मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
ज्वरादिक रोगोत्पत्ति

तृतीयपरिच्छेद - ज्वरादिक रोगोत्पत्ति

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां अश्विन्यादि नक्षत्रांवर ज्वरादिक रोगोत्पत्ति असतां फल सांगतो -

अथज्वरादौफलम् ‍ श्रीपतिः स्वात्याश्लेषारौद्रपूर्वासुशाक्रेरोगोत्पत्तिर्जायतेयस्यपुंसः तद्भैषज्यव्यापृतोनिः प्रयत्नः स्याद्दुग्धाब्धेर्लब्धजन्मापिवैद्यः व्याध्युत्पत्तिर्यस्यपौष्णेसमैत्रेप्राणत्राणंजायतेतस्यकृच्छ्रात् ‍ वैश्वेसौम्येरोगमुक्तिस्तुमासाद्विंशत्यास्याद्वासराणांमघासु पक्षाद्धस्तेवासवेसद्विदैवेमूलाश्विन्योरग्निधिष्ण्येनवाहात् ‍ याम्येत्वाष्ट्रेवैष्णवेवारुणेचनैरुज्यंस्यान्नूनमेकादशाहात् ‍ अहिर्बुध्न्येतिष्यसंज्ञेयमाख्येप्राजापत्यादित्ययोः सप्तरात्रात् ‍ रोगान्मुक्तिर्जायतेमानवानांनिः संदिग्धंजल्पितंगर्गमुख्यैः ज्योतिषे एकाहोनिधनंदशाहमनिलाबाणाविपत्पर्वताः सप्तांगाविलयश्चमासयुगुलंमासोमृतिः पक्षकः द्वौमासावथविंशतिर्दशनिशाः पक्षांतपक्षानखामासौपक्षदशांतपक्षककुभः पीडादिनान्यश्विभात् ‍ दैवज्ञः उरगवरुणरौद्रावासवेंद्रत्रिपूर्वायमदहनविशाखापापवारेणयुक्ताः तिथिषुनवमिषष्ठीद्वादशीवाचतुर्थीभवतिमरणयोगोरोगिणांकालहेतुः अत्रकुंभेहैमींनक्षत्रदेवताप्रतिमांसंपूज्यद्वादशदलेषुसंकर्षणादिद्वादशमूर्तीर्द्वादशादित्यान् ‍ वासंपूज्यदूर्वासमित्तिलक्षीराज्यैर्गायत्र्यातद्देवतायैअष्टोत्तरशतंहुत्वादध्योदनंबलिंदत्वाचार्यायगांप्रतिमांचदत्वाविप्रान् ‍ भोजयेदितिसंक्षेपः विशेषस्तुव्रतहेमाद्रौपदार्थादर्शेचज्ञेयः ॥

श्रीपति - " स्वाती , आश्लेषा , आर्द्रा , तीन पूर्वा , ज्येष्ठा ह्या नक्षत्रांवर ज्या पुरुषाला रोगोत्पत्ति होते त्याला औषधसेवनादि उपाय करण्याविषयीं वैद्य प्रयत्न करील तर ते व्यर्थ होतील . रेवती , अनुराधा ह्या नक्षत्रांवर ज्वरादिक उत्पन्न होईल तर संकटानें त्याचें प्राणरक्षण होईल . उत्तराषाढा , मृग ह्या नक्षत्रांवर रोगोत्पत्ति असतां तीस दिवस पीडा होईल . मघानक्षत्रावर रोगोत्पत्ति असतां वीस दिवस पीडा . हस्त , धनिष्ठा , विशाखा ह्या नक्षत्रांवर रोगोत्पत्ति असतां पंधरा दिवस पीडा . मूल , अश्विनी , कृत्तिका ह्या नक्षत्रांवर रोगोत्पत्ति असतां नऊ दिवस पीडा . भरणी , चित्रा , श्रवण , शततारका ह्या नक्षत्रांवर रोगोत्पत्ति असतां निश्चयें अकरा दिवसांनीं निरोगी होईल . उत्तराभाद्रपदा , पुष्य , भरणी , रोहिणी , पुनर्वसु या नक्षत्रांवर रोगोत्पत्ति असतां निश्चयें सात दिवसांनीं रोगनिरसन होतें असें गर्गप्रभृति ऋषि सांगतात . " ज्योतिषांत - " अश्विन्यादि नक्षत्रांवर रोगोत्पत्ति झाली असतां क्रमेंकरुन पीडा दिवस सांगतो - अश्विनीवर रोग असतां एक दिवस पीडा , भरणीवर रोग असतां मरण , कृत्तिकांवर दहा दिवस , रोहिणी - सात दिवस , मृग - पांच दिवस , आर्द्रा - मृत्यु , पुनर्वसु - सात दिवस , पुष्य - सात दिवस , आश्लेषा - सहा दिवस , मघा - मरण , पूर्वा - दोन महिने , उत्तरा - एक महिना , हस्त - मरण , चित्रा - पंधरा दिवस , स्वाती - दोन महिने , विशाखा - वीस दिवस , अनुराधा - दहा दिवस , ज्येष्ठा - पंधरा दिवस , मूळ - मृत्यु , पूर्वाषाढा - पंधरा दिवस , उत्तराषाढा - वीस दिवस , श्रवण - दोन महिने , धनिष्ठा - पंधरा दिवस , शततारका - दहा दिवस , पूर्वाभाद्रपदा - मृत्यु , उत्तराभाद्रपदा - पंधरा दिवस , रेवती - दहा दिवस पीडा होते . " दैवज्ञ - " आश्लेषा , शततारका , आर्द्रा , धनिष्ठा , ज्येष्ठा , तीनपूर्वा , भरणी , कृत्तिका , विशाखा यांतून कोणतें एक नक्षत्र असून त्या दिवशीं पापवार ( रवि , मंगळ , शनि ) असेल व नवमी , षष्ठी , द्वादशी , चतुर्थी ह्या तिथींपैकीं कोणती एक तिथि ह्या तिहींचा योग असतां त्या दिवशीं जर रोगोत्पत्ति होईल तर निश्चयानें मृत्यु येतो . " यांविषयीं शांति - ज्या नक्षत्रावर ज्वरादि रोग उत्पन्न झाला असेल त्या नक्षत्रदेवतेची सुवर्णप्रतिमा करुन तिची कलशावर स्थापना करुन पूजा करावी . नंतर द्वादशदलकमलावर संकर्षणादिक बारा मूर्ति , किंवा बारा आदित्य यांची पूजा करुन दूर्वा , समिधा , तिल , दुग्ध आणि आज्य यांहींकरुन गायत्रीमंत्रानें त्या देवतेच्या उद्देशानें १०८ होम करुन दधिभाताचा बलि देऊन आचार्याला गोप्रदान व प्रतिमादान करावें . आणि ब्राह्मणांना भोजन घालावें . याप्रमाणें हा संक्षेपानें प्रयोग सांगितला आहे . याचा विशेष विचार व्रतहेमाद्रि पदार्थादर्श ह्या ग्रंथांत पाहावा .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP