मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ३| अध्याय १७ खंड ३ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ खंड ३ - अध्याय १७ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत कलियुगवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । नरनारायण पुढें सांगती । चार युगांची काल मिति । दिव्य द्वादश वर्षे सहस्त्र ऐसी गणती । विबुधांनी जाणावी ॥१॥चार सहस्त्र वर्षांचे कृत युग होत । आठशें वर्षें संधिकाल होत । तीन वर्ष सहस्त्र त्रेतायुग कीर्तित । संध्यांश द्विगुण जाणावा ॥२॥दोन सहस्त्र वर्षें द्वापार युग असत । संधिकाळ द्विगुण असे युक्त । एक सहस्त्र वर्षें कलियुग नांदत । येथहीं संधि द्विगुण असत ॥३॥ऐसे द्वादश सहस्त्र देववर्षेपर्यन्त । चतुर्युगांचे प्रमाण कथित । कृत त्रेता द्वापार कलि ऐसा असत । क्रम हा चार युगांचा ॥४॥कृत युगांत मुख्य ध्यान । त्रेता युगांत तप यज्ञ याजन । द्वापारांत आचार असे पूजन । कलियुगीं स्तवन मुख्य असे ॥५॥ब्राह्मधर्म कृतयुगांत । चतुष्पाद सनातन प्रख्यात । त्रेता युगांत त्रिपद तो होत । ऐसे धर्मवेत्ते सांगती ॥६॥द्वापारांयुगीं द्विपद धर्म असत । ऐसें सर्व शास्त्रांत संमत । एक पद धर्म कलियुगांत । तोही अंतीं नाश पावे ॥७॥कृत युगांत ज्ञान पूज्य असत । रवि मान्य होय त्रेतायुगांत । द्वापारांत विष्णु दैवत । कलियुगी शंभु मुख्य म्हणती ॥८॥परी चतुर्युगांच्या कालावधीत । गणेश मुख्य भावें सर्व पूजित । आपुली सिद्धि प्राप्त होण्या जगांत । मानव प्राणी सर्वकाळ ॥९॥कश्यपाचा सुत विनायक ख्यात । सिंहारुढ दिक्बाहु तेजयुक्त । षड्भुज मयुरेश पूजिती भक्त । त्रेतायुगांत आदरें ॥१०॥शिवाचा सुत मयूरवाहन । शशिवर्ण त्याचा कांतिमान । द्वापारांत पूजिती गजानन । मूषकारुढ चतुर्बाहु ॥११॥वरेण्य नृपतीचा सुत । रक्तवर्ण तो ख्यात । कलियुगांत अवतार घेत । धूम्रवर्ण नामें तो ॥१२॥अश्वावरी तो बसेल । द्विबाहु युक्त असेल । सर्व भावतारक होईल । पूजनीय गणेश देव ॥१३॥परिब्रह्माकारें अभिन्न असत । सिद्धिदाता चार युगांत । एक लक्ष वर्ष ख्यात । मानव आयुष्य कृत युगांत ॥१४॥दहा हजार वर्षे त्रेता युगांत । सहस्त्र वर्षे द्वापारांत । शंभर वर्षे कलियुगांत । अंतीं पंधरा वर्षे न्यून होय ॥१५॥स्वधर्मनिष्ठ सर्वहितरत । ऐसे जन कृतयुगांत । भेदहीन ते सन्मान करित । भक्तिभावें परस्परांचा ॥१६॥कलहादि वर्जित मत्सर विहीन असत । बाल्यापासून धर्मरत । सदा आनंदयुक्त चित्त । विषय सुखा तुच्छ मानिती ॥१७॥सदा असती ज्ञानयुक्त । ध्यानपरायण सुखांत । वर्णाश्रम धर्म पालन करित । आपुले विचार श्रद्धेनें ॥१८॥योगाभ्यास परायण असती । ब्रह्मावरी श्रद्धा ठेविती । केवळ ऋतुकाळी भोगिती । विषयसुख शास्त्रसंमत ॥१९॥अंतर्बाह्य एकभाव राहून । सुखें भोगिती आसक्ती सोडून । ऐसे श्रेष्ठ धार्मिक जन । कृत युगांतले वर्णले ॥२०॥त्रेतायुगांत नरकपाद हीन । धर्म असतो म्हणून । अंतर्बाह्य भाव भिन्न । लोक होती त्या वेळीं ॥२१॥स्वार्थ परार्थी न ते समान । विषयेच्छायुत असती जन । संध्यांश मार्गाचें प्रमाण । आठशें वर्षें मानिलें असे ॥२२॥कृतयुगांती चार शत । त्रेता युगांती तीन शत । शत सप्तक वर्षे संघ्यांश ख्यात । कृत धर्म क्रमें विनाश पावे ॥२३॥सातशें वर्षें समाप्त होत । तेव्हां त्रेता धर्म होय उपस्थित । संध्यांश होता समाज । प्रभाव दुसर्या युगाचा ॥२४॥द्वापारांत द्विपद धर्म । स्वार्थ परायण करिती कर्म । छंद असती कलहादिसम । ऐसे मानव त्या युगीं ॥२५॥बाह्य भावें साधूंचे सेवक । धर्मपरायण निःशंक । लज्जायुक्त असती इच्छुक । अंतरी विषयसुखाचे ॥२६॥दुसर्यांच्या लज्जेस्तव धर्म आचरिती । परि स्वगृहीं विषयेच्छायुत असती । धर्मलोपक ते मलिन चित्तीं । ऐसे नर द्वापार युगीं ॥२७॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते युगधर्मवर्णनं नाम षोडशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP