मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध| अध्याय १ ला सिध्दान्तबोध प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय १ ला ‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे. Tags : pothisiddhant bodhपोथीसिध्दान्तबोध अध्याय १ ला Translation - भाषांतर ॥ श्री ॥श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥ श्रीकुळदेवतायै नम: ॥ ओं नमो जी निर्विकारा ॥ परमपुरुषा परमेश्वरा ॥ अपारा अमूपा परात्परा ॥ जगदीशा जगन्निवासा ॥१॥अचळअढळअमळविश्वेशा ॥ द्वैताद्वैतातीता परमेशा ॥ स्वयंभा सदोदिता स्वयंप्रकाशा ॥ अव्यक्तव्यक्ता वेगळा ॥२॥नव्हे उंच ना ठेंगणें ॥ वाटोळें ना लंबायमान ॥ सगुण ना निर्गुण ॥ गुणत्रयाहि वेगळा ॥३॥नाहीं हस्तपाद मुखमुखळें ॥ कंठ मुगुट ना श्रवण डोळे ॥ रक्त पीत ना श्याम ढवळें ॥ पोट पाठ त्या असेना ॥४॥ऐसिया स्वरुपाचें स्तवन ॥ करावया वेदीं घेतलें मौन ॥ थोंटावलीं शास्त्रें पुराणें ॥ श्रुति त्याही परतल्या ॥५॥जें न दिसे सूर्याचिये दिठीं ॥ तेथें काय मानव मुद्रेची हुटहुटी ॥ शेषें धाक घेतला पोटीं ॥ श्रम पावली सहस्त्रमुखें ॥६॥नाहीं ध्येय ध्याता ध्यान ॥ चारी वाचा पडिल्या मौन ॥ पांगुळ जाहलीं बुध्दिमन ॥ अलक्ष लक्षीं लक्षेना ॥७॥ नाहीं नांव गांव ठाव ॥ तेथें कैंचा विचार अनुभव ॥ ज्ञानविज्ञानासी नये लाघव ॥ तर्क वितर्क चालेना ॥८॥ऐसिया स्वरुपाचें कथन ॥ काय घेऊं कागद लिहून ॥ कोणता करुं ग्रंथ निर्माण ॥ सांगा श्रोते सज्जनहो ॥९॥यापरी केली विनंती ॥ प्रत्युत्तर कोणीच कांहीं न देती ॥ वेडावली ज्ञानस्फूर्ती ॥ पुढें कांहीं सुचेना ॥१०॥तटस्थ जाहल्या घटिका चार ॥ मग हृदयीं प्रगटला परमेश्वर ॥ करोनि बुध्दीस प्रकाश थोर ॥ सिध्दान्तबोध वदविला ॥११॥या ग्रंथा नाम सिध्दान्तबोध ॥ वर श्रीदत्तकृपेचा वरद ॥ मतीस फुटले सहस्त्र कंद ॥ ज्ञानांकुर उदेले ॥१२॥वंदिलें श्रीकृष्णचरणकमळ ॥ तेणें स्फूर्ति जाह्ली सोज्वळ ॥ वाचा बोलूं लागली सरळ ॥ अटक कांही असेना ॥१३॥नमस्कार करोनि दत्तासी ॥ सदर घातली ग्रंथासी ॥ सूचना होईल ते आपैसी ॥ दिसों येईल पुढारीं ॥१४॥मुनींद्र स्वामी गुरु पूर्ण ॥ त्याचा सेवक शहाजाण ॥ ग्रंथ आरंभिला गुरुआज्ञेन ॥ बोध येईल तो परिसा ॥१५॥आतां होऊनि सावधान ॥ बरवें ऐका निरुपण ॥ सूत्रधारी नारायण ॥ वदवील तैसा वदतसें ॥१६॥चारी वेद सहा शास्त्रें ॥ अठरा पुराणें स्तोत्रमंत्रें ॥ आणीकही प्राकृत चरित्रें ॥ निर्माण जाहलीं भूलोकीं ॥१७॥ छप्पन कोटी वसुंधरे माजी ॥ अनेक देश अनेक नगरें ॥ अनेक याती मतांतरें ॥ शास्त्र भिन्न ज्ञान भिन्न ॥१८॥ज्यादेशीं जन्मली जे याती ॥ तेचि देशभाषा वदती ॥ तेथील दैवत कुळस्वामी म्हणती ॥ भावें भजती त्यालागीं ॥१९॥म्हणती हाचि सर्वेश्वर ॥ याहूनि अधिक नाहीं थोर ॥ इतर दैवतें शास्त्राकार ॥ पाषंड म्हणोनि निंदिती ॥२०॥जंगम पूजिती शिवला ॥ वैष्णव म्हणती विष्णूचि आगळा ॥ यवन म्हणती थोर अल्ला ॥ जिजू म्हणती फिरंगी ॥२१॥एक म्हणती जगन्नाथ ॥ एक म्हणती विश्वनाथ ॥ एक म्हणती श्रीअनंत ॥ एक म्हणती नरहरी ॥२२॥एक म्हणती राम थोर ॥ एक म्हणती श्रीकृष्ण अवतार ॥ एक म्हणती निराकार ॥ आकार तितुका नासेल ॥२३॥एक म्हणती होय सगुण ॥ एक म्हणती सत्य निर्गुण ॥ एक म्हणती जाणे कोण ॥ अगाध महिमा देवाचा ॥२४॥एक भजती सूर्यास ॥ एक पूजिती श्रीगणेश ॥ एक म्हणती व्यंकटेश ॥ याहूनि दुजा दिसेना ॥२५॥एक म्हणती रवळोबा ॥ एक म्हणती विरोबा ॥ एक म्हणती नरसोबा ॥ एक म्हणती जानाई ॥२६॥एक म्हणती येमाई ॥ एक म्हणती तुकाबाई ॥ एक म्हणती ही सटवाई ॥ तेचि रक्षील आमुतें ॥२७॥एक म्हणती खंडोबा ॥ एक म्हणती बहिरोबा ॥ एक म्हणती हाणगोवा ॥ म्हाळसाची भाविती ॥२८॥एक पूजिती गौरीला ॥ एक भजती लक्ष्मीला ॥ एक आराधिती सावित्रीला ॥ एक जाती सप्तशृंगीं ॥२९॥एक म्हणती दुर्गा श्रेष्ठ ॥ एक म्हणती ज्वाळामुखी वरिष्ठ ॥ एक म्हणती हिंगळजा प्रकट ॥ केल्या यात्रा सार्थक ॥३०॥एक म्हणती जावे काशी ॥ दुजा म्हणे द्वारकेशी ॥ तिजा म्हणे पंढरीसी ॥ विठ्ठल दैवत रोकडें ॥३१॥एक म्हणती रामेश्वर ॥ एक म्हणती बदरीकेदार ॥ एक म्हणती लोणारमेहकर ॥ एक जाती मल्लिकार्जुना ॥३२॥एक म्हणती स्वामिकार्तिक ॥ एक म्हणती प्रयाग देख ॥ एक म्हणती हरिहर त्र्यंबक ॥ यांचे पुण्य अगाध ॥३३॥एक म्हणती चंद्रभागा ॥ एक म्हणती श्रेष्ठ गंगा ॥ एक म्हणती जान्हवी जगा ॥ निमाल्या मुक्ति पाविजे ॥३४॥एक म्हणती अनंतव्रत ॥ एक एकादशीच करित ॥ एक म्हणती सोमवाराचा गुह्यार्थ ॥ प्रकट नकळे कवणासी ॥३५॥एक करिती चांद्रायण ॥ एक म्हणती शिवरात्री धन्य ॥ एक म्हणती अवघा नारायण ॥ कोण करितो खटपट ॥३६॥एक मंगळवार करिती ॥ एक शनिवार रविवार धरिती ॥ गळां सांकळी वाघे होती ॥ भुंकों लागती श्वाना ऐसें ॥३७॥गरती वनिता नवस करिती ॥ पोटींची कन्या देवासी वाहती ॥ त्या मुरळ्या होऊनि व्यभिचार करिती ॥ धन्य नवस तयांचा ॥३८॥एक पाठीसी गळ टोंचिती ॥ उफराटां टांगोनि फिरविती ॥ तो म्हणे मी धन्य जाती ॥ कसीं उतरलों देवाचे ॥३९॥एक नागवे निंब नेसती ॥ एक खोडे बेडया लेती ॥ एक मस्तकीं भळंदे घेती ॥ घुमो लागती मंडपी ॥४०॥ एकाचे अंगी वारें भरत ॥ धांवोनि लोक पाया पडत ॥ दांत चावोनि आसुडेदेत ॥ हाडें मोडित कडकडां ॥४१॥एक वस्त्रें करोनि काळीं ॥ चिंध्या गुंडाळोनि पोत जाळी ॥ अंगास लावी मुखांत घाली ॥ कोण कर्म तयाचें ॥४२॥एक कवडयांच्या माळा घालिति ॥ हातीं परडी जोगवा मागती ॥ भगेंद्र शरीरीं हीनशक्ती ॥ द्वारी लोळती चंडीचे ॥४३॥एक घालिती गोंधळ ॥ काखेसी चौंडकें वाजवी संबळ ॥ म्हणे कोणता गाऊं भूपाळ ॥ सांगा सत्वर भक्तहो ॥४४॥कितेक हरिदास होऊन ॥ पाठ करिती भारत रामायण ॥ ताण मान शिकोन गौण ॥ आर्जविती धनवंतां ॥४५॥माळ लावी घरोघरीं ॥ रुपया घेऊनि कथा करी ॥ गाये नाचे सभेभीतरी ॥ प्रेम आणी रोकडें ॥४६॥एक म्हणती अनन्यभावें ॥ श्रीहरीसी शरण जावें ॥ एक म्हणती भावार्थी व्हावे ॥ तेणेंचि देव पावतो ॥४७॥एक म्हणती मुद्रा खेचरी ॥ एक म्हणती लावा भूचरी ॥ एक म्हणती सुंदर चाचरी ॥ एक अगोचरी लक्षिती ॥४८॥एक म्हणती कैंची मुद्रा कैचें ध्यान ॥ अवघें ब्रह्मचि परिपूर्ण ॥ मिथ्या भ्रमलें अज्ञान ॥ नसतें द्वैत कल्पिती ॥४९॥ एक म्हणती सांडा चावटी ॥ नाशवंत सकळ सृष्टी ॥ जीवास जन्म मरण दु:खकोटी ॥ अविनाश परब्रह्म वेगळें ॥५०॥एक वस्त्रें करोनि काळीं ॥ चिंध्या गुंडाळोनि पोत जाळी ॥ एक वस्त्रें करोनि काळीं ॥ देशोदेशी हिंडती ॥५१॥ एक म्हणती सगुणींच भजतां ॥ मुक्ति पाविजे सायुज्यता ॥ एक म्हणती चारी मुक्ती तत्त्वतां ॥ त्याही मिथ्या मायिक ॥५२॥एक म्हणती आकारा आलेंच नाहीं ॥ त्याचें भजन करावें कायी ॥ एक म्हणती तोचि पाहीं ॥ तो जनीं विस्तारला ॥५३॥एक म्हणती जनीं जनार्दन आहे ॥ एक म्हणती सत्त्ववृत्ति धरोनि राहे ॥ एक म्हणती अभिमान सांडितां पाहे ॥ देव भेटेल रोकडा ॥५४॥एक म्हणती काम क्रोध चांडाळ ॥ येणेंचि माजविला गोंधळ ॥ एक म्हणती वासना बरळ ॥ तेणेंचि सर्व नासिलें ॥५५॥एक म्हणती सर्वांभूती दया ॥ एक म्हणती शांती क्षमा आलिया ॥ एक म्हणती ज्ञान पूर्ण जाहलिया ॥ जीवन्मुक्त होईजे ॥५६॥एक म्हणती तीर्थे करावीं ॥ एक म्हणती शांती क्षमा आलिया ॥ एक म्हणती अवघी गाथा गोवी ॥ नामस्मरण चांगलें ॥५७॥एक म्हणता कीजे तप ॥ एक म्हणती होमजप ॥ एक म्हणती देऊळ मंडप ॥ केलीया कीर्ति राहील ॥५८॥ एक म्हणती धर्म थोर ॥ एक म्हणती स्वधर्म साचार ॥ एक म्हणती हा संसार ॥ केलिया बरवे दिसतसे ॥५९॥ऐसी जनांची प्रकृती ॥ घरोघरीं लोक बरळती ॥ सारासार न विचारिती ॥ नुसती करिती वळवळ ॥६०॥यापरी बाजार भरला ॥ अवघा गलबलाचि जाहला ॥ कोण निवडील खर्या खोटयाला ॥ बहुत वाढला बंबाळ ॥६१॥खद्योत जाऊनि इंद्रापासीं ॥ म्हणे युध्द केलें म्यां सूर्यांसी ॥ बाहें कवळोनि धरिला केशीं ॥ रथाखालीं पाडिला ॥६२॥कोण साच मानी त्याचें ॥ तैसे बोलणे या जनाचें ॥ ज्ञानियासी तें न रुचे ॥ अज्ञानासी आवडे ॥६३॥आधींच मोहभ्रमें व्याकुळ ॥ सर्वदा करी तळमळ ॥ विषयासाठीं घोंटी लाळ ॥ म्लान वदन करुनियां ॥६४॥तया आत्मसुखाची प्राप्ती ॥ काय पामरें पावती ॥ दर्दुर मक्षिका भक्षिती ॥ कमळसुवास केवीं घडे ॥६५॥गुरु अज्ञान केला ॥ शिष्यासी कैची ज्ञानकळा ॥ राव सैन्य त्यजूनि पळला ॥ इतरीं काय झुंजावें ॥६६॥नपुंसकाचिया भूषणा ॥ नयनीं प्रेरिली सुंदरांगना ॥ मृगजळ देखोनिया नयना ॥ तृषा काय हरेल ॥६७॥निर्बळ स्वामीची चाकरी ॥ बहुत प्रकारें करितां चतुरीं ॥ तो उदार जाहलियावरी ॥ कोणती पदवी देईल ॥६८॥कुक्कुट गेलिया आडवें ॥ वामसव्य घालावें ॥ तेणें गुणें कोण पावे ॥ शकुन किंवा अपशकुन ॥६९॥सूकरगळी पुष्पमाळा ॥ श्वानभाळीं चंदनटिळा ॥ धेनु कल्पूनि खर पूजिला ॥ कोण धर्म वाढेल ॥७०॥तीर्थ भावूनि मसणवटा ॥ जाऊन बैसला तो करंटा ॥ अंतकाळीं वैकुंठा ॥ कवणें सुकृतें पाविजे ॥७१॥समाधिचिन्हें मर्कटासी ॥ केवीं पावे योगसिध्दीसी ॥ बक ध्यानीं मीन लक्षी ॥ ईश्वरप्राप्ती कैसेनि ॥७२॥श्वान देखोनि तरळ लोळे ॥ निकट पातल्या घेऊनि पळे ॥ मैंद बहुत गोड बोले ॥ सज्जन केवीं म्हणावा ॥७३॥कागासि सुवर्णपिंजरा ॥ पढों घातला श्रीकृष्णअक्षरा ॥ काय बोध उपजेल पामरा ॥ विशेष करील फडफड ॥७४॥वेश्येचिया संगतीं ॥ चित्तें काय विरक्त होतीं ॥ अजा पुत्र दानास देती ॥ इंद्रपदाकारणें ॥७५॥पतितास गेलिया शरण ॥ कैसेनि तरेल जन्ममरण ॥ रावणापुढें रामायण ॥ वाचितां प्रेम नयेची ॥७६॥जरासंधा सन्मुख ॥ सहज पातला गुणीजन एक ॥ नृप म्हणे परम हरिख ॥ तुझें गायन परिसावया ॥७७॥येरें तानमान सज्जुन ॥ हरुषें लाविलें कृष्णकीर्तन ॥ नरेश ठाके कपाळ धरुन ॥ हाचि वैरी आमुचा ॥७८॥दुर्योधनाचे सभेभीतरी ॥ सांगता कुंतीपुत्रांची थोरी ॥ म्हणे मारा घाला बाहेरी ॥ कोणें यासी आणिलें ॥७९॥अजापाळमंडळींत ॥ कैसा शोभेल पंडित ॥ वाचस्पतीच्या कर्णात ॥ बुध्दि सांगे नापिक ॥८०॥मैंद गेला वाराणसी ॥ त्रासूं लागला जनांसी ॥ कैकाडीण तंडे रंभेसी ॥ माझें सौंदर्य विशेष ॥८१॥हिजडे नारीस गर्भवास राहिला ॥ सांगतां हांसूं आलें चतुरालां ॥ सुवासिनीचें आमंत्रण वेश्येला ॥ लज्जा वाटे देतियां ॥८२॥ करोनि षड्रसपक्वान्न ॥ ठेवणें मसणवटीं नेऊन ॥ राजहंसाचें भोजन ॥ काय शोभे वायसा ॥८३॥ अजापुत्र धरोनि हातीं ॥ सिंधु पैलतीर जाऊ म्हणती ॥ उभयतांही सवेंच बुडती ॥ तरणोपाय कैंचा तयां ॥८४॥दीप पालवोनि बैसला ॥ पोवळीं झाडोनिवेंची गुंजेला ॥ श्वानापुढें दर्पण ठेविला ॥ तया कासया विनोद ॥८५॥कुंजर विकोनि घे अस्वला ॥ सिंहापुढें जुंबक स्तविला ॥ तुरंग साज महिषाला केला ॥ काय थैथै नाचेल ॥८६॥गर्वे फुगोनियां सरडे ॥ म्हणे ससाणा धांवे मजपुढें ॥ कोल्हाटी दशन चावूनि उडे ॥ अंजनीकुमारासारिखा ॥८७॥शेष सहस्त्रमुखें वदत ॥ तयासवें मुका हुडहुड करित ॥ गंधर्वाच्या गायनांत ॥ हुडक वाजवी कुंभार ॥८८॥जाऊनि हिमाचळाचे गृहासी ॥ पालवें वारा घाली तयासी ॥ कीं सूर्याच्या मुखासी ॥ प्रकाश करी दिवटीचा ॥८९॥बैसोनि भागीरथीच्या तीरीं ॥ कुदळ घेऊनि कूप करी ॥ तसा विसरोनि आत्मा हरी ॥ अनेक पूजिती दैवतें ॥९०॥ऐसी जाणोनिया नीती ॥ बरें उमजा समजा चित्तीं ॥ जेणें हित होईल अंतीं ॥ तेंच करावें त्वरित ॥९१॥ईश्वरभक्तीवांचोनि जिणें ॥ जैसीं अजेची गळस्तनें ॥ कीं पति निमाल्या वैधव्यपणें ॥ लाजिरवाणें लोकांत ॥९२॥जीवनावाचोनियां काय कूप ॥ निशींत प्रकाशे खद्योतदीप ॥ किल्ली न भेटतां कुलुप ॥ गुंतोनि करी खळखळ ॥९३॥नासिकावांचूनि मुख ॥ चित्रा माजी काढिला अर्क ॥ स्वप्नीं जाहलें राज्यसुख ॥ प्राप्ति कांहीं असेना ॥९४॥उंसास अग्रीं आलें फूल ॥ वृंदावनाचीं फुलें पुष्कळ ॥ भुजा खचल्या अंगींचे बळ ॥ कवण उपयोग येतसे ॥९५॥लक्ष्मी नामें दासी ॥ धन्वंतरी म्हणती मोळीविक्यासी ॥ कमळाक्ष नाम धृतराष्ट्रासी ॥ पाचारितां विपरीत ॥९६॥वाद्यें लावूनि मिरविलें मढें ॥ उंच वाढलीं शिंदीचीं झाडें ॥ एरंडाचे घड द्राक्षीपाडें ॥ न विकती कदापि ॥९७॥वृश्चिका सहस्त्र पुत्र जन्मले ॥ महापूरी तक्षक बुडाले ॥ काग बहुत आयुष्य पावलें ॥ कोण सार्थक करावया ॥९८॥तैसे या संसारीं जन्मले ॥ सर्वेश्वरासी नाहीं भजले ॥ जैसें अवकाळीचें अभ्र आलें ॥ किंवा रोम काखेचे ॥९९॥अल्प दुग्ध लांब शिंगोटें ॥ ते म्हैस काय शिणीं फुटे । पोसलें कणीस पोचटें ॥ जोंधळयाचे शेतातं ॥१००॥वोखटें पांखरुं जन्मलें ॥ जैसीं हरभर्याची टरफलें ॥ निमालियाचे नेत्र पसरले ॥ कवण्या पदार्था लक्षिती ॥ १॥तस्करगृहीं धनाची राशी ॥ कवणापर्वी वेचील धर्मासी ॥ वांझ धेनूचे कासेसी दुग्धबिंदू मिळेना ॥२॥मृगजळाचा पूर देखिला ॥ संतोष नेदी तृषार्थियाला ॥ करवंदीचा घोस लागला ॥ राजहंसा तुच्छ तो ॥३॥तैसा संसार अवघा टवाळ ॥ ज्ञानियास वाटे जैसें पोकळ ॥ अज्ञानासि केवळ ॥ हर्ष मानसीं भोगावया ॥४॥जन्ममरणदु:खांच्या राशी ॥ साहतां त्रास नये जीवासी ॥ महा उल्हास संसारासी ॥ स्त्री दव्य असावें ॥५॥चांगले उष्ण मिष्टन्न भक्षावें ॥ बरवें नांवलौकिक व्हावें ॥ पिशुनामधीं मिरवावें ॥ तरीच जिणें संसारीं ॥६॥पहिल्या पत्नीस पुत्र नाहीं ॥ म्हणे दुसरी अंगना करुंकाई ॥ धर्माविषयीं तरी पाही ॥ रुका नेदी कवणाला ॥७॥मोहें भ्रमोनियां वेडे ॥ म्हणती माझें घर चाडे घोडें ॥ माझ्या म्हशी गायी गाडे ॥ माझें कुटुंब मी चांगला ॥८॥तारुण्यपणीं जोडिलें धन ॥ वृध्दपणीं स्वस्थ सेवीन ॥ तंव शरीर व्यापिलें जरेंकरुन ॥ दमा आणि खोकला ॥९॥कर्ण बधिर नेत्रीं दिसेना ॥ दशन गळाले जिव्हा वळेना ॥ वनिता शयनीं शय्या करीना ॥ सुटलीं सूत्रें नाडीची ॥१०॥ढिले जाहले हस्तपाय ॥ करी चिंता करुं काय ॥ माझे द्रव्य कोठें आह्य ॥ आणून ठेवा उशाशी ॥११॥जीव होतसे कासावीस ॥ आतां मुलें निरवूं कवणास ॥ कोण गति होईल आपणास ॥ ते विचारणा करीना ॥१२॥अकस्मात् येऊनि काळें ॥ पंचप्राणातें आकर्षिलें ॥ जीव घेऊनियां गेले ॥ पडलें मढे लोक रडती ॥१३॥द्रव्य घेऊनी गेला तस्करु ॥ धरणी म्हणे पिशवी जतन करुं ॥ ऐसा जगाचा विचारु ॥ पोटीं कवळी शवातें ॥१४॥वेष्टूनियां कुटुंब बहुत ॥ शवाचे हस्तपाद धरित ॥ पाहती कौतुक कृतांतदूत ॥ विस्मय करिती मानसीं ॥१५॥बहुत कष्टें धन जोडिलें ॥ परी भोगावया नाहीं फावलें ॥ काळें बांधोनिया नेलें ॥ पुढील अवस्था ते ऐका ॥१६॥स्थूळदेह त्यजिल्या वरी ॥ लिंगदेह वेष्टिला वरी ॥ तयासि घालोनियां पाश दोरी ॥ लोहदंडें ताडिती ॥१७॥मार्गी चालतां त्या वाटे ॥ बहुत पसरले सराटे ॥ पदीं रुपती दु:ख मोठें ॥ पडे झांपडी नेत्रांसी ॥१८॥भोवतें पाहे चहुकडें ॥ तंव मनुष्य दृष्टी न पडे ॥ वृश्चिकसर्पाचीं झुंबाडे ॥ बांधोनि पाय वेष्टिती ॥१९॥काळसर्पमुखी कागमुखी ॥ व्याघ्रमुखी गजमुखी ॥ राक्षसमुखी श्वानमुखी ॥ सूकरमुखी अस्वलमुखाचे ॥१२०॥अजांचिया कळपांतून ॥ एक उचलोन नेत पंचानन ॥ ते गति प्राणियालागून ॥ आप्त कोणी असेना ॥२१॥आकाश दिसे खालती ॥ पृथ्वी भासे वरुती ॥ तेथें दिवस नाहीं रात्र ती ॥ दिशा दिसती संध्याकाळींच्या ॥२२॥भ्यासुर सरिता दुर्गंधाची ॥ तळीं भरलीं अशुध्दाचीं ॥ कोठें शुध्दि न लागे उदकाची ॥ तृषेनें जीव त्रासला ॥२३॥ अन्न कैंचें भोजनासी ॥ वस्त्र न मिळे पांघरावयासी ॥ बोराटया लागती अंगासी ॥ त्राहे त्राहे उच्चारी ॥२४॥बहुदु:खें मार्ग क्रमिला ॥ पुढें नेला यमसभेला ॥ सन्मुख सूर्यसुत लक्षिती ॥ कंप सुटला वपूसी ॥२५॥मस्तकींचे केश उभे दिसती ॥ मुसळा ऐशा दशनपंक्ती ॥ ताम्र मिशा जिव्हा लवलविती ॥ आणा म्हणे चित्रगुप्त ॥२६॥महिषारुढ आज्ञेंत्वरितें ॥ दूतीं पाचारिलें तयातें ॥ येरें सोडूनियां पत्रातें ॥ कालिंदीअग्रजा परिसवी ॥२७॥हा कमपातकी चांडाळ ॥ येणें केलें पाप तुंबळ ॥ वांसरें रेडकें वर्धिलें बाळ ॥ पितृहत्या मातृहत्या ॥२८॥परद्वारी सुरापानी ॥ चाहाड चोरी लावी अग्नी ॥ निद्रित वधिलीं निंदा वदनीं ॥ तोंड रिकामें असेना ॥२९॥बहुत ठकविलें जगासी ॥ फांसे लावूनि धरी पक्षियांसी ॥ वृश्चिक विखार किडा मुंगीसी ॥ वधिलें गणित असेना ॥३०॥कामी क्रोधी थोर मद ॥ सख्या गोत्रजांसी द्वंद्व ॥ विषयलंपट सदा स्फुंद ॥ दुराचारी दुरात्मा ॥३१॥वासना कल्पनेचा डोह ॥ घरिंच्या कुटुंबांत नित्य कलहो ॥ दानधर्माविषयीं पाहा हो ॥ आणुमात्र बुध्दि असेना ॥३२॥दुसर्याचा प्राण घ्यावया ॥ कधीं उपजली नाहीं दया ॥ ससे मासे मारावयाचा ॥ आळस कधीं असेना ॥३३॥अफू तमाखू गांजा वर तर्क ॥ गोंधळ डफ गाण्याचा हरिख ॥ कथेसी कपाळ धरोनि ठाके ॥ म्हणे डोचके उठविलें ॥३४॥म्हणे कंटाळा आला सत्संगतीचा ॥ उल्हासें संग धरी वेश्येचा ॥ नाम स्मरावया वाचा ॥ सुईनें जाण टोंचली ॥३५॥नाहीं केलें दान पुण्य ॥ तीर्थ व्रतें अवघीं शून्य ॥ स्त्रियापुत्रा कारणें जाण ॥ प्राण वेंची आपुला ॥३६॥धड कोणासी बोलणें नाहीं ॥ हिंसा करावी हा स्वधर्म पाही ॥ आवडे व्याही जांवई ॥ बहिणीबंधूंशीं वांकडा ॥३७॥सासु मेहुणियांस चोळी लुगडीं ॥ ग्रामाबाहेर बोळवी आवडी ॥ सख्या बहिणीस न भरी बांगडी ॥ म्हणे वोडगस्त संसार ॥३८॥लांच घेऊनि न्याय करी ॥ अपराध नसतां जिवें मारी ॥ सोंगटी बुदबळें गंजिफा घरीं ॥ पोथीचें पान असेना ॥३९॥दुसर्याचा करावया नाश ॥ मनांत बहु वसे हरुष ॥ आपुलें हरपलिया विशेष ॥ मानी घर बुडालें ॥४०॥यातिभ्रष्ट सदा मलिन ॥ क्रियानष्ट न करी स्नान ॥ थोंट तोंडाळ लंड अवगुण ॥ अघोरी तामसी पापिष्ठ ॥४१॥सहस्त्र लक्ष कोटी अन्यायी ॥ वाचितां अगुण अपार पाहीं ॥ दंडपाणी देहीं ॥ संतप्त जाहला मानसीं ॥४२॥दशन चावोनियां करकरां ॥ म्हणे बांधोनि स्तंभासि मारा ॥ सांडस लावूनि देह चिरा ॥ लोटून दीजे कुंभिपाकीं ॥४३॥यमयातना दु:खाचे डोंगर ॥ लिहितां नपुरे अपार ॥ यालागीं असो समग्र ॥ संज्ञामात्र जाणविली ॥४४॥नरकवास जाहलियावरी ॥ पुढे चौर्यायशीं बांधल्या पदरीं ॥ अनंत गर्भवास धरी ॥ गणना कोणें करावी ॥४५॥दुर्लभ मनुष्यदेह पावोन ॥ परमेश्वराच्या भक्तीविण ॥ जळो जळो ते वोखटें जाण ॥ कोण भोगील क्लेशातें ॥४६॥ऐसी संसाराची कहाणी ॥ श्रुत केली श्रोतयां लागुनी ॥ पुढें ऋषीश्वरांचीं बोलणीं ॥ परिसतां चोज श्रोतयांस ॥४७॥अध्या मनिरुपणाची मात ॥ ऋषि सांगतील सिध्दांत ॥ एकाहूनी एक विशेष वदत ॥ तर्क मनींचा आपुले ॥४८॥तेंचि रसाळ निरुपण ॥ पुढिल्या प्रसंगीं कथन ॥ श्रीगुरुकृपें निवेदिन ॥ तत्वसारनिर्णयो ॥४९॥ विदुराच्या घरींचें भोजन ॥ श्रध्देनें स्वीकारी श्रीकृष्ण ॥ तैसीं शहामुनीचीं वचनें पूर्ण ॥ परिसतां तृप्ति श्रोतयां ॥५०॥कोणी घेईल मुनीची कल्पना ॥ मुनि नाम गुरुचें जाणा ॥ तयाचे कृपेनें रचना ॥ या ग्रंथाची होतसे ॥५१॥इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे आध्यात्मनिरुपणतत्त्वसारनिर्णये प्रथमोऽध्याय: ॥१॥ ओंव्या ॥१५१॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीराम ॥ N/A References : N/A Last Updated : September 23, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP