मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
बौधायनसूत्रे

तृतीयपरिच्छेद - बौधायनसूत्रे

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


बौधायनसूत्रे अथोपनीतस्यव्रतानिभवंतिनान्यस्योच्छिष्टंभुंजीतान्यत्रपितृज्येष्ठाभ्यांनस्त्रियासहभुंजीतमधुमांसश्राद्धसूतकान्नानिदशाहसंधिनीक्षीरंछत्राकनिर्यासौविलापनंगणान्नंगणिकान्नमित्येतेषुपुनः संस्कारः प्रतिषिद्धदेशगमनमित्येके अथाप्युदाहरंति सुराष्ट्रसिंधुसौवीरमवंतींदक्षिणापथम् ‍ एतानिब्राह्मणोगत्वापुनः संस्कारमर्हति अथपुनः संस्कारंव्याख्यास्यामोदेवयजनप्रभृत्याग्निमुखात् ‍ कृत्वापालाशींसमिधमाज्येनाऽड्त्वाभ्याधायवाचयति पुनस्त्वादित्यारुद्रावसवः० कामाः स्वाहेत्यथाव्रत्यप्रायश्चित्तेजुहोति यन्म आत्मनोमिंदाभूत्‍० पुनरग्निश्चक्षुरदादितिद्वाभ्यामथपक्काज्जुहोति सप्ततेअग्नेसमिधः सप्तजिह्वाः सप्त० घृतेनस्वाहेत्यथाज्याहुंतीरुपजुहोति येनदेवाः पवित्रेणेतितिसृभिरनुच्छंदसं स्विष्टकृत् ‍ प्रभृतिसिद्धमाधेनुवरदानादथापरमापरिदानातकृत्वापालाशींसमिधमाधायाथाव्रत्यप्रायश्चित्तेजुहोत्यथव्याह्रतीर्जुहोति अथापरोब्राह्मणवचनादेवसावित्र्याशतकृत्वोघृतमभिमंत्र्यप्राश्यकृतप्रायश्चित्तोभवति गुरोर्वाप्युच्छिष्टंभुंजीताथाप्युदाहरंति वपनंदक्षिणादानंमेखलादंडमजिनभैक्ष्यचर्याव्रतानिचनिवर्तंतेपुनः संस्कारकर्मणीति ।

बौधायनसूत्रांत - " आतां ब्रह्मचार्‍याचीं व्रतें सांगतो - पिता , ज्येष्ठ भ्राता यांवांचून इतराचें उच्छिष्ट भक्षण करुं नये ; स्त्रियेसह भोजन करुं नये ; मधु ( माक्षिक ), मांस , श्राद्धान्न , सूतकान्न , सुवेराचें व वाफणार्‍या गाईचें दूध , छत्राक , वृक्षाचा डिंक , रोदन , गणान्न ( बहुतांचें अन्न एकत्र शिजविलेलें तें ), गणिकान्न , हीं सेवन केलीं असतां पुनः संस्कार करावा . निषिद्ध देशांत गमन केलें असतांही कोणी आचार्य पुनः संस्कार सांगतात . आणि उदाहरणही देतात . सुराष्ट्र , सिंधु , सौवीर , अवंती , दक्षिणापथ , ह्या देशांत ब्राह्मण गेला असतां तो पुनः संस्काराला योग्य होतो . आतां पुनः संस्कार सांगतों - यज्ञभूमीचे ठायीं स्थंडिलकरण , उल्लेखन इत्यादि अग्निमुख कर्म करुन घृतानें प्लुत अशी पलाशसमिधा घेऊन मंत्र म्हणावा . तो असाः - ‘ पुनस्त्वादित्यारुद्रा वसवः० स्वाहा ’ ह्या मंत्रानें ती समिधा द्यावी . नंतर व्रतलोपप्रायश्चित्ताविषयीं दोन आहुति होम करावा . ते मंत्र असेः - ‘ यन्म आत्मनो मिंदाभूत् ० ’ ‘ पुनरग्निश्चक्षुरदात् ‍ ० ’ याप्रमाणें आज्याहुति होम करुन नंतर पक्क होम ( चरुहोम ) करावा . त्याचा मंत्र - ‘ सप्तते अग्ने० घृतेन स्वाहा . ’ नंतर ‘ येन देवाः पवित्रेण० ’ इत्यादि तीन मंत्रांनीं आज्याहुति देऊन त्याग म्हणून स्विष्टकृत् ‍ इत्यादि आचार्याला गोप्रदानापर्यंत कर्म करावें . दुसरा प्रकार - ( उपनयनप्रयोगांत सांगितल्याप्रमाणें ) परिदानापर्यंत कर्म करुन पूर्ववत् ‍ पलाशसमिधा घेऊन नंतर त्या समिधेचा होम करुन दोन व्रतलोपप्रायश्चित्ताहुतींचा ( वर सांगितलेल्यांचा ) होम करुन व्याह्रति मंत्रांनीं होम करावा . आतां तिसरा प्रकार - ब्राह्मणाकडून गायत्रीमंत्रांनें शंभर वेळां घृत अभिमंत्रित करुन तें घृत प्राशन केलें असतां कृतप्रायश्चित्त ( शुद्ध ) होतो . अथवा गुरुचें उच्छिष्ट भक्षण करावें , म्हणजे शुद्ध होतो . आताम उपनयनाहून पुनः संस्कारांत विशेष सांगतो - वपन , दक्षिणादान , मेखला , दंड , अजिन , भिक्षा मागणें , आणि व्रतें ( महानाम्न्यादिक चार व्रतें ) इतके प्रकार पुनः संस्कारकर्माचे ठायीं होत नाहींत . "

आश्वलायनगृह्येपि अथोपेतपूर्वस्येत्यादिनापुनः संस्कार उक्तः तथापित्रादिव्यतिरेकेणब्रह्मचारिणः प्रेतकर्मकरणेपुनरुपनयनमित्यपरार्कादयः त्रिस्थलीसेतौ कर्मनाशाजलस्पर्शात्करतोयाविलंघनात् ‍ गंडकीबाहुतरणात्पुनः संस्कारमर्हति गौडास्तु करतोयाजलस्पर्शात्कर्मनाशाविलंघनादितिपठंति तन्न दानधर्मेषुकरतोयास्नानेप्राशस्त्योक्तेः करतोयेसदानीरेसरिच्छ्रेष्ठेतिविश्रुते आप्लावयसिपौराणांपापंहरकरोद्भवेइतिस्मृतिदर्पणचंद्रिकालिखितस्नानमंत्राच्च पराशरः अजिनंमेखलादंडोभैक्ष्यचर्याव्रतानिच निवर्तंतेद्विजातीनांपुनः संस्कारकर्मणि हरदत्तस्तु यएकंवेदमधीत्यान्यंवेदमध्येतुमिच्छतितस्यपुनरुपनयनंतेन प्रतिवेदमुपनयनंकर्तव्यमित्याह अन्येनैतन्मन्यंते सर्वेभ्योवैवेदेभ्यः सावित्र्यनूच्यतइत्यापस्तंबोक्तेः ।

आश्वलायन गृह्यसूत्रांतही - " आतां ज्याचें पूर्वीं उपनयन झालें आहे त्याचें प्रायश्चित्तासाठीं पुनः उपनयन कर्तव्य असतां विशेष सांगतो - केशवपन आणि मेधाजनन हें कृताकृत आहे . परिदान ( प्रजापतीला वटुदान ) होत नाहीं . आणि उदगयनादि कालही पहावयाचा नाहीं . सावित्रिमंत्राच्या स्थानीं ‘ तत्सवितुर्वृणीमहे० ’ या सावित्रीचा प्रयोग करावा . " या प्रकारेंकरुन पुनः संस्कार सांगितला आहे . तसेंच ‘ पिता , माता , मातामह इत्यादिकांवांचून इतरांची प्रेतक्रिया ब्रह्मचार्‍यानें केली असतां त्याचें पुनरुपनयन करावें ’ असें अपरार्कादि ग्रंथकार सांगतात . त्रिस्थलीसेतूंत - " कर्मनाशा नदीच्या जलाचा स्पर्श , करतोया नदीचें उल्लंघन , आणि गंडकीला बाहूंनीं तरणें , यांतून कोणतें एक घडलें असतां तो पुनः संस्काराला योग्य होतो . " गौड तर - ‘ कर्मनाशाजलस्पर्शात्करतोयाविलंघनात् ‍ ’ या स्थानीं ‘ करतोयाजलस्पर्शात्कर्मनाशाविलंघनात् ‍ ’ असा पाठ करितात . तें बरोबर नाहीं . कारण , भारतांत दानधर्मांचे ठायीं करतोयानदीचें स्नान प्रशस्त , असें सांगितलें आहे . आणि ‘ करतोये सदानीरे सरिच्छ्रेष्ठेऽतिविश्रुते ॥ आप्लावयसि पौराणां पापं हरकरोद्भवे ’ असा स्मृतिदर्पण - चंद्रिकाकारांनीं स्नानमंत्रही लिहिला आहे . पराशर - " अजिन , मेखला , दंड , भिक्षा मागणें , आणि व्रतें ही कर्मैं द्विजातींच्या पुनः संस्कारकर्माचे ठायीं होत नाहींत . " हरदत्त तर - जो द्विज एका वेदाचें अध्ययन करुन दुसर्‍या वेदाचें अध्ययन करण्याची इच्छा करितो त्याचें पुनरुपनयन करावें असें आहे . यावरुन प्रत्येक वेदाच्या अध्ययनाविषयीं उपनयन करावें असें सांगतो . इतर ग्रंथकार हें ( हरदत्त ) मत मानीत नाहींत . कारण , " सर्व वेदांकरितां गायत्रीचा उपदेश आहे " असें आपस्तंबाचें वचन आहे .

तद्विधिः कारिकायां वेदांतरमधीत्यैवऋग्वेदंयेत्वधीयते उपनीतिरियंतेषामलंकरणवर्जिता यद्वै तदुपनीतस्यप्रायश्चित्तंयदाभवेत् ‍ कृताकृतंचवपनंमेधाजननमेवच मेधाजननसद्भावेव्रतचर्याभवेदिह अनुप्रवचनीयश्चतदभावेद्वयंनहि परिदानंनकार्यंस्यान्निमित्तानंतरंत्विदं पूर्वस्यावाचयेत्स्थानेतत्सवितुर्वृणीमह इति यत्तुहारीतः द्विविधाः स्त्रियः ब्रह्मवादिन्यः सद्योवधूनामुपनयनंकृत्वाविवाहः कार्य इति तद्युगांतरविषयं पुराकल्पेषुनारीणांमौंजीबंधनमिष्यते अध्यापनंचवेदानांसावित्रीवाचनंतथेतियमोक्तेः ।

पुनरुपनयनाचा विधि सांगतो कारिकेंत - " जे ब्राह्मण ऋग्वेदावांचून दुसर्‍या वेदाचें अध्ययन करुन नंतरच ऋग्वेदाचें अध्ययन करितात त्यांना हें उपनयन अलंकाररहित उक्त आहे . अथवा उपनीताला प्रायश्चित्तनिमित्तानें हें पुनरुपनयन सांगितलें आहे . त्या प्रायश्चित्तरुप पुनरुपनयनांत वपन आणि मेधाजनन , हीं कृताकृत ( केलें असतां अभ्युदय , न केलें असतां दोषाभाव , अशीं ) आहेत . मेधाजनन करावयाच्या पक्षीं ब्रह्मचर्यव्रताचरण आणि अनुप्रवचनीय हीं दोन होतात . मेधाजननाच्या अभावपक्षीं ब्रह्मचर्यव्रताचरण व अनुप्रवचनीय हीं करुं नयेत . परिदान होत नाहीं . निमित्तानंतर तत्कालींच हें पुनरुपनयन करावें . गायत्रीच्या स्थानीं ‘ तत्सवितुर्वृणीमहे० ’ ह्या गायत्रीचा उपदेश करावा . " आतां जें हारीत - " स्त्रिया दोन प्रकारच्या - ब्रह्मवादिनी व सद्योवधू . त्यांपैकीं ब्रह्मवादिनी स्त्रियांस उपनयन , अग्नींत समिधा होम करणें , वेदाध्ययन , आणि आपल्या घरीं भिक्षा मागणें हीं सांगितलीं आहेत . सद्योवधू स्त्रियांचें उपनयन करुन विवाह करावा " असें सांगतो तें इतर युगांत समजावें . कारण , " पूर्वींच्या कल्पांत स्त्रियांस मौंजीबंधन , वेदांचें अध्यापन , आणि

सावित्रीवाचन इष्ट होतें " असें यमाचें वचन आहे .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP