मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ३| अध्याय ७ खंड ३ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ खंड ३ - अध्याय ७ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत मोहासुरविजयवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । रवि कथा पुढती सांगत । मोहासुराची जी रोचक असत । मदिरेपासून तयास होत । पांच पुत्र महाबळी ॥१॥तेजस्वी ते पित्यासम होत । उग्र क्रूर बुद्धिंमंत । पांचही शास्त्रपारंगत । अलंकार जणूं त्या नगराचे ॥२॥ऐसा कांहीं काळ लोटत । तेव्हां महासुर बोलावित । दैत्येशां सकलां ते येत । त्यांसी सांगे हितवचन ॥३॥नीतिसंयुक्त सुखयुक्त । प्रीतिवर्धक जे योग्य असत । मोहासुर म्हणे तयांप्रत । दैत्याधिपांनो प्रचंडादी ॥४॥ऐकावें माझें हितप्रद वचन । जिंकूया आपण त्रिभुवन । जरी तुमच्या मनीं हित भावन । तरी मान्य हें करावें ॥५॥तुमचें सर्वाचें कार्य करीन । शुक्रपालित तुम्हीं महान । तैसें मज असुरेश्वरपदीं स्थापून । त्यानेंच धन्य मज केलें ॥६॥मी अजेय जगीं असत । रवीच्या वरदानें संशयातीत । तेव्हां ते नमस्कार करुन गर्जत । हर्षनिर्भर दैत्यगण ॥७॥महात्म्या महाभागास म्हणती । स्वामी योग्य विचार करिती । आपुल्या वाक्यामृतें आम्हांप्रती । तृप्ति आज वाटतसे ॥८॥तपस्तेज समन्वित । सम्यक् आपला विचार असत । आपुल्या आज्ञेनें त्रैलोक्यांत । जिंकू सर्व प्राणिमात्रासी ॥९॥पराक्रमात न तुल्य आपणासम । सर्व विश्वांत इतुका महान । म्हणोनी विष्णु प्रमुख देवांसी अनुपम । अन्यांसही जिंकूं त्वरित ॥१०॥मोहासुर त्यांचें वचन ऐकत । आनंदानें त्यांस आज्ञापित । म्हणे सर्वही सुसज्ज व्हा त्वरित । दाखवूं आपला पराक्रम ॥११॥ते युद्धमार्गज्ञ दैत्येश करित । युद्धसज्जता अति त्वरित । नाना शस्त्रें घेऊन येत । यमधर्मा गिळण्या जणूं निघती ॥१२॥त्यांस पाहून मोहासुर हर्षित । दर्पें स्वयं रथ संस्थित । चतुरंग सैन्य त्याचें शोभत । कालरुद्रासम तो वाटे ॥१३॥सर्वांचा तो अध्यक्ष असत । भयदायक शुक्र संयुक्त । पृथ्वीविजयीं संचार उद्यत । प्रथम वसुधातळावरी ॥१४॥त्याची अपार सेना संचलन करित । भूतल तेव्हां दबून जात । तेव्हां जी धूळ उसळत । तेणें झाकिलें सूर्यबिंब ॥१५॥त्या काळरुप महादैत्यांसह । युद्ध करण्याचा कोणा संमोह? । त्यांचें तेज अतिदुःसह । विप्रांनो जिंकती सर्वांसी ते ॥१६॥सप्तद्वीपवती अवनी जिंकून । असुरोत्तम गेले नंतर चालून । विष्णु प्रमुखादी देवांवरी वेगें करुन । देव शरण जाती इंद्रासी ॥१७॥सेना आपुली सज्ज करित । इंद्रासहित जात ब्रह्मदेवाप्रत । परी तो त्यांस नेत । शंकराकडे कैलासीं ॥१८॥शंकरासहित ते जात । केशवा जवळीं वैकुंठांत । केशव त्या सर्वांसी नेत । सूर्यलोकीं भास्कराजवळ ॥१९॥त्यांस पाहून भययुक्त । सुरेश्वरांसी भास्कर सांगत । निःश्वास सोडून त्यांचे हित । मोहासुरा मीच वर दिला ॥२०॥माझ्या वरदानें तो समर्थ झाला । दैत्यपुंगव अजिंक्य जगाला । देवेंद्रांनो मोहासुराला । जिंकू शकण्या अक्षम सारे ॥२१॥कर्मांचे फळ निश्चित । ते कोणासीही न चुकत । म्हणोनी आपण सारे वनांत । राहूया सांप्रत कांहीं काळ ॥२२॥त्यागूं राज्यादिक भयग्रस्त । देह आपुले रक्षूं अक्षत । त्या मोहासुराचें पुण्य संपत । त्याचा मृत्यू तें होई ॥२३॥अन्यथा लढूं जरी सांप्रत । तरी तो महादैत्य मारील बलयुक्त । प्रतापी दैत्य भूपेंद्र उत्साहयुक्त । देवेंद्रासह सर्वांसी ॥२४॥ऐसें माझें वाक्य ऐकत । रवि सांगे कथा ही अद्भुत । तेव्हां बृहस्पति मज म्हणत । सर्व नीतींत निपुण जो ॥२५॥देवाचार्य महायश देवांप्रत । हितकारक वचन उचित । भानूचा उपदेश सर्वथैव वाटत । सत्य हितकारक या समयीं ॥२६॥नंतर सर्वही देव म्हणत । उत्तम सांगितलें आमुचें हित । भानूचें वचन देवगुरु प्रशांसित । तेंच आम्हीं प्रमाण असे ॥२७॥ऐसा निश्चय करुन । देवेंद्रासह वनीं जाऊन । पर्वतांच्या गुहांत निवसन । करिती सारे भयग्रस्त ॥२८॥मोहासुर असुरांसहित । स्वर्गावरी आक्रमण करित । तेथें देव त्यांसी न दिसत । म्हणे पळाले मज भिऊन ॥२९॥परम हर्षित तो होत । स्वर्गीं विविध स्थानांवरी स्थापित । बहुविध बलाढय दैत्य बळवंत । आपण बैसला इंद्रपदीं ॥३०॥स्वर्गलोकींचे भोग उत्तम । सेवन करित असुर अनुपम । गंधर्व अप्सरा सेवाधर्म । आचरती भयें एकनिष्ठ ॥३१॥स्वर्गलोकांत जे निवसत । ते लोक असुरांची सेवा करित । स्वर्गलोक जिंकून सत्यलोकीं जात । मोहासुर दैत्यांसह ॥३२॥तेथ सत्यलोकांत । पितामह ब्रह्मा त्यास न दिसत । शून्य सारे नगर पाहत । जाहला हर्षनिर्भर तें ॥३३॥जिंकून लीलया सत्यलोक । निघाला जिंकण्या वैकुंठलोक । तेथ विष्णूही नसती निःशंक । असुरराज्य तेथ स्थापिती ॥३४॥नंतर कैलासीं प्रवेशत । तेथ शंकर न दिसत । कैलास शिवविवर्जित । जिंकला असुरें क्षणार्धांत ॥३५॥तदनंतर सौरलोकांत । महाअसुर तेव्हां जात । आदित्यहीन तो लोक पराजित । करिता झाला सत्वर ॥३६॥शक्तिलोक शक्तिहीन । तैसाचि सहजी जिंकून । दैत्येंद्र मुख्य तो हर्षोत्फुल्लमन । देवनगरीं स्थापी दैत्येंद्रा ॥३७॥कैलासांत अधिपति नेमत । उग्र नामक आपुला सुत । वैकुंठाधिपतित्व देत । क्रूरदैत्या त्या वेळीं ॥३८॥सौरलोकी मेधावीस नेमित । शक्तिलोकीं शोचना स्थापित । एक होता अति गर्वित । दुसरा युद्धलालस ॥३९॥सत्यलोकीं हरणासी नेमित । जो सर्वहारक प्रख्यात । प्रचंड मुख्यादींस करित । इंद्रलोकांदीचे अधिपति ॥४०॥कालांतका पाताळीं पाठवित । तो शेष नागास भेटत । तेव्हां त्या दैत्यराजाप्रत । सामनीति शेष दाखवी ॥४१॥नागराजा त्याचें करी स्वागत । प्रभुत्व असुरांचे मान्य करित । करभार देऊन टाळित । युद्धांत विनाश सर्वस्वाचा ॥४२॥ऐश्या प्रकारें ब्रह्मांड जिंकित । दैत्यनायक मोहासुर अल्यकाळांत । महासुर आनंदे राहत । असुर दैत्यांसमवेत ॥४३॥नंतर आपुल्या मूळ नगरांत । परतूनी तो मोहासुर जात । विषयावासक नगर शोभत । राजाश्रयें त्या वेळीं ॥४४॥तेथ राहून ब्रह्मांडीं सत्ता । प्रस्थापित करी महत्ता । मोहासुरा वाटे कृतकृत्यता । म्हणे माझ्यासम मीच ॥४५॥अतुल भोग भोगित । सर्वोत्तम जे त्रैलोक्यांत । विषयप्रिय तो भयमुक्त । गर्वोद्धत दैत्यांसह ॥४६॥ऐसा मोहासुर विजय मिळवित । त्याचा प्रभाव त्रिभुवनांत । पुढिल कथा अति अद्भुत । गणेश माहात्म्यपर असें ॥४७॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते मोहासुरविजयवर्णन नाम सप्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP