मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय १४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । नरनारायण ज्ञान सांगती । मार्कंडेय मुनी ऐकती । तपानें ब्रह्मचर्यें सिद्ध असती । ज्ञानग्रहणार्थ वर्ण निःसंशय ॥१॥
शिवानें रामचंद्रासी कथिलें । हें ज्ञान पूर्वीं तेणें जाहलें । लक्ष्मणाग्रज शांत भले । राज्यसंगें विसरले जें ॥२॥
वशिष्ठांचा उपदेश ऐकत । तेव्हां पुनरपि तें ज्ञान लाभत । मार्कंडेय विचारित । कोण हा राम महाभाग ॥३॥
जन्मला कोणत्या वंशांत । कोणाचा तो पुत्र असत । हें सर्व सांगा मजप्रत । नरनारायण महामुनींनो ॥४॥
रवि वालखिल्यास सांगत । ऐसें ऐकून मार्कंडेयाचें प्रार्थित । ते मुनी होउनी परमप्रीत । चरित्र वर्णिती राघवाचें ॥५॥
ब्रह्माचा पुत्र मरीची असत । कश्यप त्यापासून जन्मत । अदितीपासून कश्यपा लाभत । सूर्य पुत्र जो आत्मा जगाचा ॥६॥
सूर्यापासून जन्मत । मनुनामक श्रेष्ठ सुत । वैवस्वत तो प्रख्यात । प्रसिद्ध सातव्या भूमिमंडळी ॥७॥
ब्रह्याचा एक दिवस असत । चतुर्युग एवढा विस्तृत । तेवढीच रात्र एक वर्णित । काळवादी महामुनी ॥८॥
आपापल्या कालें प्रेरित । चवदा मनू क्षत्रकर्मांत । एक सप्तती त्यांची अधिक असत । चार मन्वंतरे युगांची ॥९॥
स्वायंभुवादी मनू ख्यात । स्वाधिकारें भिन्न असत । त्यांचें षट्‌क असे वर्णित । मनुपुत्र अवतार ॥१०॥
विभागशः प्रकाशवित । सर्व धर्म मनू प्रख्यात । देव विप्र सप्त पुरंदर कीर्तित । मनूचे अंश ते सारे ॥११॥
भूमिपालन करावें पाळोनी विधान । वर्णाश्रमांचें नियमन । तत्त्वमार्गे कर्मज्ञानादिसाधन । ऋषिगणांते करावें ॥१२॥
मनु सांगे यजमानाकार्य करावें । आपुल्याला मन्वंतरी बरवें । त्रिभुवन वृष्टयादीनें तारावें । महेंद्राअनेम कर्मानुसार ॥१३॥
कर्मफलानुसार पाळावें । देवांनी यज्ञभाग स्वीकारावे । कर्मकर्त्यास फळ द्यावें । आदरपूर्वक तयांनी ॥१४॥
जेव्हां दैत्यांपासून भय संभवत । इंद्रासी तेव्हां कलांशें रक्षित । बिडौजसा त्या इंद्रासी त्वरित । विष्णु पालक सर्वांचा ॥१५॥
मनूच्या पुत्रपौत्रांनी करावें । प्रजापालन सर्वभावें । क्षात्रधर्मपरायण रहावें । ऐसें षट्‌क समाख्यात ॥१६॥
एक मन्वंतर होता समाप्त । दुसर्‍याचा उदय होत । कर्मानंतर ज्ञाननिष्ठ होत । षट्‌क नित्य आदरानें ॥१७॥
तपानें देह सोडून । जावें स्वधार्मी परतून । तोच लय नामें ख्यात असून । मन्वंतर लयात्मक म्हणती ॥१८॥
तेथ सर्व जन लय पावती । स्थावर जंगमही अंतीं । द्वितीय मनुमुख्य जेव्हां उदित होती । भृग्वादी निर्मिति स्वतः तें ॥१९॥
योगसेवेनें आपणा निर्मित । चराचरमयी सृष्टि घडवित । ऐशीं मन्वंतरे ख्यात । जाणावीं हीं विबुधांनीं ॥२०॥
ब्रह्याचा दिवसान्त होत । तेव्हां नैमित्तिक लय घडत । त्रैलोक्याचा नाश निश्चित । त्यासमयीं होत असे ॥२१॥
ऐश्या दिनक्रमें ब्रह्म देवाचें असत । शतवर्षे आयुष्य संशयातीत । तें पूर्ण आयुष्य भोगितां पावत । पितामहही लयें मृत्यू ॥२२॥
ऐशा क्रमानें त्रैगुण्य असत । नाशरुप तें ख्यात । जन्ममृत्यूमयी माया जगांत । नाना द्वंद्व प्रकाशिनी ॥२३॥
द्वंद्वभावांत संस्थित । भरांतिदा माया कथिली अद्‌भुत । जन्ममृत्यू युक्ता असत । ऐसें रहस्य जाणावें ॥२४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खंडे महोदरचरिते मायावर्णनं नाम चतुर्दशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP