TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
आधान

तृतीयपरिच्छेद - आधान

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आधान

आतां आधान सांगतो -

अथाधानम् ‍ रत्नमालायाम् ‍ प्राजापत्येपूषभेसद्विदैवेपुष्येज्येष्ठास्वैंदवेकृत्तिकासु अग्न्याधानंह्युत्तराणांत्रयेपिचित्रादित्येकीर्तितंगर्गमुख्यैः आश्वलायनः अग्न्याधेयंकृत्तिकासुरोहिण्यांमृगशिरसिफल्गुनीषुविशाखयोरुत्तरयोः प्रोष्ठपदयोरेतेषांकस्मिंश्चिद्वसंतेपर्वणिब्राह्मणआदधीतग्रीष्मवर्षाशरत्सुक्षत्रियवैश्योपक्रुष्टायस्मिन्कस्मिंश्चिदृतावादधीतसोमेनयक्ष्यमाणोनर्तृंपृच्छेन्ननक्षत्रम् ‍ सोमाधानेऋत्वाद्यनालोचनमार्तपरम् ‍ अथोखलुयदैवैन श्रद्धोपनमेदथादधीतसैवास्यर्द्धिरिति सोमेनयक्ष्यमाणोनर्तृंपृच्छेन्ननक्षत्रंतदेतदार्तस्यातिवेलंवाश्रद्धायुक्तस्यभवतीतिबौधायनोक्तेरिति मदनरत्नेवृद्धगार्ग्यः पुष्याग्नेयत्र्युत्तरादित्यपौष्णज्येष्ठाचित्रार्कद्विदैवेंदुभेषु कुर्युर्वह्न्याधानमाद्यंवसंतग्रीष्मोष्मांतेष्वेवविप्रादिवर्णाः कालादर्शे अग्निहोत्रंदर्शपूर्णमासावप्युत्तरायणे उपक्रम्ययथाकालमुपासीरन् ‍ द्विजातयः सोमंचपशुबंधंचसर्वाश्चविकृतीरपि सौम्यायनेयथाकालंविदध्युर्गृहमेधिनः अत्रविशेषः पूर्वमुक्तः ॥

रत्नमालेंत - " रोहिणी , रेवती , विशाखा , पुष्य , ज्येष्ठा , मृग , कृत्तिका , तीन उत्तरा , चित्रा , हस्त , ह्या नक्षत्रांवर गर्गादि मुनींनीं अग्न्याधान करावें असें सांगितलें आहे . " आश्वलायन - " कृत्तिका , रोहिणी , मृगशीर्ष , पूर्वाफल्गुनी , उत्तराफल्गुनी , विशाखा , उत्तराप्रोष्ठपदा हीं नक्षत्रें अग्नीच्या आधानास सांगितलीं आहेत . ह्यांतून कोणत्याही नक्षत्रावर वसंतऋतूंत पर्वाचे ठायीं ब्राह्मणानें आधान करावें . आणि ग्रीष्मऋतु , वर्षाऋतु , शरत् ‍ ऋतु यांचे ठायीं अनुक्रमानें क्षत्रिय , वैश्य , उपकुष्टा यांनीं आधान करावें . सोमयाग करावयाचा असेल तर कोणत्याही ऋतूंत आधान करावें . त्याविषयीं ऋतु व नक्षत्र यांचा विचार करुं नये . " सोमासाठीं आधानाविषयीं ऋतु वगैरे पाहूं नयेत , असें जें सांगितलें तें आर्ताविषयीं समजावें . कारण , " आतां ज्या वेळीं आधानाची श्रद्धा उत्पन्न होईल त्या वेळीं आधान करावें . तोच काल चांगला आहे . सोमाचा याग करावयाचा असेल तर ऋतु , नक्षत्र यांचा प्रश्न करुं नये . हें सांगणें आर्ताला किंवा फार दिवस श्रद्धायुक्त असेल त्याला आहे . " असें बौधायनवचन आहे . मदनरत्नांत वृद्धगार्ग्य - " ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , यांनी वसंत , ग्रीष्म , वर्षा या ऋतूंत पुष्य , कृत्तिका , तीन उत्तरा , पुनर्वसु , रेवती , ज्येष्ठा , चित्रा , रोहिणी , विशाखा , मृगशीर्ष , ह्या नक्षत्रांवर पहिलें अग्न्याधान करावें . " कालादर्शांत - " अग्निहोत्र , दर्शपूर्णमास यांचा उत्तरायणांत उपक्रम करुन द्विजातींनीं यथाकालीं ते करावे . गृहस्थाश्रम्यांनीं सोम , पशुबंध , आणि सार्‍या विकृति ह्या उत्तरायणांत यथाकालीं कराव्या . " या विषयाचा विशेषनिर्णय पूर्वीं ( प्रथम परिच्छेदांत ) सांगितला आहे .

अग्निहोत्रकालउक्तः छंदोगपरिशिष्टे उदितेनुदितेचैवसमयाध्युषितेतथा सर्वथावर्ततेयज्ञइतीयंवैदिकीश्रुतिः एतेषांस्वरुपंतत्रैव रात्रेस्तुषोडशेभागेग्रहनक्षत्रभूषिते कालंत्वनुदितंज्ञात्वाहोमंकुर्याद्विचक्षणः तथा प्रभातसमयेनष्टेनक्षत्रमंडले रविर्यावन्नदृश्येतसमयाध्युषितंचतत् ‍ रेखामात्रंप्रदृश्येतरश्मिभिश्चसमन्वितः उदितंतद्विजानीयात्तत्रहोमंप्रकल्पयेत् ‍ आश्वलायनः उषोदयंव्युषितउदितेवा सायंतुसएव अस्तमितेहोमइति गौणकालमाहसएव प्रदोषांतोहोमकालः संगवांतः प्रातरिति छंदोगपरिशिष्टे यावत्सम्यड्नभाव्यंतेनभस्यृक्षाणिसर्वतः नचलोहितिमापैतितावत्सायंतुहूयते औपासनेऽप्येवम् ‍ तस्याग्निहोत्रेणप्रादुष्करणहोमकालौव्याख्यातावित्याश्वलायनोक्तेः ॥

अग्निहोत्राचा काल सांगतो छंदोगपरिशिष्टांत - " उदित , अनुदित आणि समयाध्युषित ह्या तीन कालीं सर्व प्रकारचा यज्ञ ( होम ) होतो , असें हें वेदांतील श्रुतीनें सांगितलें आहे . " ह्या उदितादिकालांचें स्वरुप तेथेंच सांगतो - " ग्रह व नक्षत्रें यांनीं युक्त असा रात्रीच्या शेवटचा सोळावा भाग तो अनुदित काल समजावा . त्या कालीं विद्वानानें होम करावा . तसाच प्रभातकालीं सारीं नक्षत्रें अदृश्य झालीं असून जोंपर्यंत सूर्य दिसूं लागला नाहीं , तो काल समयाध्युषित समजावा . फक्त रेखा व किरण दिसूं लागले असतां तो उदित काल समजावा . त्या कालीं होम करावा . " आश्वलायन - " उषः कालीं , व्युषितकालीं किंवा उदितकालीं होम करावा . " सायंहोमाचा काल तोच सांगतो - " सूर्य अस्तंगत झाला असतां होम करावा . " गौणकाल तोच सांगतो - " सायंकालीं प्रदोषापर्यंत होमकाल आहे . आणि प्रातःकालीं संगवकालापर्यंत होमकाल आहे . " छंदोगपरिशिष्टांत - " आकाशांत सर्व बाजूंस जोंपर्यंत चांगलीं नक्षत्रें दिसूं लागलीं नाहींत , आणि आकाशाचा लालपणा गेला नाहीं तोंपर्यंत सायंकालीं होम करावा . " औपासनाच्या होमाविषयीं देखील असाच काल समजावा . कारण , " त्या औपासनाचा प्रादुष्करणकाल , आणि होमकाल हे अग्निहोत्राच्या कालानें सांगितले आहेत " असें आश्वलायनगृह्यसूत्र आहे .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:19.0070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जात्‍यांतील रडती, सुपांतील हंसती

  • जात्‍यात ओवरावयाचे दाणे जवळच सुपात ठेवलेले असतात. जात्‍यातले प्रत्‍यक्ष भरडले जात असतात व सुपांतल्‍यांची पाळी क्रमाक्रमाने यावयाची असते. त्‍याप्रमाणे काही लोक प्रत्‍यक्ष संकटात सापडलेले असतात व कांहीस त्‍याची प्रत्‍यक्ष बाधा झालेली नसली तरी ती पुढे लवकरच व्हावयाची असते. तेव्हां ज्‍यांचा क्रम नंतर आहे त्‍यांनी प्रत्‍यक्ष संकटात सापडलेल्‍या लोकांचा उपहास करण्यात किंवा आपल्‍यावर येणारे संकट दूर आहे म्‍हणून आनंद मानण्यात अर्थ नाही. त्‍यांच्याहि पुढे लवकरच तेच वाढलेले असते. ‘‘जात्‍यांतील रडती आणि सुपातील हांसती. त्‍यांची गत तो या रीतीची जाली.’’ -भाब ७०. तु०-आधणांतले रडतात-रोवळीतले सुपातले हंसतात. 
RANDOM WORD

Did you know?

सोळा मासिक श्राद्धें कोणती ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.