मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध| अध्याय १५ वा सिध्दान्तबोध प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय १५ वा ‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे. Tags : pothisiddhant bodhपोथीसिध्दान्तबोध अध्याय १५ वा Translation - भाषांतर श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ अपूर्व नरदेहाची प्राप्ती ॥ बहुतां जन्मांचे अंतीं ॥ भोगावया सुख संपत्ती ॥ आणिक जन्म असेना ॥१॥या मनुष्यांकारणें ॥ निर्मिलीं नाना पक्वानें ॥ कित्येक शाखांची चवी भिन्नें ॥ चाखितीं श्रीमंत आवडी ॥२॥बहुत फळें बहुत मेवे ॥ मानवांसाठीं केलें देवें ॥ बहु सुगंधाची नांवें ॥ कोठवर सांगावी ॥३॥अनेक वस्त्रांचे श्रृंगार ॥ शाला दुशाला पीतांबर ॥ झगे तिवटें जरी चीर ॥ बहुत लुगडीं पाटावें ॥४॥सर्व सुखांची राशी ॥ भोगणें घडे नरदेहासी ॥ हत्ती घोदे बैसावयासी ॥ पलंग पालख्या रथ गाडया ॥५॥सत्ता साहेबी उडे चंवरी ॥ येवढया भाग्याची चढे थोरी ॥ भोगांगना सुंदरनारी ॥ हास्य विनोदें सुखावती ॥६॥नित्य स्नान देवतार्चन ॥ वाचिती शास्त्रें पुराण ॥ घोकिती वेद करिती पठण ॥ शिकती कळाकूसरी ॥७॥चौदा विद्या चौसष्टि कळा ॥ प्राप्त होती मानवांला ॥ राग संगीत गायनकळा ॥ सप्तस्वरे आलापिती ॥८॥लाविती लग्न मिरविती वरात ॥ दारु जाळिती असंख्यात ॥ नाचविती वेश्या गतिगात ॥ विनोद करिती मेहुणे ॥९॥व्याही विहिणी जावा नणंदा ॥ हास्य करिती गदगदां ॥ नरदेहीं आल्या ह्या विनोदा ॥ प्राप्त होती अनायासें ॥१०॥चाकरी मजूरी व्यवहार करिती ॥ घरें बांधोनियां नांदती ॥ आपुलें परावें ओळखिती ॥ जाणती बरें वाईंट ॥११॥पारखिती हिरे मोतीं ॥ आपुलिया उत्तम म्हणविती ॥ बहुत शहाणे चतुर होती ॥ जोडिती धन लौकिक ॥१२॥घालिती तिवाशा टेंकिती लोडें ॥ वोढिती झरझरी घेती विडे ॥ पिकदाणी आणूनियां पुढें ॥ सेवक ठेविती पिकाची ॥१३॥जिहीं जैसें संचित केलें ॥ तयांसी तैसें प्राप्त जाहलें ॥ एक दरिद्री जन्मले ॥ सदा भोगिती दु:खासी ॥१४॥वस्तीस मोडकी झोंपडी ॥ पांघरावया फाटकी घोंगडी ॥ सदा लंगोटी अंगें उघडीं ॥ डोईस चिंधी मिळेना ॥१५॥ऋण काढोनियां लग्न केलें ॥ त्याचें व्याज दुप्पट जाहलें ॥ तें फेडितां जन्म गेले ॥ न मिळे लेश सुखाचा ॥१६॥अहो या नरदेहीं जन्मावें ॥ जन्मोनि व्यर्थ काय मरावें ॥ कांहीं सार्थक करोनि घ्यावें ॥ आयुष्य आहे तंववरी ॥१७॥या नरदेहीं थोर मौज ॥ कित्येक जागीं होय झुंज ॥ होती श्रीमंत करिती राज्य ॥ घेती मुलुक फौजाबळें ॥१८॥एक संन्यास घेती ॥ एक तीर्थवास करिती एक मळे शेतें राबिती ॥ एक करिती चाटेपण ॥१९॥एक जाहले बैरागी ॥ राख लाविती सर्वांगीं ॥ एक वस्त्रें विणोनि मागीं ॥ घडिया मांडी हाटवटी ॥२०॥कोणी जाहले संसारी ॥ कोणी जाहले भिकारी ॥ कोणी होऊनि ब्रह्मचारी ॥ करिती साधन तपाचें ॥२१॥कोणी जाहले सिध्द साधु कोणी ॥ जाहले तस्कर भोंदु ॥ कोणी जाहले दुर्जन मैंदु ॥ ठकवित फिरती लोकांसी ॥२२॥यापरी जन्मोनि प्राणी ॥ वर्तती आपुले भाग्यें करुनी ॥ त्यांची सांगता कहाणी ॥ नसतां ग्रंथ वाढेल ॥२३॥यालागीं हें असो ॥ कृष्णचरणीं मन बसो ॥ आत्मस्वरुपीं बुध्दि पैसो ॥ नसो चिंता जीवासी ॥२४॥पूर्वी काय पुण्य केलें ॥ तेणें नरदेह प्राप्त जाहले ॥ धरिलीं श्रीकृष्णाचीं पाउलें ॥ बरें हो कीं वाईट ॥२५॥आतां हाचि माझा धंदा ॥ सदा स्मरेंजी गोविंदा ॥ लोक निंदेच्या वादा ॥ न पडें कदा कल्पांतीं ॥२६॥अहो काय लोकांसी काज ॥ कृष्णभजनीं माझें निज ॥ अंतरीं होतें गौप्यगुज ॥ तेचि ग्रंथीं ठेवितों ॥२७॥येथें आज्ञा श्रीगुरुची ॥ सिध्दांतबोध ग्रंथाची ॥ त्यासी आणावया रुची ॥ स्वामी माझा श्रीगुरु ॥२८॥दंडवत घालून श्रीगुरुस ॥ म्हणे ग्रंथ सावकाश ॥ मागिले अध्यायीं ऋषीभाष ॥ गडबड जाहली तत्त्वांची ॥२९॥एके वायु ब्रह्म केले ॥ दुजें आकाशाचि स्थापिलें ॥ दोघांचे पाहोनि गलबले ॥ तिजा उठिला क्षोभोनि ॥३०॥म्हणे ऐका सावधान ॥ तुम्ही चुकलां मुळींची खूण ॥ आतां मीच प्रमाण ॥ आहे तैसें सांगतों ॥३१॥विवेकें पहा अनुभवें ॥ आकाशा वायु ब्रह्म नोहे ॥ हे तो पंचभूतांचे मेळावे ॥ ईश्वर कैसे होतील ॥३२॥ईश्वर तो असे वेगळा ॥ पिंड ब्रह्मांडा निराळा ॥ अपरिमित त्याची कळा ॥ ब्रह्मादिकां कळेना ॥३३॥तो महाराजा निर्गुण ॥ गुणातीत ब्रह्म पूर्ण ॥ निर्विकार निरंजन ॥ होता मुळीं एकला ॥३४॥मी ब्रह्म हें आठवण ॥ होतां स्वरुपीं पूर्ण ॥ तेचि महामाया निर्गुण ॥ गुणातीत ब्रह्म पूर्ण ॥ निर्विकार निरंजन ॥ होता मुळीं एकला ॥३४॥मी ब्रह्म हें आठवण ॥ होतां स्वरुपीं पूर्ण ॥ तेचि महामाया जाण ॥ महत्तत्वें उद्भवलीं ॥३५॥मुळीं महत्तत्त्व जाहलें ॥ तेथूनि त्रिगुण जन्मले ॥ रज तम सत्व बोलिले ॥ श्रुतिसाक्ष करुनी ॥३६॥तम व्यालें अहंकारातें ॥ अहंकार व्याला आकाशातें ॥ तेथूनि त्रिगुण जन्मले ॥ रज तम सत्व बोलिले ॥ श्रुतिसाक्ष करुनी ॥३६॥तम व्यालें अहंकारातें ॥ अहंकार व्याला आकाशातें ॥ आकाश व्यालें वायूतें ॥ वायु अग्नि प्रसवला ॥३७॥तेज व्यालें आपासी ॥ आप व्यालें पृथ्वीसी ॥ यापरी पंचभूतांसीं ॥ जन्म जाहले जाणिजे ॥३८॥पंचभूतांचे पंच विषय ॥ ते परिसोनि यथान्वय ॥ अवघी तत्त्वांची सोय ॥ उकलोनि तुम्हां सांगतों ॥३९॥शब्द गुण आकाशाचा ॥ स्पर्श तो असे वायूचा ॥ रुप गुण ओळखा तेजाचा ॥ रस आपाचा असे कीं ॥४०॥पृथ्वी पासोनि जाहला गंध ॥ यापरी पंचभूतांचा भेद ॥ शब्द स्पर्श रुप रस गंध ॥ हे पंच विषय बोलिजे ॥४१॥पंच विषय पंच भूतें जाण ॥ तमोगुणापासोनि निर्माण ॥ रजोगुणाची उत्पत्ति कोण ॥ तेही तुम्हां सांगतों ॥४२॥दश इंद्रियें पंचप्राण ॥ हे रजोगुणाची उत्पति जाण ॥ यांचीं नामें भिन्नभिन्न ॥ परिसा निवाडा मुनि हो ॥४३॥श्रोत्र चक्षु घ्राण रसन ॥ त्वचेसहित पांच जाणा ॥ ह्या ज्ञानेंद्रियांच्या खुणा ॥ ओळखोनि घ्याव्या पिंडांत ॥४४॥वाचा आणि पाद गुद ॥ पांचवें शिश्न तें विविध ॥ हें कर्मेंद्रियांचें भेद ॥ शरीरांत वर्तती ॥४५॥व्यान समान आणि उदान ॥ अपान प्राणासहित जाण ॥ यांसी म्हणावें पंचप्राण ॥ चंचळ असतीं देहांत ॥४६।पंच जाणावीं ज्ञानेंद्रियें ॥ पंच तीं कर्मेंद्रियें ॥ पंचप्राणाच्या अन्वयें ॥ येकुण पंधरा जाणावी ॥४७॥हे रजोगुणाची उत्पत्ती ॥ सांगितली तुम्हांप्रती ॥ आतां सत्वगुणाची भक्ती ॥ तेही निश्चितीं अवधारा ॥४८॥अंत:करण आणि मन ॥ बुध्दिसहित चित्त जाण ॥ अहंकार तो असे गहन ॥ हें अंत:करणपंचक बोलिजे ॥४९॥त्रिगुण आणि पंचभूत ॥ यांपासूनि सृष्टि होत ॥ विश्वामध्यें पदार्थ ॥ उघड दृष्टीं दिसतसे ॥५०॥समस्तांचा कर्दम करुन ॥ सत्ता पुरुष आपण ॥ पिंड ब्रह्मांडा पासून ॥ उभे केलें सारिखें ॥५१॥पिंडदेहावांचूनि कांहीं ॥ सुखविलास होणार नाहीं ॥ म्हणोनियां देही पाही ॥ बहुत कौतुकें निर्मिला ॥५२॥स्थूल सूक्ष्म कारण ॥ चौथें तें महाकारण ॥ यापरी सुखविलास जाण ॥ उभारिले भगवंतें ॥५३॥स्थूलदेहाची जागृती ॥ लिंगदेहाची स्वप्नस्थिती ॥ कारणदेह ती सुषुप्ती ॥ महाकारण ते तुर्या ॥५४॥ऐशा ह्या चारी अवस्था ॥ चहूं देहांच्या तत्वता ॥ आतां चहूं वाचेची कथा ॥ तेही तुम्हां सांगतों ॥५५॥तयांची नामें परोपरी ॥ परापश्यंती मध्यमा वैखरी ॥ परा नाभिकमळांभीतरीं ॥ तेथोनि उठवीशब्दासी ॥५६॥पश्यंती हृदयीं जाण ॥ तेथें आदळे शब्द जाऊन ॥ कंठीं मध्यमेतून ॥ वैखरी बाहेर बोलतो ॥५७॥पिंड ब्रह्मांड अवघें ॥ याचें ऐक्य अनुभवे जाणावें ॥ येथें अज्ञानाचा लाग नव्हे ॥ गुंतोनि पडेल भ्रमात ॥५८॥गोरख धंदा खेळती ॥ कडीनें कडी उकलिती ॥ तैसे येथें विवेकवंतीं ॥ तत्व निवडिलें पाहिजे ॥५९॥दिशा तितुक्या पोकळ ॥ तयांचे स्थान कर्णबिळ ॥ श्रोत्रांसी आधिदैवत केवळ ॥ दिशा असती जाणपां ॥६०॥सूर्य ब्रह्मांडीं असे ॥ त्याचा अंश नेत्रीं वसे ॥ चक्षूंचें आधिदैवत भानु असे ॥ म्हणावया उचित ॥६१॥घ्राणासी आदिदैवत ॥ अश्विनींदेव निभ्रांत ॥ रसनेचें आधिदैवत ॥ वरुण होय जाणावा ॥६२॥त्वचेचे ठायीं स्पर्शन ॥ तेथें वायूस अधिष्ठान ॥ म्हणऊनि त्वचेलागून ॥ वायु आधिदैवत ॥६३॥हस्तांसी इंद्र आधिदेवत ॥ पायांसी वामन आधिदैवत ॥ गुदासी आधिदैवत ॥ नैऋत्य होय तयाचा ॥६४॥शिश्नासी गा प्रजापती ॥ आधिदैवत ओळखा विरक्ती ॥ संततीची उत्पत्ती ॥ तयामुळे होतसे ॥६५॥दाढा आणि दंत ॥ त्यांसी यम आधिदैवत ॥ वाचेसी आधिदैवत निभ्रांत ॥ अग्नि सत्य जाणावा ॥६६॥मुख्य जे अंत:करणु ॥ तेथील अधिष्ठान श्रीविष्णु ॥ आधिदैवत लक्ष्मीरमणू ॥ होय अंत:करणाचा ॥६७॥चंद्राच्या कळा तुटती ॥ सवेंचि पूर्णिमेसी भरती ॥ तैसी मनाची गती ॥ तुटे वाढे कल्पना ॥६८॥म्हणोनि गा मनाला ॥ आधिदैवत चंद्र बोलिला ॥ कर्तव्यता बुध्दीला ॥ तिसी आधिदैवत विधाता ॥६९॥चित्तासी आधिदैवत ॥ नारायण होय उचित ॥ अहंकारासी आधिदैवत ॥ रुद्र होय निश्चयें ॥७०॥हिरण्यगर्भ प्रचंड ॥ तयापासोनि ब्रह्मांड ॥ ब्रह्मांडाचा अंशी पिंड ॥ म्हणोनि हिसे सारिखे ॥७१॥पृथ्वीच्या ठायीं दगडे ॥ तेचि देहामध्यें हाडें ॥ मृत्तिकेचा भाग कातडें ॥ उघड दिसों येतसे ॥७२॥पृथ्वीच्या ठायीं चिखल ॥ तोचि देही मांसगोळ ॥ वृक्ष वल्ली सकळ ॥ रोमावळी जाणावी ॥ रोम त्वचा नाडी मांस ॥ अस्थिसहित पांच जिन्नस ॥ ओळखा पृथ्वीचा अंश ॥ पिंडामध्यें विवेकें ॥७४॥लाळ मूत्र आणि थुंका ॥ रेतरक्त मज्जा देखा ॥ हे पांचही अंश ओळखा ॥ आपाचे ते बोलिजे ॥७५॥आळस निद्रा मैथुन ॥ क्षुधा तृषादि पांचही गुण ॥ हे तेजाचे अंश जाण ॥ पिंडामध्यें असती ॥७६॥चलन वलन प्रसरण ॥ निरोधन स्तंभन ॥ हे पांच गुण जाण ॥ वायूचे पै असती ॥७७॥मोह भय आणि लाज ॥ क्रोध शोक सांगितले वोज ॥ या पांच गुणांचें चोज ॥ ओळखा खुण नभाची ॥७८॥एक एक भूतापासून ॥ जाहले पांच पांच गुण ॥ पांचाचे पंचवीस जाण ॥ तत्व बोलती जाणते ॥७९॥यापरी तत्वांचा विचार ॥ दाविलासे सविस्तर ॥ ऐसा सृष्टीचा आकार ॥ कर्ता एक ईश्वर ॥८०॥ऐसी हे सृष्टि जाहली ॥ ते जगदीश्वरें आकारिली ॥ पुनरपि संहारिली ॥ ते कैसीया परी ॥८१॥पृथ्वी विरोनि जाहलें पाणी ॥ पाणी शोषिलें तेजेंकरुनी ॥ तेज मिळालें प्रभंजनीं ॥ वायु ग्रासिला आकाशें ॥८२॥आकाशें भक्षिलें अहंकारान ॥ अहंकार गिळिला तामसान ॥ तामस गेला महत्तत्त्वीं मिळोन ॥ महत्तत्व ब्रह्मीं विरालें ॥८३॥जाहले तेथें सामावलें ॥ तें दुजे नाहीं आलें ॥ यालागीं बोलिलें ॥ आदि अंतीं ब्रह्माची ॥८४॥कासवें हातपाय पसरिले ॥ सवेंचि आवरोनि पोटासी धरिले ॥ तैसेचि ब्रह्मीं जाहलें ॥ विस्तार आणि संहार ॥८५॥वृक्ष विशाल वाढले ॥ ते बीजापोटीं उद्भवले ॥ शेखी बीजीं समावले ॥ तैसी ब्रह्मीं घडामोड ॥८६॥समुद्रीं वायूचेनि बाळें ॥ उचलती लाटांचे बंबाळे ॥ दिसती भिन्न परी एकमेळें ॥ नीरस्वभाव व्यापक ॥८७॥व्यापक म्हणणे न साहे ॥ लाटा पाणी एकचि आहे ॥ तेवीं विश्व ब्रह्म पाहे ॥ आत्मस्वरुपें कोंदलें ॥८८॥सुवर्णाचे अलंकार ॥ घडले अनेक प्रकार ॥ उदंड नगांचा विस्तार ॥ नांवें भिन्न ठेविलीं ॥८९॥परी नग आणि सोनियास ॥ काय भिन्न भेद दृष्टीस ॥ तेवीं ब्रह्मीं जगदभास ॥ नाम रुप मिथ्याची ॥९०॥कापूर आणि परिमळ ॥ किंवा गोडी आणि गुळ ॥ अथवा अग्नि आणि ज्वाळ ॥ नये वेगळें निवडितां ॥९१॥दीप आणि प्रकाश ॥ सूर्य आणि किरणांस ॥ आकाश आणि अवकाश ॥ काय दोन लेखावे ॥९२॥देह आणि अवयवा ॥ कोण भेद ओळखावा ॥ बिब प्रतिबिंबाचा हेलावा ॥ दोन कैसे मानावे ॥९३॥रांजणमडकी घागर ॥ कुंभार करी नाना आकार ॥ अवघा मृत्तिकेचा विस्तार ॥ ठेंविली नामें मिथ्याचि ॥९४॥तेवीं जग जगदीश ॥ पाहतां भिन्नभेद नसे त्यास ॥ कापूर आणि सुवास ॥ अंतर काय सांगावें ॥९५॥निराकार तेंचि आकारलें ॥ जैसें पाणी गोठोनि लवण जाहलें ॥ किंवा तूप विवरोनि थिजलें ॥ अथवा दुग्थीं साय जन्मली ॥९६॥तैसी ब्रह्मीं माया जाहली ॥ परी ब्रह्मरुपें संचली ॥ म्हणोनि माया बोलिली ॥ अनादिसिध्द वेदानें ॥९७॥माया तोचि ईश्वर ॥ विस्तारलासे चराचर ॥ ब्रह्मासहित विश्वाकार ॥ असे ब्रह्म एकची ॥९८॥तंतूपासूनि पट जाहले ॥ उभें आडवें सूतची भरलें ॥ नाम लुगडें ठेविलें ॥ सत्य काय मानावें ॥९९॥विश्व अवघा नारायण ॥ जग हेंचि जनार्दन ॥ ऐसीं बोलती पुराण ॥ तरी ते काय वायांचि ॥१००॥ब्रह्मा होऊनि सृष्टि केली ॥ विष्णुरुपें प्रतिपाळिली ॥ संहार करिता चंद्रमौळी ॥ तिन्ही मूर्ती एकची ॥१॥तोचि सूर्य आणि सोम ॥ तोचि जाहला यमधर्म ॥ अंतर्यामीं आत्माराम ॥ मनोविश्राम जगाचा ॥२॥तोचि काळाचाही काळ ॥ ज्यास म्हणावा महाकाळ ॥ करी सृष्टिचा हलकल्लोळ ॥ सांठवी ब्रह्मांड पोटांत ॥३॥तोचि राजा तोचि प्रजा ॥ तोचि सुखदु:खांत करी मौजा ॥ तोचि पुरुष तोचि भाजा ॥ भोगी आपणा आपण ॥४॥तोचि बध्द आणि तोचि मुक्त ॥ तोचि जीव शिव पंचभूत ॥ तोचि भोक्ता कर्ता होत ॥ जाहला राम रावण ॥५॥तोचि राक्षस आणि दैत्य ॥ तोचि जीवंत आणि मृत्य ॥ गिरिमशकापर्यंत ॥ तोचि जाहला जगदीश ॥६॥चारी खाणी चारी वाणी ॥ धरिता जाहला शार्ड्गपाणी ॥ सर्व व्याघ्रांदिक योनी ॥ जाहला पशुपक्ष्यादि ॥७॥पाणियावरी बुडबुडे येती ॥ शेवटीं विरोनि पाणियांत जाती ॥ तैसी स्वरुपीं जगाची उत्पत्ती ॥ बुदबुदाकार जाणावें ॥८॥अहो मुळीं अद्वैत ॥ पुढें कोठून होईल द्वैत ॥ हा सांख्याच्या सिध्दांत ॥ उघड तुह्मां दाविला ॥९॥ज्याणें सांख्य नाहीं पाहिलें ॥ तयाचे ज्ञानीं अंध डोळे ॥ यालागीं अभ्यासबळें ॥ सांख्यशास्त्रीं असावें ॥११०॥अवघें एकचि ब्रह्म ॥ ऐसें श्रुति बोलती वर्म ॥ तें नेणोनियां अधम ॥ नसते द्वैत कल्पिती ॥११॥जंववरी द्वैताचें ज्ञान ॥ तंववरी न चुके जन्ममरण ॥ म्हणोनि तोचि धन्य ॥ अद्वैतबोधें रतला ॥१२॥कैचें पाप कैचें पुण्य ॥ अवघें ब्रह्मचि परिपूर्ण ॥ स्वर्ग नरक हें भान ॥ नसती कल्पना मनाची ॥१३॥एकमेवाद्वितीय नास्ति ॥ ऐसें श्रुतिवाक्य बोलती ॥ तरी का मनांत गुंती ॥ धरितां तुम्हीं सज्ञान हो ॥१४॥माझी याती हो उत्तम ॥ माझा आचार नेमधर्म ॥ संध्या स्नान क्रिया कर्म ॥ हाचि भ्रम वाढला ॥१५॥अद्वैत बोधाचे ठायीं ॥ हें अवघेचि मिथ्या पाहीं ॥ ऐसें ज्याचें ज्ञान हृदयीं ॥ तो जीवन्मुक्त बोलिजे ॥१६॥ एक पृथ्वी बैसावयास ॥ एक पाणी सर्वांस ॥ एक वायु हृदयीं वास ॥ प्राणरुपें जाण पां ॥१७॥एक आकाश एक सूर्य ॥ अवघे पंचभूतांचे देह ॥ त्यांत उत्तमाधम पाहता होय ॥ तोचि अज्ञान जाणावा ॥१८॥सांडोनि अद्वैताची चवी ॥ मिथ्या करी गाथागोवी ॥ तीर्थे व्रतें करावीं ॥ तेंचि भ्रमण तयासी ॥१९॥मंत्र तंत्र जपध्यान ॥ शास्त्रें पुराणें घोकण ॥ भवति न भवति करण ॥ पंडित वाद मिथ्याची ॥१२०॥कोणास कर्मकांडाचा अभिमान ॥ कोणास दृढ उपासना कांडाचा अभिमान ॥ ज्ञानकांडाचा ज्ञानाभिमान ॥ तिनी फंद वांयाची ॥२१॥एक भट्टाचार्य उपदेशी ॥ एक शंकराचार्य उपदेशी ॥ एक मध्वाचार्य उपदेशी ॥ वाढलीं डिंबें भट्टांचीं ॥२२॥बहुत पंथ वाढले ॥ बहुत मार्ग स्थापिले ॥ जैसें अवकाळीं अभ्र दाटलें ॥ कांहीं उपयोगा पडेना ॥२३॥आतां असोत या गोष्टी ॥ आत्मज्ञानाविण चावटी ॥ काय विष घेतां कंठीं ॥ सुधेसमान होईल ॥२४॥ब्रह्मीं विश्व कैसें जाहलें ॥ तेंही तुम्ही दाविलें ॥ प्रलय होतां संहारिलें ॥ तेंहि निर्धारीं बोलिलों ॥२५॥अवघा जमाखर्च केला ॥ हिशेब तुम्हां दाविला ॥ ऐसा ऋषि बोलिला ॥ नैमिषारण्याभीतरीं ॥२६॥सकळ ब्रह्म पूर्ण ॥ सांगितलें मुनीनें ज्ञान ॥ तें परिसिलें वचन ॥ ऋषीश्वरीं समस्ती ॥२७॥तयांवरी एक पुरुष ॥ सांगेल अनुभव विशेष ॥ तेंही ज्ञानाचें रहस्य ॥ श्रोतयांसी निवेदीन ॥२८॥वाचा नाहीं संस्कार ॥ अबध्द बोलतों अपार ॥ जैसें गौळियांचे पोर ॥ कां रे कृष्णा बोलती ॥२९॥त्याचा खेद न मानी हरी ॥ कृपा करी मुलांवरी ॥ श्रोते तुम्ही तयापरी ॥ मातें गोड करावें ॥३०॥आधींच तुम्ही अंगिकारिलें ॥ मज दीनासी पदरी घेतलें ॥ तरी शेवटास पाहिजे नेलें ॥ नव्हे उचित त्यागितां ॥३१॥यापरी प्रार्थोनि श्रोतियांसी ॥ संतोषविलें समस्तांसी ॥ शहा आनंद पावोनी मानसीं ॥ सांगेल कथा पुढारी ॥१३२॥इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये पंचमशोध्याय: अध्याय ॥१५॥ ओंव्या ॥१३२ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : September 23, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP