मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
मूर्तिप्रतिष्ठा

तृतीयपरिच्छेद - मूर्तिप्रतिष्ठा

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां मूर्तिप्रतिष्ठा सांगतो -

अथमूर्तिप्रतिष्ठा वसिष्ठः हस्तत्रयेमित्रहरित्रयेचपौष्णद्वयादित्यसुरेज्यभेषु तिस्त्रोत्तराधातृशशांकभेषुसर्वामरस्थापनमुत्तमंस्यात् ‍ मात्स्ये चैत्रेवाफाल्गुनेवापिज्येष्ठेवामाधवेतथा माघेवासर्वदेवानांप्रतिष्ठा शुभदाभवेत् ‍ नारदस्तुचैत्रंनिषेधति विचैत्रेष्वेवमासेषुमाघादिषुचपंचस्विति तेनात्रविकल्पः अत्रमाघमासो विष्णुप्रतिष्ठाव्यतिरिक्तविषयः माघेकर्तुर्विनाशायफाल्गुनेशुभदाभवेदिति विष्णुधर्मोक्तेरितिहेमाद्रिः मात्स्ये दृढाधनकरीस्फीतातथाप्रतिपदिस्मृता द्वितीयायांधनोपेतातृतीयायांधनप्रदा चतुर्थ्यांनाशमाप्नोति यमस्यस्यात्सुखावहा विनायकस्यदेवस्यतथातत्रहितप्रदा पंचम्यांश्रीयुताकर्तुर्वरदाचतथाभवेत् ‍ षष्ठ्यांलक्ष्मीयुतानित्यंसप्तम्यांरोगनाशिनी अष्टम्यांधान्यबहुलानवम्यांचविनश्यति भद्रकाल्याः कृतातत्रकर्तुर्भवतितुष्टये धर्मवृद्धिकरीज्ञेयादशम्यांतुतथातिथौ एकादश्यांतथायुक्ताद्वादश्यांसर्वकामदा त्रयोदश्यांतथाज्ञेयाचतुर्दश्यांविनश्यति कृष्णपक्षेपंचदश्यांकर्तुः क्षयकरीभवेत् ‍ पंचदश्यांतथाशुक्लेसर्वकामकरीभवेत् ‍ अषाढेद्वेतथामूलमुत्तरात्रयमेवच ज्येष्ठाश्रवणरोहिण्यः पूर्वाभाद्रपदातथा हस्तोश्विनीरेवतीचपुष्योमृगशिरास्तथा अनूराधातथास्वातीप्रतिष्ठासुप्रशस्यते श्रीपतिः रोहिण्युत्तरपौष्णवैष्णवकरादित्याश्विनीवासवानूराधैंदवजीवभेषुगदितंविष्णोः प्रतिष्ठापनम् ‍ पुष्यश्रुत्यभिजित्सुरेश्वरकयोर्वित्ताधिपस्कंदयोर्मैत्रेतिग्मरुचेः करेनिऋतिभेदुर्गादिकानांशुभम् ‍ गणपरिवृढरक्षोयक्षभूतासुराणांप्रमथफणिसरस्वत्यादिकानांचपौष्णे श्रवसिसुगतनाम्नोवासवेलोकपानांनिगदितमखिलानांस्थापनंचस्थिरेषु तेजस्विनीक्षेमकृदग्निदाहविधायिनीस्याद्धनदादृढाच आनंदकृत्कल्पविनाशिनीचसूर्यादिवारेषुभवेत्प्रतिष्ठा माधवीयेवैखानसः मातृभैरववाराहनरसिंहत्रिविक्रमाः माहिषासुरहत्र्त्रीचस्थाप्यावैदक्षिणायने वैशब्दोप्यर्थे ।

वसिष्ठ - " हस्त , चित्रा , स्वाती , अनुराधा , ज्येष्ठा , मूळ , श्रवण , धनिष्ठा , शततारका , रेवती , अश्विनी , पुनर्वसु , पुष्य , तीन उत्तरा , रोहिणी , मृग या नक्षत्रांवर सर्व देवांची प्रतिष्ठा उत्तम म्हटली आहे . " मात्स्यांत - " चैत्रांत , फाल्गुनांत किंवा ज्येष्ठांत , अथवा वैशाखांत किंवा माघांत सर्व देवांची प्रतिष्ठा शुभ होईल . " नारद तर चैत्राचा निषेध करितो , तो असा - " माघादिक जे पांच मास त्यांमध्यें चैत्र वर्ज्य करुन इतरांत देवप्रतिष्ठा शुभ होईल . " चैत्र मात्स्यवचनानें घेतला आणि नारदानें निषिद्ध केला यावरुन चैत्राविषयीं विकल्प समजावा . येथें माघमास जो सांगितला तो विष्णुप्रतिष्ठेवांचून इतरांविषयीं समजावा . कारण , " माघांत केलेली प्रतिष्ठा कर्त्याचा विनाश करणारी होईल . फाल्गुनांत केलेली प्रतिष्ठा शुभदायक होईल . " असें विष्णुधर्मांत वचन आहे , असें हेमाद्रि सांगतो . मात्स्यांत - " प्रतिपदेस केलेली प्रतिष्ठा धन देणारी , वृद्धि करणारी व दृढ अशी होते . द्वितीयेस धन देणारी होते . तृतीयेस धनप्रद होते . चतुर्थीस प्रतिष्ठा केली असतां नाश होतो . यमाची प्रतिष्ठा शुभावह होते . तशीच चतुर्थीस विनायकाची प्रतिष्ठा हितकारक होते . पंचमीस कर्त्याला वरदायक व लक्ष्मीयुक्त अशी होते . षष्ठीस सदा लक्ष्मीयुक्त होते . सप्तमीस रोगनाश करणारी होते . अष्टमीस बहुत धान्य देणारी होते . नवमीस विनाश करणारी होते . त्या नवमीस भद्रकाली देवीची प्रतिष्ठा केली असतां कर्त्याला आनंद करणारी होते . दशमीस धनवृद्धि करणारी होते . एकादशीस तशीच आहे . द्वादशीस सर्व मनोरथ देणारी होते . त्रयोदशीस तशीच समजावी . चतुर्दशीस विनाश करणारी होते . अमावास्येस केलेली प्रतिष्ठा कर्त्याचा क्षय करणारी होईल . आणि पौर्णिमेस केलेली प्रतिष्ठा सर्व काम पूर्ण करणारी होईल . पूर्वाषाढा , मूल , तीन उत्तरा , ज्येष्ठा , श्रवण , रोहिणी , पूर्वाभाद्रपदा , हस्त , अश्विनी , रेवती , पुष्य , मृगशीर्ष , अनुराधा , स्वाती , हीं नक्षत्रें देवांच्या प्रतिष्ठेविषयीं प्रशस्त आहेत . " श्रीपति - " रोहिणी , उत्तरा , रेवती , श्रवण , हस्त , पुनर्वसु , अश्विनी , धनिष्ठा , अनुराधा , मृग , पुष्य , ह्या नक्षत्रांवर विष्णूची प्रतिष्ठा शुभ आहे . पुष्य , श्रवण , अभिजित् ‍, या नक्षत्रांवर इंद्र व ब्रह्मदेव यांची ; अनुराधांवर कुबेर व कार्तिकस्वामी यांची ; हस्तावर सूर्याची ; आणि मूळावर दुर्गादेवी इत्यादिकांची प्रतिष्ठा शुभ आहे . गणाधिप , राक्षस , यक्ष , भूतें , दैत्य , प्रमथ , शेष , सरस्वती , इत्यादिकांची प्रतिष्ठा रेवतीवर ; बुद्धाची प्रतिष्ठा श्रवणावर ; लोकपालांची प्रतिष्ठा धनिष्ठांवर ; आणि सर्वांची प्रतिष्ठा स्थिर नक्षत्रांवर सांगितली आहे . रविवारीं तेजस्विनी ; सोमवारीं कल्याणकारी ; मंगळवारीं अग्निदाहकारी ; बुधवारीं धन देणारी ; गुरुवारीं दृढ ; शुक्रवारीं आनंदकारी ; शनिवारीं कल्पांतीं विनाश पावणारी अशी प्रतिष्ठा होते . " माधवीयांत वैखानस - " मातृका , भैरव , वराह , नारसिंह , त्रिविक्रम आणि देवी यांची प्रतिष्ठा दक्षिणायनांतही करावी . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP