TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
श्रावणशुक्ल तृतीया

द्वितीय परिच्छेद - श्रावणशुक्ल तृतीया

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


श्रावणशुक्ल तृतीया
श्रावणशुक्लतृतीयामधुस्रवाख्यागुर्जरेषुप्रसिद्धा सापरयुताग्राह्येतिदिवोदासः श्रावणशुक्लचतुर्थीपूर्वयुता मातृविद्धोगणेश्वर इत्यादिवचनात् श्रावणशुक्लपंचमीनागपूजादौपरैवेतिसामान्यनिर्णयेउक्तं चमत्कारचिंतामणौ पंचमीनागपूजायांकार्याषष्ठीसमन्विता तस्यांतुतुषितानागाइतरासचतुर्थिकेति श्रावणेपंचमीशुक्लासंप्रोक्तानागपंचमी तांपरित्यज्यपंचम्यश्चतुर्थीसहिताहिताइतिमदनरत्नेभिधानाच्च तेनपरैवेति अत्रविशेषोहेमाद्रौभविष्ये श्रावणेमासिपंचम्यांशुक्लपक्षेनराधिप द्वारस्योभयतोलेख्यागोमयेनविषोल्बणाः पूजयेद्विधिवद्वेरदधिदूर्वांकुरैः कुशैः गंधपुष्पोपहारैश्चब्राह्मणानांचतर्पणैः येतस्यांपूजयंतीहनागान्भक्तिपुरः सराः नतेषांसर्पतोवीरभयंभवतिकुत्रचिदिति श्रावणशुक्लद्वादश्यांदधिव्रतंप्रागुक्तं तक्रादीनांत्वनिषेधः तत्रदधि व्यवहाराभावादितिवक्ष्यते ।

श्रावणशुक्ल तृतीया ही मधुस्त्रवानाम्नी गुर्जरदेशांत प्रसिद्ध आहे. ती चतुर्थीयुक्त घ्यावी असें दिवोदास सांगतो. श्रावणशुक्ल चतुर्थीं ही तृतीयायुक्त घ्यावी; कारण, चतुर्थी तृतीयाविद्ध घ्यावी, इत्यादि वचन आहे. श्रावणशुक्ल पंचमी नागपूजादिकृत्यांविषयीं पराच घ्यावी, असें सामान्यनिर्णयांत ( प्रथमपरिच्छेदांत ) सांगितलें आहे. चमत्कारचिंतामणींत - “ नागपूजेविषयीं पंचमी षष्ठीयुक्त करावी; कारण, तिचे ठायीं नाग संतुष्ट होतात. इतर कृत्यांविषयीं पंचमी चतुर्थीयुक्त घ्यावी. ” आणि “ श्रावणशुक्ल पंचमी ही नागपंचमी म्हटली आहे, ती वर्ज्य करुन सर्व पंचमी चतुर्थीयुक्त घ्याव्या त्या हितकारक होत. ” असें मदनरत्नांतही सांगितलें आहे. तेणेंकरुन पराच घ्यावी. या तिथीचे ठायीं विशेष सांगतो - हेमाद्रींत भविष्यपुराणांत - “ श्रावणमहिन्यांत शुक्लपक्षीं पंचमीस गृहद्वाराच्या दोन बाजूंस गोमयानें भिंत सारवून सर्प काढावे आणि दधि, दूर्वांकुर, कुश, गंध, पुष्प, उपहार, ब्राह्मणभोजन यांहींकरुन यथाशास्त्र पुजावे. जे मनुष्य या पंचमीस भक्तियुक्त नागपूजन करतील त्यांस सर्पांपासून भय कोठेंही होणार नाहीं. ” श्रावणशुक्ल द्वादशीस दधिवर्जनरुप व्रत पूर्वी सांगितलें आहे, त्यांत तक्रादिकांचा निषेध नाहीं. कारण, तक्राविषयीं दधिशब्दाचा व्यवहार नाहीं, असें पुढें सांगूं.

अत्रैवविष्णोः पवित्रारोपणमुक्तं हेमाद्रौविष्णुरहस्ये श्रावणस्यसितेपक्षेकर्कटस्थेदिवाकरे द्वादश्यां वासुदेवायपवित्रारोपणंस्मृतं द्वादश्यांश्रवणेवापिपंचम्यामथवाद्विज आनुकूल्येषुकर्तव्यंपंचदश्यामथापिवेति शिवेतुतत्रैवकालोत्तरे आषाढांतेचतुर्दश्यांनभस्यनभसोस्तथा अष्टम्यांचचतुर्दश्यांपक्षयोरुभयोः सममिति अन्यदेवतानांतुवक्ष्यते अधिवासनंतुदीपिकायां गोदोहांतरितेकालेपूर्वेद्युर्वाधिवासनमिति गौणकालोरामार्चनचंद्रिकायां पवित्रारोपणंविघ्नाच्छ्रावणेनभवेद्यदि कार्तिक्यवधिशुक्रास्तेकर्तव्यमितिनारदः हैमरौप्यताम्रक्षौमैः सूत्रैः कौशेयपद्मजैः कुशैः काशैश्चकार्पासैर्ब्राह्मण्याकर्तितैः शुभैः कृत्वात्रिगुणितंसूत्रंत्रिगुणीकृत्यशोधयेत् तत्रोत्तमंपवित्रंतुषष्ट्यासहशतैस्त्रिभिः सप्तत्यासहितंद्वाभ्यांशताभ्यांमध्यमंस्मृतं साशीतिनाशतेनैवकनिष्ठंतत्समाचरेत् साधारणपवित्राणित्रिभिः सूत्रैः समाचरेत् उत्तमंतुशतग्रंथिपंचाशद्ग्रंथिमध्यमं कनिष्ठंतुपवित्रंस्यात्षट्‍ त्रिंशद्गंथिशोभनं षट्‍ त्रिंशच्चचतुर्विंशद्दूदशेतिचकेचन चतुर्विंशद्दूदशाष्टावित्येकेमुनयोविदुः हेमाद्रौविष्णुरहस्येत्वन्यथोक्तं अष्टोत्तरशतंकुर्याच्चतुः पंचाशदेववा सप्तविंशतिरेवाथज्येष्ठमध्यकनीयसं अधमंनाभिमात्रंस्यादूरुमात्रंद्वितीयकं प्रलंबतोजानुमात्रंप्रतिमायांनिगद्यते शिवपवित्रंतुतत्रैवशैवागमे एकाशीत्यथवासूत्रैस्त्रिंशतावाष्टयुक्तया पंचाशतावाकर्तव्यंतुल्यग्रंथ्यंतरालकं द्वादशांगुलमानानिव्यासादष्टांगुलानिवा लिंगविस्तारमानानिचतुरंगुलकानिचेति ।

ह्याच द्वादशीचेठायीं विष्णूचें पवित्रारोपण सांगितलें आहे - हेमाद्रींत विष्णुरहस्यांत - “ श्रावणमासाच्या शुक्लपक्षीं कर्कास सूर्य असतां द्वादशीस विष्णूचें पवित्रारोपण करावें. द्वादशी किंवा श्रवणनक्षत्र किंवा पंचमी अथवा पौर्णिमा यांतून अनुकूल असेल त्या दिवशीं पवित्रारोपण करावें. ” शिवाचें पवित्रारोपण तर - हेमाद्रींत कालोत्तरांत - “ आषाढाच्या शेवटीं चतुर्दशीस किंवा श्रावण, भाद्रपद यांच्या दोनही पक्षांच्या अष्टमी, चतुर्दशी या दोनही तिथींस पवित्रारोपण समान होय. ” अन्य देवतांचें पवित्रारोपण पुढें सांगूं. अधिवासन सांगतो - दीपिकेंत - “ त्या दिवशीं गोदोहनसमयीं ( प्रातःकालीं ) किंवा पूर्वदिवशीं अधिवासन करावें. ” गौणकाल सांगतो - रामार्चनचंद्रिकेंत - “ कांहीं विघ्रानें श्रावणांत जर पवित्रारोपण झालें नाहीं तर कार्तिकीपौर्णिमेपर्यंत शुक्रास्तांतही करावें, असें नारद सांगतो. सुवर्ण, रुपें, तांबें, जवस, रेशीम, कमल, कुश, काश, कापूस यांचें ब्राह्मणीनें काढलेलें सूत घेऊन तें सूत्र त्रिगुण करुन पुनः तिप्पट करुन शुद्ध करावें ( धुवावें ). त्या तीनशेंसाठ सूत्रांचें पवित्रक उत्तम, दोनशेंसत्तरांचें मध्यम, एकशेंऐशीं सूत्रांचें कनिष्ठ होय, याप्रमाणें तें करावें. साधारण पवित्रकें तीन सूत्रांनीं करावीं. शंभर ग्रंथींचें पवित्रक उत्तम, पन्नास ग्रंथींचें मध्यम, छत्तीस ग्रंथींचें कनिष्ठ होय. छत्तीस, चोवीस, बारा ग्रंथींचें अनुक्रमानें उत्तम, मध्यम, कनिष्ठ असें कोणी म्हणतात. चोवीस, बारा, आठ ग्रंथींचें उत्तम, मध्यम, कनिष्ठ असें कितीएक मुनि म्हणतात. ” हेमाद्रींत विष्णुरहस्यांत तर निराळेंच सांगितलें आहे - तें असें - “ एकशेंआठ, चौपन्न, सत्तावीस, नव सूत्रांचें उत्तम, मध्यम, कनिष्ठ होय. प्रतिमेच्या नाभीपर्यंत पोंचणारें कनिष्ठ, मांड्याइतकें मध्यम, गुडघ्यांइतकें उत्तमः ” शिवपवित्रकें तर हेमाद्रींत शैवागमांत सांगतो - “ एक्यायशीं, किंवा अडतीस अथवा पन्नास सुतांचीं व तितक्याच ग्रंथींनीं युक्त करावीं. बारा किंवा आठ अथवा चार अंगुळें लिंगाचा विस्तार असेल तशीं पवित्रकें करावीं. ”

अधिकारिणोपितत्रैवविष्णुरहस्ये ब्राह्मणः क्षत्रियोवैश्यस्तथास्त्रीशूद्रएवच स्वधर्मावस्थिताः सर्वेभक्त्याकुर्युः पवित्रकं तथा अतोदेवेतिमंत्रेणद्विजोविष्णौनिवेदयेत् शूद्रस्यमूलमंत्रोवायेनवापूजयेद्धरिं एतच्चनित्यं नकरोतिविधानेनपवित्रारोपणंतुयः तस्यसांवत्सरीपूजानिष्फलामुनिसत्तम तस्माद्भक्तिसमायुक्तैर्नरैर्विष्णुपरायणैः वर्षेवर्षेप्रकर्तव्यंपवित्रारोपणंहरेरितितत्रैवोक्तेः देवताविशेषेतिथयोपितत्रैव धनदश्चरमागौरीगणेशः सोमराड्गुहः भास्करश्चंडिकांबाचवासुकिश्चतथर्षयः चक्रपाणिर्ह्यनंगश्चशिवोब्रह्मातथैवच प्रतिपत्प्रभृतिष्वेताः पूज्यास्तिथिषुदेवताः यथोक्ताः शुक्लपक्षेतुतिथयः श्रावणस्यचेति तथाहेमाद्रौकालोत्तरे चतुर्दश्यामथाष्टम्यांसर्वसाधारणंतुतदिति ।

त्याविषयीं अधिकारीही हेमाद्रींतच विष्णुरहस्यांत सांगतो - “ स्वधर्मावस्थित असे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, स्त्री, शूद्र, या सर्वांनीं भक्तीनें पवित्रकें करावीं. ” तसेंच - “ द्विजांनीं ‘ अतोदेवा० ’ या मंत्रानें विष्णूस निवेदन करावें. शूद्रानें मूलमंत्रानें अथवा जेणेंकरुन हरीचें पूजन करील त्या मंत्रानें पवित्र वाहावें. ” हें पवित्रारोपण नित्य आहे; कारण - “ जो मनुष्य यथाविधि पवित्रारोपण करणार नाहीं त्याची संवत्सरपूजा व्यर्थ होते, यास्तव भक्तियुक्त व विष्णुपरायण मनुष्यांनीं प्रतिवर्षीं हरीचें पवित्रारोपण करावें. ” असें तेथेंच वचन आहे. इतर देवतांच्या पवित्रारोपणाविषयीं तिथीही तेथेंच सांगतो - “ कुबेर, रमा, गौरी, गणेश, चंद्र, स्कंद, सूर्य, चंडिका, देवी, वासुकि, ऋषि, चक्रपाणि, काम, शिव, ब्रह्मा, ह्या देवतांचेंपवित्रारोपण प्रतिपदादि तिथींचे ठायीं अनुक्रमें करावें. ह्या तिथि श्रावण शुक्लपक्षींच्या घ्याव्या. तसेंच हेमाद्रींत कालोत्तरांत - “ चतुर्दशीस किंवा अष्टमीस सर्वधारण पवित्रारोपण करावें. ”  

तत्प्रकारस्तुरामार्चनचंद्रिकायां यथा ततस्तानिपवित्राणिवैणवेपटलेशुभे संस्थाप्यशुचिवस्त्रेणपिधाय पुरतोन्यसेत् अरत्निसंमितांवेणींकुर्यात्षट्‍ त्रिंशताकुशैः क्रियालोपविघातार्थंयत्त्वयाविहितंप्रभो मयैतत्क्रियतेदेवतवतुष्ट्यैपवित्रकं नमेविघ्नोभवेद्देवकुरुनाथदयांमयि सर्वथासर्वदाविष्णोममत्वंपरमागतिः उपवासेनदेवत्वांतोषयामिजगत्पते कामक्रोधादयोप्येतेनमेस्युर्व्रतघातकाः अद्यप्रभृतिदेवेशयावद्वैशेषिकंदिनं तावद्रक्षात्वयाकार्यासर्वस्यास्यनमोस्तुते इतिदेवंसंप्रार्थ्यकुंभंसंस्थाप्यतत्रवंशपात्रे ॐसांवत्सरस्ययागस्यपवित्रीकरणायभो विष्णुलोकात्पवित्राद्य आगच्छेहनमोस्तुते अनेनमूलेनचावाह्योत्तममध्यमकनिष्ठेषुविष्णुब्रह्मरुद्रान्‍ सत्वरजस्तमांसि वेदत्रयं वनमालायां प्रकृतिं चावाह्य त्रिसूत्र्यांब्रह्मविष्णुरुद्रान्‍ ग्रंथिषु क्रिया पौरुषी वीरा विजया ईशा अपराजिता मनोन्मनी जया भद्रा मुक्तिश्चेत्यावाह्य संपूज्य ॐसंवत्सरकृतार्चायाः संपूर्णफलदोपियत् पवित्रारोपणायैतत्कुरुकंधरतेनमः विष्णुतेजोद्भवंरम्यंसर्वपातकनाशनं सर्वकामप्रदंदेवतवांगेधारयाम्यहमितिदेवकरेमंगलसूत्रंबध्वा देवंसंपूज्यनिमंत्रयेत् आमंत्रितोसिदेवेशपुराणपुरुषोत्तम प्रातस्त्वांपूजयिष्यामिसांनिध्यंकुरुकेशव क्षीरोदधिमहानामशय्यावस्थितविग्रह प्रातस्त्वांपूजयिष्यामिसन्निधौभवतेनमः निवेदयाम्यहंतुभ्यंप्रातरेतत्पवित्रकं सर्वथासर्वदाविष्णोनमस्तेस्तुप्रसीदमे ततःपुष्पांजलिंदत्वारात्रौजागरणंकुर्यादिति अधिवासनम् ।
त्या पवित्रारोपणाचा प्रकार सांगतो - रामार्चनचंद्रिकेंत - पूर्वोक्तप्रमाणें पोवतीं तयार केल्यानंतर तीं पवित्रकें चांगल्या वैणिव ( वेळूच्या ) पात्रांत ठेवून शुद्ध वस्त्रानें आच्छादून देवापुढें ठेवावीं. अरत्रिमानाची छत्तीस दर्भांची वेणी करुन ती त्या पवित्रकांत ठेवून प्रार्थना करावी. प्रार्थनेचे मंत्र - ‘ क्रियालोपविघातार्थं यत्त्वया विहितं प्रभो ॥ मयैतत्क्रियते देव तव तुष्ट्यै पवित्रकं ॥ न मे विघ्नो भवेद्देव कुरु नाथ दयां मयि ॥ सर्वथा सर्वदा विष्णो मम त्वं परमा गतिः ॥ उपवासेन देव त्वां तोषयामि जगत्पते ॥ कामक्रोधादयोप्येते न मे स्युर्व्रतघातकाः ॥ अद्यप्रभृति देवेश यावद्वैशेषिकं दिनं ॥ तावद्रक्षा त्वया कार्या सर्वस्यास्य नमोस्तु ते ॥ ’ अशी देवाची प्रार्थना करुन कुंभ स्थापून त्यावर वंशपात्रामध्यें - ‘  ॐ सांवत्सरस्य यागस्य पवित्रीकरणाय भो ॥ विष्णुलोकात्पवित्राद्य आगच्छेह नमोस्तु ते ॥ ’ या मंत्रानें व मूलमंत्रानें आवाहन करुन उत्तम, मध्यम, कनिष्ठ पवित्रांचेठायीं विष्णु, ब्रह्मा, रुद्र तसेंच सत्व, रज, तम व तीन वेद यांचें आवाहन आणि वनमालेवर प्रकृतीचें आवाहन करुन त्रिसूत्रीचेठायीं ब्रह्मा, विष्णु, रुद्र व ग्रंथींचेठायीं क्रिया, पौरुषी, वीरा, विजया, ईशा, अपराजिता, मनोन्मनी, जया, भद्रा, मुक्ति यांचें आवाहन करुन पूजा करुन ‘ ॐ संवत्सरकृतार्चायाः संपूर्णफलदोपि यत्‍ ॥ पवित्रारोपणायैतत्‍ कुरु कंधर ते नमः ॥ विष्णुतेजोद्भवं रम्यं सर्वपातकनाशनं ॥ सर्वकामप्रदं देव तवांगे धारयाम्यहं ॥ ’  या मंत्रानें देवाचे हस्तांत मंगलसूत्र बांधून देवाची पूजा करुन निमंत्रण करावें. तें असें - ‘ आमंत्रितोसि देवेश पुराणपुरुषोत्तम ॥ प्राप्तस्त्वां पूजयिष्यामि सांनिध्यं कुरु केशव ॥ क्षीरोदधिमहानागशय्यावस्थितविग्रह ॥ प्रातस्त्वां पूजयिष्यामि सन्निधौ भव ते नमः ॥ निवेदयाम्यहं तुभ्यं प्रातरेतत्पवित्रकं ॥ सर्वथा सर्वदा विष्णो नमस्तेस्तु प्रसीद मे ॥ ’ असें निवेदन करुन नंतर पुष्पांजलि देऊन रात्रीं जागरण करावें - याप्रमाणें हें अधिवासन होय.

प्रातर्नित्यपूजांकृत्वागंधदूर्वाक्षतयुतंपवित्रमादाय ॐ देवदेवनमस्तुभ्यंगृहाणेदंपवित्रकं पवित्रीकरणार्थायवर्षपूजाफलप्रदं पवित्रकंकुरुष्वाद्ययन्मयादुष्कृतंकृतं शुद्धोभवाम्यहंदेवत्वत्प्रसादान्महेश्वर मूलसंपुटितेनानेनदत्वांगदेवताभ्योनाम्रासमर्प्य महानैवेद्यंदत्वा नीराज्य मणिविद्रुममालाभिरित्यादिभिर्दमनारोपणोक्तमंत्रैः प्रार्थयित्वा गुरवेब्राह्मणेभ्यश्चदत्वास्वयंधारयेत् तथा मासंपक्षमहोरात्रंत्रिरात्रंधारयेत्तथा देवेतंसूत्रसंदर्भंदेशकालविवक्षया अकरणेतुतत्रैव पवित्रारोपणंकालेनकरोतिकथंचन तदायुतंजपेन्मंत्रंस्तोत्रंवापिसमाहित इत्युक्तं इति पवित्रारोपः श्रावणशुक्लचतुर्दशीपूर्वयुताग्राह्या अत्रवक्तव्योविशेषश्चैत्रचतुर्दश्यामुक्तः ।

प्रातःकाळीं नित्यपूजा करुन गंध, दूर्वा, अक्षतायुक्त पवित्रक घेऊन “ ॐ देवदेव नमस्तुभ्यं गृहाणेदं पवित्रकं ॥ पवित्रीकरणार्थाय वर्षपूजाफलप्रदं ॥ पवित्रकं कुरुष्वाद्य यन्मया दुष्कृतं कृतं ॥ शुद्धो भवाम्यहं देव त्वत्प्रसादान्महेश्वर ॥ ” या मूलसंपुटित मंत्रानें पवित्रक अर्पण करुन अंगदेवतांस नाममंत्रानें समर्पून महानैवेद्य  देऊन आरती करावी. नंतर “ मणिविद्रूममालाभिः ” इत्यादिक दमनारोपणीं पूर्वी सांगितलेल्या मंत्रांनीं प्रार्थना करुन गुरु व ब्राह्मण यांसही पवित्रकें देऊन आपण स्वतां धारण करावें. तसेंच “ महिना, पंधरा दिवस, अहोरात्र, किंवा त्रिरात्र देशकालानुसार देवाचेठायीं तें सूत्र ( पवित्रक ) ठेवावें. ” हें पवित्रारोपण न केलें तर रामार्चनचंद्रिकेंतच - “ पवित्रारोपण उक्तकालीं न करील तर मंत्राचा ( त्या देवतेच्या मूलमंत्राचा ) दहा हजार जप किंवा स्तोत्राचा जप एकाग्रचित्तानें करावा ” असें सांगितलें आहे. इति पवित्रारोपणम्‍ ॥ श्रावणशुद्ध चतुर्दशी पूर्वतिथीनें विद्ध अशी घ्यावी. येथें सांगावयाचा विशेष प्रकार तो चैत्रचतुर्दशीस सांगितला आहे, तो तेथें पाहा.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-05-28T05:20:21.2170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

स्वादु

  • a  Sweet, tasty. 
RANDOM WORD

Did you know?

शंकराला अर्धी प्रदक्षिणा कां घालतात ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.