मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ३| अध्याय २५ खंड ३ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ खंड ३ - अध्याय २५ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत सगरभगीरथचरितम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । नरनारायण पुढती सांगती । अंबरीषाचा पुत्र जगतीं । यौवनाश्व नामें त्याची ख्याती । त्याचा सुत हारित ॥१॥त्याचा पुत्र पुरुकुत्स असत । त्रसद्दस्यू त्यापासून जन्मत । अनरण्य झाला त्याचा सुत । त्याचा नातू हर्यश्व ॥२॥त्या हयेंश्वाचा पुत्र साधुसंमत । अरुण सूर्यवरानें संभवत । त्यास पुत्र सत्यव्रत । महायशस्वी विद्यावंत ॥३॥तोच त्रिशंकुनामें प्रख्यात । देहधारा जात स्वर्गलोकांत । त्याचा पुत्र हरिश्चंद्र असत । सर्वधर्मपरायण ॥४॥विश्वामित्रापासून जाणून । विघ्नेशातें करी वंदन । गाणेशक स्वयें होऊन । अंती गेला स्वानंदलोकीं ॥५॥गणनाथाचें सायुज्य लाभत । महायश तो भक्तियुत । त्याचा पुत्र झाला रोहित । रोहिताचा पुत्र हरित ॥६॥चंप सुदेव विजय जन्मत । भरुक वृकबाहू त्या कुळींत । बाहूचा आत्मज सगर असत । त्यास होत्या दोन भार्या ॥७॥प्रभा भानुमती नामें भक्तियुत । त्यांनी आराधिला भृगु योगी जगांत । पुत्रार्थ तो त्यांस वर देत । पुत्रप्रद अति प्रभावी ॥८॥साठ हजार मागितले सुत । प्रभा संतती महान वांछित । भानुमतीस परी इष्ट वाटत । एकच पुत्र असमंजस नामा ॥९॥तो योगयुत प्रतापवंत । सर्व शिशूंस धरुन टाकित । शरयूनदीमध्यें मारित । बालकविनाशी तो खळ ॥१०॥पित्यानें त्यागिता जात वनांत । मायाबळें सर्व शिशूस करी जिवंत । त्याचा पुत्र अंशुमान् ख्यात । धर्मपरायण प्रेमळ ॥११॥प्रभेस साठ हजार सुत । झाले कालांतरें जगांत । सगर तेव्हा यज्ञ आरंभित । अश्वमेध बलदर्शनासी ॥१२॥शंभर यज्ञ तेव्हां उचित । करणें हें उद्दिष्ट पुनीत । नव्याण्णव यज्ञ होता समाप्त । शंभरावा आरंभिला ॥१३॥अंत्य यज्ञ प्रारंभ होत । सुरेंद्र तेव्हां होय क्षुभित । मायाबळें अश्व नेत । पाताळलोकीं सत्वर तें ॥१४॥कपिलाचा आश्रम असत । जेथ पाताळ लोकांत । तेथ यज्ञाचा अश्व बांधित । इंद्र तेव्हां हेतूनें ॥१५॥सगराचे साठ हजार । परम दुर्जय ते पुत्र । शोध करिती अति उग्र । यज्ञीय अश्वाचा प्राणपणें ॥१६॥अश्वाची पाउलें भूमींत । उमटली होतीं तें पाहत । म्हणोनि विचक्षण ते खणित । बळानें भूमी समग्र ॥१७॥तेव्हां त्यांनी निर्मिला । लवणात्मक समुद्र ख्यात झाला । म्हणोनि सागर नाम पावला । सगरपुत्रांची ती निर्मिति ॥१८॥ते सगर पुत्र पाताळांत । जेव्हां इतस्ततः संचार करित । अश्वराजासी पाहत । कपिलमुनी समीप ॥१९॥यज्ञीय अश्व होता चरत । कपिलांच्या आश्रमांत । त्या मुनीसी चोर मानून धावत । शस्त्रास्त्रांनी मारावया ॥२०॥कपिलाच्या क्रोधाग्नींत । ते सगरपुत्र भस्मीभूत । पुरंदर तें होत हर्षित । प्रतापी त्या यज्ञविघ्नानें ॥२१॥नारदें सांगतां वृत्तान्त । सगर अंशुमान पौत्रका पाठवित । तो महाद्युती जाऊन नमित । कपिलाची स्तुति करी ॥२२॥तेव्हा तो कपिल यज्ञाश्व देत । तो घेऊन अंशुमान परतत । आपुल्या आजोबांजवळ जात । तेणें यज्ञ पूर्ण झाला ॥२३॥सगर अश्वमेध संपूर्ण करित । अंशुमानासी राज्यीं स्थापित । महायश स्वयं वनीं जात । गणेशाचा महामंत्र त्यास मिळे ॥२४॥गुरुपासून मिळता योग शांतिद । मंत्र गणेश जपे तो सुखद । योगी होऊन परमद्युतिमानद । अनन्यमनें गणेशा भजे ॥२५॥अंतीं गणेशाप्रत जात । ब्रह्मपरायण सतत । अंशुमान कपिलापासून लाभत । ज्ञान गणेशयोगाचें ॥२६॥तोही गणेशास नित्य भजत । गाणपत्य स्वभावें वर्तत । त्याचा पुत्र दिलीप ख्यात । दिलीपसुत भगीरथ ॥२७॥दिलीपें राज्यावरी स्थापिला । सद्धर्में राज्य करु लागला । एकदा नारदमुनी जाता झाला । भगीरथा भेटावया ॥२८॥त्यानें पूजा केली उत्तम । तेव्हा नारद म्हणे वचन अभिराम । तुझ्या या प्रपितामहांचा पूर्वी उपरम । झाला ब्राह्मण क्रोधानें ॥२९॥कपिलाच्या शापाग्नींत । साठ हजार ते दग्ध मृत । त्यांना गति नाहीं मिळत । सांप्रत त्यांचें हित करावें ॥३०॥स्वर्गंगा महाराजा आणून । भूवरी तिच्या जळात मग्न । कराव्या त्यांच्या अस्थी पावन । तेणें स्वर्ग त्यांस लाभेल ॥३१॥ऐसें सांगून गणपासी स्मरत । महायोगी नारद स्वर्गी परतत । इकडे भगीरथ चित्तांत । अति दुःखित जाहला ॥३२॥प्रधानांवरी राज्य सोडून । स्वयें वनी जात उन्मन । तपश्चर्या करी महान । आराधना करी स्वर्नदीची ॥३३॥वर्ष शतपूर्ण होत । तपश्चर्या करी अविरत तेव्हा स्वर्गवाहिनी । गंगा प्रकटत । भगीरथापुढें प्रसन्न ॥३४॥भक्तिसंयुत नृप पाहत । त्यास वर देऊ करीत । भगीरथ विविध प्रकारे स्तवित । प्रतापवन्त महाभक्त ॥३५॥म्हणे स्वर्गंगे जरी प्रसन्न । महाभागे तरी कर पावन । माझ्या पणजोबांस येऊन । पृथ्वीवरी आत्मोदके ॥३६॥स्वर्गंगा म्हणे तयाप्रत । मी येईन भूतलीं निश्चित । परी माझा वेग धारण करित । ऐसें स्थान शोधावें ॥३७॥ऐसा पात्र जो असेल । जो माझा भार सहन करील । त्यास तूं विनवी विमल । तरी येईन भूतलावरी ॥३८॥स्वर्नदीचें ऐकून वचन । भगीरथ करी आराधन । शंकरांचे त्यास जाणून । सुपात्र गंगा अवतरणार्थ ॥३९॥एक वर्ष तप करित । तेणें शंभू प्रसन्न होत । म्हणे वर माग मनोवांछित । तेव्हां मागे भगीरथ ॥४०॥जरी शंकरा प्रसन्न । झालात तरी द्या वरदान । स्वर्नदी घारण करा महान । आपुल्या जटाभारावरी ॥४१॥शिवें तथास्तु म्हणता स्मरत । स्वर्गंगेसी चित्तांत । ती प्रकट होता सांगत । देवी शंकर करुणानिधि ॥४२॥ते तुजला धरतील । महीतलीं जेव्हां अवतरशील । हें ऐकता गर्वयुक्त प्रबल । पडली शिवमस्तकीं स्वर्गंगा ॥४३॥सहस्त्र धारांनी पडत । स्वर्गांतून भूतलीं जोरांत । शिवमस्तक बुडवून क्षणांत । जाईन म्हणे रसातळीं ॥४४॥ऐसा विचार मनीं करित । तिचा गर्व मायेनें जाणत । शंकर आपुल्या जटेंत । सामावून तिज घेत असे ॥४५॥तेव्हां स्वर्गंगा जटेंत । शंकराच्या तेथ वाहात । परी शिवजटेचा अंत । तिजला ना सांपडला ॥४६॥नंतर नृप त्यासी प्रार्थित । म्हणोनी शिव तिज सोडित । धरणीतळावरी वाहत । तेथ पाहे जन्हू नृपासी ॥४७॥जन्हु मग्न होता तपांत । त्या घोर तापसा ती म्हणत । दूर हो मार्गांतून त्वरित । अन्यथा तुज बुडवीन ॥४८॥परी जन्हू घोर तपव्रतांत । मग्न होता म्हणोनी न देत । उत्तर काहीही तिजप्रत । तेव्हा गंगा संतप्त झाली ॥४९॥जन्हूस बुडविण्या धावत । तें जाणून क्रोध संतप्त । तो नृप पिऊन टाकी गंगेस त्वरित । पुन्हा तपार्थ बैसला ॥५०॥तें पाहून भयभीत । तैसाची मनीं दुःखित । भगीरथ त्यास प्रणाम करीत । प्रार्थना करी आर्तभावें ॥५१॥म्हणे महायशा गंगाजल । आपण सोडावें विसल । पूर्वज उद्धरतां बळ । वाढेल माझे जगांत ॥५२॥त्याची प्रार्थना ऐकत । आपुल्या मांडीतून वाट देत । तेव्हां गंगा पुढे वाहत । जन्हुसुता ती म्हणोनी ॥५३॥जन्हूची पुत्री जान्हवी ख्यात । पुढे वाहे वेगसंयुक्त । सगरपुत्रांच्या अवशेषां बुडवीत । शुद्ध शांतिजलांत आपुल्या ॥५४॥सुंदर विमानांत आरुढ होत । सगर पुत्र उद्धरुन जात । भगीरथ सन्निध प्रकट होऊन त्वरित । स्वर्गलोकीं ते गेले ॥५५॥भगीरथें स्वर्गवाहिनी पूजिली । म्हणोनी ती पृथ्वीवर आली । जन्हूची कन्या नंतर शोभली । भागीरथी नामें ख्यात ॥५६॥ऐसा भगीरथ प्रभावयुक्त । त्याचा पुत्र श्रुत असत । त्यास तो राज्यावरी स्थापित । स्वतःगेला वनांतरी ॥५७॥वसिष्ठापासून लाभत । गाणेशक योग तो साध्य करित । गाणपत्य होऊन अंतीं प्राप्त । गणेशासायुज्य योगसेवेनें ॥५८॥हें भगीरथाचें आख्यान । वाचील वा ऐकेल प्रसन्न । त्यासी भुक्तिमुक्ति लाभून । गणेशकृपा प्राप्त होईल ॥५९॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते सगरभगीरथचरितं नाम पंचविंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP