मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
महालयश्राद्ध

द्वितीय परिच्छेद - महालयश्राद्ध

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


तत्रपंचपक्षाः तदुक्तंहेमाद्रौब्राह्मे आश्वयुक् ‍ कृष्णपक्षेतुश्राद्धंकार्यंदिनेदिने त्रिभागहीनंपक्षंवात्रिभागंत्वर्धमेववा दिनेदिनेइतिपक्षपर्यंतत्वमुक्तम् ‍ त्रिभागहीनमितिपंचम्यादिपक्षः त्रिभागमितिदशम्यादिपक्षः त्रिभागहीनमितिचतुर्दशीसहितप्रतिपदादिचतुष्टयवर्जनाभिप्रायेणेतिकल्पतरुः अत्रदिनपदंतिथिपरंवीप्सयातत्पक्षीयतिथित्वंश्राद्धव्याप्यतावच्छेदकम् ‍ तेनपंचदशतिथिव्यापिश्राद्धंसिध्यति तेनचतुर्दशीनिषेधोऽन्यकृष्णपक्षपर इतिगौडाः तन्न श्राद्धंशस्त्रहतस्यैवचतुर्दश्यांमहालये इत्यादिविरोधात् ‍ यच्च कश्चित् ‍ पूरणप्रत्ययलोपेनतृतीयभागहीनंषष्ठ्यादिपक्षं तृतीयभागमेकादश्यादि तदर्धंत्रयोदश्यादि उत्तरोत्तरंलघुकालोक्तेरिति तन्न गौतमादिवचनेनमूलकल्पनालाघवात् ‍ पक्षमित्यनन्वयापत्तेश्च पंचम्यूर्ध्वंचतत्रापिदशम्यूर्ध्वंततोप्यतीति विष्णुधर्मोक्तेः षष्ठ्याद्येकादश्यादिपक्षावपिज्ञेयावितितत्त्वम् ‍ कालादर्शेपि पक्षाद्यादिचदर्शांतंपंचम्यादिदिगादिच अष्टम्यादियथाशक्तिकुर्यादापरपक्षिकम् ‍ पक्षादिःप्रतिपत् ‍ दिक् ‍ दशमी दर्शांतमितिसर्वत्र गौतमोपि अथापरपक्षेश्राद्धंपितृभ्योदद्यात्पंचम्यादिदर्शांतमष्टम्यादिदशम्यादिसर्वस्मिंश्चेति तथैकस्मिन्नपिदिने श्राद्धमुक्तंहेमाद्रौनागरखंडे आषाढ्याः पंचमेपक्षेकन्यासंस्थेदिवाकरे योवैश्राद्धंनरः कुर्यादेकस्मिन्नपिवासरे तस्यसंवत्सरंयावत्संतृप्ताः पितरोध्रुवमिति अत्रशक्ताशक्तपराव्यवस्थेतिप्रांचः तन्न तद्वाचकपदाभावात् ‍ नत्रयोदश्यादिपक्षएवनित्यः तत्रैवनिंदाश्रुतेः ब्राह्मेएवकारेणतस्यैवपंचमपक्षयोगव्यवच्छेदोक्तेरितिगौडाः तन्न एकस्मिन्नपीतिविरोधात् ‍ तेनफलभूमार्थिनान्यानिकार्याणीतितत्त्वम् ‍ तत्रचतुर्दशीश्राद्धाभावेपंचम्यादिदशम्यादिपक्षौ तत्सत्त्वेषष्ठ्याद्येकादश्यादिकौ एवंचतुर्दश्यभावेद्वादश्यादिः तत्सत्त्वेत्रयोदश्यादिरितिव्यवस्था ।

ह्या महालयश्राद्धांचे पांच पक्ष आहेत . ते सांगतो हेमाद्रींत ब्राह्मांत - " आश्विनकृष्णपक्षांत दररोज श्राद्ध करावें . अथवा तिथींच्या तिसर्‍या भागानें हीनपक्ष म्हणजे पंचमीपासून श्राद्ध करावें . किंवा तिसरा भाग म्हणजे दशमीपासून श्राद्ध करावें . अथवा निंमे तिसरा भाग श्राद्ध करावें . " या वचनांत दररोज करावें , असें सांगितलें तें सारा पक्ष समजावा . ‘ तिसर्‍या भागानें हीन ’ म्हटलें तें पंचमीपासून समजावें . ‘ तिसरा भाग ’ असें म्हटलें तें दशमीपासून समजावें . तिसर्‍या भागानें हीन पक्ष असें सांगितलें त्याचा अभिप्राय असा - प्रतिपदादि चार तिथि आणि चतुर्दशी ह्या पांच तिथि वर्ज्य करुन , असें कल्पतरु सांगतो . या वचनांत ‘ दिने ’ हें पद तिथिवाचक आहे , त्या पदाची वीप्सा ( द्विरुक्ति ) असल्यानें असा अर्थ होतो कीं , त्या पक्षांतील जी जी तिथि त्या त्या तिथीस श्राद्ध होतें . असा अर्थ झाल्यानें पंधरा तिथींना व्यापून श्राद्ध सिद्ध झालें आहे . तेणेंकरुन चतुर्दशीला जो श्राद्धनिषेध तो इतर कृष्णपक्षाविषयीं आहे , असें गौड सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , " शस्त्रानें मारलेल्याचेंच महालयांतील चतुर्दशीस श्राद्ध होतें " इत्यादि वचनाचा विरोध येईल . आतां जें कोणीएक सांगतो कीं , वरील वचनांत ‘ त्रिभागहीनं ’ या पदांत ‘ त्रि ’ शब्दांपुढें पूरणप्रत्ययाचा लोप झालेला आहे . त्यावरुन ‘ तृतीयभागहीनं ’ म्हणजे तिसर्‍या भागानें हीन असा पक्ष म्हटला म्हणजे षष्ठीपासून अमावास्येपर्यंत होय . तसाच ‘ त्रिभाग ’ म्हणजे तिसरा भाग होय , तो एकादशीपासून अमावास्येपर्यंत . त्याचा अर्ध म्हणजे त्रयोदशीपासून अमावास्येपर्यंत . कारण , उत्तरोत्तर अल्पकाळ सांगितला आहे , असें सांगतो . तें बरोबर नाहीं . कारण , गौतमादिवचन पंचम्यादि पक्षांविषयीं असल्यामुळें वचनाचा असा अर्थ करण्यापेक्षां तशाविषयीं मूलवचनाची कल्पना केली तर लाघव येईल . आणि ‘ पक्षं ’ ह्या पदाला तिसर्‍या भागानें ( प्रतिपदादि पांच तिथींनीं ) हीन , असा अन्वयही होत नाहीं . " त्या कृष्णपक्षांतही पंचमीच्या पुढच्या तिथींस करावें . अथवा दशमीच्या पुढच्या तिथींस करावें . " ह्या विष्णुधर्मवचनावरुन षष्ठीपासून व एकादशीपासून तिथींस करावें , हे पक्षही आहेत असें समजावें , हें खरें तत्त्व होय . कालादर्शांतही - " प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत आपरपक्षिकश्राद्ध ( महालय ) करावें . पंचमीपासून अमावास्येपर्यंत , दशमीपासून अमावास्येपर्यंत , अष्टमीपासून अमावास्येपर्यंत , आपल्या शक्तीप्रमाणें आपरपक्षिक श्राद्ध करावें . " गौतमही - " आतां अपरपक्षांत पितरांना श्राद्ध द्यावें . तें असें - पंचमीपासून दर्शापर्यंत , अष्टमीपासून दर्शापर्यंत , दशमीपासून दर्शापर्यंत , आणि पक्षाच्या सर्वतिथींस असे पक्ष आहेत . " तसेंच एकाही दिवशीं श्राद्ध सांगतो हेमाद्रींत नागरखंडांत - " आषाढीपासून पांचव्या पक्षांत कन्याराशीस सूर्य गेला असतां जो मनुष्य एकाही दिवशीं श्राद्ध करील त्याचे पितर संवत्सरपर्यंत तृप्त होतात , यांत संशय नाहीं . " ह्या वरील सर्व पक्षांविषयीं शक्ति व अशक्ति पाहून व्यवस्था करावी , असें प्राचीन पंडित सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , त्या वरील वचनांत शक्ति व अशक्तिबोधक पद नाहीं . त्रयोदशीपासून अमावास्येपर्यंत हाच पक्ष नित्य आहे , असें नाहीं . कारण , त्या त्रयोदशीसच निंदा पुढें केलेली आहे . वरील ‘ आश्वयुक् ‍ कृष्णपक्षे तु० ’ ह्या ब्राह्मवचनांत ‘ त्रिभागंत्वर्धमेव ’ म्हणजे तिसर्‍या भागाचा अर्धच ( त्रयोदशीपासून अमावास्येपर्यंतच ) करावें . येथें ‘ एव ’ काराच्या योगेंकरुन त्या त्रयोदश्यादिपक्षालाच पांचव्या पक्षा ( ह्या वचनांत सांगितलेल्या चार पक्षांहून अधिक पक्षा ) चा योग नाहीं असें सांगितल्यावरुन तो त्रयोदश्यादि पक्षच नित्य आहे , असें गौड सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , ‘ एकस्मिन्नपि वासरे ’ ह्या वरील नागरखंडवचनाशीं विरोध येतो . यावरुन सकृन्महालयच नित्य आहे . मोठें फल इच्छिणारानें सकृन्महालयावांचून इतर प्रतिपदादिश्राद्धें करावीं , हें तत्त्व होय . त्यांमध्यें चतुर्दशीश्राद्ध करावयाचे नसेल तर पंचमीपासून व दशमीपासून हे पक्ष घ्यावे . चतुर्दशीश्राद्ध करावयाचें असेल तर षष्ठीपासून व एकादशीपासून हे पक्ष घ्यावे . याप्रमाणें चतुर्दशीश्राद्धाभावीं द्वादश्यादि पक्ष , व चतुर्दशीश्राद्ध असेल तर त्रयोदशीपासून हा पक्ष होय , अशी वर सांगितलेल्या पक्षांची व्यवस्था समजावी .

विधवायास्तुविशेषः स्मृतिसंग्रहे चत्वारः पार्वणाः प्रोक्ताविधवायाः सदैवहि स्वभर्तृश्वशुरादीनांमातापित्रोस्तथैवच ततोमातामहानांचश्राद्धदानमुपक्रमेत् ‍ तथा श्वश्रूणांचविशेषेणमातामह्यास्तथैवचेति अशक्तौतु स्मृतिरत्नावल्याम् ‍ स्वभर्तृप्रभृतित्रिभ्यः स्वपितृभ्यस्तथैवच विधवाकारयेच्छ्राद्धंयथाकालमतंद्रिता विधवास्वयंसंकल्पंकृत्वान्यद्ब्रह्मणद्वाराकारयेदित्युक्तं प्रयोगपारिजाते ।

विधवाकर्तृक श्राद्धांत विशेष सांगतो स्मृतिसंग्रहांत - " विधवेला श्राद्धांत चार पार्वण सांगितले आहेत . ते असे - भर्तृतत्पित्रादिपार्वण , मातृपार्वण , पितृपार्वण , आणि मातामहपार्वण यांना श्राद्ध द्यावें . " तसेंच " श्वश्रूपार्वण आणि मातामहीपार्वण यांनाही द्यावें . " चार पार्वणाविषयीं अशक्ति असेल तर सांगतो स्मृतिरत्नावलींत - " भर्तृतत्पितृपितामहांना आणि आपल्या पितृपितामहप्रपितामहांना विधवेनें यथाकालीं श्राद्ध करावें . " विधवेनें स्वतः आपण संकल्प करुन इतर विधि ब्राह्मणाकडून करवावा , असें प्रयोगपारिजातांत सांगितलें आहे .

सकृन्महालयेचवर्ज्यतिथ्याद्युक्तंपृथिवीचंद्रोदयप्रयोगपारिजातादिषु वसिष्ठः नंदायांभार्गवदिनेचतुर्दश्यांत्रिजन्मसु एषुश्राद्धंनकुर्वीतगृहीपुत्रधनक्षयात् ‍ जन्मभंतत्पूर्वोत्तरेचत्रिजन्मानि वृद्धगार्ग्यः प्राजापत्येचपौष्णेचपित्रर्क्षेभार्गवेतथा यस्तुश्राद्धंप्रकुर्वीततस्यपुत्रोविनश्यति प्राजापत्यंरोहिणी पौष्णंरेवती पित्र्यंमघा अन्यान्यपिप्रत्यरादीनितत्रैवज्ञेयानि केचित्तु नंदाश्वकामरव्यारभृग्वग्निपितृकालभे गंडेवैधृतिपातेचपिंडास्त्याज्याः सुतेप्सुभिरितिसंग्रहात् ‍ नंदाप्रतिपत्षष्ठ्येकादश्यः अश्वः सप्तमी कामस्त्रयोदशी आरोभौमः भृगुः शुक्रः अग्निभंकृत्तिका कालभंभरणी अत्रपिंडास्त्याज्याइत्याहुः तत्रमूलंमृग्यम् ‍ एतच्चसकृन्महालयविषयं सकृन्महालयेकाम्येपुनः श्राद्धेखिलेषुच अतीतविषयेचैवसर्वमेतद्विचिंतयेदितिपृथ्वीचंद्रोदयेनारदोक्तेः ।

सकृन्महालयास वर्ज्य तिथि , वार इत्यादिक पृथ्वीचंद्रोदय , प्रयोगपारिजात इत्यादि ग्रंथांत सांगतो . वसिष्ठ - " नंदा तिथि ( १।६।११ ), भृगुवार , चतुर्दशी , त्रिजन्मनक्षत्रें ( जन्मनक्षत्र व त्याच्या पूर्वींचें आणि पुढचें ) यांचे ठायीं गृहस्थानें श्राद्ध करुं नये ; केलें तर पुत्र व धन यांचा क्षय होतो . " वृद्धगार्ग्य - " रोहिणी , रेवती , मघा , शुक्रवार यांचे ठायीं जो श्राद्ध करील त्याचा पुत्र नष्ट होतो . " प्रत्यर ( जन्मनक्षत्राहून पांचवें नक्षत्र ) इत्यादिक अन्यही निषिद्ध आहेत तीं तेथेंच ( पृथ्वीचंद्रोदयादिकांतच ) जाणावीं . केचित् ‍ तर - " नंदा तिथि ( १।६।११ ), सप्तमी , त्रयोदशी , रविवार , भौमवार , शुक्रवार , कृत्तिका , मघा , भरणी , गंड , वैधृति , व्यतीपात यांचे ठायीं पुत्रेच्छूंनीं पिंड वर्ज्य करावे " ह्या संग्रहवचनावरुन नंदादि तिथी आणि वर सांगितलेले वार , नक्षत्रें , योग यांच्यावर पिंड वर्ज्य करावे , असें सांगतात . त्याविषयीं मूल शोधावें . हा वर सांगितलेला तिथि इत्यादिकांचा निषेध सकृन्महालयविषयक आहे . कारण , " सक्रुन्महालय ( एकदिवशीं करावयाचा महालय ), काम्य श्राद्ध , दुसर्‍या वेळीं करावयाचें श्राद्ध , खिलश्राद्ध , अतिक्रांतमहालय , इतक्यांचे ठिकाणीं हा वर सांगितलेला सर्व तिथ्यादिविचार करावा " असें पृथ्वीचंद्रोदयांत नारदवचन आहे .

अस्यापवादोहेमाद्रौपृथ्वीचंद्रोदयेच अमापातेभरण्यांचद्वादश्यांपक्षमध्यके तथातिथिंचनक्षत्रंवारंचनविचारयेत् ‍ पराशरमाधवीयेमदनपारिजातादिषुचैवम् ‍ निर्णयदीपिकायांतु पितृमृताहे निषिद्धदिनेपिसकृन्महालयः कार्यइत्युक्तम् ‍ आषाढ्याः पंचमेपक्षेकन्यासंस्थेदिवाकरे मृताहनिपितुर्योवैश्राद्धंदास्यतिमानवः तस्यसंवत्सरंयावत्संतृप्ताः पितरोध्रुवमितिनागरखंडोक्तेः यातिथिर्यस्यमासस्यमृताहेतुप्रवर्तते सातिथिः पितृपक्षेतुपूजनीयाप्रयत्नतः तिथिच्छेदोनकर्तव्योविनाशौचंयदृच्छया पिंडश्राद्धंचकर्तव्यंविच्छित्तिंनैवकारयेत् ‍ अशक्तः पक्षमध्येतुकरोत्येकदिनेयदा निषिद्धेपिदिनेकुर्यात्पिंडदानंयथाविधीतिकात्यायनोक्तेश्च अत्रमूलंचिंत्यम् ‍ ।

ह्याचा अपवाद सांगतो हेमाद्रींत पृथ्वीचंद्रोदयांत - " अमावस्या , व्यतीपात , भरणी , द्वादशी , अष्टमी यांचे ठायीं तिथि , वार , नक्षत्र यांचा विचार करुं नये . " पराशरमाधवीयांत मदनपारिजात इत्यादिकांतही असेंच आहे . निर्णयदीपिकेंत तर - पित्याच्या मृतदिवशीं निषिद्ध दिवस असला तरी सकृन्महालय करावा , असें सांगितलें आहे . कारण , " आषाढीपासून पांचव्या पक्षांत सूर्य कन्याराशीस असतां पित्याच्या मृतदिवशीं जो मनुष्य श्राद्ध करील त्याचे पितर संवत्सरपर्यंत निश्चयानें तृप्त होतील " असें नागरखंडवचन आहे . आणि " ज्याच्या मृतदिवशीं मासाची जी तिथि असते ती तिथि पितृपक्षांत त्याच्याविषयीं पूज्य ( श्राद्धदानाला योग्य ) आहे . आशौचावांचून स्वेच्छेनें श्राद्धविरहित तिथि करुं नये . सपिंडक श्राद्ध करावें , विच्छेद करुंच नये . पक्षपर्यंत श्राद्ध करण्याविषयीं अशक्त असल्यामुळें जेव्हां पितृपक्षांत एकदिवशीं श्राद्ध करीत असेल तेव्हां निषिद्धदिवशीं देखील यथाविधि पिंडदान करावें " असें कात्यायनवचनही आहे . याविषयीं मूल चिंत्य ( विचारणीय ) आहे .

तथापक्षश्राद्धकरणेपिननंदादिषुपिंडनिषेधइत्याह पराशरमाधवीयेकार्ष्णाजिनिः नभस्यस्यापरेपक्षेश्राद्धंकार्यंदिनेदिने नैवनंदादिवर्ज्यंस्यान्नैवनिंद्याचतुर्दशीति अत्रश्राद्धमित्येकवचनाद्दिनेदिनेइतिवीप्सावशाच्च सोमयागवदेकस्याभ्यासेनैकप्रयोगपरमिदं अतः प्रतिपत्प्रभृतिष्वेकांवर्जयित्वाचतुर्दशीमितियाज्ञवल्कीयंप्रयोगभेदपरम् ‍ नतुपंचम्यादिपक्षविषयम् ‍ प्रतिपत्प्रभृतिष्वितिविशिष्योक्तेः निर्णयदीपेपृथिवीचंद्रोदयेमदनपारिजातेचैवं अन्यकृष्णपक्षपरंयाज्ञवल्कीयम् ‍ एतत्परत्वेनैवनिंद्याचतुर्दशीविरोधादितिगौडाः तन्न श्राद्धंशस्त्रहतस्यैवचतुर्दश्यांमहालयइतिविरोधात् ‍ तत्त्वंतु तिथिनक्षत्रवारादिनिषेधोयउदाह्रतः सश्राद्धेतन्निमित्तेस्यान्नानुषंगकृतेह्यसावितिदिवोदासीयेवृद्धगार्ग्योक्तेस्तन्निमित्तेपक्षांतरेचज्ञेयः सकृन्महालयेतुवचनान्निषेधः अन्यत्रनकोपिनिषेधः कार्ष्णाजिनिस्मृतेरिति अतोनंदादौसपिंडकश्राद्धेपुत्रवतोप्यधिकारः अत्रिरपि महालयेक्षयाहेचदर्शेपुत्रस्यजन्मनि तीर्थेपिनिर्वपेत्पिंडान् ‍ रविवारादिकेष्वपि पूर्वोक्तनंदादिनिषेधस्तुमृताहातिक्रमेसकृन्महालयेपौर्णमास्यादिमृतश्राद्धेतन्निमित्तेचज्ञेयः यत्तुस्मृत्यर्थसारे विवाहव्रतचूडासुवर्षमर्धंतदर्धकं पिंडदानंमृदास्नानंनकुर्यात्तिलतर्पणमिति तस्यात्रापवादोदिवोदासीयेबृहस्पतिः तीर्थेसंवत्सरेप्रेतेपितृयागेमहालये पिंडदानंप्रकुर्वीतयुगादिभरणीमघे महालयेगयाश्राद्धेमातापित्रोः क्षयेहनि कृतोद्वाहोपिकुर्वीतपिंडनिर्वपणंसदेति निर्णयदीपेतुनंदादिनिषेधः प्रत्यहभिन्नश्राद्धविषयः षोडशाहव्यापिश्राद्धप्रयोगैकत्वेतुप्रत्यहंपिंडदानंकार्यमेवेत्युक्तम् ‍ तदयमर्थः संपन्नः षोडशाहव्यापिश्राद्धैक्ये नपिंडनिषेधः मृताहेसकृन्महालयेपितथाप्रत्यहंश्राद्धभेदेपिव्यतीपातादैतथा अन्यत्रमृताहातिक्रमेमहालयेचपिंडनिषेधइति संन्यासिनांतुद्वादश्यांश्राद्धंकार्यं यतीनांचवनस्थानांवैष्णवानांविशेषतः द्वादश्यांविहितंश्राद्धंकृष्णपक्षेविशेषतइतिपृथ्वीचंद्रोदयेसंग्रहोक्तेः ।

तसेंच पक्षश्राद्ध ( पंधरादिवस श्राद्ध ) कर्तव्य असतांही नंदादिकांचे ठायीं पिंडनिषेध नाहीं , असें सांगतो पराशरमाधवीयांत कार्ष्णाजिनि - " भाद्रपदाचे अपरपक्षांत दररोज श्राद्ध करावें . नंदादिक वर्ज्य नाहींत , व चतुर्दशी निंद्य नाहीं . " या वचनांत ‘ श्राद्धं ’ असें एकवचन असल्यामुळें व ‘ दिने दिने ’ म्ह० दिवसादिवसाचे ठायीं अशी द्विरुक्ति असल्यामुळेंही पक्षश्राद्धाच्या एकप्रयोगपक्षविषयक हें वचन आहे . जसा - सोमयागाचा आवृत्तीनें एक प्रयोग होतो , तसा या श्राद्धाचा एक प्रयोग होतो . म्हणून " प्रतिपदादिक श्राद्धांचे ठायीं एक चतुर्दशी वर्ज्य करावी " हें याज्ञवल्क्याचें वचन भिन्नप्रयोगविषयक आहे . पंचमीपासून वगैरे जे पक्ष सांगितले तद्विषयक नाहीं . कारण त्याच वचनांत ‘ प्रतिपदादिक श्राद्धांत ’ असें विशेषेंकरुन सांगितलें आहे . निर्णयदीप - पृथ्वीचंद्रोदय - मदनपारिजात या ग्रंथांतही असेंच आहे . वर सांगितलेलें याज्ञवल्क्यवचन भाद्रपदाहून इतर कृष्णपक्षांत श्राद्धें सांगितलीं त्यांविषयीं आहे . ह्या कृष्णपक्षाविषयीं याज्ञवल्क्यवचन म्हटलें तर ‘ चतुर्दशी निंद्य नाहीं ’ ह्या वर सांगितलेल्या कार्ष्णाजिनिवचनाचा विरोध येईल , असें गौड सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , असें म्हटलें तर महालयांतील चतुर्दशीस पक्ष करावा , असें झालें म्हणजे " महालयांतील चतुर्दशीस शस्त्रानें मारलेल्याचेंच श्राद्ध करावें , इतराचें करुं नये " या वचनाचा विरोध येईल . म्हणून याज्ञवल्क्यवचन भिन्नप्रयोगविषयक आहे . खरा प्रकार म्हटला तर " तिथि , नक्षत्र , वार इत्यादिकांचा जो निषेध सांगितला , तो त्या तिथिनक्षत्रादिनिमित्तक श्राद्धाविषयीं होतो . इतराच्या अनुषंगानें प्राप्त झालेल्या श्राद्धाविषयीं तो निषेध नाहीं " असें दिवोदासीयांत वृद्धगार्ग्यवचन सांगितल्यावरुन चतुर्दशीनिमित्तक श्राद्धाविषयीं व इतर पक्षांविषयीं तो निषेध जाणावा . सकृन्महालयाविषयीं तर वर सांगितलेल्या वसिष्ठ - नारदादिवचनांवरुन चतुर्दशीचा निषेध आहे . वर सांगितलेल्या कार्ष्णाजिनिस्मृतिवरुन प्रतिदिवशीं श्राद्धाविषयीं कोणताही निषेध नाहीं . ही कार्ष्णाजिनिस्मृति आहे म्हणूनच नंदादिकांचे ठायीं सपिंडक श्राद्धाविषयीं पुत्रवंतालाही अधिकार आहे . अत्रिही - " महालय , मृतदिवस , दर्श , पुत्रजन्म , तीर्थप्राप्ति , इतक्यांचे ठायीं रविवार इत्यादि निषिद्ध दिवस असतांही पिंडदान करावें . " वसिष्ठादिवचनांनीं वर सांगितलेला नंदादिनिषेध तर मृतदिवस टाकून पुढें करावयाच्या सकृन्महालयाविषयीं , पौर्णमासीस वगैरे मृताच्या पुढें करावयाच्या श्राद्धाविषयीं आणि तिथ्यादिनिमित्तक श्राद्धाविषयीं जाणावा . आतां जें स्मृत्यर्थसारांत - " विवाह , उपनयन , चौल हीं झालीं असतां अनुक्रमानें एक वर्ष , अर्धै वर्ष , तीनमास पर्यंत पिंडदान , मृत्तिकास्नान आणि तिलतर्पण हीं करुं नयेत " असें सांगितलें , त्याचा अपवाद सांगतो दिवोदासीयांत बृहस्पति - " तीर्थश्राद्ध , सांवत्सरिक , मृतपित्याचें और्ध्वदेहिक , महालय , युगादिश्राद्ध , भरणीश्राद्ध , मघाश्राद्ध्ह यांचे ठायीं पिंडदान करावें . विवाह केला असला तरी महालय , गयाश्राद्ध , मातापितारांचा मृतदिवस यांचे ठायीं सर्वदा पिंडदान करावें . " निर्णयदीपांत तर नंदादिनिषेध सांगितला तो दररोज करावयाच्या श्राद्धावांचून इतर श्राद्धांविषयीं समजावा . वर सांगितलेलें एकप्रयोगानें सोळा दिवस व्यापून करावयाचें श्राद्ध असेल तर प्रतिदिवशीं पिंडदान करावेंच , असें पूर्वीं सांगितलें , तस्मात् ‍ असा अर्थ निष्पन्न झाला कीं , सोळा दिवस व्यापून एकप्रयोगानें एक श्राद्ध असतां पिंडाचा निषेध नाहीं . मृतदिवशीं सकृन्महालय असतांही तसाच पिंडनिषेध नाहीं . भिन्नप्रयोगानें दररोज भिन्नश्राद्ध असतांही व्यतीपातादिक असतां तसाच पिंडनिषेध नाहीं . व्यतीपातादिक नसतां भिन्नप्रयोगाविषयीं आणि मृतदिवस टाकून महालय असतां वर सांगितलेला पिंडनिषेध आहे . संन्याशाचें तर द्वादशीस श्राद्ध करावें . कारण , " संन्याशी , वानप्रस्थ यांचें आणि विशेषेंकरुन वैष्णवांचें श्राद्ध द्वादशीस विहित आहे . कृष्णपक्षांतील द्वादशीस विशेषेंकरुन विहित आहे " असें पृथ्वीचंद्रोदयांत संग्रहवचन आहे .

N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP