मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|

माधव जूलियन - निसर्ग आणि मी

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[सुनीत, वृत्त पृथ्वी]

निशा दश दिशांत या भरुनि शान्तता राहिली,
भरे शिशिर अन्तरीं, ढग न अम्ब्ररीं, कम्बल.
न वायुहि फिरूं शके, स्थिति अशी न मी पाहिली,
निशेस बिलगूनि हें जग निजे, पडे निश्चल.
निसर्गहृदयक्रिया जणु गमे पडे बन्द ती,
असे अमर तो परी, परम योग - निद्राच ही !
मनुष्यहृदयें किती अशिं सुखामघे स्पन्दती ?
नकोच दुरि जावया, मजसि जागवी आच ही.
प्रिया कधि धरील हें शिर ऊरावरी दाबुनी,
म्हणेल मज, रे नको विरहभीति ती दारुण ?
कितीक दमलास तू फिरुनि येऊनी लाम्बुनी !
जरा पड, नसे मम सहानुभूती मनीं,
अशान्त विरहार्त मी, सुखित शान्त तू मीलनीं.

सप्टेम्बर १९१३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP