TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
जीर्णोद्धार

तृतीयपरिच्छेद - जीर्णोद्धार

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


जीर्णोद्धार

आतां जीर्णोद्धार सांगतो -

अथजीर्णोद्धारः सचलिंगादौदग्धेभग्नेचलितेवाकार्यः अयंचानादिसिद्धप्रतिष्ठितलिंगादौभंगादिदुष्टेपिनकार्यः तत्रतुमहाभिषेकंकुर्यादितित्रिविक्रमः कर्तामुकदेवस्यजीर्णोद्धारंकरिष्येइत्युक्त्वा पुण्याहंवाचयित्वानांदीश्राद्धांतंकृत्वाआचार्यमृत्विजश्चवृत्वापीठेमंडलदेवताआवाह्य लिंगेॐव्यापकेश्वरह्रदयायनमः ॐव्यापकेश्वरशिरसेस्वाहेत्येवंषडंगंकृत्वा देवतांतरेमूलमंत्रेणषडंगंकृत्वाअर्चयेत् ‍ अघोरमंत्रंअष्टोत्तरशतंजप्त्वाऽग्निंप्रतिष्ठाप्याघोरेणघृतसर्षपैः सहस्त्रंहुत्वा इंद्रादिभ्योनाम्नाबलिंदत्वाजीर्णदेवंप्रणवेनसंपूज्यसाज्यतिलैर्ब्रह्मादिमंडलदेवतानांहोमंपूर्वोक्तंकृत्वादेवंप्रार्थयेत् ‍ जीर्णभग्नमिदंदेवसर्वदोषावहंनृणाम् ‍ अस्योद्धारेकृतेशांतिः शास्त्रेऽस्मिन् ‍ कथितात्वया जीर्णोद्धारविधानंचनृपराष्ट्रहितावहम् ‍ तदधस्तिष्ठतांदेवप्रहरामितवाज्ञयेति ततः क्षीराज्यमधुदूर्वाभिः समिद्भिश्चाष्टोत्तरसहस्त्रंअष्टोत्तरशतंवादेवमंत्रेणहुत्वांऽगानांदशांशेनलिंगचालनार्थंसहस्रंशतंवापायसेनहुत्वालिंगंप्रार्थयेत् ‍ लिंगरुपंसमागत्ययेनेदंसमधिष्ठितम् ‍ यायास्त्वंसंमितंस्थानंसंत्यज्यैवशिवाज्ञया अत्रस्थानेचयाविद्यासर्वविद्येश्वरैर्युता शिवेनसहसंतिष्ठेतिमंत्रितजलेनाभिषिच्यविसर्जयेत् ‍ ततोऽस्त्रमंत्रितेनखनित्रेणखात्वा लिंगमादायनद्यादौवामदेवेनलिंगंप्रणवेनमूर्तिंक्षिपेत् ‍ दारुजंतुमधुनाऽभ्यज्याघोरेणदहेत् ‍ हेमरत्नादिमयंतुदग्धंचलितंवापुनस्तत्रैवस्थापयेत् ‍ ततः शांत्यैअघोरेणतिलैः सहस्त्रंहुत्वाप्रार्थयेत् ‍ भगवन् ‍ भूतभव्येशलोकनाथजगत्पते जीर्णलिंगसमुद्धारः कृतस्तवाज्ञयामया अग्निनादारुजंदग्धंक्षिप्तंशैलादिकंजले प्रायश्चित्तायदेवेश अघोरास्त्रेणतर्पितम् ‍ ज्ञानतोऽज्ञानतोवापियथोक्तंनकृतंयदि तत्सर्वंपूर्णमेवास्तुत्वत्प्रसादान्महेश्वरेति ततोयजमानः प्रार्थयेत् ‍ गोविप्रशिल्पिभूतानामाचार्यस्यचयज्वनः शांतिर्भवतुदेवेशअच्छिद्रंजायतामिदम् ‍ मूर्तौतुविशेषः त्वत्प्रसादेननिर्विघ्नंदेहंनिर्माययत्यसौ वासंकुरुसुरश्रेष्ठतावत्त्वंचाल्पकेगृहे वसन्क्लेशंसहित्वेहमूर्तिंवैतवपूर्ववत् ‍ यावत्कारयतेभक्तः कुरुतस्यचवांछितमिति ततोनवांमूर्तिंलिंगंवाकृत्वोक्तविधिनास्थापयेत् ‍ मूलंत्वग्निपुराणेस्पष्टम् ‍ इतिजीर्णोद्धारः ॥

तो जीर्णोद्धार लिंग किंवा प्रतिमा दग्ध , भग्न किंवा चलित झाली असतां करावा . हा जीर्णोद्धार , अनादि व सिद्धानें प्रतिष्ठित असें लिंग वगैरे असेल तर त्या ठिकाणीं भंगादि दोष उत्पन्न झाला असला तरी करुं नये . त्या ठिकाणीं महाभिषेक करावा , असें त्रिविक्रम सांगतो . जीर्णोद्धाराचा प्रयोग - कर्त्यानें ‘ अमुकदेवस्य जीर्णोद्धारं करिष्ये ’ असा संकल्प करुन पुण्याहवाचन नांदीश्राद्ध करुन आचार्य आणि ऋत्विज यांना वरुन लिंगाचे ठायीं ‘ ॐ व्यापकेश्वर ह्रदयायनमः , ’ ‘ ॐ व्यापकेश्वर शिरसेस्वाहा ’ याप्रमाणें षडंगन्यास करुन इतर देवतेचे ठायीं मूलमंत्रानें षडंगन्यास करुन पूजा करावी . नंतर ‘ अघोर० ’ ह्या मंत्राचा एकशेंआठ जप करुन अग्निस्थापन करुन ‘ अघोर० ’ ह्या मंत्रानें घृतयुक्त सर्षपांनीं एक सहस्र होम करुन इंद्रादि देवतांना नाममंत्रानें बलि देऊन जीर्णदेवाची प्रणवानें पूजा करुन ब्रह्मादिमंडलदेवतांचा पूर्वीं ( प्रतिष्ठेंत ) सांगितलेला होम करुन देवाची प्रार्थना करावी . ती अशी - ‘ जीर्णभग्नमिदं देव सर्वदोषावहं नृणां ॥ अस्योद्धारे कृते शांतिः शास्त्रेस्मिन् ‍ कथिता त्वया ॥ जीर्णोद्धारविधानं च नृपराष्ट्रभयावहम् ‍ ॥ तदधस्तिष्ठतां देव प्रहरामि तवाज्ञया ॥ ’ नंतर दूध , आज्य , मध , दूर्वा यांचा आणि समिधांचा अष्टोत्तरसहस्त्र किंवा अष्टोत्तरशत देवमंत्रानें होम करुन अंगांचा दशांशानें होम करुन लिंगचालनासाठीं सहस्त्र किंवा शत पायसाचा होम करुन लिंगाची प्रार्थना करावी . ‘ लिंगरुपं समागत्य येनेदं समधिष्ठितम् ‍ ॥ यायास्त्वं संमितं स्थानं संत्यज्यैव शिवाज्ञया ॥ अत्रस्थाने च या विद्या सर्वविद्येश्वरैर्युता ॥ शिवेन सह संतिष्ठ ’ याप्रमाणें प्रार्थना करुन मंत्रितजलानें अभिषेक करुन विसर्जन करावें . नंतर अस्त्रानें मंत्रित असें खनित्र ( कुदळ वगैरे ) घेऊन खणून तें लिंग घेऊन वामदेवमंत्रानें तें लिंग , मूर्ति असेल तर प्रणवानें ती मूर्ति नदीच्या वगैरे उदकांत टाकावी . काष्ठाचें लिंग वगैरे असेल तर मधानें भिजवून अघोरमंत्रानें दहन करावें . सुवर्णादि धातूचें किंवा रत्नाचें असेल तर नीट करुन पुनः त्याच ठिकाणीं स्थापन करावें . तदनंतर शांतीकरितां अघोरमंत्रानें तिलांचा सहस्र होम करुन प्रार्थना करावी . ती अशी - ‘ भगवन् ‍ भूतभव्येश लोकनाथ जगत्पते ॥ जीर्णलिंगसमुद्धारः कृतस्तवाज्ञया मया ॥ अग्निना दारुजं दग्धं क्षिप्तं शैलादिकं जले ॥ प्रायश्चित्ताय देवेश अघोरास्त्रेण तर्पितम् ‍ ॥ ज्ञानतो‍ऽज्ञानतो वापि यथोक्तं न कृतं यदि ॥ तत्सर्वं पूर्णमेवास्तु त्वत्प्रसादान्महेश्वर ॥ " तदनंतर यजमानानें प्रार्थना करावी , ती अशी - " गोविप्रशिल्पिभूतानामाचार्यस्य च यज्वनः ॥ शांतिर्भवतु देवेश अच्छिद्रं जायतामिदम् ‍ ॥ ". नवी मूर्ति करावयाची असेल तर विशेष सांगतो - ‘ त्वत्प्रसादेन निर्विघ्नं देहं निर्माययत्यसौ ॥ वासं कुरु सुरश्रेष्ठ तावत्त्वं चाल्पके गृहे ॥ वसन्क्लेशं सहित्वैव मूर्ति वै तव पूर्ववत् ‍ ॥ यावत्कारयते भक्तः कुरु तस्य च वांछितम् ‍ ॥ ’ अशी प्रार्थना करुन नवी मूर्ति किंवा नवें लिंग करुन पूर्वीं सांगितलेल्या विधीनें स्थापन करावें . या जीर्णोद्धाराचीं मूलवचनें अग्निपुराणांत सांगितलीं आहेत .

इति जीर्णोद्धारविधि समाप्त झाला .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:19.7700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चालता कूच

 • न थांबतां, मुक्काम न करतां मार्गआक्रमण 
 • एकसारखी चाल 
 • टाकोटाक जाणें. तु०-चढेघोड्यानिशी जाणें. 
RANDOM WORD

Did you know?

भक्त आणि भक्ती या संकल्पना स्पष्ट कराव्यात.
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.