मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
प्रतिमासशिवरात्रिव्रत

द्वितीय परिच्छेद - प्रतिमासशिवरात्रिव्रत

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अस्यारंभोहेमाद्रौ स्कांदे आदौमार्गशिरेमासिदीपोत्सवदिनेपिवा गृह्णीयान्माघमासेवाद्वादशैवमुपोपयेत्‍ तथा दीपोत्सवेतथामाघेकृष्णायातुचतुर्दशी द्वादशस्वपिमासेषुप्रकुर्यादिहजागरम् एवंद्वादशवर्षेषुद्वादशैवतपोधनान् वरयेदितिशेषः चतुर्दशवाविप्रान्‍ आचार्यंचवृत्वा कुंभोपरिन्यसेद्देवमुमयासहितंशिवम् सौवर्णेप्यथवारौप्येवृषभेसंस्थितंशुभेइत्युक्तम् हैमींमूर्तिंसंपूज्यस्थिरंचरंवालिंगंपंचामृतसहस्रशतपंचाशत्तदर्धान्यतरकुंभैः संस्नाप्यसंपूज्यजागरंकृत्वापरेद्युस्तिलान् सहस्त्रंशतंवाहुत्वाविप्रेभ्योवस्त्राणिद्वादशगाश्चदत्वाआचार्यायधेनुंशय्यांचदत्वाविप्रान् भोजयेदितिमदनरत्नेउक्तम् ।

या प्रतिमासशिवरात्रिव्रताचा आरंभ सांगतो - हेमाद्रींत स्कांदांत - “ मार्गशीर्षमासांत अथवा दीपावलींतील चतुर्दशीस, किंवा माघमासांत, प्रथम व्रत घ्यावें, व याप्रमाणें बारा चतुर्दशींचे ठायीं उपोषण करावें. ” तसेंच “ दीपावलींत किंवा माघांत जी कृष्णचतुर्दशी तिचे ठायीं आरंभ करुन बाराही महिन्यांत जागरण करावें. याप्रमाणें बारा वर्षै व्रत करुन बारा तपोधन ब्राह्मण वरावे. ” अथवा चवदा ब्राह्मण आणि आचार्य वरुन “ कलशावर सोन्याच्या किंवा रुप्याच्या सुंदर वृषभावर बसलेल्या उमासहित शिवाची स्थापना करावी ” असें सांगितलें आहे. याप्रमाणें सुर्वणाचे शिवसूतांची पूजा करुन अथवा स्थिरलिंगाला किंवा चरलिंगाला पंचामृतांच्या सहस्र कलशांनीं किंवा शंभर कलशांनीं अथवा पन्नास कलशांनीं किंवा पंचवीस कलशांनीं स्नान घालून पूजा करुन जागरण करुन दुसर्‍या दिवशीं तिलांचा सहस्रसंख्य किंवा शतसंख्य होम करुन ब्राह्मणांना वस्त्रें व बारा गाई देऊन आचार्याला धेनु आणि शय्या देऊन ब्राह्मणभोजन करावें; असें मदनरत्नांत सांगितलें आहे.

N/A

References : N/A
Last Updated : June 21, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP