TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
अंकुरार्पणाकरितां मृत्तिकाहरण

तृतीयपरिच्छेद - अंकुरार्पणाकरितां मृत्तिकाहरण

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अंकुरार्पणाकरितां मृत्तिकाहरण

आतां अंकुरार्पणाकरितां मृत्तिकाहरण सांगतो -

अथमृदाहरणं ज्योतिर्निबंधेनारदः कर्तव्यंमंगलेष्वादौमंगलायांकुरार्पणम् ‍ नवमेसप्तमेवापि पंचमेदिवसेपिवा तृतीयेबीजनक्षत्रेशुभवारेशुभोदये सम्यग्गृहाण्यलंकृत्यवितानध्वजतोरणैः सहवादित्रनृत्याद्यैर्गत्वाप्रागुत्तरांदिशम् ‍ तत्रमृत्सिकतांश्लक्ष्णांगृहीत्वापुनरागतः मृन्मयेष्वथवावैणवेषुपात्रेषुयोजयेत् ‍ अनेकबीजसंयुक्तांतोयपुष्पोपशोभिताम् ‍ शौनकः आधानंगर्भसंस्कारंजातकर्मचनामच हित्वान्यत्रविधातव्यं मंगलेंकुरवापनम् ‍ बृहस्पतिः आत्यंतिकेषुकार्येषुकार्यंसद्योंऽकुरार्पणम् ‍ तत्रैववाग्दानंहरिद्रावंदनंचकार्यम् ‍ ज्योतिःप्रकाशे चतुर्थोमंडपः श्रेष्ठः सप्तमः पंचमस्तथा नवमैकादशौश्रेष्ठौनेष्टौषष्ठतृतीयकौ विवाहभेस्वोदयेवाकन्यावरणमाचरेत् ‍ वरस्यापिवरणमाहचंडेश्वरः उपवीतंफलंपुष्पंवासांसिविविधानिच देयंवरायवरणेकन्याभ्रात्राद्विजेनवेति ॥

ज्योतिर्निबंधांत नारद - " मंगलकार्यांमध्यें आधीं मंगलासाठीं नवव्या , सातव्या , पांचव्या , किंवा तिसर्‍या दिवशीं , बीज पेरण्यास सांगितलेल्या नक्षत्रावर शुभवारीं शुभलग्नावर अंकुरार्पण करावें . पताका , ध्वज , तोरणें लावून घरें चांगलीं भूषित करुन वाद्यगजर , वारांगनांचा नाच करीत ईशान्यदिशेस जाऊन त्या ठिकाणची चांगली मृदु माती घेऊन पुनः घरीं यावें . नंतर ती माती मातीच्या पात्रांत किंवा वेळूच्या पात्रांत ठेवून त्यांत अनेक धान्यांचीं बीजें पेरुन पाणी घालावें , आणि वर फुलें घालावी . हें अंकुरार्पण होय . " शौनक - " गर्भाधान , गर्भाचे संस्कार , जातकर्म , नामकरण , हीं कर्मै वर्ज्य करुन बाकीच्या मंगलकार्यांत अंकुरार्पण करावें . " बृहस्पति - " थोड्या अवकाशांत करावयाच्या कार्यांत सद्यः ( तत्कालीं ) अंकुरार्पण करावें . " या वेळींच वाग्दान आणि हरिद्रावंदन हीं करावीं . ज्योतिः प्रकाशांत - " चवथा मंडप श्रेष्ठ आहे . तसाच सातवा आणि पांचवा श्रेष्ठ आहे . नववा आणि अकरावा हेही श्रेष्ठ आहेत . सहावा आणि तिसरा हे दोन इष्ट नाहींत . विवाहनक्षत्रावर किंवा विवाहनक्षत्राच्या उदयावर कन्यावरण करावें . " वराचेंही वरण सांगतो चंडेश्वर - " वराच्या वरणकालीं कन्येच्या भ्रात्यानें किंवा ब्राह्मणानें वराला यज्ञोपवीत , फलें , पुष्पें आणि अनेक प्रकारचीं वस्त्रें हीं द्यावीं . "

वाग्दानोत्तरंवरमरणेऽपरार्कस्मृतिचंद्रिकायांवसिष्ठः अद्भिर्वाचाचदत्तायांम्रियेतोर्ध्वंवरोयदि नचमंत्रोपनीतास्यात्कुमारीपितुरेवसा यत्तुनारदः उद्वाहितापिसाकन्यानचेत्संप्राप्तमैथुना पुनः संस्कारमर्हेतयथाकन्यातथैवसेति यच्चकात्यायनः वरोयद्यन्यजातीयः पतितः क्लीबएवच विकर्मस्थः सगोत्रोवादासो दीर्घामयोपिवा ऊढापिदेयासान्यस्मैसहावरणभूषणेति इदंकलौनिषिद्धम् ‍ देवरेणसुतोत्पत्तिर्दत्ताकन्यानदीयतेइत्यादित्यपुराणेकलौनिषेधात् ‍ दत्ताशब्दऊढापरः ऊढायाः पुनरुद्वाहमितिहेमाद्रावुक्तेः अतएवसगोत्रासपिंडादिविवाहेपि भोगतस्तांपरित्यज्यपालयेज्जननीमिवेत्युक्तम् ‍ ।

वाग्दानोत्तर वर मृत झाला असतां सांगतो अपरार्कांत स्मृतिचंद्रिकेंत वसिष्ठ - " उदकानें आणि वाणीनें कन्या दिली असतां नंतर जर वर मरेल आणि कन्या पाणिग्रहणाच्या मंत्रांनीं संस्कार केलेली नसेल तर ती कन्या पित्याचीच आहे . " आतां जें नारद - " विवाहित झालेली कन्या असली तरी जर तिचा संभोग ( मैथुन ) केलेला नसेल तर ती पुनः संस्काराला ( विवाहाला ) योग्य होते . जशी कन्या ( अविवाहित ) तशीच ती समजावी . " आणि जें कात्यायन - " जर वर अन्यजातीचा असेल , अथवा पतित किंवा षंढ असेल , अथवा वेदशास्त्रविरुद्ध कर्म करणारा , किंवा सगोत्री अथवा दास किंवा दीर्घरोगी असा असेल तर विवाहित कन्या असली तरी ती कन्या वस्त्रालंकारसहित दुसर्‍याला द्यावी . " असें सांगतो . हें कारणें कलियुगांत निषिद्ध आहे . कारण , " स्त्रियेनें भर्त्याच्या अभावीं दिरापासून पुत्रोत्पत्ति करणें , आणि दिलेली कन्या पुनः दुसर्‍याला देणें . " या वचनानें ह्या कर्मांचा आदित्यपुराणांत कलियुगांत निषेध केलेला आहे . ह्या आदित्यपुराणांतील वचनांत ‘ दत्ता ’ असें पद आहे , त्याचा अर्थ विवाहित समजावा . कारण , " विवाहित कन्येचा पुनः विवाह कलियुगांत निषिद्ध असें हेमाद्रींत सांगितलें आहे . म्हणूनच सगोत्रा , सपिंडा इत्यादि कन्येचा विवाह झाला असेल तर " संभोगाविषयीं तिचा त्याग करुन मातेप्रमाणें तिचें पालन करावें " असें सांगितलें आहे .

देशांतरगमनेतुकात्यायनः वरयित्वातुयः कश्चित्प्रणश्येत्पुरुषोयदा ऋत्वागमांस्त्रीनतीत्यकन्यान्यंवरयेद्वरम् ‍ अपरार्केनारदोपि प्रतिगृह्यतुयः कन्यांवरोदेशांतरंव्रजेत् ‍ त्रीनृतून् ‍ समतिक्रम्यकन्याऽन्यंवरयेद्वरम् ‍ शुल्कदानेतुमनुवसिष्ठौ कन्यायांदत्तशुल्कायांम्रियतेयदिशुल्कदः देवरायप्रदातव्यायदिकन्यानुमन्यते चंद्रिकायांकात्यायनः प्रदायशुल्कंगच्छेद्यः कन्यायाः स्त्रीधनंतथा धार्यासावर्षमेकंतुदेयान्यस्मैविधानतः अनेकेभ्योहिदत्तायामनूढायांतुतत्रैव पूर्वागतश्चसर्वेषांलभेताद्यवरस्तुताम् ‍ पश्चाद्वरेणयद्दत्तं तस्याः प्रतिलभेतसः अथागच्छेन्नवोढायांदत्तंपूर्ववरोहरेत् ‍ याज्ञवल्क्यः सकृत्प्रदीयतेकन्याहरंस्तांचौरदंडभाक् ‍ दत्तामपिहरेत्पूर्वाच्छ्रेयांश्चेद्वरआव्रजेत् ‍ पूर्वस्यदोषसत्त्वेइदमितिविज्ञानेश्वरः संबंधतत्त्वेवसिष्ठः कुलशीलविहीनस्यपश्चाद्धिपतितस्यच अपस्मारिविधर्मस्यरोगिणांवेषधारिणाम् ‍ दत्तामपिहरेत्कन्यांसगोत्रोढांतथैवच मनुः षंढांधबधिरादीनांविवाहोस्तियथोचितम् ‍ विवाहासंभवेतेषांकनिष्ठोविवहेत्तदा पितृव्यपुत्रेसापत्नेपरदारसुतेषुच विवाहाधानयज्ञादौपरिवेदोनदूषणम् ‍ अन्यद्वक्तव्यंविस्तरभीतेर्नोच्यतेइतिदिक् ‍ ।

वर देशांतरीं गेला असेल तर सांगतो कात्यायन - " जेव्हां जो कोणी पुरुष कन्येला वरुन नाहींसा होईल तेव्हां त्याची तीन ऋतु ( सहा महिने ) पर्यंत प्रतीक्षा करुन नंतर त्या कन्येनें दुसरा वर वरावा . " अपरार्कांत नारदही - " जो वर कन्येचा प्रतिग्रह ( वाग्दानादि कर्मै ) करुन देशांतरीं जाईल त्याची सहा महिनेपर्यंत प्रतीक्षा करुन कन्येनें दुसरा वर वरावा . " कन्येला मूल्य दिलें असेल तर सांगतात मनु आणि वसिष्ठ - " कन्येला शुल्क ( मूल्य ) दिलेलें असून जर मूल्य देणारा मरेल तर ती कन्या त्याच्या ( मूल्य देणाराच्या ) भ्रात्याला द्यावी . पण कन्येची जर संमति असेल तर द्यावी . अर्थात् ‍ नसेल तर देऊं नये . " चंद्रिकेंत कात्यायन - " जो पुरुष कन्येला शुल्क ( मूल्य ) आणि स्त्रीधन देऊन देशांतरीं जाईल त्याची प्रतीक्षा करीत एक वर्षपर्यंत ती कन्या ठेवावी ; नंतर दुसर्‍या वराला ती कन्या यथाविधि द्यावी . अनेक वरांला कन्या दिलेली असून तिचा कोणाशीं विवाह झालेला नसेल तर त्या सर्वांमध्यें प्रथम आलेल्या पहिल्या वराला ती कन्या प्राप्त होईल . मागांहून आलेल्या वरानें जें कांहीं द्रव्यादिक दिलें असेल तें त्याला परत मिळेल . आतां जर तिचा दुसर्‍या वराशीं विवाह झाल्यावर पहिला वर प्राप्त होईल तर त्यानें जें कांहीं द्रव्यादिक दिलें असेल तें त्याला परत मिळेल . " याज्ञवल्क्य - " कन्येनें दान एकवार होतें . एकवार दिलेली कन्या जो पुरुष हरण करुन आणील त्याला चोराची शिक्षा प्राप्त होईल . जर उत्तम वर प्राप्त होईल तर पूर्वीं दिलेली कन्या असली तरी त्यापासून हरण करुन आणावी . " हें सांगणें पूर्ववराला दोष असेल तर समजावें , असें विज्ञानेश्वर सांगतो . संबंधतत्त्वांत वसिष्ठ - " हीन कुलांतील , दुःशील , पतित , अपस्मार ( फेंपरें ) असलेला , वेदशास्त्रविरुद्ध आचरण करणारा , रोगी , स्त्रियादिकांचे वेषधारी , आणि सगोत्री यांना दिलेली असली तरी ती कन्या हरण करुन आणावी . " मनु - " षंढ , आंधळा , बेहरा , इत्यादिकांचा यथायोग्य विवाह होतो . यांचा विवाह न होईल तर त्याच्या कनिष्ठ भ्रात्यानें विवाह करावा . पितृव्याचा पुत्र , सापत्नभ्राता , परस्त्रियांचे पुत्र ( दत्तकादिक ) हे ज्येष्ठ असून अविवाहित असतां कनिष्ठानें विवाह , अग्न्याधान , यज्ञ इत्यादि केलें तरी त्याला परिवेदनरुप दोष प्राप्त होत नाहीं . " इतर कांहीं सांगावयाचें आहे , परंतु विस्तार फार होईल या भीतीनें सांगत नाहीं . ही फक्त दिशा दाखविली आहे .

अत्रनांदीश्राद्धेविशेषंतदधिकारिविशेषंचाग्रेवक्ष्यामः इदंचाद्यविवाहेपिताकुर्याद्दितीयादौवरएव नांदीश्राद्धंपिताकुर्यादाद्येपाणिग्रहेपुनः अतऊर्ध्वंप्रकुर्वीतस्वयमेवतुनांदिकमितिस्मृतेः त्रिकांडमंडनोपि पित्रोस्तुजीवतोः कुर्यात्पुनः पाणिग्रहंयदा पितुर्नांदीमुखंश्राद्धंनोक्तंतस्यमनीषिभिरिति रेणुकारिका उक्तेकालेविवाहांगंकुर्यान्नांडीमुखंपिता देशांतरेविवाहश्चेत्तत्रगत्वाभवेदिदम् ‍ अथलग्नघटीस्थापनमाहनारदः षडंगुलमितोत्सेधंद्वादशांगुलमायतम् ‍ कुर्यात्पातालवत्ताम्रपात्रंतद्दशभिः पलैः ताम्रपात्रेजलैः पूर्णेमृत्पात्रेवाथवाशुभे मंडलार्धोदयंवीक्ष्यरवेस्तत्रविनिक्षिपेत् ‍ तत्रमंत्रः मुख्यंत्वमसियंत्राणांब्रह्मणानिर्मितंपुरा भवभावायदंपत्योः कालसाधनकारणमिति ।

या विवाहांत नांदीश्राद्धाविषयीं विशेष विचार आणि त्याच्या अधिकार्‍यांचा विशेष निर्णय पुढें ( उत्तरार्धांत श्राद्धप्रकरणीं ) सांगूं . हें नांदीश्राद्ध पहिल्या विवाहांत पित्यानें करावें . द्वितीयादि विवाहांत वरानेंच करावें . कारण , " पहिल्या विवाहांत नांदीश्राद्ध पित्यानें करावें . पहिला विवाह झाल्यावर पुढें नांदीश्राद्ध करावयाचें असतां तें स्वतःच करावें . " अशी स्मृति आहे . त्रिकांडमंडनही - " माता पिता जीवंत असतां जर पुनः विवाह करील तर त्या विवाहाचें नांदीश्राद्ध करण्यास विद्वानांनीं पित्यास सांगितलें नाहीं . " रेणुकारिका - " विवाहकालीं विवाहाचें अंगभूत नांदीश्राद्ध पित्यानें करावें , देशांतरीं विवाह होईल तर त्या ठिकाणीं पित्यानें जाऊन हें नांदीश्राद्ध करावें . " आतां लग्नघटीस्थापन सांगतो नारद - " दहा पलें ( ४० कर्ष ) तांबें घेऊन त्याचें सहा अंगुलें उंच आणि बारा अंगुलें विस्तृत असें वैद्यकशास्त्रोक्त पातालयंत्राप्रमाणें मध्यें छिद्र पाडलेलें असें ताम्रपात्र करावें . तें घटिकासाधण्याचें यंत्र होय . उदकानें भरलेल्या तांब्याच्या भांड्यांत अथवा चांगल्या मातीच्या भांड्यांत , सूर्याच्या अर्धमंडलाचा उदय झालेला पाहून त्या वेळीं तें घटिकायंत्र ठेवावें . त्याविषयीं मंत्र - " मुख्यं त्वमसि यंत्राणां ब्रह्मणा निर्मितं पुरा ॥ भव भावाय दंपत्योः कालसाधनकारणम् ‍ ॥ "

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:18.5830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

taboo

 • निषिद्ध 
 • निषिद्ध मानणे 
 • वर्ज्य मानणे 
 • = tabu 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

If the rituals after the death are not performed what are the consequences?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.