मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ३| अध्याय ४२ खंड ३ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ खंड ३ - अध्याय ४२ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत लक्ष्मीवरप्रदानवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मुद्गल म्हणती दक्षाप्रत । ऐक विग्नपाचें अद्भुत चरित । कृष्ण पांडवांसी जें सांगत । अमित द्युति वासुदेव ॥१॥श्रीकृष्ण म्हणे युधिष्ठिराप्रत । महापुण्यशीला ऐक वृत्तान्त । उपाय असे एक अद्भुत । संकट मुक्त होण्यास्तव ॥२॥पुरातन इतिहास सांगेन । जो आहे अपूर्व महान । सर्व विघ्नहर पुण्यपावन । महोदर गुणांनी लक्ष्मीमंडित ॥३॥एकदा देवदेवेश वैकुंठांट । विष्णु बैसला होता लक्ष्मीसरित । विश्वसेनादी समीप असत । सुखविलासीं निमग्न ॥४॥गरुड वाहन पुढयांत । त्याच्या होते हर्षयुक्त । अप्सरा गंधर्व देव सेवित । विष्णु देवास त्या समयीं ॥५॥सर्व देवांच्या सान्निध्यांत । लक्ष्मी म्हणे भगवंताप्रत । सनातना महाभागाप्रत । विनयसंयुत त्या वेळीं ॥६॥स्वामी ऐका माझी विज्ञप्ति । आपण माझी सतत गति । स्त्रियांस भर्त्यांसम जगतीं । नसे अन्य हें वेदभाषित ॥७॥आपण साक्षात देवदेवेश । शंकरादी स्तविती विशेष । भक्तांसी सिद्धिदाते सिद्धीश । षडैश्चर्य समायुक्त ॥८॥देवादींस पदप्राप्त होत । आपणापासून सुविहित । सर्वांस भुक्तिदाते जगात । मुक्तिदाते आपणची ॥९॥सर्वांचे पालक आपण विश्वांत । आपुला पालक अन्य नसत । तथापि ध्यान करता सतत । कोणास भजता तें सांगा ॥१०॥एकांतात पूजिता कोणास । आपण आनंद परमबुद्ध जगास । श्रुति सांगती रहस्यास । म्हणोनी विस्मय मम चित्तीं ॥११॥म्हणोनी मी निर्लज्ज विचारित । कोणाचें ध्यान करिता सतत । मी आपुली चरणदासी विनीत । संशय माझा दूर करा ॥१२॥आपण सर्वत्र द्वद्वहीन । समरुप आनंदमय महान । तरी कां मोहविता जन । ध्यान करुनी अन्याचें ॥१३॥या पूजन ध्यानाचें आपणांस । काय फळ मिळणार विशेष । तथापि करिता भक्तीस । कोणाची आपण केशवा? ॥१४॥श्रीकृष्ण म्हणती युधिष्ठिराप्रत । प्रियेचें हें वचन ऐकून हसत । तिला आलिंगन देऊन म्हणत । ऐक प्रिये जलधिसुते ॥१५॥तूं शुभप्रद प्रश्न विचारलास । जो तारक सर्व भूतांस । सिद्धिदाता सकलांस । उत्तर त्याचें एक आतां ॥१६॥जनासी मोहविण्यां न करित । ध्यान मी नित्य चित्तांत । कुलदेवास गणेशा भजत । सर्वभावें मी प्रिये ॥१७॥गुणेश्वरापासून संजात । महेश्वर आम्ही जगीं ख्यात । पांच देव महाभागे बलयुक्त । ऐक पूर्व परंपरा ॥१८॥गुणेशें पूर्वी आराधिला । गणनायक जो वंद्य जयाला । त्या गणेशें तेव्हां स्थापिला । स्वपदीं प्रेमभावयुत ॥१९॥त्याच्या वरदानें होत । गणेश ज्ञान सत्तादि संयुक्त । तो गुणेशही भक्तिसंयुत । भजतो देवी त्या गणेशा ॥२०॥त्याची सेवा करुन । आम्ही झालों ज्ञानवान । स्वकार्य प्रवर्तक पावन । महेशान प्रख्यात ॥२१॥म्हणूनी भावसंयुक्त भजत । आम्हीं तयास आदरयुक्त । तो आमुचा कुलदेव प्रख्यात । सर्व अर्थ प्रदायक ॥२२॥विष्णूचें वचन ऐकून । लक्ष्मी झाली विस्मित मन । महाविष्णूस बोले वचन । विनयपूर्वक तदनंतर ॥२३॥कोण हा गणेश्वर देव । कैसें स्वरुप कोण ठाव । तो जर आपुला कुळदेव । जनार्दना मी भजीन त्यासी ॥२४॥देवि तू योग्य प्रश्न केलास । आता करीन वर्णनास । त्याचें स्वरुप अपूर्व सुरस । सांगेन मी तुज स्नेहानें ॥२५॥स्वानंदीं तो गणेश वसत । ब्रह्मनायक पंचधा जन्मत । त्याचें कथानक तुजप्रत । वर्णन करतो या वेळीं ॥२६॥नामरुपात्मक देव जगतीं । ब्रह्मांत त्याची नित्यस्थिति । तेथ स्वानंदक योग वर्णिती । असद्रूप या नावानें ॥२७॥असता अमृतरुप असत । ते सदात्म प्रवाचक ख्यात । सत्स्वरुप स्वानंदयुक्त । ऐसे जाण प्रिये तूं ॥२८॥जें सत्यासत्य विहीन । सत्यासत्यमय नित्य नूतन । आनंदात्मक रुपी तो महान । समस्वानंद जाणावा ॥२९॥त्रिप्रबोध त्रिहीन । नेतिरुप मोहहीन । महाभागे तो महान । स्वानंद अव्यक्त प्रसिद्ध ॥३०॥वेदवादी गणेशाचें वर्णन । मायामय ऐसें करिती पावन । चतुर्धा रचना करुन । तो त्यांत नित्य खेळे ॥३१॥मायाहीनतेनें होत । ढुंढी प्रयोगवाचक अद्भुत । त्याचा कोणाशी संयोग न होत । ऐसे बुधजन सांगती ॥३२॥जें मायायुक्त विहीन । तेच भरांतिदायक असून । त्या उभयतांच्याहून भिन्न । गणेश हा योगरुप ॥३३॥त्यात योगिजनांस शांति लाभत । यांत कांहीं संशय नसत । म्हणोनी योगस्वरुपा ती ज्ञात । शांति उत्तम जाणावी ॥३४॥मनवाणीमय सर्व असत । गकाराक्षरानें व्यक्त । मनवाणी विहीन ज्ञात । णकाराक्षररुपानें ॥३५॥त्यांचा जो स्वामी प्रख्यात । तो हा गणाघीश वेदांत । यासाठीं भक्तिसंयुक्त । भजतों मीं त्या सर्वनायका ॥३६॥भ्रमरुपा ती महामाया । मानदे सिद्धि जाणी सदया । सिद्धीस्तव सर्व लोक या । भ्रमण करिती जगतांत ॥३७॥भ्रमधारकरुपा बुद्धि जाण । सिद्धि बुद्धि भ्रमाची खूण । त्यांचा स्वामी सिद्धिरमण । सदा योगशांति रुप ॥३८॥या कारणें जे ब्रह्मभूत । ते होती त्याच्या भजनीं रत । ऐसें सांगून नारायण थांबत । समुद्रपुत्री चकित झाली ॥३९॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते लक्ष्मीनारायणसंवादवर्णन नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP