मांडपुराणे वारुणेनसमायुक्तामधौकृष्णात्रयोदशी गंगायांयदिलभ्येतशतसूर्यग्रहैः समेति कल्पतरौब्राह्मे मधौकृष्णत्रयोदश्यांशनौशतभिषायुता वारुणीतिसमाख्याताशुभेतुमहतीस्मृता चैत्रकृष्णचतुर्दश्यांविशेषः पृथ्वीचंद्रोदयेपुलस्त्यः चैत्रकृष्णचतुर्दश्यांयः स्नायाच्छिवसन्निधौ नप्रेतत्वमवाप्नोतिगंगायांतुविशेषत इति अत्रपूर्वाग्राह्या कृष्णपक्षस्थत्वात्‍ गौडस्त्वेतदेवशुक्लचतुर्दश्यामित्येवंदेवलीयत्वेनपठितं इतिश्रीकमलाकरभट्टकृतेकालनिर्णयसिंधौचैत्रमासः ।

चैत्रकृष्णत्रयोदशीस महावारुणीसंज्ञक योग, हा गौडदेशांत प्रसिद्ध आहे. त्याचें स्वरुप वाचस्पतिग्रंथांत व शूलपाणींत स्कंदपुराणांत - “ शततारकानक्षत्रानें युक्त अशी चैत्रकृष्णत्रयोदशी गंगेचे ठायीं जर प्राप्त होईल तर शंभर सूर्य ग्रहणांशीं समान होय. ती शनिवारानें युक्त असतां महावारुणी होते. ती गंगेचे ठायीं कोटिसूर्यग्रहणसमान आहे. शुभयोग, शनिवार व शततारकानक्षत्र यांनीं युक्त असतां महामहावारुणी होय. ही तीन कोटि कुलांचा उद्धार करील. ” तेथेंच ज्योतिषांत - “ चैत्रकृष्णत्रयोदशी शनिवार, शततारकानक्षत्र, शुभयोग यांहीं युक्त असतां महामहावारुणी. ती गंगाजलाचे ठायीं कोटिसूर्यग्रहणतुल्य होय. ” त्रिस्थलीसेतूंत ब्रह्मांडपुराणांत - “ शततारकानक्षत्रानें युक्त चैत्रकृष्णत्रयोदशी गंगेमध्यें जर मिळेल तर ती शंभ सूर्यग्रहणतुल्य होते. ” कल्पतरुंत ब्राह्मांत - “ चैत्रकृष्णत्रयोदशी शनिवार व शततारकायुक्त असेल तर तिला वारुणी म्हणावें, त्यांत शुभयोग असेल तर तिला महावारुणी म्हणावें. ” चैत्रकृष्णचतुर्दशीस विशेष सांगतो पृथ्वीचंद्रोदयांत पुलस्त्य - “ चैत्रकृष्ण चतुर्दशीस शिवाजवळ जो स्नान करील तो प्रेतत्व
( पिशाचत्व ) पावत नाहीं. गंगेमध्यें तर विशेषेंकरुन स्नान करावें म्हणजे पिशाचत्व होणार नाहीं. ” ही चतुर्दशी कृष्णपक्षस्थ
असल्यामुळें सामान्य तिथिनिर्णयावरुन पूर्वा घ्यावी. गौडांनीं तर हें पुलस्त्यवचन ‘ चैत्रशुक्लचतुर्दश्यां ’ म्हणजे चैत्रशुद्ध चतुर्दशीस स्नान करावें, अशा अर्थाचें देवलाचें म्हणून सांगितलें आहे.

इति श्रीचैत्रमासनिर्णयाची महाराष्ट्र भाषाटीका समाप्त झाली.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP