TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
आमलकस्नान

तृतीयपरिच्छेद - आमलकस्नान

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आमलकस्नान

आतां आमलकस्नान सांगतो -

अथामलकस्नानं व्यासः श्रीकामः सर्वदास्नानंकुर्वीतामलकैर्नरः सप्तमींनवमींचैवपर्वकालंविवर्जयेत् ‍ चंद्रसूर्योपरागेचस्नानमामलकैस्त्यजेत् ‍ क्रतुः षष्ठीचसप्तमीचैवनवमीचत्रयोदशी संक्रांतौरविवारेचस्नानमामलकैस्त्यजेत् ‍ यत्तु नवमीदशमीचैवतृतीयाचत्रयोदशी प्रतिपद्दादशीकृष्णास्नानंतासुविवर्जयेत् ‍ यच्च दर्शेस्नानंनकुर्वीतमातापित्रोः सुजीवतोः पुत्रः कुर्वन्निराचष्टेपित्रोरुन्नतिजीवितेइतिकण्वयमाद्यैः स्नानमात्रंनिषिद्धं तद्भोगार्थस्नानपरं ननित्यनैमित्तिकपरमितिहेमाद्रिः ॥

व्यास - " संपत्तीची इच्छा करणार्‍या मनुष्यानें सर्वदा आंवळे वाटून अंगास लावून स्नान करावें ; परंतु सप्तमी , नवमी , पर्वकाल , चंद्रसूर्याचें ग्रहण या दिवशीं आमलकस्नान करुं नये . " क्रतु - " षष्ठी , सप्तमी , नवमी , त्रयोदशी , संक्रांति , रविवार ह्या दिवशीं आमलकस्नान करुं नये . " आतां जें " नवमी , दशमी , तृतीया , त्रयोदशी , प्रतिपदा , कृष्णद्वादशी या दिवशीं स्नान ( आमलकस्नान ) वर्ज्य करावें , " आणि जें " ज्याचे मातापिता जीवंत आहेत अशा पुरुषानें अमावास्येच्या दिवशीं स्नान करुं नये , केलें असतां मातापितरांचा आयुर्दाय व उत्कर्ष यांचा क्षय होतो , " याप्रमाणें कण्व , यम इत्यादिकांच्या वचनांनीं सामान्य स्नानाचा निषेध केला आहे , तो भोगार्थ जें स्नान तद्विषयक आहे . नित्यनैमित्तिक स्नानाविषयीं नाहीं , असें हेमाद्रि सांगतो .

आतां तैलाभ्यंगपूर्वक स्नानाचा निषेध सांगतोः -

अथतैलस्नाननिषेधः कात्यायनः पक्षादौचरवौषष्ठ्यांरिक्तायांचतथातिथौ तैलेनाभ्यज्यमानस्तु चतुर्भिः परिहीयते गर्गः पंचदश्यांचतुर्दश्यामष्टम्यांरविसंक्रमे द्वादश्यांसप्तमीषष्ठ्योस्तैलस्पर्शंविवर्जयेत् ‍ नचकुर्यात्तृतीयायांत्रयोदश्यांतिथौतथा शाश्वतींगतिमन्विच्छन् ‍ दशम्यामपिपंडितः तत्रैवायुर्वेदे षष्ठ्यांदिनक्षयेष्टम्यामेकादश्यांचपर्वसु द्वादश्यांचचतुर्दश्यांपंचम्यांप्रतिपत्तिथौ व्रतेश्राद्धदिनेजन्मत्रितयेश्रवणार्द्रयोः ज्येष्ठोत्तराफल्गुनीषुव्यतीपातेचवैधृतौ विष्टियोगेचसंक्रांतौमन्वादिषुयुगादिषु नाभ्यंगंतत्रबालानांवृद्धानांतुनदोषकृदिति व्यवहारतत्त्वे संक्रांतिभद्राव्यतिपातवैधृतिषष्ठ्यष्टमीपर्वसुनार्कभूसुते स्नानेद्वितीयादशमीचगर्हिताः षष्ठ्यादिमाद्यारदधावनेधमाः अस्यापवादमाहतत्रैवप्रचेताः सार्षपंगंधतैलंचयत्तैलंपुष्पवासितं अन्यद्द्रव्ययुतंतैलंनदुष्यतिकदाचन आयुर्वेदे निषिद्धतिथिवारर्क्षग्रहणेष्वपिरात्रिषु किंचिद्गोघृतयुक्तंवाविप्रपादरजोन्वितं भानौदूर्वान्वितंभौमेभूयुक्तंपुष्पयुग्गुरौ सर्वेषांसर्वदातैलमभ्यंगेषुनदुष्यति मंगलेष्वप्यदोषः मांगल्यंविद्यतेस्नानंवृद्धिपूर्वोत्सवेषुच स्नेहमात्रसमायुक्तंमध्याह्नात् ‍ प्राक् ‍ तदिष्यते इतिमदनपारिजातेकात्यायनोक्तेः हेमाद्रौबृहन्मनुः तैलाभ्यंगोनार्कवारेनभौमेनोसंक्रांतौवैधृतौविष्टिषष्ठ्योः पर्वस्वष्टम्यांचनेष्टः सइष्टः प्रोक्तान् ‍ मुक्त्वावासरेसूर्यसूनोः तिलस्नाननिषेधस्तुषट् ‍ त्रिंशन्मते तथासप्तम्यमावास्यासंक्रांतिग्रहजन्मसु धनपुत्रकलत्रार्थीतिलपिष्टंनसंस्पृशेत् ‍ ॥

कात्यायन - " प्रतिपदा , रविवार , षष्ठी , रिक्ता तिथि यांचे ठायीं तैलाभ्यंग करणारा चतुर्विधपुरुषार्थांपासून हीन होतो . " गर्ग - " पौर्णिमा , अमावास्या , चतुर्दशी , अष्टमी , सूर्यसंक्रांति , द्वादशी , सप्तमी , षष्ठी , या दिवशीं तैलस्पर्श वर्ज्य करावा . शाश्वत गति इच्छिणारानें तृतीया , त्रयोदशी , आणि दशमी या तिथींचेठायींही तैलस्पर्श करुं नये . " तेथेंच आयुर्वेदांत सांगतो - " षष्ठी , दिनक्षय , अष्टमी , एकादशी , पर्वदिवस , द्वादशी , चतुर्दशी , पंचमी , प्रतिपदा , व्रतदिवस , श्राद्धदिवस , जन्मनक्षत्र , जन्मनक्षत्राहून दहावें व एकोणिसावें नक्षत्र , श्रवण , आर्द्रा , ज्येष्ठा , उत्तराफल्गुनी , व्यतीपात , वैधृति , भद्रा , संक्रांति , मन्वादितिथि , युगादितिथि , ह्यांचे ठायीं बालकांस अभ्यंग करुं नये , वृद्ध जे त्यांनीं केला असतां दोष नाहीं . " व्यवहारतत्त्वांत - " संक्रांति , भद्रा , व्यतीपात , वैधृति , षष्ठी , अष्टमी , पर्वदिवस , रविवार , मंगळवार , द्वितीया , दशमी ह्यांचे ठायीं तैलाभ्यंगस्नान करुं नये . षष्ठी , अष्टमी , पर्व तिथि ह्या दंतधावनाविषयीं निषिद्ध होत . " याचा अपवाद सांगतो तेथेंच प्रचेता - " सार्षपतेल , सुगंधितेल , जें पुष्पांनीं सुवासित केलेलें ( मोगरा चमेली इत्यादि ) तेल , दुसरें द्रव्य घालून मिश्र केलेलें तेल ह्या तेलानें निषिद्धदिवशींही अभ्यंग केला असतां दोष नाहीं . " आयुर्वेदांत - " निषिद्ध अशा तिथि , वार , नक्षत्रें , ग्रहण , रात्रि यांचे ठायीं तैलाभ्यंग कर्तव्य असतां त्या तेलांत गाईचें घृत किंवा ब्राह्मणाची पादधूलि घालून त्या तेलानें अभ्यंग करावा . रविवारीं तेलांत दूर्वा , भौमवारीं मृत्तिका , गुरुवारीं पुष्प तेलांत टाकून त्या तेलानें सर्वांनीं अभ्यंग करावा असें केलें असतां निषिद्ध दिवसाचा दोष नाहीं . " मंगलकार्यांतही तैलाभ्यंगाविषयीं दोष नाहीं . कारण , " नांदीश्राद्धपूर्वक जीं मांगलिककृत्यें त्यांचेठायीं तैलाभ्यंगपूर्वक मांगलिक स्नान आहे , तें कोणत्याही तेलानें मध्यान्हकालाचे पूर्वीं करावें " असें मदनपारिजातांत कात्यायनाचें वचन आहे . हेमाद्रींत बृहन्मनु - " रविवार , भौमवार , संक्रांति , वैधृति , भद्रा , षष्ठी , पर्वदिवस , अष्टमी , यांचेठायीं तैलाभ्यंग करुं नये . निषिद्ध दिवस वर्ज्य करुन शनिवारीं तैलाभ्यंग करावा . " तिलस्नानाचा निषेध सांगतो - षट त्रिंशन्मतांत - " धन , पुत्र , स्त्री यांची इच्छा कराणार्‍या पुरुषानें सप्तमी , अमावास्या , संक्रांति , ग्रहण , आणि जन्मदिवस यांचेठायीं तिलपिष्टस्नान करुं नये . "

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:20.3630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

decomposition

 • न. विघटन 
 • न. अपघटन 
 • न. विघटन 
 • continuous decomposition संतत विघटन 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

shatshastra konati?
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.