मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ३| अध्याय २३ खंड ३ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ खंड ३ - अध्याय २३ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अम्बरीषचरितम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मार्कंडेय मुनि विचारित । पुढील कथा नर-नारायणांप्रत । अंबरीष नृप मनुवंशांत । एकादशी व्रत नित्य करी ॥१॥त्याचें चरित आम्हां सांगावें । हें प्रार्थित आमुचें एकावें । नरनारायण म्हणती परिसावें । अंबरीष कथानक ॥२॥मनुवंशीं अंत्यपुत्र होत । अंबरीष नामा प्रतापवंत । नित्य विष्णूस तो भजत । अनन्य मानस श्रद्धेनें ॥३॥एकादशीव्रत आचरित । माधवासी तो तोषवित । ऐसा बहुकाल लोटत । एकदा होती द्वादशी ॥४॥त्या तिथीस दुवसि येत । क्रोधशाली अतिथि त्याच्या गृहांत । एकादशीव्रत पारणा असत । अतिथि आला त्या वेळीं ॥५॥त्यास प्रणाम करुन । राजर्षि बोले कर जोडून । भगवन् स्वल्पकाळ उरला म्हणून । द्वादशी पारणा करण्यासाठी ॥६॥आपण स्वस्थ काळांत । संध्यादि करुन यावें परत । तें स्वीकारुन तीर्थाप्रत । निघोनि गेला दुर्वास ॥७॥तेथ शीघ्र संध्यादिक करित । परी द्वादशी योग होत प्रगत । मुहूर्त मात्र विलंब होत । तयासी परत यावयासी ॥८॥म्हणोनी पलमात्र द्वादशी जाणून । अंबरीषें केली पारणा पावन । विष्णूचें तीर्थ प्राशन करुन । उपवास सोडिला तयानें ॥९॥नंतर अतिथि राजाची वाट पाहत । अंबरीष तो विनययुत । तेव्हां शीघ्रगति दुर्वास परतत । वृत्तांत सत्य त्या सांगितला ॥१०॥विस्तारें ऐकून वृत्तान्त । दुर्वास कोपला अत्यंत । अंबरीषास शाप देत । म्हणे नृपा हें अनुचित केलें ॥११॥मज निमंत्रण देऊन । तूं केलेस प्रथम भोजन । पारणा कैशी होय साधन । फल तुजला न लाभेल ॥१२॥ऐसें बोलून दुर्वास जात । स्वेच्छेनें अन्यत्र संचार करीत । नृप जाहला दुःखी बहुत । उपोषण घडे तयासी ॥१३॥कांहीं भक्षण न करित । दुर्वासाची वाट पहात । आल्या अतिथीस सोडून सुखांत । भोजन कैसे करु म्हणे? ॥१४॥ऐसा एक संवत्सर निराहार । राहिला जपध्यान पर । तेव्हां नारदमुनी तत्पर । विचारिती वृत्तान्त ॥१५॥त्याची विधियुक्त पूजा करुन । अंबरीषें सर्व केलें कथन । नारद म्हणे तयासी वचन । जलभक्षणें केलीस पारणा तूं ॥१६॥अन्यथा उपोषण युक्त । पाळिलेस धर्मानुसार व्रत । द्वादशी व्रत तें पूर्ण होत । सिद्धि तुजला लाभेल ॥१७॥अपराध तुझा नसून । उपस्थित झालें हें विघ्न । दुर्वास कोपसंयुक्त मन । गेला क्षुधित परतून ॥१८॥तुझ्या गृहांतून त्वरित । आता तूं विघ्नराजा भज निश्चित । तेणें विघ्नविहीनता प्राप्त । होईल तुजला निःसंशय ॥१९॥तुझ्यास्तव मज विष्णूनें पाठविले । नृपसत्तमा रुप पहिलें । सर्वांचे जे गणेश्वर भले । तोच हा विष्णु आदिअंतीं ॥२०॥शिव विष्णु आदी असत । गण त्याचेच ते नियुक्त । नाना कार्यीं होत रत । ऐसें जाण अंबरीषा ॥२१॥चित्त बुद्धिरुप असत । तेथ चिंता मनीं निवसत । त्या बुद्धिपतीस त्वरित । शरण जाई तूं वत्सा ॥२२॥सिद्धिपतीस सोडून । जो इच्छितो सिद्धिलाभ महान । त्या दुर्मतीस असिद्धि लाभून । सर्वत्र अपयश येतसे ॥२३॥ऐसें बोलून त्या मुनीप्रत । गणपतिषडक्षर मंत्र देत । महाविष्णु जो जपत । नारद गुप्त झाले ॥२४॥अंबरीष त्या वेळेपासून । विघ्नेशासी जात शरण । मंत्रराजाचा जप पावन । विनायक पूजन भक्तीनें ॥२५॥विष्णु गणेशांत भेद नसत । हें अंबरीष मनीं ठसवीत । गणेशाची मूर्ति दिसत । चतुर्धां ती सर्वत्र ॥२६॥नंतर दुर्वासाचें चित्त । आपोआप झाले द्रवित । दया येऊन तो जात । अंबरीष नृपाचे घरीं ॥२७॥या मुनींद्रासी पाहून । नृप झाला विस्मित मन । प्रथम त्यास प्रणाम करुन । नंतर पूजी भक्तिभावें ॥२८॥नंतर त्या नृपशार्दूंला म्हणत । मुनिसत्तम दुर्वास हर्षित । तुझा विनय पाहून झालो लज्जित । अपराधास्तव क्षमा करी ॥२९॥तूं अपराधहीन असून । शाप दिला मी साहसें करुन । परी तूं साधुभाव धरुन । उपवासयुक्त राहिलास ॥३०॥म्हणोनी तूं झालास विनययुत । मज सोडून पारणें जें केलेंस श्रद्धायुत । जलप्राशनें एकादशी होत । निष्फल तुझी ऐसें जाण ॥३१॥परी अन्य एकादशिनीचें फल । मिळेल तुजला पूर्ण अमल । ऐसे सांगून त्या वेळ । भोजन करी नृपासहित ॥३२॥तो मुनिसत्तम दुर्वास परतत । अनुग्रह करुन स्वाश्रमाप्रत । अंबरीष तदनंतर भजत । गणेशासी अविरत ॥३३॥त्या अंबरीषासी झाले बहु सुत । त्याला ज्येष्ठ तो असत । त्यास राज्यावरी स्थापित । स्वयें गेला वनांतरीं ॥३४॥तेथ भक्तिभावें गणपतीसी पूजित । अनन्य हृदये वनी चिंतित । कालांतरें गणेशाप्रत । योगसाहाय्यें जाता झाला ॥३५॥अंबरीषाचे हें चरित । जो वाचेल अद्भुत । किंवा ऐकेल प्रेमयुत । भुक्तिमुक्ति नाश्वत त्यास लाभे ॥३६॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयेखंडे महोदरचरिते अंबरीषचरिते नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP